Monthly Archives: September 2018

आजचं मार्केट – २८ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ सप्टेंबर २०१८

संपला बाबा एकदाचा सप्टेंबर महिना असे म्हणत सगळेजण ऑक्टोबर सिरीजला सामोरे गेले. सप्टेंबर महिना संपला पण त्या महिन्यातील कटकटी संपल्या नाहीत. ऐतिहासिक डाटा असे सांगतो की ऑक्टोबर सिरीज १० पैकी ८ वेळेला खराबच जाते. पण ऑक्टोबरमध्ये रोटेशन असते. आज रुपया US $१= Rs ७२.४८ होता. क्रूडची US $ ८१.८२ प्रती बॅरल आणि US $ निर्देशांक ९४.५६ होता.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

पण अजूनही बॉटमिंग झाले आहे असे दिसत नाही. मार्केटमध्ये अस्थिरता खूप आहे. पूर्वी VIX(VOLATALITY इंडेक्स) ११ ते १४ या पातळीवर होता. सध्या VIX १७ झाला आहे . त्यामुळे शॉर्ट कव्हरिंग अपेक्षित आहे.आणि यानंतर टाईम करेक्शन व्हायला पाहिजे. प्राईस करेक्शन झाले आहे.

आज INFIBEAM च्या शेअरने दाणादाण उडवली. २०० DMA चा मजबूत सपोर्टही जो Rs १६७ वर होता तोही शेअरने तोडला. व्यवस्थापनाने येऊन खुलासा केला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. Rs १९०ला उघडलेला शेअर Rs ५३ पर्यंत खाली गेला होता.

अपोलो टायर्सच्या शेअरहोल्डरनी MD च्या डिस्प्रपोरशनेट सॅलरी आणि अपॉइंटमेंटविरुद्ध वोटिंग केले. पूर्वी असेच वोटिंग TBZ च्या शेअरहोल्डरनी केले होते. त्यामुळे शेअर सुधारला नाही.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com **

येस बँकेचे प्रमोटर आपला स्टेक विकून टाकतील ही शेअरहोल्डर्सच्या मनातील भीती गेलेली नाही. स्वतः राणा कपूरने ट्विट करून सांगितले की मी बँकेत असलो नसलो तरी मी माझा स्टेक विकणार नाही. पण यावर लोकांचा विश्वास बसला नाही.

PNGRB ने गॅसचे टॅरिफ रेट वाढवले. ही वाढ २८% पर्यंत केली. याचा फायदा GSPL, GAIL यांना होईल.

HUL नी लाईफबॉयचे भाव ५.१% ने कमी केले. व्हॅसलिन बॉडी लोशनच्या किमती १६.७०% ने वाढवल्या. पॉण्ड्स पॉवडरच्या किमती २.२७% ने वाढवल्या.

२६ आणि २७ सप्टेंबर २०१८ च्या ब्लॉगमध्ये नेस्लेचा उल्लेख केला होता. एवढ्या मंदीच्या मार्केटमध्येही नेस्लेचा शेअर इंट्राडे Rs २०० ने वाढला.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com **

विशेष लक्षवेधी

 • IRCON चे आज लिस्टिंग Rs ४१० वर झाले. IPO मध्ये Rs ४७५ ला दिला होता.
 • एल आय सी च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने IDBI बँकेतील ५१% स्टेक घ्यायला मंजुरी दिली IDBI बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग ४ ऑक्टोबर २०१८ रोजी होईल.

वेध उद्याचा

केरळमधील आपत्तीसाठी सेस लावायला बऱ्याच राज्यांनी विरोध केला. त्यामुळे लिकर आणि सिगारेट यांच्यावर आलेले डिझास्टर सेस चे संकट काही काळापुरते टळले. GST कौन्सिलमध्ये GST चे कलेक्शन वाढवण्यासाठी करता येणाऱ्या उपायांचा विचार झाला.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com **

बुल रन मध्ये IPO ला लिस्टिंग गेन होतो. तसा लिस्टिंग गेन बेअर रन मध्ये होत नाही. मजबूत कंपनी असेल तरच IPO पूर्णपणे सबस्क्राईब होतो अन्यथा IPO मध्ये बदल करावे लागतात किंवा मागे घ्यावा लागतो.
बुल रन मध्ये ट्रेडेबल करेक्शन मिळते त्यावेळी खरेदी केल्यास फायदा होतो. यालाच आपण ‘BUY ON DIPS’ म्हणतो. पण बेअर रन मध्ये ट्रेडेबल रॅली मिळते तेव्हा आपण शॉर्ट करतो. याला आपण ‘सेल ON RALLIES ‘ म्हणतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२२७ NSE निर्देशांक निफ्टी १०९३० आणि बँक निफ्टी २५११९ वर बंद झाला.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०१८

आज क्रूड US $ ८२.२५ प्रती बॅरल आणि रुपया US $१= Rs ७२.६१ तर पुट/कॉल रेशियो १.०९ होता
इराणच्या विदेशमंत्र्यांनी असे सांगितले की भारत इराणमधून क्रूड आयात करणे बंद करणार नाही. क्रूड आयात करण्याचा करार ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

२५ सप्टेंबर २०१८ आणि २६ सप्टेंबर २०१८ असे दोन दिवस FOMC मीटिंग झाली. त्यामध्ये ०.२५ बेसिस पाईंट रेट वाढवला. आता रेट २.२५% झाला. २०१८ या वर्षात आणखी एकदा रेट वाढण्याची शक्यता वर्तवली गेली. २०१९ या वर्षात तीन वेळेला रेट वाढवला जाईल.

