Monthly Archives: August 2018

आजचं मार्केट – १६ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ऑगस्ट २०१८

आज सर्व ASSET CLASSES मध्ये मंदी दिसून आली. क्रूड US $ ७१ च्या ही खाली गेले, रुपया मार्केट बंद होता होता US $ १= Rs  ७०.२८ होता. कॉपर ,अल्युमिनियम,स्टील, झिंक तसेच सोनेचांदी  आणि  इतर धातूंचे भाव पडत होते.  अशा प्रकारे सर्व ASSET CLASSES च्या किमती पडू लागलया  की निराशा आली असे समजतात.
RBI ला कोटक बँकेच्या प्रमोटरचा हिस्सा कमी करण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य वाटली. एकदा कोटक बँकेला अशी परवानगी दिली की इतर बँका उदा यस बँक, ऍक्सिस बँक हीच पद्धत वापरतील. त्यामुळे हिस्सा कमी करण्याच्या मागचा RBI चा उद्देश सफल होणार नाही.
सरकार दोनशे कंपन्या आणि त्यांना कर्ज देणार्या बँका यांची चौकशी करणार आहे. या कंपन्यांना कर्ज देताना नियम कसोशीने पाळले गेले आहेत का आणि या खात्यांसाठी पुरेशी प्रोव्हिजन केली  आहे का ते पाहणार आहे. यामध्ये व्हिडिओकॉन आणि JSPL या कंपन्यांचाही समावेश आहे.
आज पेपर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. गेल्या वर्षी या कंपन्यांना पाण्याची टंचाई जाणवत होती. यावर्षी ही स्थिती नाही. रुपया डेप्रीसिएट होउ लागला की चीनमधून डम्पिंग कमी होते चीन मध्ये पेपर पल्पचे शॉर्टेज आहे.अशा परिस्थितीमुळे भारतातील पेपर उद्योगाला चांगली मागणी येईल असा अंदाज आल्याने हे शेअर्स वाढले.
प्रतिबंधीत २० कीटक नाशक औषधात इन्सेक्टीसाईड्स इंडियाच्या चार औषधांचा समावेश आहे. त्यामुळे हा शेअर पडला.
साखर उत्पादक कंपन्यांना ३० सप्टेंबरपर्यंत साखर निर्यात करण्यासाठी मुदत दिली आहे ही  मुदत तीन महिन्यांनी वाढवली जाण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी  भारती अकसा लाईफ इन्शुरन्स कंपनीबरोबर एअरटेल पेमेंट बँकेने करार केला. यामुळे भारती एअरटेलचा शेअर वाढला.
लिरा क्रायसिसचा सर्वात जास्त परिणाम रेंडिंग्टन या कंपनीवर झाला कारण टर्किश ऑपरेशनमधून ७.५% रेव्हेन्यू मिळतो.. बराचसा व्यवहार US $ मध्ये करीत आहेत काही व्यवहार मात्र लिरामध्ये होतो. पण लिरामध्ये केलेला व्यवहार रोजच्या रोज SQUARE अप केला जातो.
भुषण  पॉवर सारख्या NCLT मध्ये गेलेल्या कंपन्याना चांगली बोली लावली जात आहे. त्यामुळे बँकांनी दिलेली कर्जे  वसूल होतील असे वाटते आहे. JSW  स्टीलने आपली Rs ११०००कोटींची बोली वाढवून Rs १९००० कोटी केली. टाटा स्टीलने  मात्र आपल्या बोलीत वाढ केली नाही.
सॅन फार्माला किडनी ट्रान्सप्लांटच्या औषधासाठी तर DR रेड्डीजला कँन्सर च्या औषधासाठी USFDA कडून परवानगी मिळाली.
विशेष लक्षवेधी 
 • सुवेन लाईफसायन्स आणि ब्रिगेड एंटरप्रायझेस यांचा निकाल चांगला आला. पटेल इंजिनीरिंग तोट्यातून फायद्यात आली.
वेध उद्याचा 
 • मारुतीने आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या. त्यामुळे मारुतीचा शेअर वधारला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६६३ NSE निर्देशांक निफ्टी ११३८५ आणि बँक निफ्टी २७८२६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १४ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ ऑगस्ट २०१८

आज पहिल्या तिमाहीचे निकाल येण्याचा अखेरचा दिवस ! टी सी एस च्या ‘BUY BACK ‘ची एक्स डेट आणि त्याच बरोबर Rs ७० =US $ १ ची लक्ष्मण रेखा पार केलेला रुपया. या सगळ्या गोष्टींचे सावट  असताना काही सकारात्मक गोष्टींचाही प्रभाव होता. OPEC ने क्रूड चे उत्पादन वाढवायचे ठरवले. त्याचवेळी इराण आशियातील देशांना डिस्कॉउंटमध्ये क्रूड विकू लागले. पाकिस्तानने चीनशी संबंध वाढवले तर USA कडून मिळणारी मदत बंद होईल असे त्यांना वाटते आहे त्यामुळे पाकिस्तान चीनशी असलेले आपले संबंध कमी करून USA कडून मदत मिळवेल.  अशा सगळ्या गोंधळाच्या वातावरणामुळे मार्केट टेक्स्टबुक फॅशन प्रमाणे वाढत नाही किंवा कमीही होत नाही. म्हणून लॉन्ग करणारे आणि शॉर्ट करणारे असे दोघेही पेचात सापडले आहेत.
ट्रकच्या संपामुळे महागाईचे आकडे वाढतील असे वाटत होते. पण तसे दिसले नाही.  CPI जुलैमध्ये  ४.१७% आणि WPI ५.०९ % (गेल्यावेळी ५.७७% होते) होते त्यामुळे या महागाई दर्शविणाऱ्या निर्देशांकात घट दिसून आली
सरकारने १८ कीटकनाशक औषधांना पर्यावरणाच्या कारणास्तव मनाई केली आहे. याचा ‘UPL’ वर परिणाम होईल. त्यामुळे हा शेअर पडला.
पेज इंडस्ट्रीला MSCI निर्देशांकामध्ये सामील केले म्हणून शेअर वाढला तर वकरांगीला MSCI निर्देशांकातून वगळले म्हणून शेअर पडला.
सरकार  दक्षिण कोरियातून  सोन्याची आयात करायला काही अटींवर परवानगी देणार आहे. ONGC चे लंडन किंवा सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग करावे अशा विचारात सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने सिगारेट पाकिटावर दिलया  जाणारऱ्या  चेतावणी चित्रासंबंधीच्या  नियमात कोणताही बदल केला जाणार नाही असे स्पष्ट केले. मॅक्समधला हॉस्पिटल व्यवसाय BAIN कॅपिटल किंवा KKR  खरेदी करणार आहे. माझगाव डॉकच्या IPO ला सेबीची परवानगी मिळाली.
सन फार्मा, ग्रासिम, गुजरात फ्लोरो, कोलते पाटील, ऑइल इंडिया,HDIL ,टाटा स्टील, जय कॉर्प, DHFL, SUNTECK रिअल्टी  यांचे निकाल चांगले आले.टाटा स्टील चा निकाल चांगला येऊनही नंतर शेअर का पडला कारण टाटा स्टीलने  भूषण पॉवरसाठी सुधारित बीड दिली आहे याचा परिणाम कॅश फ्लोवर होईल म्हणून शेअर पडला.
IDBI, अलाहाबाद बँक, स्पाईस जेट, नवकर कॉर्प, यांचे निकाल खराब आले. उषा मार्टिन, VIP क्लोदिंग, लेमन ट्री, आणि सन फार्मा या तोट्यातून फायद्यात आल्या.
यावेळचे निकाल पाहता रिअल्टी सेक्टर  आणि फार्मा कंपन्यांचे निकाल चांगले येत आहेत म्हणजे ‘बॉटमिंग आऊट प्रोसिजर’ चालू आहे असे जाणवते.
वेध उद्याचा
नवनीत पब्लिकेशन ही कंपनी २० ऑगस्टला BUY बॅक ऑफ शेअर्सवर विचार करण्यासाठी बोर्ड बैठक घेणार आहे. उद्या स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आहे गुरुवारी बँक निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८५२  NSE निर्देशांक निफ्टी ११४३५ आणि बँक निफ्टी २८०२१ वर बंद झाले

