आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१८

आज मार्केटमध्ये वायदे बाजाराच्या ऑगस्ट एक्स्पायरीची धामधूम जास्त होती. जेवढे मार्केट पडले तेवढेच शेवटच्या अर्ध्या तासात सावरले. विदेशी बाजारातले संकेत चांगले असूनही रुपयाचे होणारे अवमूल्यन आणि वाढणारी क्रूडची किंमत यामुळेच ट्रेडिंग करताना गोंधळ उडत होता

प्रत्येक सिरीजमध्ये ITC चा शेअर वाढताना दिसतो आहे. ITC चे अनेक व्यवसाय आहेत. ITC हॉटेल, पेपर बोर्ड, PACKAGING, ऍग्री बिझिनेस, IT, FMCG या क्षेत्रात बिझिनेस करत आहे. ITC चा प्रमुख व्यवसाय सिगारेटचा असला तरी ITC ने बाकीच्या व्यवसायातही चांगले पाय रोवले आहेत. पूर्वी प्रत्येक अंदाजपत्रकात ITC वर भरमसाठ कर लावले जात होते. पण आता काही वेळेला कर वाढवला नाही तर GST च्या कररचनेमध्ये पूर्वी पेक्षा कमी कर द्यावा लागतो. ITC च्या बाकीच्या बिझिनेसमध्ये प्रगती दिसत आहे कायदेशीर अडचणींचा दबाव कमी होत आहे आणि FMCG मधील फायदा वाढत आहे.ITC ऍग्री आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रात भरपूर गुंतवणूक करीत आहे.त्यामुळे रीरेटिंगची शक्यता आहे.
MNC फार्मा कंपन्यांची चलती आहे. यामध्ये GSK फार्मा, PFIZER, ABBOTT LAB, सनोफी, प्रॉक्टर & गॅम्बल आणि मर्क, नोव्हार्टीस तसेच अस्त्राझेनेका यांचा समावेश आहे. पण फार्मा क्षेत्रात इतके दिवस या MNC कंपन्यांचा वाटा कमी होता. सरकारने आरोग्यावरचा खर्च वाढवून आरोग्यविषयक योजनांना त्वरित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या MNC कंपन्या त्यांची प्रॉडक्ट्स आणि रोगप्रतिबंधक लसी भारतात आणत आहेत.. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लागत नाही आणि जी दुकानात सहजपणे उपलब्ध होऊ शकतात अशी ब्रँडेड प्रोडक्ट्स या MNC कंपन्या विकत आहेत.

रिलायन्स इंफ्राने त्यांचा मुंबईतील पॉवर बिझिनेस अडानी ट्रान्समिशनला Rs १८८०० कोटींना विकला.त्यामुळे रिलायन्स इन्फ्राचे कर्ज Rs ७५०० कोटी बाकी राहील. रिलायन्स इन्फ्राला मिळालेल्या आर्बिट्रेशन अवॉर्डमधून Rs ६००० कोटी मिळतील. त्यामुळे सात आठ महिन्यामध्ये कंपनी DEBTFREE होईल असे व्यवस्थापनाने सांगितले.

टाटा केमिकल्समध्ये काही कॉर्पोरेट एक्शन अपेक्षित होती म्हणून मोठ्या मोठ्या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केली होती. ही कॉर्पोरेट एक्शन होत नाही असे पाहिल्याबरोबर म्युच्युअल फंडांनी विक्री करायला सुरुवात केली. त्यामुळे शेअर पडत आहे. त्याविरुद्ध TRIDENT मध्ये प्रमोटर्स पासून सगळ्यांची खरेदी चालू आहे म्हणून शेअर वाढत आहे.

ग्रीव्हज कॉटन ने AMPERE व्हेइकल्स मध्ये ६७% हिस्सा Rs ७७ कोटींना घेतला. त्यामुळे ही कंपनी इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या व्यवसायात उतरत आहे असा मार्केटने कयास बांधला.

मॉर्गन स्टॅन्लेने कॅम्लिन फाइन या कंपनीतील आपली हिस्सेदारी विकल्यामुळे हा शेअर पडला. ज्यावेळेला शेअरचे सर्किट वाढवले जाते तेव्हा ते चांगले चिन्ह समजले जाते. AURINPRO या कंपनीचे सर्किट ५% वरून २०% चे केले त्यामुळे शेअरची किंमत चांगलीच वाढली.

चहाच्या किमती Rs २० ते Rs २५ प्रती किलो वाढणार आहेत म्हणून चहाचे शेअर्स तेजीत होते.

विशेष लक्षवेधी

 • ६ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान टी सी एस या कंपनीचा BUY बॅक चालू राहील. ४ सप्टेंबर रोजी इन्फोसिस एक्स बोनस होईल.

वेध उदयाचा

उद्यापासून १४ शेअर्सवर जादा एक्स्पोजर मार्जिन द्यावे लागेल. जून २०१८ साठी GDP चे आकडे जाहीर होतील. ३१ पॉवर कम्पन्यांसाठी बैठक होईल. ३ सप्टेंबर पासून MSCI निर्देशांका मध्ये बदल होतील. पेज इंडस्ट्रीचा समावेश होईल आणि वकरांगी बाहेर पडेल. २५ आणि २६ सप्टेंबरला फेडरल रिझर्व्हची मीटिंग आहे यामध्ये बहुतेक व्याज दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. एल आय सी आणि IDBI यांच्या डीलच्या संदर्भातील सुनवाई ४ सप्टेंबर रोजी होईल. पुढील महिन्यापासून दुचाकीच्या ( मोटार सायकल आणि स्कुटर्स ) किमती Rs ३००० ने वाढवल्या जातील.थर्ड पार्टी इन्शुअरन्स मुळे या किमती वाढवाव्या लागत आहेत असा खुलासा कम्पन्यांनी केला. नैसर्गीक गॅसच्या किमती वाढवण्याची घोषणा सरकार उद्या करण्याची शक्यता आहे याचा फायदा ONGC, ऑइल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज यांना होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६९० NSE निर्देशांक निफ्टी ११६७६ आणि बँक निफ्टी २८१०३ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१८

 1. Ravi Patankar

  Review after mkt closing is not worth.More important is what will happen tomorw and what to buy or sell tomorw,Pl rethink.

  Reply
  1. surendraphatak

   Namaskar Ravi, Thanks for your feedback but I would disagree with that. I try to explain things that happen so people understand why they happen. If we understand the cause and effect relationship then we are in a better position to predict what will happen in future. That is always my motivation.

   Another thing is I never suggest which stocks to buy/ sell or when. I am not in that business. I believe in empowering people to make their own decisions by making them educated. If you are looking for tips on what to buy or sell then you are on the wrong website.

   Thanks

   Bhagyashree Phatak

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.