आज सरकारने अशा वस्तूंवर इम्पोर्ट ड्युटी लावली की ज्या वस्तू आयात केल्या नाहीत तरी चालतील. या वस्तूंचं उत्पादन भारतात होत आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना याचा फायदा होऊ शकेल. सणासुदीच्या सिझनचा विचार करून हा निर्णय घेतला आहे असे दिसते. ही इम्पोर्ट ड्युटी एअरकंडिशनर, वाशिंग मशीन, टायर्स, आणि पादत्राणे यावर लावण्यात आली. उदा जॉन्सन हिताची, IFB इंडस्ट्री, मर्क इलेक्ट्रॉनिक्स, ब्ल्यू स्टार, अंबर एंटरप्रायझेस, अपोलो टायर्स, लिबर्टी, नीलकमल, ला ओपाला, बोरोसिल. या कंपन्यांना फायदा तर हॅवेल्स आणि व्होल्टास या दोन कंपन्यांना तोटा होईल.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

ATF (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) वर ड्युटी लावली. याचा परिणाम जेट एअरवेज आणि इंडिगो यांच्यावर होईल. सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी न लावल्यामुळे टायटन कंपनीला फायदा झाला. पॉलिश्ड हिऱ्यांवरील ड्युटी १५% वरून २०% केली कारण UAE, टर्की, इटली आणि सिंगापूर येथून ज्युवेलरी आयात होते.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com **

मारुतीचा शेअर दिवसेंदिवस पडत आहे कारण त्यांचा ‘WAITING पिरियड’ कमी होऊ लागला आहे याचा अर्थ मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाला आहे. कंपनी कार्सवर डिस्कॉउंटही देत आहे.

नेस्लेने मात्र नवीन नवीन प्रॉडक्ट्स, नवीन फ्लेवर्स, मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली आहे. नवीन पोर्टेबल कॉफी मेकर बाजारात आणला. त्याची किंमत Rs ६४९९ ठेवली आहे.

विशेष लक्षवेधी

 • TD पॉवर लिमिटेड या कंपनीने Rs २५६ प्रती शेअर या दराने शेअर BUY BACK जाहीर केला. कंपनी Rs ११कोटी BUY बॅक साठी खर्च करेल. माझ्या ‘मार्केट आणि मी ‘ या पुस्तकात ‘BUY BACK’ या कॉरपोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
 • मार्केट मंदीत असल्यामुळे गार्डन रिच शिपबिल्डर्स या सरकारी कंपनीच्या IPO ला थंडा प्रतिसाद मिळाला.प्राईस बँड मध्ये बदल केला की IPO ची मुदत तीन दिवस वाढवून मिळते. असा नियम असल्यामुळे प्राईस बँड Rs ११४ ते Rs ११८ करण्यात आला. हा IPO आता १ ऑक्टोबर २०१८ पर्यंत ओपन राहील.

वेध उद्याचा

 • १ऑक्टोबर आणि २ऑक्टोबर २०१८ रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील.
 • ५ ऑक्टोबर २०१८ RBI ची मीटिंग आहे. यामध्ये लिक्विडीटी वाढवण्यासाठी CRR कमी करण्याविषयी तसेच रेट वाढवण्याविषयी विचार केला जाईल.
 • विधानसभांच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईल.
 • २९ ऑक्टोबर २०१८ रोजी अयोध्या मामल्याची सुनावणी होईल.
 • १५ दिवसांसाठी अतिरिक्त मार्जिन लावण्यास उद्यापासून सुरुवात होईल.
 • दुसऱ्या तिमाहीचे निकाल यायला सुरुवात होईल. २८ सप्टेंबरला GST कौन्सिलची मीटिंग आहे. या मिटींगच्या अजेंड्यावर सिमेंटवरील GST कमी करण्याचा विषय नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३२४ NSE निर्देशांक निफ्टी १०९७७ आणि बँक निफ्टी २५०४२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०१८

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

आज मार्केटमध्ये वातावरण चांगले होते. मार्केट पडले तरी पुन्हा वाढत होते. त्यामुळे ट्रेडर्सना दिलासा मिळत गेला.पण फंड हौसेसमध्ये रिडम्प्शन प्रेशर वाढले आहे असे समजले. आज क्रूडने थोडी माघार घेतली US $८१.६० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ७२.६३ या पातळीवर राहिला. एकेका शेअरमध्ये दिवसागणिक २०% पेक्षाही अधिक हालचाल पाहून सेबी त्रस्त झाली. उदा येस बँक, DHFL. ज्या शेअरमध्ये अशी हालचाल होईल त्या शेअर्ससाठी मार्जिन वाढवले.

मंत्रीमंडळाने साखरेसाठी निर्यात सबसिडी मंजूर केली. साखरेच्या निर्यातीवर Rs ४५०० कोटींची तर मिल्ससाठी Rs १०००कोटी ट्रान्सपोर्ट सबसिडी जाहीर केली.Rs १३.८८ प्रती QUINTAL सबसिडी मंजूर केली. गेले दोन दिवस या बातमीची अपेक्षा होती प्रत्यक्षात ही बातमी आल्यावर साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर ‘सेल ऑन न्यूज’ या उक्तीप्रमाणे पडले.

सरकारने नवी टेलिकॉम पॉलिसी मंजूर केली. या अंतर्गत टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे इंफ्रा, उत्पादन सुधारले जाईल. ग्रामनेट नगरनेट अशा विविध योजनांचा टेलिकॉम धोरणात समावेश आहे. या नव्या धोरणाचा फायदा तेजस नेटवर्क, स्टरलाईट, अक्ष ऑप्टी फायबर या कंपन्यांना होईल. **भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

FITCH या रेटिंग एजन्सीने बँक ऑफ बरोडा ची रेटिंग निगेटिव्ह केली आणि त्यांच्या निगराणी लिस्टमध्ये सामील केले.
ITDC या पर्यटन क्षेत्रातील सरकारी कंपनीला पाटण्यातील पाटलीपुत्र आणि J &K मधील गुलमोहर हॉटेल त्या त्या राज्य सरकारांना विकण्यासाठी मंजुरी दिली.

IOC आणि ONGC मिळून GSPL च्या LNG बिझिनेसमधला २५% हिस्सा घेणार आहेत.

SBI त्यांचा SBI जनरल इंश्युअरन्स मधला ४% हिस्सा विकणार आहे यातून Rs ४८१ कोटी मिळतील असा अंदाज आहे.