 

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १३ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ ऑगस्ट २०१८

चलनाचा सावळा गोंधळ असे आजच्या मार्केटचे वर्णन करता येईल. तुर्कस्थानची अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे त्यांचे लिरा हे चलन कमकुवत झाले. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी तुर्कस्थान मधून आयात होणाऱ्या मेटल्स वरील ड्युटी दुप्पट केली. म्हणजे स्टीलवर  २५% आणि अल्युमिनियम वर ५०% केली. दिवसेंदिवस जग जवळ येत असल्यामुळे याचा आमच्याशी काय संबंध ? आम्हाला काय करायचं ! असे म्हणून चालत नाही. प्रत्येक घटनेचा फायदाही होतो तसेच त्या घटनेमुळे नुकसानही होत. याचा युरोपवर जास्त परिणाम होईल आणि भारतावर त्यापेक्षा कमी परिणाम होईल. USA ने इराणकडून होणाऱ्या आयातीवर जे निर्बंध लादले आहेत त्याचा परिणाम जास्त होईल असा अंदाज आहे. क्रूड महागलं आणि रुपयांची किंमत घसरली तर दोन्ही बाजूनी नुकसान होईल. त्यामुळेच आज HPCL,BPCL, IOC हे शेअर मंदीत होते. छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर २०१८ मध्ये येऊ घातल्या आहेत. आता या करेक्शननन्तर निवडणुका हा एक ट्रिगर असेल.
स्पर्धेच्या युगामध्ये काही चांगले परिणाम दिसतात तर काही वाईट! या स्पर्धेचा  बळीचा बकरा  बनलेला सेक्टर म्हणजे एव्हिएशन आणि DTH  सेवा पुरविणाऱ्या कंपन्याहोत. या कंपन्यांचा बिझिनेस वाढताना दिसतो आहे पण त्यामानाने उत्पन्न किंवा ऑपरेशनल मार्जिन वाढताना दिसत नाही. कधीही विमाने रिकामी जाताना दिसत नाहीत पण तेवढा विमान कंपन्यांना नफा झालेलाही दिसत नाही.यामुळे जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईस जेट या कंपन्यांना मार्केटमधील तेजीचा फायदा झाला नाही. रिलायन्स जियो अर्ध्या किमतीमध्ये DTH सेवा पुरविणार आहे असे समजताच या स्पर्धेत डिश टी व्ही आणि सन टी व्ही हे कितपत तग धरतील असे वाटल्यामुळे  सन टी व्ही ( निकाल चांगला लागूनही)  आणि डिश टी व्ही या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स पडले.
आज आपल्याला HDFC बँकेविषयी चर्चा करावीच लागेल. HDFC बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री परेश सुखटणकर यांनी राजीनामा दिल्याची बातमी आल्याबरोबर चर्चेला उधाण आलं. आतल्या गोटात कुठे तरी ही बातमी शिजत असावी कारण गेल्या महिना दीड महिन्यात ऍक्सिस बँकेचा शेअर Rs ७० ते Rs ८० वाढला. कोणी श्री सुखटणकर हे ऍक्सिस बँकेत जाणार तर कुणी ते ICICI बँकेत जाणार असे सुचवले. कारण या दोन्ही कडील  जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे HOPE ट्रेंड दिसला. पण आज जेव्हा जाहीर झाले की HDFC बँकेबरोबर स्पर्धा करणाऱ्या बँकेत श्री सुखटणकर जाणार नाहीत तेव्हा आभाळ स्वच्छ झाले आणि दोन्ही बँकेचे शेअर पडले. श्री सुखटणकर हे HDFC बँकेमध्ये १९९४ पासून  म्हणजेच  बँकेच्या स्थापनेपासून क्रेडिट, फायनान्स आणि ह्युमन रिसोर्सेस हे भाग सांभाळत होते. आदित्य पुरींनी एका अनॅलिस्ट मीटिंग मध्ये सांगितले की MD च्या पोस्टसाठी एक्स्टर्नल आणि इंटर्नल अशा दोन्ही उमेदवारांचा विचार केला जाईल. त्याचवेळी हा राजीनामा समोर आला. QIP केल्यानंतर ही बातमी समोर आली ह्याचे सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. QIP च्या आधी जर ही बातमी आली असती तर QIP च्या भावावर परिणाम होऊ शकला असता. या सर्व बातमीचा HDFC, ICICI आणि ऍक्सिस बँकेच्या शेअर्सवर नकारार्थी परिणाम झाला. ही ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. कारण HDFC ग्रुपचे  शेअर्स स्वस्तात उपलब्ध होतील.
HPCL- मित्तल एनर्जी भटिंडा येथील BS -VI जॉईंट व्हेंचरला पर्यावरणाचे NOC मिळाले.
विशेष लक्षवेधी 
 • PVR या कंपनीनी SPL सिनेमा ही कंपनी विकत घेतली.
 • स्ट्राइड्स शसूनचे नाव १७ ऑगस्टपासून बदलून स्ट्राईड फार्मा सायन्सेस असे होईल.
 • कॅडीला हेल्थकेअर या कंपनीने ‘WINDS हेल्थकेअर’ ह्या कंपनीतील ५१% स्टेक खरेदी केला.
 • पार्ले लिमिटेडने आपल्या बिस्किटांची किंमत वाढवली.
 • सन टी व्ही, गॉडफ्रे फिलिप्स, प्रभात डेअरी, ऑटो अक्सल्स, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स, कॉर्पोरेशन बँक, व्हील्स इंडिया, वर्धमान टेक्सटाईल्स, महाराष्ट्र सिमलेस पाईप्स, कॅडीला हेल्थकेअर, टाइड वाटर ऑइल, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, MEP इन्फ्रा, सोनाटा सॉफ्टवेअर, M M फोर्जिंग्ज या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • ग्लेनमार्क फार्म , NBCC, ITNL यांचे निकाल असाधानकारक होते.
 • गोदरेज इंडस्ट्रीज, कोल  इंडिया यांचे निकाल समाधानकारक होते.
वेध उद्याचा  
सेबीने असे स्पष्टीकरण  दिले आहे की तुम्ही ५ डिसेंबर २०१८ नंतरही फिझिकल फॉर्ममध्ये शेअर होल्ड करू शकता. जुलै मध्ये सेबीने असे सांगितले होते की लिस्टेड कंपनीच्या शेअर्सची ट्रान्स्फर फक्त डिमटेरिअलाइझ्ड फॉर्म मध्ये होईल. पण जर शेअर्स ५ डिसेंबर नंतर  ट्रान्स्फर करायचे असतील तर ते डिमटेरीअलाईझ्ड  फॉर्ममध्येच करावे  लागतील याला अपवाद म्हणजे INHERITANCE, SUCCESSION, आणि जर शेअर प्रमाणपत्रातील नावांचा क्रम बदलणे हे असतील. या तीन कारणाशिवाय कोणत्याही प्रकारची शेअर्स ट्रान्सफर ही ५ डिसेंबर २०१८ नंतर DEMAT फॉर्ममध्येच होईल.
रुपया सतत पडत असल्यामुळे IT आणि फार्मा हे सेक्टर  तेजीत असतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६४४ NSE निर्देशांक निफ्टी ११३५५  आणि बँक निफ्टी २७७९४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १० ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० ऑगस्ट २०१८

