आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०१८

आठवड्याची सुरुवात दमदार झाली. ३८७०० वर सेन्सेक्स आणि ११७०० वर निफ्टीने मजल मारली.सेन्सेक्स जवळ जवळ ४५० पाईंट्स वर होते. आज सेक्टर रोटेशन जाणवत होते. फार्मा आणि लेदरगुड्समध्ये प्रॉफिटबुकिंग तर बँकिंग आणि पॉवर सेक्टरच्यामध्ये तेजी होती.

पॉवर सेक्टर संबंधी सरकारची मीटिंग आहे. पॉवर सेक्टर मधील कंपन्यांना NCLT च्या कक्षेबाहेर ठेवले जाईल अशी शक्यता आहे.

सेबीने ADDITIONAL एक्स्पोजर मार्जिनसाठी ज्या कंपन्यांची यादी बनवली आहे त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात १७ कंपन्या होत्या तर सप्टेंबरमध्ये १४ कंपन्यांना सामील केले आहे. NCC चा समावेश केला आहे तर इन्फिबीम, इंडिया सिमेंट. कर्नाटक बँक, सेंच्युरी टेक्सटाईल या कंपन्यांना लिस्टमधून बाहेर काढले आहे.

JB केमिकल्सच्या पनोली प्लांटची तपासणी USFDA ने पुरी केली. यामध्ये दोन त्रुटी दाखवल्या. पण त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार नाही असे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले.

रुपया घसरल्यामुळे BPL आणि मर्क इलेक्ट्रॉनिक्स त्यांच्या उत्पादनांच्या किमती ५% ते १०% वाढवणार आहेत.
पुंज लॉईडने ICICI बँकेबरोबर बोलणी करून कर्जाची परतफेड केली.

अनिल अंबानी यांनी रिलायन्स NAVAL या कंपनीच्या डायरेक्टरशीपचा राजीनामा दिला.

आज RBI ने ७० NPA खात्यांच्या Rs ४ लाख कोटीच्या कर्जाचे रेझोल्यूशन करण्याची मुदत संपली. थोड्याच दिवसांत हे NPA अकौंट्स NCLT मध्ये जातील. SBI ने असे सांगितले की यापैकी पॉवर सेक्टरमधील ७ NPA खात्यांमध्ये काही मार्ग निघू शकेल. पण इतर सेक्टरमधील खात्यांबाबातीत ही आशा आहे असे म्हणता येत नाही. सप्टेंबर २०१८ मध्ये NPA खात्यांसाठी AMC स्थापन केली जाण्याची शक्यता आहे.

एस्कॉर्टने मोबाईल क्रेन उत्पादनासाठी TADANO या जपानी कंपनीबरोबर करार केला.

विमान वाहतुकीसाठी इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करता यावा म्हणून सरकार वेगळे धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे.

वॉरेन बफेट हे त्यांच्या बर्कशायर हाथवे या कंपनी मार्फत PAYTM मध्ये ३% ते ४% स्टेक Rs २००० ते Rs २५०० कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे.

हॉर्लिक्स आणि इतर ब्रॅण्ड्स विकून GSK CONSUMER या कंपनीला प्रती शेअर Rs ३००० मिळण्याची शक्यता आहे.
हेक्झावेअरमधील शेअर प्रमोटर्स विकत आहेत. पुन्हा एकदा शेअर्स विकले तर या शेअरचा भाव Rs ४०० प्रती शेअर पर्यंत खाली येईल असा अंदाज आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या परदेशात असलेल्या ७० शाखा बंद करायला सरकारने सांगितले आहे.
भारतातील ३ पोर्ट ड्रेजिंग कॉर्पोरेशन मधील स्टेक विकत घेणार आहेत.

बंधन बँकेने PNB हाऊसिंग मधील स्टेक विकत घेण्याचा निर्णय काही लोकांना बरोबर वाटला तर काही लोकांना पटला नाही. बँकेच्या स्थापनेपासून ३ वर्षाच्या आंत प्रमोटर्सचे होल्डिंग कमी करून ४० % पर्यंत आणले पाहिजे असा सेबीचा नियम आहे. बँकेच्या स्थापनेला ३ वर्ष व्हायला काही दिवसच बाकी आहेत पण अजूनही प्रमोटर होडींग ८३% आहे. हे प्रमोटर होल्डिंग कमी करण्याची ही एक चांगली संधी आहे असे काही जणांना वाटते. पूर्णतः स्टॉक ऑप्शनच्या माध्यमातून किंवा काही प्रमाणात स्टॉक आणि काही प्रमाणात कॅश अशी ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरी बाजू पाहता बंधन बँकेचा शेअर ५२ WEEK हायला आहे. पण दोन्हीही ऑर्गनायझेशनच्या साईझचा विचार करता PNB हौसिंग बंधन बँकेच्या ३पट मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष लक्षवेधी

  • RITES आणि LIC हौसिंगचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी आला.
  • अमृतांजन या कंपनीने अमेझॉन या कंपनीबरोबर करार केला
  • आज स्पाईस जेटने BIOFUEL वर विमान चालवण्याची डेहराडून ते दिल्ली या मार्गावर ट्रायल घेतली. तर काही दिवसांनी BIOFUEL विमानाच्या इंधनात मिसळल्यास विमानाच्या इंधन खर्चात बचत होईल आणि विमानवाहतुकीच्या उद्योगात क्रांती येईल. म्हणून जेट एअरवेजचा शेअरही वाढला.

वेध उद्याचा

भेल ही कंपनी आपल्या नियमात ‘शेअर BUY BACK’ करता यावे म्हणून १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि इतर नियमात बदल करण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६९४ NSE निर्देशांक निफ्टी ११६९१ आणि बँक निफ्टी २८२६४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.