नॉन ESSENTIAL वस्तूंवरील आयात कमी करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली. त्यामुळे CAD कमी होईल.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

विशेष लक्षवेधी

 • आज IT क्षेत्रातील बाकी चे शेअर पडत असताना L &T टेकनॉलॉजिकल सर्व्हिसेस हा शेअर तेजीत होता. या कंपनीला US $ ४० मिलियनचे काम मिळाले.ही हायड्रोकार्बन क्षेत्रातील सॉफ्टवेअर बनवते. याचा उपयोग शेल गॅस क्षेत्रात होतो. यात L &T चा ८२% स्टेक आहे
 • या आठवड्यात तीन IPO ओपन असूनही मार्केट मधील बिघडलेल्या सेंटीमेंट मुळे यांना गुंतवणूकदारांनि निराशाजनक प्रतिसाद दिला.
 • आज निफ्टीने हायर हाय आणि हायर लो केल्यामुळे थोडेसे हायसे वाटले. आणि निफ्टी १०० दिवसाच्या शॉर्ट टर्म मोविंग ऍव्हरेज च्या वर क्लोज झाला ही जमेची बाजू होय.

वेध उद्याचा

 • १११५० ची पातळी पार करून अर्धातास त्याच ठिकाणी निफ्टी राहुन पूर्वीच्या रॅलीचा हाय १११७१ पार झाल्यावरच मार्केटमध्ये स्थैर्य येईल.
 • उद्या F &O ची एक्स्पायरी आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५४२ NSE निर्देशांक निफ्टी ११०५३ आणि बँक निफ्टी २५३७६ वर बंद झाला.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१८

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

क्रूड, विनिमय दर, व्याजाचा दर , ट्रेड वॉर, लिक्विडीटी, बॉण्ड यिल्ड,आणि आता IL&FS हे सर्व ढग मार्केटच्या आकाशात होते. काही गोष्टी सरकारच्या हातातल्या होत्या तर काही गोष्टी सरकारच्या हाताबाहेरच्या होत्या. शेअरमार्केट पडणं थांबलं नाही तर मार्केटमध्ये पैसा येण्याच्या ऐवजी काढून घेतला जाईल आणि बिकट परिस्थितीचा सामना करावा लागेल हे लक्षात येताच सरकार दरबारी हालचाल सुरु झाली. लिक्विडीटी कमी झाल्यामुळे शेअरमार्केट मध्ये जी घबराट निर्माण झाली होती त्यावर वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झाली. आणि IL&FS ची समस्याच सोडवली जाईल अशी ग्वाही दिली गेली. IL&FS मधील प्रॉब्लेम सॉल्वन्सीचा नसून लिक्विडिटीचा होता. IL&FS ला सुद्धा AAA – रेटिंग होते. हे रेटिंग हाय ट्रस्ट आणि रेप्युटेशन दाखवते. चांगल्या चांगल्या गुंतवणूकदारांनी या मध्ये गुंतवणूकही केली आहे. पण लिक्विडीटी इशू निर्माण झाल्यामुळे IL&FS पेमेंट करू शकले नाहीत. आणि त्यामुळे विश्वासार्हता गमावली म्हणून त्यांना ‘D’ रेटिंग दिले गेले.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

हा लिक्विडीटी इशू आहे असे रोगाचे निदान होताक्षणी RBI , SEBI ,अर्थमंत्रालय एकत्र आले. पद्धतशीरपणे लिक्विडीटी प्रोवाइड करू असे मार्केटला आश्वासन दिले.२१ सप्टेंबर पासून इंडिया बुल्स हौसिंग फायनान्सने Rs २२०० कोटींचे कमर्शियल पेपर्स ८.३६% दराने विकले. गृह फायनान्सने सुद्धा Rs १००० कोटी ८.५०% ने गोळा केले. अशाच प्रकारे आदित्य बिर्ला फायनान्स ने सुद्धा मार्केटमधून पैसा उभा केला. NBFC ना लिक्विडीटी इशुला सामोरे जावे लागते. सातत्याने रिपेमेंट करावी लागले आणि रिफायनान्स उपलब्ध होऊ शकला नाही तर IL&FS सारखा लिक्विडीटी इशू होतो आणि काही काळाने याचे रूपांतर सॉल्वन्सी इशूमध्ये होते. २१ सरकारी बँकांपैकी १७ बँका PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) खाली आहेत. या बँका कर्ज देऊ शकत नाहीत. आणि ही पोकळी सध्या NBFC भरून काढत आहेत.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

NBFC ला म्युच्युअल फंड पैसे पुरवतात. जर पैशाचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम प्रगतीवर आणि ग्रोथवर होऊ शकतो हे सर्व लक्षात घेऊन सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली आणि मार्केटने सुद्धा ३०० ( सेन्सेक्स) पाईंट्सची सलामी दिली. लिक्विडीटी पुरवण्यासाठी RBI CRR ( कॅश रिझर्व्ह रेशियो) कमी करू शकते. RBI एक स्वतंत्र विंडो उघडून बॉण्ड्सची खरेदी करू शकते. एल आय सी IL&FS मध्ये त्यांचा स्टेक वाढवू शकते. सध्या एल आय सी चा स्टेक २५.३४% आहे तर HDFC चा स्टेक ९.०२% आहे. IL&FS Rs ४५०० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे. पण या राईट्स इशूमध्ये आम्ही सहभाग घेणार नाही असे स्पष्टपणे HDFC ने कळवले आहे. आम्ही पॅसिव्ह इन्व्हेस्टर आहोत त्यामुळे भाग घेणार नाही. रोगाला उपाय सापडला आहे पण अशक्तपणा जायला वेळ लागतो त्याच प्रमाणे लोकांच्या मनातली भीती आणि अविश्वास जायला वेळ लागेल. मार्केट हळू हळू पूर्वपदावर येईल. आपल्या लिस्टमधील जे शेअर्स आपल्याला हव्या असलेल्या भावात उपलब्ध असतील ते शेअर हळू हळू खरेदी करायची ही योग्य वेळ आहे.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

GST कौन्सिलची मीटिंग २८ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. यामध्ये डिझास्टर सेस लावण्यासंबंधात चर्चा केली जाईल. प्रथम हा सेस सिगारेटवर लावला जाईल असे समजते. सिगारेट कंपन्या ५%सेस लावल्यास किमती तेवढ्याच वाढवून हा खर्च सोसू शकतील. सध्या केरळमध्ये निर्माण झालेल्या संकटामुळे हा खर्च केंद्र सरकारने करायचा की राज्य सरकारनं करायचा असा विचार ऐरणीवर आला.