हल्ली मार्केट फायदेशीर गोष्टींचा  फक्त विचार करत आहे. आणि नकारात्मक संकेतांकडे दुर्लक्ष करत आहे असे वारंवार जाणवते. ट्रेंड वॉर, टॅरिफ वॉर,प्रदूषण हे सूत्र मार्केटने पकडले. क्रूड US $ ७२ च्या खाली पोहोचले आणि रुपया घसरला. चीन प्रदूषण कमी करण्यासाठी स्टीलचे उत्पादन कमी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे आज IT क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स, मेटलशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स, HP BP आणि IOC या OMC कम्पन्यांचे शेअर्स तेजीत होते.
स्टॉक ऑफ द डे नकारात्मक दृष्टीने जेट एअरवेज आणि सकारात्मक दृष्टीने आयशर मोटर्स होता. जेट एअरवेजची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. ऑडिटर समितीने सही करायला नकार दिल्यामुळे काल  जे पहिल्या तिमाहीचे निकाल येणार होते ते रहित झाले. SBI ने सुद्धा जेट एअरवेजला दिलेलया कर्जाखात्याच उल्लेख  SICK ACCOUNT असा केला. त्यामुळे जेट एअरवेजचा शेअर तर पडलाच पण याबरोबर SBIचा शेअरही पडला.पण त्याचवेळी स्पाईस जेट आणि इंडिगो यांचा मार्केट शेअर वाढेल या अपेक्षेने हे दोन्ही शेअर वाढले. तर आयशर मोटारचा निकाल काल  मार्केट संपल्यानंतर आला. अपेक्षेपेक्षा चांगला निकाल आल्यामुळे शेअर भरपूर वाढला.
वक्रांगीला ओपन ऑफर आणावी लागेल आणि १०% व्याज द्यावे लागेल. २०१३ मध्येच ही ऑफर आणायला हवी होती ती  न आणल्यामुळे ही दंडात्मक कारवाई सेबीने केली.
GST चे दर १२% आणि १८% आहेत हे दोन्ही स्लॅब मर्ज करून १४% ते १५% दर ठेवला जाईल असे कळते.
अल्केम लॅबच्या बद्दी युनिटची तपासणी USFDA ने ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या काळात झाली होती या बाबतीत USFDA ने कंपनीला क्लीन चिट दिली.
यूको बँक, औरोबिंदो फार्मा, मावानी शुगर, G E SHIPPING , नीटको टाईल्स, आणि महिंद्र हॉलिडेज, आणि सन फार्माच्या सबसिडी TARO चे निकाल असमाधानकारक होते.
गेल, AIA इंजिनीअरिंग, झी लर्न, हिंदुस्तान कॉपर, , NCC, हिंदाल्को, अल्केम लॅब , अपोलो हॉस्पिटल, KNR CONSTRUCTION, लाल पाथ लॅब  यांचे निकाल चांगले आले.
BF यूटिलिटीज, MACLEOD रसेल, JSPL , ६३ मुन्स,  ह्या  कंपन्या  टर्न अराउंड झालया.
SBI चा निकाल मार्केटच्या पसंतीला उतरला नाही.
विशेष लक्षवेधी 
 • क्रेडिट ग्रामीण ऍक्सेसचा IPO  १.३७ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
 • वेदांताला OALP १  मध्ये ४१ ऑइलफिल्डस, ONGC ला २ आणि HOEC ला १ ऑइलफिल्ड मिळाले. या ऑइलफीडच्या  ऑपरेशनमध्ये प्राइसिंग आणि मार्केटिंगचे स्वातत्र्य  असते.
 • इंडीयन एनर्जी एक्स्चेंज या कंपनीचे निकाल चांगले आले. कंपनी आपल्या एका शेअरचे दहा शेअर्समध्ये विभाजन करणार आहे
 • भूषण स्टील लिमिटेड चे नाव टाटा ग्रुपने घेतल्यानंतर टाटा स्टील BL लिमिटेड असे बदलायचा विचार चालू आहे.

