आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१८

आज मार्केटमध्ये गोंधळच होता आणि हा गोंधळ काही मूलभूत फरकामुळे होता. आज निफ्टी ५०, निफ्टी नेक्स्ट ५०, मिडकॅप ५० या मधील काही शेअर्स वगळले तर काही नवीन शेअर्सचा समावेश केला. निफ्टी ५० मध्ये २८ सप्टेंबर २०१८ पासून JSW स्टीलचा समावेश असेल तर ल्युपिन या निर्देशांकातून बाहेर पडेल. निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये बंधन, बायोकॉन, HDFC स्टॅंडर्ड लाईफ, ICICI लोंबार्ड, न्यू इंडिया अशुअरन्स आणि ल्युपिन यांचा समावेश करणार. तर PNB,कमिन्स, इमामी, JSW स्टील, PFC आणि REC यांचा समावेश असणार नाही. मिडकॅप ५० मधून IDFC, PC ज्युवेलर्स, अडानी पॉवर, बायोकॉन, इंजिनिअर्स इंडिया बाहेर पडतील. मिडकॅप ५० मध्ये PNB, कमिन्स आणि ज्युबिलन्ट फूड यांचा समावेश केला जाईल.

असेच बदल निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ही बदल केले. ९ शेअर्स मध्ये बदल केले. ज्या शेअरचा समावेश केला जातो ते चांगले तर ज्या शेअर्सना वगळले ते शेअर्स वाईट असे गृहीत धरले जाते. म्हणून JSW स्टीलचा शेअर वाढला तर ल्यूपीनचा शेअर पडला.

F & O मधील शेअर्सची तुम्ही फिझिकल डिलिव्हरी घेत असाल तर STT भरावा लागेल. पूर्वी जे पैसे भरावे लागत होते ते Rs १ कोटीच्या व्यवहारावर Rs १००० पडत होत.आता त्यासाठी Rs १०००० भरावे लागतील. मिडकॅपमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांना याचा जास्त त्रास होईल. या सर्व गोंधळामुळे प्रत्येकाला आपापली पोझिशन आज आणि उद्या अड्जस्ट करावी लागेल.
IRDA ने विमा पॉलिसीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. ३ वर्ष आणि ५ वर्षाच्या पॉलिसीचे प्रीमियम ताबडतोब भरावे लागतील याचा फायदा GIC RE आणि न्यू इंडिया यांना होईल.

३१ ऑगस्टला YES बँकेचे MD राणा कपूर यांची मुदत संपत आहे त्यांना पुन्हा या पदावर नेमले जाईल की नाही अशी शंका आल्यामुळे येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता आहे.

SBI ला त्यांचा NSE मधील ३.८९% स्टेक विकण्यासाठी मंजुरी मिळाली. त्याच प्रमाणे SBI च्या कन्सॉरशियमने हिंदुस्थान नॅशनल ग्लासकडून Rs २००० कोटी ९० दिवसात घेण्याचे मान्य केले. त्यामुळे हिंदुस्थान नॅशनल ग्लास ही कंपनी NCLT मध्ये जाण्यापासून बचावली.

USA ने H१B व्हिसासाठी जे निर्बंध लागू केले होते, त्या निर्बंधांची मुदत ५ महिने वाढवली. याचा परिणाम IT क्षेत्रातील सर्व शेअर्सवर झाला.

जेट एअरवेजच्या अडचणी संपलेल्या दिसत नाहीत. जेट एअरवेज आणि गोदरेज बिल्डकॉन लँड डेव्हलपमेंट डीलची आयकर विभाग तपासणी करणार आहे.

केरळच्या पुराचा परिणाम ओणम हा सण साजरा करण्यावर होईल, आणि व्हाइट गुड्ससाठी असलेली मागणी कमी होईल हे विचारात घेऊन हिरोमोटोने केरळसाठी ३०% डिस्कॉउंट जाहीर केला. आणि त्याच प्रमाणे केरळमधील लोकांना कोणताही दुरुस्तीचा चार्ज द्यावा लागणार नाही असे जाहीर केले.

रिलायन्स इन्फ्राचा मुंबईमधील इलेक्ट्रिसिटी वितरणाचा बिझिनेस आज अडाणी ट्रान्समिशनकडे सुपूर्द केला जाईल.
ONGC आंध्र प्रदेशमधील ७२ तेल विहिरिंच्या विस्तारावर Rs ८०० कोटी खर्च करणार आहे.

कॅडीला हेल्थकेअरच्या अडचणी अजूनही संपलेल्या दिसत नाहीत. २० ते २८ ऑगस्ट २०१८ या काळात USFDA केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये ५ त्रुटी दाखवल्या आणि १५ दिवसात यावर उत्तर देण्यास सांगितले. तोपर्यंत USA मध्ये कोणतीही प्रॉडक्ट्स निर्यात करता येणार नाही असे सांगितले.

विशेष लक्षवेधी

TANFAK या कंपनीचे निकाल चांगले आले. कॅम्लिन फाईन हा शेअर मात्र खूप पडत आहे त्याचे कारण समजू शकले नाही.
आज रुपया US $ १ =Rs ७०.५१ पर्यंत घसरला. हा रुपयाचा US $ बरोबरचा न्यूनतम दार आहे. पुट/कॉल रेशियो २ पेक्षा जास्त झाला होता. व्याजाचा दर, रुपयांचा विनिमय दर आणि कच्च्या मालाच्या किमती ( इंटरेस्ट रेट, INR आणि इनपुट कॉस्ट) अशा ३ गोष्टींवर मार्केटचे लक्ष केंद्रित असेल

वेध उद्याचा

निफ्टी ५० आणि इतर निर्देशांकांची रचना बदलत असल्यामुळे खरेदी विक्री साठी चांगली संधी मिळेल. त्यात उद्या वायदेबाजाराची एक्स्पायरी आहे १,२ सप्टेंबर रोजी ऑटो विक्रीचे आणि सिमेंट विक्रीचे आकडे जाहीर होतील. ज्या शेअरमध्ये रोल ओव्हर जास्त प्रमाणात असेल ते शेअर पुढील महिन्यात चालतात असा एक ढोबळ अंदाज आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८७२२ NSE निर्देशांक निफ्टी ११६९१ आणि बँक निफ्टी २८२२४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.