नेस्ले या कंपनीने मॅगी स्प्रेड आणि डीप बाजारात आणले.

विशेष लक्षवेधी

 • रशिया आणि ओपेक देश क्रूडचे उत्पादन वाढवायला तयार नाहीत म्हणून क्रूडने US $ ८२ प्रती बॅरलची पातळी ओलांडली.
 • रुपया US $१=Rs ७२.७४ वर तर US $ निर्देशांक ९४.१८ झाले.

वेध उद्याचा

 • आजपासून फेडच्या FOMC ची मीटिंग सुरु झाली. त्यात काय झाले हे २७ सप्टेंबरला कळेल.
 • २७ सप्टेबर २०१८ ला F&O एक्स्पायरी तसेच बँकांची साप्ताहिक एक्स्पायरी आहे. २८ तारखेच्या GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये घेतलेल्या निर्णयांकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६५२ NSE निर्देशांक निफ्टी ११०६७ आणि बँक निफ्टी २५३३० वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१८

शुक्रवारी मार्केटमध्ये जो गोंधळ उडाला त्यानंतर RBI आणि SEBI यांना लक्ष घालणे भाग पडले. दोघांनीही संयुक्त स्टेटमेंट दिले. IL&FS च्या ज्या काही अडचणी असतील त्या समजावून घेण्यासाठी मीटिंग ठरवली आहे. कदाचित IL&FS ला ‘BAIL OUT’ करण्याचीही शक्यता आहे. ‘ICRA ‘ आणि ‘CARE’ या रेटिंग एजन्सीजनी DHFL आणि इंडिया बुल्सच्या रेटिंगवर शिक्कामोर्तब केले. पण मार्केट जे काही समजायचे ते समजले होते. अर्थमंत्रयांनी सुद्धा सांगून पाहिले. इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगात ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले. ** www.marketaanime.com **
सर्वांना वाटले होते की एखादा अपघात झाल्याप्रमाणे मार्केट पुन्हा पूर्ववत होईल. झाले गेले विसरून जाईल ! पण तसे घडले नाही. मार्केटमध्ये मंदी सुरूच राहिली.

व्यक्तिशः मला मात्र ‘सत्यम’ च्या घटनेची आठवण झाली. जे कोणी गेल्या पंधरा वीस वर्षात मार्केटमध्ये व्यवहार करत आहेत त्यांनासुद्धा जानेवारी २००९ मधील ‘सत्यम ‘च्या घटनेची आठवण झाली असेल . ‘सत्यम’ चा शेअर सुद्धा Rs ६०० च्या वर होता. भले भले विश्लेषक सुद्धा ‘सत्यम’ मध्ये काही दोष आहे किंवा ‘सत्यम’ पासून दूर राहावे असे सांगत नव्हते. पण प्रमोटरने स्वतः कबूल केल्यानंतर शेअर Rs ६०० वरून Rs १० पर्यंत खाली गेला होता. ऑडिटर्स वरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे नष्ट झाला होता. त्यामुळे अशा घटनांमुळे लोकांचे हात पोळलेले आहेत. शुक्रवारी घडलेली घटना हा एक अपघात म्हणून सोडून देण्यास लोक तयार नाहीत असे दिसते. ** www.marketaanime.com **

शुक्रवारी मार्केट एवढे पडेल असे कोणत्याही दूरदर्शनच्या वाहिनीवरून सांगितले नव्हते. किंवा अशा प्रकारची शंका उपस्थित केली नव्हती. DHFL ५०% पडेल किंवा अगदी १०% ने NBFC चे शेअर्स पडतील असेही भाकीत कोणी केले नव्हते. समझनेवालेको इशारा काफी होता है ! त्यामुळे आपण अंथरून पाहूनच पाय पसरावेत. तुम्ही का सांगितले नाही म्हणून कोणाला दोष देऊ नये. तोटा आपलाच होतो ना ? मग जेवढा तोटा सहन करू शकू तेवढाच धोका पत्करावा. ज्याला आगत असेल त्यानेच स्वागत केले पाहिजे. ** www.marketaanime.com **

आज क्रूडने US $ ८० प्रती बॅरल ची पातळी ओलांडली रुपया US $ १ = Rs ७२.६१ झाला होता. US $ निर्देशांक वधारला. फेड रेट वाढवेल, भारतातही व्याजाचे दर वाढवले जातील अशी शक्यता वाटू लागली. NBFC कंपन्यांची फंडिंग कॉस्ट वाढेल असे बोलले जाऊ लागले. ११ वाजता मार्जिन कॉल साठी विक्री होते तशी विक्री सुरु झाली. या सगळ्यामुळे मार्केटची अवस्था ‘आधीच मर्कट तशात मद्य प्याला तशात त्यास झाली भूतबाधा’ अशी झाली ** www.marketaanime.com **
आणि मार्केट दिवसभर पडतच राहिले. याला अपवाद ऑइल आणि गॅस क्षेत्र आणि IT क्षेत्रातील कंपन्यांचा होता.

या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी काही उपाय योजले आहेत. ते उपाय लागू होऊन त्याचा परिणाम दिसायला वेळ लागेल. ऑइल मार्केटिंग कंपन्या जो क्रूडचा साठा ठेवतात तो कमी ठेवतील. त्यामुळे क्रूडची आयात कमी करता येईल ..
सुप्रीम कोर्टाने दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरील थर्ड पार्टी इन्शुअरन्स Rs १५ लाखांचा करावयास सांगितला. यामुळे इन्शुअरन्स प्रीमियमपासून मिळणारे उत्पन्न वाढेल. ** www.marketaanime.com **

टाटा स्टील ने उषा मार्टिनचा स्टील बिझिनेस Rs ४७०० कोटींना खरेदी केला.

येस बँक नवीन CEO ची नेमणूक करण्यासाठी एक समिती नेमेल . ही समिती राणा कपूर यांच्या अधिकारांचा विचार करेल.
PFC मधील सरकारची हिस्सेदारी REC Rs १२००० कोटींना खरेदी करेल. SJVN मधील सरकारची हिस्सेदारी NTPC Rs ८००० कोटींना खरेदी करेल अशा पद्धतीने पॉवर कंपन्या मर्ज करून सरकारला Rs २८० कोटी मिळतील.