वेध उद्याचा 

मार्केट सरता सरता मार्कटच्या तेजीला ब्रेक लागला असे वाटले कारण सर्व विदेशी मार्केट मंदीत होती. आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि १५ ऑगस्ट हा पहिल्या तिमाहीच्या निकालांचा शेवटचा दिवस त्यामुळे काही दिवस मार्केटमध्ये तेजी येण्यासाठी फारसे ट्रिगर असणार नाहीत. काही काळ मार्केट कन्सॉलिडेट होईल किंवा थोडेफार मंदीतच राहील असा अंदाज वाटतो. मार्केट थोडेसे हलके झाले तर मार्केटमध्ये प्रवेश करणे सोपे होईल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८६९ NSE निर्देशांक निफ्टी ११४२९ आणि बँक निफ्टी  २८१२४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ९ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ९ ऑगस्ट २०१८

ट्रेड वॉर, टॅरिफ वॉर अजूनही संपलेले नाही. सगळ्या जगाला याची झळ कमी अधिक प्रमाणात लागते आहे. पण पुष्कळदा दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ होतो या प्रमाणे क्रूडचे दर घसरत असल्याने भारताला फायदा होत आहे. अचानक लॉटरी लागली आहे असे वाटते. मार्केटमधील सर्वांना या गोष्टीचा आनंद झाला आणि मार्केटने  तेजीचे निरनिराळे उच्चांक प्रस्थापित केले. आज मार्केट प्रथमच सेंसेक्स ३८००० च्या स्तरावर बंद झाले. सोशल मेडियावर एक फोटो पाहायला मिळाला. त्यामध्ये मार्केटचे सचित्र दर्शन होते. अगदी थोड्या शेअर्समुळे मार्केट रोज नवी शिखरे गाठत आहे पण पोर्टफोलिओ मात्र तोट्यात जात आहे. हे हुबेहूब दर्शवले होते.
RBI सरकारला Rs ५०००० कोटी लाभांश देणार आहे. पूर्वी Rs ४५००० कोटी द्यायचे कबुल केले होते. तर गेल्या वर्षी  RBI ने Rs ३०००० कोटी लाभांश दिला होता. हे जादा मिळालेले पैसे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील  सरकारी बँकांच्या रिकॅपिटलायझेशनसाठी वापरेल असा अंदाज आहे. हळू हळू निवडणुकीपूर्वी काही बँकांना PCA च्या यादीतून बाहेर काढले जाईल. ज्या बँकांनी वसुली चांगली केली असेल त्या बँकांचा यासाठी विचार केला जाईल. ASM लिस्टकडे आपण जसे लक्ष देतो तसेच आता PCA च्या लिस्टकडे लक्ष दिले पाहिजे.
सरकार सैन्य आधुनिकीकरणासाठी मेक इन इंडिया अंतर्गत १० %  बजेट वाढवणार आहे. यामुळे आज संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना चालना मिळाली. IFCI ही कंपनी त्यांचा  CCIL (क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मधील ३% स्टेक विकणार आहे. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट च्या डीलला परवानगी मिळते आहे. गतीने फ्लिपकार्टबरोबर आधीच करार केला आहे. त्यामुळे गती या कंपनीवर परिणाम  होईल. HT मेडियाला त्यांचा  FM रेडियो चा बिझिनेस डीमर्ज करण्यासाठी  परवानगी मिळाली. दिलीप बिल्डकॉन या कंपनीला झारखंडमधील एका खाणीच्या डेव्हलपमेंटचे काम मिळाले. हे काम ५५ वर्षांकरता मिळाले.
विशष लक्षवेधी 
 • क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण या कंपनीचा IPO दुसर्या दिवसाअखेर २७% सबस्क्राईब झाला.
 • झील AQUA  या  कंपनीने १६ ऑगस्टला बोनस शेअर्स इशू करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
 • ASAAHI SONGWON, नाल्को, HPCL, इंडियन बँक, सिमेन्स, थरमॅक्स, भारत फोर्ज, कमिन्स वेंकी’ज, GMM PFAUDLER, WHIRPOOL, MRF ,आयशर मोटर्स, SML इसुझू,पेज इंडस्ट्रीज, वरून बिव्हरेजीस, यांचे निकाल चांगले आले.
 • वरूण बिव्हरेजीस आणि इप्का  लॅब टर्न अराउंड झाल्या.
 • अपार इंडस्ट्रीज आणि गुजरात पिपावावचे निकाल असमाधानकारक होते
एवढे मार्केट वाढल्यानंतर मार्केटचा पाठलाग करू नये. एवढे वाढलेले मार्केट छोट्याशा कारणाने सुद्धा जोरदार  पडायची शक्यता असते. त्यावेळी मार्केटमध्ये योग्य शेअरची खरेदी करावी पण अशा तेजीच्या मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग करणे टाळावे.
वेध उद्याचा 
उद्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा निकाल आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०२४  NSE निर्देशांक निफ्टी ११४७० आणि बँक निफ्टी २८३२० वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ८ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ८ ऑगस्ट २०१८

