आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१८

कोणत्याही अडथळ्यांना जुमानायचे नाही, कशालाही दाद द्यायची नाही असेच जणू मार्केटने ठरवले आहे. रुपया US $ १= ७०.३० पर्यंत घसरला, क्रूड US $ ७६.१४ प्रती बॅरेल, पुट/कॉल रेशियो १.८६ अशी सगळी नकारात्मक स्थिती असतानाही मार्केट पुढे पुढे जात राहिले. आज अडानी ग्रुपचे शेअर्स, MNC फार्मा कंपन्या, खत उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांचे सहकार्य मार्केटला मिळाले.

खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना जी सबसिडी मिळते ती प्रत्येक आठवड्याला DBT योजनेमार्फत मिळेल असे सरकारने जाहीर केले. त्यामुळे RCF, FACT, चंबळ, कोरोमंडल, GSFC, मद्रास फर्टिलायझर अशा खताच्या कंपन्या तेजीत होत्या.
अलाहाबाद हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार पॉवर कंपन्यांना कोणतेही सहकार्य मिळाले नाही. म्हणून पॉवर कंपन्यांमध्ये कन्सॉलिडेशन होणे गरजेचे आहे असे वाटले. अडानी पॉवर  GMR छत्तीसगढ एनर्जी विकत घेण्याच्या तयारीत आहे.
ट्रम्प हे USA चे अध्यक्ष मेक्सिको आणि USA यांच्या मध्ये भिंत बांधण्याची भाषा करत होते. आता हे वातावरण बदलून USA NAFTA ( नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेंड अग्रीमेंट)  करायला तयार झाले आहे. या अग्रीमेंटमुळे  कॅनडावर दबाव येईल, नवीन तरतुदी  मान्य कराव्या लागतील आणि तंटे मिटवावे लागतील. मेक्सिकोमध्ये ऑटो पार्ट्स बनवणार्या बऱ्याच भारतीय कंपन्या आहेत. त्यांना फायदा होण्याची शक्यता दिसते आहे. यात GNA  ऍक्सल्स, मदर्सन सुमी, मिंडा  इंडस्ट्रीज या ऑटो अँसिलरी क्षेत्रातील कंपन्यांचा यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश राज्य सरकार साखर उद्योगाला  Rs ४९६० कोटी (Rs ५० प्रती टनच्या हिशेबाने) देणार आहे. याचा फायदा UP तील  साखर उत्पादक कंपन्यांना होईल – बलरामपूर चिनी धामपूर शुगर, बजाज हिंदुस्थान…

१५ वर्षांपेक्षा जुन्या गाड्या मोडीत काढाव्यात ( रस्त्यावरून हटवाव्यात) असा आदेश दिल्ली राज्य सरकारने काढला. याचा फायदा मागणी वाढल्यामुळे सगळ्या ऑटो कंपन्यांना होईल.

ICICI प्रुडेन्शियलने  ४० लाख शेअर्स विकून IPO साठी मदत केली हे सेबीला पटले नाही. म्हणून सेबीने नोटीस पाठवली.
गेलचे विभाजन होणार नसून गेल त्यांचा पेट्रोरसायन व्यवसाय विकणार आहे.

जेट एअरवेजच्या  डोक्यावरील टांगती तलवार नाहीसी झाली निकाल खराब आले पण अनिश्चितता संपली आणि जी कॉस्टकटिंग मेजर्स जेटच्या व्यवस्थापनाने सांगितली ती  मार्केटला पटली  आणि शेअर वाढला.

विशेष लक्षवेधी
  • ऑइल ब्लॉक्सच्या लिलावात ऑइल इंडियाला ९, वेदांताला ४१ , गेलला १ आणि ONGC २ असे ऑइल ब्लॉक्स अलॉट झाले.
वेध उद्याचा 
  • फ्युचर ग्रुपची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या आहे. यामध्ये स्टेक घेण्यासाठी गूगल अमेझॉन यांनी रस दाखवला आहे. फ्युचर ग्ररुपच्या भावी योजना या सभेत जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • एल आय सी आणि IDBI च्या डील च्या संदर्भात एल आय सी ला १४.९ % प्रेफरन्स शेअर्स जारी करण्याचे ठरले. आणि
  • ३६% स्टेक एल आय सी घेणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ओपन ऑफरवर विचार करण्यासाठी एल आय सीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग  आहे.
  • अर्थ मंत्रालयाने जाहीर केले की ३० ऑगस्ट २०१८ रोजी होणाऱ्या S & P बरोबरच्या मीटिंगमध्ये भारताचे रेटिंग अपग्रेड करण्यावर विचार होण्याची शक्यता  आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८९६ NSE निर्देशांक निफ्टी ११७३८ आणि बँक निफ्टी २८२६९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.