आजपासून चीन मधून आयात होणाऱ्या मालावर १०% ड्युटी लावण्यास USA ने सुरुवात केली.

विशेष लक्षवेधी ** www.marketaanime.com **

 • कोची शिपयार्ड ८ ऑक्टोबरला ‘BUY BACK’ वर विचार करेल. BUY BACK झाल्यानंतर शेअरचा भाव वाढतो असे मी माझ्या ‘मार्केट आणि मी ‘ या पुस्तकात दिले आहे – https://store.self-publish.in/products/market-aani-me. त्याचा अनुभव टी सी एस आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्यामुळे येत असेल.
 • आज गार्डन रीच शिपबिल्डर्सचा IPO ओपन झाला.

वेध उद्याचा ** www.marketaanime.com **

पुट /कॉल रेशियो १ पेक्षा कमी झाल्यानंतर बॉटम फॉर्म होईल. आणि तोपर्यंत ‘सेल ऑन रॅलीज’ मार्केट चालू राहील. मार्केट थोडे जरी वाढले तरी पुन्हा शॉर्टींग केले जाईल. जर पुट/ कॉल रेशियो आधीच्या दिवशीच्या पूट /कॉल रेशियो पेक्षा कमी राहिला तर मार्केट बेअरिश असेल. आणि त्याउलट स्थिती असेल तर मार्केट बुलिश असेल असा अर्थ होतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३०५ NSE निर्देशांक निफ्टी १०९६७ आणि बँक निफ्टी २४९७० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ सप्टेंबर २०१८

सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून मार्केटमध्ये तेजीमंदीचा खेळ सुरु आहेच. पण आज मात्र कहर झाला. अवघ्या पांच मिनिटात मार्केट सेन्सेक्स १००० पाईंट कोसळले आणि तेवढ्याच गतीने सावरले. हा जरी ‘अल्गो’ ट्रेडचा परिणाम असला तरी मार्केटमधील निराशा शिगेला पोहोचली आहे असे जाणवते.जणू काही कारल्याचा वेळ कडुलिंबाच्या झाडावर चढावा तशी स्थिती होती. ही स्थिती बॉण्ड्समुळे निर्माण झाली. ** www.marketaanime.com **

आता प्रश्न येतो बॉण्ड म्हणजे काय ? बॉण्ड हे एक DEBT INSTRUMENT आहे. NBFC ना बँकेप्रमाणे सर्वसाधारण पब्लिक कडून ठेवी गोळा करता येत नाही. त्यामुळे NBFC ना बॉण्ड्स इशू करावे लागतात आणि बॉण्ड होल्डरला व्याजाची टक्केवारी कबुल केली जाते आणि ठरावीक कालावधीनंतर या बॉण्ड्सची रकम परत केली जाते. या बॉण्ड्सची खरेदी विक्री मनीमार्केटमध्ये केली जाते. अशीच एक NBFC IL&FS आहे. तिची लीड बँकर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एल आय सी, ORIX कॉर्पोरेशन ऑफ जपान हे IL&FS चे प्रमुख भागधारक आहेत. १० सप्टेंबर २०१८ रोजी IL&FS ही कंपनी SIDBI ला Rs एक बिलियन चे पेमेंट करू शकली नाही. याचाच अर्थ IL&FS मध्ये लिक्विडीटी CRUNCH आहे. IL&FS ने बॉण्ड्स इशू करून कर्ज घेतले आहे. हे IL&FS चे बॉण्ड DSP म्युच्युअल फंडाकडे आहेत पण IL&FS चे बॉण्ड्स विकले जाणार नाहीत असे वाटल्यामुळे DSP म्युच्युअल फंडाने DHFL चे Rs ३०० कोटींचे बॉण्ड्स डिस्कॉउंटने विकले किंबहुना विकावे लागले. याचा अर्थ BONDS चा सप्लाय जास्त आहे आणि लिक्विडीटी CRUNCH आहे. याचा सुगावा लागताक्षणी सर्व NBFC चे शेअर्स पडायला सुरुवात झाली. ** www.marketaanime.com **

अशा बर्याच म्युच्युअल फंडांकडे IL&FS चे बॉण्ड आहेत.Rs ९०००० कोटींच्या बॉण्डसाठी रिडम्प्शन प्रेशर येईल आणि मार्क टू मार्केट लॉसेस सोसावे लागतील. अजून याबाबतीत काहीच उपाययोजना झाली नाही IL&FS ची प्रोजेक्ट्स पूर्ण व्हायला उशीर लागत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने मनीमार्केटमध्ये लिक्विडीटी पुरवली पाहिजे तर या संकटातून मार्ग निघेल. ** www.marketaanime.com **

येस बँकेचे चेअरमन राणा कपूर यांची मुदत ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदत वाढवली. एवढ्या छोट्या कालावधीत त्यांचा सक्सेसर शोधणे सोपे नाही. आणि या कालावधीत आपला स्टेक प्रमोटर मॉनेटाईझ करतील या भीतीने येस बँकेचा शेअर Rs १०० ने पडला. आणि त्याच बरोबर येस बँक एक टेकओव्हर कॅन्डीडेट आहे. ** www.marketaanime.com **

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी केबिन प्रेशर मेंटेन करणारा स्विच चालू केला नाही त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. हे प्रवासी जेट एअरवेज विरुद्ध क्लास एक्शन सूट दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ** www.marketaanime.com **

टाटा मोटर्सचा कॅशफ्लो गरजेच्या मानाने कमी आहे आणि २०२० पर्यंत हीच स्थिती राहील असा अंदाज व्यक्त केला जातो.
चेन्नई पेट्रो ऑक्टोबरपासूनUSA चे अध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशाप्रमाणे इराणमधून आयात केले क्रूड प्रोसेस करणार नाही. पण त्याच बरोबर ट्रम्पनी ओपेक देशांना क्रूडची किंमत कमी करण्यासाठी सांगितले आहे. रविवारी अल्जीरियामध्ये तेल उत्पादक देशांची बैठक आहे. ** www.marketaanime.com **

ग्राफाइट इंडियाच्या बंगलोर युनिटला पर्यावरणाचे नियम पाळले नाहीत म्हणून हे युनिट बंद करायला सांगितले. कॉन्सेंट ऑफ ऑपरेशन रिन्यू केले नाही. ** www.marketaanime.com **

विशेष लक्षवेधी

 • आज टीसिएस च्या BUY BACK चा शेवटचा दिवस होता.
 • FTSE EM निर्देशांकात भारताचे वेटेज वाढणार आहे. या मध्ये बजाज होल्डिंग, पेट्रोनेट एल एन जी, बंधन बँक, L &T फायनान्सियल होल्डिंग, आणि L &T इन्फोटेक यांचा समावेश असेल.