थोडी विश्रांती घेऊन मार्केटने पुन्हा नव्या दमाने चढ़ाई करायला सुरुवात केली. यावर्षीचा निकालांचा सीझन बराचसा उत्साहवर्धक आहे असे म्हणता येईल. पूर्वी सुरुवातीचे निकाल चांगले येत असत आणि निकालांचा सिझन संपता संपता येणारे निकाल खराब असत. यावर्षीचे निकाल तुलनेने चांगले आहेत. मार्केटचा मूडही चांगला आहे. ज्या कंपनीचा निकाल चांगला त्या कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढतो आहे. ट्रेडर्स शाबासकी देत आहेत. कदाचित गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे निकाल डीमॉनेटायझेशनच्या प्रभावाखाली असल्याने खराब आले होते. त्याच्याशी तुलना करता आताचे निकाल लोकांना चांगले वाटत आहेत.
आज मार्केटने सेन्सेक्स ३७९०६ आणि निफ्टी ११४५४ आणि बँक निफ्टीने २८१२५ चा इंट्राडे उच्चांक गाठला.
मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे पदार्थ घेऊन जावेत की नाही जावेत याचा वाद कोर्टापर्यंत गेला. आज त्याची सुनावणी होणार होती ती सुनावणी कोर्टाने ३ सप्टेंबर २०१८ पर्यंत पुढे ढकलली. म्हणून सकाळी वाढलेले PVR , आयनॉक्स, मुक्ता आर्ट्स दुपारी पडले.
आज पुन्हा USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी कुरघोडी केली. इराणबरोबर जे देश व्यापारी संबंध ठेवतील त्यांच्यावरही आम्ही निर्बंध लावू. चीनने सुद्धा USA मधून आयात होणाऱ्या मालावर ५% ते २५% ड्युटी लावू असे जाहीर केले.
NSEने  बांगलादेश एक्स्चेंज मध्ये स्टेक खरेदी करण्यासाठी NASDAQ बरोबर करार केला.IDBI  मधील सरकारचा स्टेक ५०% पेक्षा कमी करायचा तसेच व्यवस्थापनावरील कंट्रोल सोडण्यासाठी सरकारने  NOC दिले. गरवारे वॉल रोप्स या नावावरून कंपनीच्या बिझिनेसचे आकलन होत नसल्यामुळे या कंपनीचे   नाव  ‘ गरवारे टेक्निकल फायबर’ असे बदलले.
अशोक लेलँड ने आपला व्हॉल्युम विषयीचा गायडन्स वाढवल्यामुळे या कंपनीचा शेअर वाढला. BPCL च्या चेंबूर येथील प्लांटमध्ये आग लागल्यामुळे आणि पहिल्या तिमाहीचे निकाल खराब आल्यामुळे शेअर पडला. २१ ऑगस्ट २०१८ पासून पोस्ट  बँक चालू केली जाणार आहे. याचे तांत्रिक व्यवस्थापन इन्फोसिस करणार आहे. GAIL या कंपनीला Rs ३४५० कोटी कराच्या बाबतीत कोर्टाकडून दिलासा मिळाला. SRF चा निकाल चांगला आला तसेच  चीनमध्ये  दोन प्लान्ट बंद झाल्यामुळे बिझिनेस वाढला.
विशेष लक्षवेधी 
 • मेघमणी  ऑर्गनिक्स, GSK  कन्झ्युमर ,PNC इंफ्राटेक, एडेलवाईज , नेक्टर लाईफ स्टाईल, फ्युचर सप्लाय  चेन,, पुष्कर केमिकल्स, मिंडा  इंडस्ट्रीज, स्ट्राईड शसून, सिप्ला, नाटको फार्मा, जमना ऑटो, नेस्को यांचे निकाल चांगले आले. आयनॉक्स विंड ,कनोरिया केमिकल्स तोट्यातून फायद्यांत आली.
 • BEML, ल्युपिन, ग्रीन प्लायचा निकाल असमाधानकारक आला.
 • ITC ने ‘WAVE’ या नावाची नवीन सिगारेट १० सिगारेटना Rs ५० या भावाने बाजारात आणली. ‘विवेल’ या साबणाची किंमत ८% ने  वाढवून Rs ९४ केली. ‘हॅन्ड सॅनिटायझर जेल’ Rs ७७ /५५ML या किमतीला बाजारात आणले.  ITC चा शेअर वाढला आणि मार्केटला नवीन चेतना आली.
 • फ्युचर कंझुमरने न्यूझीलंडच्या ‘FONTERRA’या डेअरी कंपनीबरोबर करार केला.
 • ‘ईगारशी मोटर्स’ या कंपनीने जर तुमच्याजवळ २०२ शेअर्स असतील तर २५ बोनस शेअर्स मिळतील असे जाहीर केले.तसेच याकंपनीने ‘ASILE इलेक्ट्रिक ‘ची एक्स्पोर्ट डिव्हिजन Rs १४० कोटींना विकत घेतली.
 • ‘यूकेन'(YUKEN INDIA LTD) या कंपनीने तुमच्याजवळ ३ शेअर्स असतील तर १ बोनस शेअरची घोषणा जाहीर केली.
 • MPHASIS BFL  या कंपनीने ७३ लाख शेअर्स प्रती शेअर Rs १३५० या भावाने ‘BUY BACK’ करण्याची घोषणा केली.
 • आज जागतिक सिनियर सिटीझन डे आहे. शेअर मार्केटचा विचार केल्यास हा व्यवसाय सिनियर सिटिझननी सुद्धा गुंतवणुकीच्या, मानसिक आणि शारीरिक आरोग्याला बाधा येणार नाही तसेच एक निश्चित उत्पन्न मिळेल अशा तऱ्हेने केल्यास ज्ञान,  मनोरंजन आणि त्याबरोबरच एक उत्पन्नाचे साधन होईल.
वेध उद्याचा 
 • उद्या ऑरोबिंदो फार्मा, आयशर मोटर्स आणि फ्युचर रिटेल यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८८७ NSE निर्देशांक निफ्टी ११४५०  बँक निफ्टी २८०६२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ७ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ ऑगस्ट २०१८

दोन तीन दिवसाच्या दमदार तेजीनंतर मार्केटने विसावा घेतला. पण त्याचवेळी मंदी  करणाऱ्याना डोके वर काढू दिले नाही. पेपर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये आलेली तेजी आजही सुरु राहिली. जे कोणी पेपर शेअर्स मध्ये अडकले असतील त्यांनी या तेजीचा फायदा घेऊन आपले प्रॉफिट बुक करावे. JK पेपर्स, ओरिएंट पेपर, स्टार  पेपर, रुचिरा पेपर, BILT, शेषशायी पेपर, TNPL, श्री रामा न्यूज प्रिंट्स, इंटरनॅशनल पेपर, आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये पेपरच्या किमती वाढल्या तसेच प्लास्टिकवर बंदी आल्यामुळे पेपर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.
आज तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले- KRBL, LT फूड्स, कोहिनूर फूड्स. USA ने इराणवरील आर्थिक बंधने आजपासून लागू केली. प्रकाश इंडस्ट्रीज, नॅशनल पेरॉकसाईड, लॉईड स्टील या कंपन्या ASM च्या यादीतून बाहेर काढल्या.तर VIP, अदानी  ग्रीन, मोरेपन लॅब्स, अंबुजा एक्स्पोर्ट या कंपन्यांना ASM चे निर्बंध लागू केले.
ग्राफाईट बनवण्यासाठी पेट कोक वापरतात. सरकारने पेट कोकवर सप्टेंबर २०१८ पासून पूर्णपणे बंदी घातली आहे. याचा परिणाम ग्राफाइट इंडिया, आणि HEG या कंपन्यांवर होईल.या कंपन्यांकडे दोन महिने पुरेल एवढाच पेट कोकचा साठी उपलब्ध आहे.
P & G आणि MERCK  यांच्या मर्जरला CCI ने मंजुरी दिली त्यामुळे आणि पहिल्या तिमाहीच्या चांगल्या निकालालांमुळे MERCK च्या शेअरला वरचे सर्किट लागले.
सरकार पुढील वर्षात १२ कंपन्यातील आपला स्टेक डायव्हेस्ट करणार आहे. याचा परिणाम म्हणजे कोल इंडिया BEL, BEML या कंपन्यांचे शेअर्स पडले.  NTPC मधील  आपला ३% स्टेक विकणार आहे. HUDCO आणि NBCC यातील १०% स्टेक विकणार आहे. ज्यूट क्षेत्रातील पश्चिम बंगाल मधील सार्वजनिक क्षेत्रातील  दोन सरकारी कंपन्या बंद करणार आहे.
PSU ETF चा चौथा इशू सरकार डिसेंबर २०१८ पर्यंत आणेल. सरकारने टेक्सटाईल क्षेत्रातील ३०० प्रोडक्टसवर २०% इम्पोर्ट ड्युटी बसवली सरकारने याबाबतीतले नोटिफिकेशन संसदेमध्ये जारी केले. तर काही टेक्सटाईल प्रॉडक्टवरील ड्युटी दुप्पट केली. याचा फायदा पेज इंडस्ट्रीज, मनधना, सेंच्युरी इत्यादी कंपन्यांना होईल.सरकारने एक एक्सल आणि दोन ऍक्सल असलेल्या वाहनांची वजन वाहण्याची अधिकतम  मर्यादा ७ टनापर्यंत घटवली.
विशेष लक्षवेधी
 • क्रेडिट ऍक्सेस या कंपनीचा IPO ८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान ओपन राहील. याचा प्राईस बँड Rs ४१८ ते ४२२ असून मिनिमम लॉट ३५ शेअरचा असेल. ह्या IPO द्वारे कंपनी Rs ११२० कोटी उभारेल. ही मायक्रो फायनान्स क्षेत्रातील तिसर्या नंबरची कंपनी आहे. कंपनीचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड ठीक आहे. कंपनी ६ राज्यातून हा व्यवसाय करते.
 • पहिल्या तिमाहीच्या निकालांचा कालखंड चालू आहे आज पराग मिल्क प्रॉडक्ट, DFM फूड्स, स्मार्ट लिंक, मदरसन सुमी, ई  CLERX  सर्व्हिस, शोभा, अडानी  ट्रान्समिशन, वंडरेला हॉलिडेज, MERCK, फ्युचर लाइफस्टाइल, TVS मोटर्स,महिंद्रा आणि महिंद्रा यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. धनसेरी टी ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.
 • सिंडिकेट बँक, PNB, द्वारिकेश शुगर, बॉमबे  डायिंग, ट्रायडंट, अवंती फीड्स, अदानी पॉवर  यांचे निकाल असमाधानकारक होते. गार्डनसिल्क आणि टाटा टेली यांचा तोटा कमी झाला.
 • गोव्यामध्ये MMDR कायद्यात बदल झाल्यामुळे वेदांताबरोबरच डेक्कन गोल्ड माईन्स आणि आशापुरा माईन्स यांचा फायदा होईल.
वेध उद्याचा 
 • DFM फूड्स ही कंपनी आपल्या एका शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन करणार आहे.
 • वेदांता या कंपनीला ४० HOEC ला १ आणि ONGC २ ऑइल ब्लॉक मिळण्याची शक्यता आहे.
 • अजून पहिल्या तिमाहीचे निकाल येणे संपलेले नाही ,संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे मार्केट टिकून आहे तसेच मंदी जाणवत नाही. आपण आपल्याला होत असलेले प्रॉफिट बुक करावे. म्हणजे पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६६५  NSE निर्देशांक निफ्टी ११३८९ आणि बँक निफ्टी २७८७५ वर बंद झाले.

 

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ६ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ ऑगस्ट २०१८

आज ट्रेडर्स, गुंतवणूकदार यांनी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा एकत्र साजरे केले.. ज्यांना HDFC AMC चे १३ शेअर्स अलॉट झालेत्यांना प्रत्येक शेअरला कमीतकमी Rs ७०० फायदा झाला. IPO मध्ये Rs ११०० ला दिलेला शेअर BSE वर Rs १७३९ ला तर NSE वर Rs १७२६ वर लिस्ट झाला. दिवसभर शेअर Rs १८०० च्या वर राहिला. आज HDFC ग्रुपच्या मुकूटांत नवीन तुरा खोचला गेला. त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे HDFC AMC चे सुंदर लिस्टिंग झाले NSE ८ ऑगस्ट २०१८ रोजी आपला रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. NSE आपला नवीन लोगो निर्माण करण्याचा आणि आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हजर राहणार आहेत. हा प्रसंग निफ्टीने ११४२७ हा इंट्राडे ऑल टाइम हाय प्रस्थापित करून साजरा केला.

गॅस वितरणासाठी सरकारने लायसन्सेस इशू केली. अडानी ६ शहरात CNG आणि पापलाइनच्या सहाय्याने स्वयंपाकाचा गँस देईल आणि ५ शहरात IOC च्या सहकार्याने गॅस पुरवठा करेल आणि गेलसुद्धा ३ शहरांत स्वतंत्ररित्या, २ शहरात आसाम कंपनी आणि ऑइल इंडिया यांच्या बरोबर आणि उरलेल्या ६ शहरात त्रिपुरा नॅचरल गॅस, महाराष्ट्र नॅचरल गॅस, IGL आणि ग्रीन गॅस यांच्या सहकार्याने गॅस पुरवठा करेल. म्हणून अडानी ग्रुपचे शेअर वाढले.