वेध उद्याचा

 • निफ्टीमध्ये केलेले बदल पुढील आठवड्यातील शुक्रवारपासून लागू होतील. JSW स्टील निफ्टीमध्ये सामील होतील तर ल्युपिन बाहेर पडेल.
 • गार्डन रिच शिपबिल्डर या सरकारी कंपनीचा IPO २४ सप्टेंबरला ओपन होऊन २६ सप्टेंबरला बंद होईल.
 • पुढील आठवड्यात आवास फायनान्सिअल्सचा IPO २८ सप्टेंबर २०१८ ला ओपन होईल आणि ३ ऑक्टोबर२०१८ ला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ८१८ ते Rs ८२१ असेल. या शेअर्सची दर्शनी किंमत Rs १० असेल.
 • IRCON च्या शेअर्सचे लिस्टिंग २६ सप्टेंबर २०१८ ला होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६८४१ NSE निर्देशांक निफ्टी १११४३ आणि बँक निफ्टी २५५९६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट१९ सप्टेंबर २०१८

रुपया US $१=Rs ७२.७१, ब्रेंट क्रूड US $७९ प्रती बॅरेल, US $निर्देशांक ९४.५१ होता. पण मार्केट वर परिणाम मात्र सरकार आणि सेबी यांच्या धोरणांचा झाला.म्युच्युअल फंड ग्राहकांना जास्त चार्ज लावत आहेत हे सेबीच्या लक्षात आले. सेबीने या एक्स्पेन्स रेशियोची कमाल मर्यादा ठरवली. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

इंडेक्स फंडासाठी १% आणि फंड ऑफ फंडांसाठी २.२५% आणि ETF साठी १% असा TER ( टोटल एक्स्पेन्स रेशियो) ठरवला. यामुळे म्युच्युअल फंडांशी संबंधित शेअर्स कोसळले. त्यांना शॉर्ट टर्ममध्ये तोटा सोसावा लागेल पण या योजनेमध्ये ग्राहकांचा फायदा असल्यामुळे व्यवसाय वाढेल आणि तोटा भरून निघेल. याचा परिणाम HDFC AMC, रिलायन्स निप्पोन, एडल वेस यांच्यावर झाला. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

कमोडिटी डेरिव्हेटीव्ह सेगमेंट १ऑक्टोबरपासून सुरु करण्यासाठी सेबीने BSE ला मंजुरी दिली. प्रथम BSE मेटल वायदा सुरु करणार आहे. आणि नंतर ऍग्री कमोडिटीमध्ये वायदा सुरु करेल. म्हणून गेला आठवडाभर BSE चा शेअर वाढत होता. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

सेबी IPO ला लागणारा वेळ कमी करण्याच्या तयारीत आहे सध्या T + 6 ही योजना आहे.आता T + ३ ची योजना आणणार आहे. म्हणजेच IPO बंद झाल्यावर ३ दिवसात लिस्टिंग होईल  **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

सरकार निर्यात वाढवण्यासाठी चहा साखर तांदूळ या क्षेत्रातील कंपन्यांना काही सवलती देणार आहे. आणि इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीम लागू करणार आहे. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

सरकार स्टीलवरची इम्पोर्ट ड्युटी १५%ने वाढवण्याचा विचार करत आहे. तर डाळी धान्य, तेल आणि साखर यांच्या निर्यातीवर भर देण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी ISMA, SEA आणि SOPA या संबंधित असोसिएशनशी चर्चा करणार आहे. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

सरकारने मध्य प्रदेश मधील इंदोर ते बुधनी रेल्वे लाईन साठी Rs ३२६२ कोटी मंजूर केले. तर तालचेर फर्टिलायझर प्रोजेक्ट साठी Rs १०३४ कोटी मंजूर केले. या प्रोजेक्टमध्ये GAIL, CIL, RCF आणि फर्टिलायझर कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. हा कोलगॅसिफिकेशन प्रोजेक्ट आहे. यामुळे युरियाचे उत्पादन वाढेल आणि आयातीवर अवलंबून लागणार नाही. त्यामुळे आज हे सर्व शेअर्स वाढत होते. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

विशेष लक्षवेधी

दिनेश इंजिनीअर्सचा IPO २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत येत आहे. प्राईस बँड Rs १८३ ते Rs १८५ असेल. यातून Rs १८५ कोटी गोळा होतील. हा पैसा विस्तार योजनेसाठी वापरला जाणार आहे. ऑप्टिकल फायबर, केबल नेटवर्कसाठी ही  रकम वापरली जाईल. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

इरकॉन चा IPO मार्केट संपेपर्यंतच्या वेळेपर्यंत ३ वेळा ओव्हरसबस्क्राइब झाला होता. KIOCL ( कुद्रेमुख आयर्न ओअर कंपनी लिमिटेड) या कंपनीने Rs १७० प्रती शेअर या भावाने शेअर BUY BACK जाहीर केला. यासाठी कंपनी Rs २१४ कोटी खर्च करेल. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

वेध उद्याचा

इंडियन स्टील आणि अल्युमिनियमला USA हायर टॅरिफ रेजिममधून वगळणार आहे. चीनसुद्धा USA मधून आयात होणाऱ्या US $ ६० बिलियन मालावर ड्युटी लावणार आहे. **भाग्यश्री फाटक  –  www.marketaanime.com**

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१८

१२ बँका PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) या RBI च्या कार्यक्रमा अंतर्गत आहेत. यांना दत्तक कोण घेणार ? यांचा सांभाळ कोण करणार ? हा फार मोठा प्रश्न सरकारला भेडसावत होता. बँकांना फार मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवण्याची गरज होती. या सगळ्यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू होते. शेवटी बँकांचे सक्तीने लग्न लावून द्यावे असा मतप्रवाह उदयाला आला.

विजया बँक, बँक ऑफ बरोडा यांची कुंडली चांगली जमते आहे. भोगौलिक दृष्ट्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा या दोन्ही बँका एकमेकांना पूरक होतील असे वाटले. आणि यांच्या गळ्यात देना बँकेसारखी अशक्त बँक घालायचे सरकारने ठरवले. सरकारच मोठा शेअरहोल्डर असल्यामुळे कोणाचीही हरकत येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशा प्रकारच्या मर्जरमुळे ज्यांची स्थिती चांगली आहे त्या बँकाही डबघाईला येतील असा अंदाज गुंतवणूकदारांना आला त्यामुळे मार्केटमध्ये पडझड सुरु झाली आणि जर हा मर्जरचा मौसम सुरु झाला असेल तर कोणत्या बँकेच्या गळ्यात कोणती बँक घातली जाईल याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरु झाले. त्यामुळे मजबूत बँकाही पडू लागल्या. स्टेट बँकेमध्ये मुळातच इतर स्टेट बँकांचे आणि महिला बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणतीही बँक स्टेट बँकेच्या गळ्यात पडण्याची शक्यता नाही. परंतु वातावरणाचा परिणाम स्टेट बँकेच्या शेअरवरही झाला. बँक बरोडाचे ५.४०% NPA आणि विजया बँकेचे ४.१०% NPA आणि देना बँकेचे ११.४% NPA आहेत. पण मर्जरनंतर याचे प्रमाण ५.७% वर येईल. ROA निगेटिव्हच राहील.आणि NIM ( नेट इंटरेस्ट मार्जिन) मध्येही लक्षणीय सुधारणा होणार नाही . पण सरकार या मर्जरसाठी आवश्यक असणारा पैसा पुरवणार आहे. मर्ज्ड एंटीटीला भांडवल पुरवण्याची गरज नाही असे समजते. मर्जर नंतर ही सर्व जबाबदारी बँक ऑफ बरोडाचे चेअरमन P .S . जयकुमार यांच्याकडे सोपवली जाईल. त्यांनीही याला तयारी दर्शवली आहे. या मर्जरमध्ये कर्मचाऱ्यांचे कोठलेही नुकसान होणार नाही असे सरकारने जाहीर केले. यामुळे विजया बँक आणि बँक ऑफ बरोडाचे शेअर पडले आणि देना बँकेचा शेअर अपर सर्किटला बंद झाला. 

इराणवरील निर्बंध ४ नोव्हेंबर पासून लागू होतील. इराण हा केमिकल प्लेअर आहे. ज्या कंपन्या केमिकलच्या बिझिनेसमध्ये आहेत त्यांना या निर्बंधांचा फायदा होईल. त्यांना प्रायसिंग पॉवर मिळेल. उदा दीपक नायट्रेट, GNFC GSFC

क्रूड US $ ८० प्रती बॅरेल एवढे असेल तर आमची काहीही हरकत नाही असे सौदी अरेबियाने सांगितले. आता USA, रशिया आणि OPEC देश यांची एकी झाली आहे. HURRICANE ( चक्री वादळं) येण्याचा हा सिझन आहे. वादळग्रस्त भागातून क्रूडची रिकव्हरी आणि रिफायनिंग काही काळापुरते बंद होते. त्यामुळे क्रूड US $ ८२ ते ८३ प्रती बॅरेल तर रुपया US $ १= ७५ पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज ७.१७% २०२८चे बॉन्ड्स ८.१०% वर पोहोचले त्यामुळे सर्व NBFC चे शेअर्स पडले.

ब्रेक्झिट आणि डिझेलच्या पॉलिसीमुळे आणि USA आणि चीन यांच्यातील ट्रेंड वॉर मुळे टाटा मोटर्सचा लंडनमधील प्लांट आता आठवड्यातून तीन दिवस सुरु राहील.

विजेचे दर १४% ने वाढले आहेत याचा फायदा पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपन्यांना होईल. टाटा पॉवर, अदानी पॉवर, REC आणि PFC यांना होईल.

पाम ऑइलच्या किमती कमी होत आहेत तर HUL ने त्यांच्या उत्पादनांच्या किमती ३% ते ४% ने वाढवल्या आहेत. या दोन्हीमुळे HUL चे मार्जिन वाढेल म्हणून शेअर वाढला.

सणासुदीच्या काळाचा विचार करून सरकारने सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी वाढवली नाही. म्हणून टायटनचा शेअर तेजीत होता.

MACLEOD RUSSEL या कंपनीच्या आसाममधील दोन चहाच्या बागा GOODRICK ही कंपनी विकत घेणार आहे. हे डील Rs ९१ कोटींना होईल असे अपेक्षित आहे.

डिफेन्स कौन्सिलने Rs ९१०० कोटींची उपकरणे खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली. यात मिसाईलचा समावेश आहे. याचा फायदा भारत डायनामिक्सला मिळेल.

विशेष लक्षवेधी

 • IRCON चा IPO आज दुसऱ्या दिवशी ४३% भरला. उद्या या IPO चा शेवटचा दिवस आहे.
 • ३ ऑक्टोबर २०१८ ला HCL TECH च्या BUY बॅकची शेवटची तारीख आहे.
 • F & O ट्रेडिंगचा कालावधी रात्री ११ वाजेपर्यंत वाढवण्याचा आपला निर्णय सेबीने पुढे ढकलला.