अरविंद त्यांच्या टेक्सटाईल आणि इंजिनीअरिंग व्यवसायाचे डीमर्जर करणार आहे. अरविंदचे निकालां बरोबर या डीमर्जरविषयी कंपनी काही घोषणा करते का याचे उत्सुकता ट्रेडर्सना होती.

विप्रोने नॅशनल ग्रीड बरोबर केलेल्या समझोत्यानुसार यावर्षी Rs ५०० कोटी देण्याचे कबुल केले. त्यामुळे शेअर पडला. ACMA (ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) ने २८% GST च्या ऐवजी १८% GST साठी मागणी केली आहे. निर्णय होईल तेव्हा होईल पण आज ऑटो अँसिलियरी क्षेत्रातील शेअर्स वाढले.

ब्रिटानिया इंडस्ट्रीजने आपल्या १०० व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने कंपनी आपला नवा लोगो रिलीज करणार आहे. ब्रिटानियाचा निकाल फारसा चांगला नव्हता. पण व्हॉल्युम मात्र लक्षणीय होते. २३ ऑगस्टला शेअर स्प्लिटसाठी आणि Rs ६० किमतिचे नॉनकॉन्व्हर्टिबल बोनस डिबेंचरवर आणि लाभांशवर विचार करण्यासाठी बैठक आहे. बोनस डिबेंचरविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या ब्लॉगवर ब्लॉगनंबर ५२ नंतर दिली आहे. असे डिबेंचर्स सर्व प्रथम NTPC ने इशू केले होते.

गोव्यामध्ये खाणउद्योग पुन्हा सुरु होण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर आणि नितीन गडकरी यांची मीटिंग झाली. याचा फायदा वेदांताला होईल.

IDFC चा म्युच्युअल फंड आणि ब्रोकिंग बिझिनेस AVENDUS कॅपिटल Rs ५००० कोटी ते Rs ६००० कोटींना विकत घेणार आहे. त्यामुळे IDFC बँक आणि IDFC या दोन्हींचे शेअर वाढले. SREI हा शेअर पडला. त्यांचा इक्विपमेंट फायनांस बिझिनेसचा येणार असलेला IPO पोस्टपोन होण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.BPCL ने बिना येथील रिफायनरी आग लागली म्हणून १६ ऑगस्ट २०१८ पासून ४५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

विशेष लक्षवेधी

 • TCS च्या BUY बॅक ऑफ शेअर्सची रेकॉर्ड डेट १८ ऑगस्ट २०१८ असेल.
 • JMC प्रोजेक्ट्स या कंपनीने आपल्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन केले.
 • अरविंद, HIL, मार्कसन फार्मा, विनंती ऑर्गनिक्स, मॉन्सॅन्टो, अतुल ऑटो हे निकाल चांगले आले.
 • ककातीया सिमेंट ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.
 • देना बँकेचे निकाल खराब आले पण त्यांच्या NII मध्ये वाढ झाली.

निफ्टी ११५०० पर्यंत पोहोचेपर्यंत मार्केट असेच तेजीत चालू राहील असे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६९ NSE निर्देशांक निफ्टी ११३८७ आणि बँक निफ्टी २७८९८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०१८

ज्याचा शेवट गोड ते सारं गोड असे आपण नेहेमी म्हणतो. काल मार्केट ३०० पाईंट पडले होते. आज मार्केटने पुन्हा कंबर कसली आणि कालची कसर भरून काढून बुल्सनी आपला झेंडा फडकावला. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांचा वीक एन्ड मौजमजेत घालवता येईल.

GST चे चांगले परिणाम हळू हळू दिसू लागले आहेत. लॉजिस्टिक कंपन्यांचे निकाल चांगले येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातल्या शेअर्सकडे नव्याने लक्ष घालावे लागेल. VRL, गती, स्नोमॅन,महिंद्रा लॉजिस्टिक, अलकार्गो

कोटक महिंद्रा बँकेमध्ये मोठी डेव्हलपमेंट होणार याचा सर्वांना अंदाज होता. त्यांनी पर्पेच्युअल प्रेफरन्स शेअर इशू करून प्रमोटर्सचा स्टेक २९.३४% वरून १९.०७ केला . RBI च्या नियमानुसार २०१८ च्या शेवटपर्यंत प्रमोटर्सचा स्टेक २०% पर्यंत आणायचा आणि २०२० पर्यंत प्रमोटर्सचा स्टेक १५% असला पाहिजे. कोटकनी प्रेफरन्स शेअर्स इशू केल्यामुळे इक्विटी शेअर्सच्या संरचनेमध्ये काही फरक पडला नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना ही गोष्ट पसंत पडली आणि शेअर वाढला. हे प्रेफरन्स शेअर प्रमोटर्सच्या फॅमिलीमेम्बर किंवा नातेवाईकांना इशू केले नाहीत.

सुप्रीम कोर्टानी RCOM आणि एरिक्सनच्या सेटलमेंटला मंजुरी दिली. वायरलेस बिझिनेस आणि टॉवर ASSET विकण्यासाठी मंजुरी दिली पण १ ऑक्टोबरच्या आधी सेटलमेंट केली पाहिजे असे सांगितले. एरिक्सनला यातून Rs ५५० कोटी मिळतील पण R COM आणि जियो यांच्या डील मधला फार मोठा अडथळा दूर झाला.

सरकार आता पॉवरप्लांटसाठी मेरिट ऑर्डर इशू करेल. यामुळे कोणत्याही प्लान्टमधून कोणत्याही ठिकाणी वीज पुरवठा करता येणे शक्य होईल. पूर्वी यासाठी प्रत्येक वेळी PPA ( पॉवर पर्चेस अग्रीमेंट) करावे लागत असे.

आज शुक्रवार त्यामुळे मेडिया सेक्टरमधल्या कंपन्यांमध्ये हालचाल असते. PVRने टिकटींग बरोबर केलेला करार ३ वर्षांकरता वाढवला. यातून PVR ला Rs ३५० कोटी मिळतील. PVR ने त्यांच्या मल्टिप्लेक्सेसमध्ये डिस्काउंटमध्ये खाद्यपदार्थ विकण्याचे ठरवले आहे. परिणामी PVR, आयनॉक्स, मुक्ता आर्ट्स हे शेअर वाढले. JK पेपरनी NCLT मध्ये गेलेल्या शिरपूर पेपरमधील ७६% स्टेक Rs ३७१ कोटींना खरेदी केला. मॉईल, टायटन, नेस्ले, VIP, NFL यांचे निकाल चांगले आले. भारत गिअर्स, आणि ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

विशेष लक्षवेधी

 • HDFC AMC च्या IPO ची अलॉटमेंट झालेली आहे. तुम्हाला शेअर्स लागले की नाही हे तुम्ही गूगलवर “अलॉटमेंट स्टॅटस ऑफ HDFC AMC’ असे सर्च करून बघू शकता. तुम्ही हे तुमचा पॅन नंबर, किंवा अँप्लिकेशन नंबर किंवा DEMAT अकौंट नंबर टाकून बघू शकता. या शेअर्सचे लिस्टिंग ६ ऑगस्ट २०१८ रोजी होईल. इशू ८३ वेळेला सबस्क्राईब झाल्यामुळे चांगला लिस्टिंग गेन होण्याची शक्यता आहे.
 • एम्फसिस BFL या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ‘BUYBACK’ वर विचार करण्यासाठी ७ ऑगस्ट २०१८ रोजी तर टेक्नोइलेक्ट्रिक या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग १० ऑगस्ट २०१८ रोजी आहे.

वेध उद्याचा

 • क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण ही कंपनी IPO आणत आहे. प्राईस बँड Rs ४१८ ते Rs ४२२ असेल. हा IPO ८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान ओपन राहील.
 • जून IIP चे आकडे १० ऑगस्टला येतील.
 • ४ ऑगस्ट २०१८ ला DIVI’ज LAB, रिलॅक्सो, सुझलॉन, आणि WOCKHARDT, तर ६ ऑगस्टला अडानी पोर्ट, अडानी पॉवर, अरविंद अवंती फीड्स, ब्रिटानिया आणि कोल इंडिया, देना बँक, इंडियन बँक, ७ ऑगस्टला अदानी इंटरप्राइझेस, अडाणी ट्रान्समिशन, बाळकृष्ण , बॉंबे डायिंग, ८ ऑगस्टला सिमेन्स ९ ऑगस्टला WHIRPOOL १० ऑगस्टला ALKEM लॅब, अपोलो हॉस्पिटल, SBI यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७५५६ NSE निर्देशांक निफ्टी ११३६० आणि बँक निफ्टी २७६९५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २ ऑगस्ट २०१८

RBI ची दरवाढ मार्केटने पचवली. आता पुढील सहा महिने तरी RBI च्या दरवाढीची भीती नाही असे वाटत असतानाच आज आंतरराष्ट्रीय संकेतांचा पाठिंबा मिळाला नाही. बॉण्ड यिल्डच्या भीतीने पुन्हा डोके वर काढले. जपान, USA मधील बॉण्ड यील्डस वाढू लागली. त्यामुळे ओव्हरबॉट झोनमध्ये असलेल्या मार्केट मध्ये प्रॉफिट बुकिंग आढळून आले.

FED ने USA च्या अर्थव्यवस्थेला ‘सॉलिड’ वरून ‘स्ट्रॉन्ग’ असे अपग्रेड केले. रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. सप्टेंबर २०१८ च्या पॉलिसीमध्ये रेट वाढवले जातील असा अंदाज व्यक्त केला.

बलरामपूर चिनीमध्ये ग्रेव्ह स्टोन डोजी पॅटर्न बुधवारी फॉर्म झाला होता. हा पॅटर्न रॅली फेल झाली हे दर्शवतो. खरेदी करणाऱयांचा प्रभाव दिवसभर असतो दिवस अखेरीला विकणारे येतात आणि किंमत पूर्व पदाला येते. आणि खरेदीचा प्रभाव नष्ट होऊन जातो.त्यामुळे ओपन, लो, आणि क्लोज भाव सारखेच येतात. या नंतर शेअर पडतो

विशेष लक्षवेधी

 • आज सेबीने १३ कंपन्यांचे शेअर्स ASM खाली असलेल्या शेअर्सच्या यादीतून बाहेर काढल्या. त्या कंपन्यांची नावे अशी – वेंकी’ज, दिलीप बिल्डकॉन, भन्साली इंजिअनीरिंग, HIL, मान इंडस्ट्रीज, हिमाद्री केमिकल्स, HEG, टिन प्लेट, सांवरिया ऍग्रो, गोवा कार्बन, भारत सीट्स, क्रेसेंट लिझिंग, अमृत कॉर्प. या यादीतल्या काही कंपन्या फंडामेंटली चांगल्या होत्या. त्यामुळे ही घोषणा जाहीर झाल्याबरोबर या कंपन्यांचे शेअर्स वाढायला लागले.
 • आज सरकारने क्रूडच्या आयातीवर अवलंबून राहायला लागू नये आणि विदेशी चलनाची बचत व्हावी म्हणून ULP ( युनिफॉर्म लायसेन्सिंग पॉलिसी) ला मान्यता दिली. हायड्रोकार्बनच्या व्याख्येमध्ये सुधारणा करून या व्याख्येमध्ये कोल बेड मिथेन, गॅस, शेल ऑइल, यांचा समावेश होईल. त्यामुळे ‘अनकन्व्हेन्शनल हायड्रोकार्बन पोटेन्शियल’वापरता येईल. याचा फायदा कोल इंडिया, HOEC, डॉल्फिन ऑफशोअर, ONGC, ABAN ऑफशोअर यांना होईल.
 • आज फायझर या फार्मा क्षेत्रातील कंपनीचा निकाल उत्तम लागला. पीडिलाइट, रामको सिमेंट, गोदरेज प्रॉपर्टी यांचे निकाल यथातथाच आले. HEG , एलकॉन इंजिनीअरिंग, मजेस्को या कंपन्या टर्न अराउंड झाल्या. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, महिंद्रा लॉजिस्टिक, मेरिको यांचे निकाल चांगले आले.

वेध उद्याचा
आता मार्केट २८ च्या PE वर आहे. २००८ मध्ये एवढ्याच PE वर असताना निफ्टी ६३५७ वरून २२५३ पर्यंत पडले होते. सन २००० मध्ये निफ्टी १८१८ वरून मार्केट ८५० पडले होते. या आकडेवारीवरून एकच सांगायचे आहे की थोड्या थोड्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करणे योग्य ठरते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७१६५ वर NSE निर्देशांक निफ्टी ११२४४ आणि बँक निफ्टी २७३५६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!