वेध उद्याचा

 • गुरुवारी मोहर्रम ची सुट्टी असल्यामुळे बँकांची साप्ताहिक एक्स्पायरी बुधवार दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७२९० NSE निर्देशांक निफ्टी ११२७८ आणि बँक निफ्टी २६४४१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१८

सकाळी रुपया US $१=Rs ७२.६६ होता. ढासळणार्या रुपयाला सावरण्यासाठी जे उपाय योजायला हवे होते ते उपाय योजले गेले नाहीत. आणि जाहीर झालेले उपाय पुरेसे नाहीत असे मार्केटला वाटले. त्यातून USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की चीनमधून आयात होणाऱ्या मालावर १०% आयात ड्युटी बसवली जाईल. पण हळू हळू सरकार फर्निचर, फळे, काजू , इलेक्ट्रॉनिक आयटेम्स, सोने आणि स्टील यावर ताबडतोब इम्पोर्ट ड्युटी लावण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे मार्केट सरता सरता रुपया US $१= Rs ७२.४६ वर पोहोचला. रुपयाच्या तालावर मार्केट नाचत होतं असं जाणवलं.

माणसाच्या आयुष्याचा आणि मार्केटचा विचार एकत्रितपणे करावा असे प्रकर्षाने जाणवते. सर्वजण श्रावण पाळतात गौरीच्या जेवणापर्यंत मांसाहार करत नाहीत काही काही गौरींना मासांहाराचा नेवैद्य असतो. त्या दिवसापासून लोक मांसाहार करतात. कदाचित (मजा केली हं 😉 ) यामुळेच अंडी झिंगे कोंबड्या याची विक्री वाढून हे शेअर्स मार्केट ५०० पाईंट पडलेले असतानाही २०% वर होते. उदा:- अवंती फीड्स, वॉटरबेस, वेंकीज, ऍपेक्स प्रोझॅन फूड्स, SKM एग्ज.

एथॅनॉलच्या किमतीमध्ये २५% वाढीला दिलेली मंजुरी सगळ्यांच्या फायद्याची ठरली. यावर्षी साखरेची मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. पुरवठा जास्त आणि मागणी कमी त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळातही साखरेचा भाव Rs २७ प्रती किलोपर्यंत खाली येईल असा अंदाज होता. पण आता उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केले जाईल. या सर्व गोष्टींमुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. द्वारिकेश, दालमिया भारत, अवध,उत्तम , रेणुका, धामपूर शुगर, राजश्री शुगर. प्राज इंडस्ट्रीज, त्रिवेणी.

सारीडॉन, एक्स प्रॉक्सिवान,नीमिलिड या औषधांवरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली.

ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी युनिटची तपासणी USFDA ने सुरु केली.

ऑइल रेग्युलेटर PNGRB यांनी सिटी गॅस रिटेलिंग लायसेन्स मिळाल्यांची नावे जाहीर केली. अडानी,IOC,BPCL आणि टॉरंट गॅस यांचा या यादीत समावेश असल्यामुळे हे शेअर वाढत होते.

विशेष लक्षवेधी

 • गोदरेज कंझुमरला बोनस देण्यासाठी मंजुरी मिळाली. २ शेअर्सला १ शेअर बोनस म्हणून मिळेल.
 • इरकॉन इंजिनीअरिंगचा IPO आज ओपन झाला. पहिल्या दिवशी मार्केट संपेपर्यंत १३% भरला.
 • रेंडिंग्टन या कंपनीने Rs १२५ प्रती शेअर या भावाने शेअर BUY BACK जाहीर केला.

वेध उद्याचा

 • सगळ्यांचे लक्ष FED च्या मीटिंगकडे आहे.
 • २०१३ सालाप्रमाणे NRI बॉण्ड्स येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
 • उद्यापासून HCL TECH चा BUY BACK Rs ११00 प्रती शेअर्स या भावाने सुरु होत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७५८५ NSE निर्देशांक निफ्टी ११३७७ आणि बँक निफ्टी २६८२० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १४ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ सप्टेंबर २०१८

USA मध्ये आलेले महागाईचे आकडे थोडे कमजोर आले. त्यामुळे US $ निर्देशांक ९४.४८ झाला. ब्रेंट क्रूड US $ ७८.४५ प्रती बॅरेल होते. स्वतः पंतप्रधान देशाच्या आर्थीक स्थितीची समीक्षा करून आवश्यक असलेली उपाययोजना करणार आहेत. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी ६-३० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे रुपया US $१=Rs ७२ च्या खालीच राहिला. चीनबरोबरच्या व्यापारी वाटाघाटी करण्याची आम्हाला घाई नाही असे सांगून USA ने चीनला पुन्हा वाटाघाटीचे आमंत्रण दिले. त्यामुळे बुधवारी सुरु झालेली तेजी शुक्रवारी मार्केटचा वेळ संपेपर्यंत चालू राहिली. ११५००चा टप्पा पुन्हा एकदा निफ्टीने गाठला. आज बॉण्ड यिल्ड सुद्धा थोडे कमी झाले. त्यामुळे NBFC आणि हौसिंग फायनान्स कंपन्या तेजीत होत्या.

इथॅनॉलच्या दरात सरकारने केलेली वाढ मार्केटला खूपच आवडली. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. साखरेचे झालेले भरघोस उत्पादन विचारात घेता साखर निर्यातीसाठी दिली जाणारी सबसिडी २०१८ -२०१९ या वर्षांसाठी सुरु ठेवावी या विचारात सरकार आहे. पण या विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील WTO कडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. नवी सबसिडी ऊस पेरणी करण्यासाठी Rs १४० प्रति टन आणि निर्यातीसाठी Rs ३००० प्रती टन दिली जाणार आहे.

ITC ने SANFEAST बिस्किटांचा भाव १३% वाढवला. आशीर्वाद आट्याचा भाव वाढवला आणि बिंगो चिपचे वजन १३%ने कमी केले. सिगारेट्स च्या किमती ४% ते ८% पर्यंत वाढवल्या. कंपनीने गव्हाच्या वाढलेल्या किमती असे कारण या दरवाढीसाठी दिले. परिणामी ITC आणि प्रताप स्नॅक्सच्या शेअरचा भाव वाढला.

ITC आणि टाटा ग्रुप ताजमानसिंग हॉटेलसाठी बोली लावणार आहेत.

आज USFDA कडून बरसातच झाली. सन फार्माला डोळ्यांच्या औषधासाठी, ल्युपिनला न्यूमोनियाच्या औषधासाठी तर झायडसला हाडांच्या औषधासाठी मंजुरी मिळाली.

MCX आणि NSE यांचे मर्जर होण्याची शक्यता वाढली. MCX ला कमोडिटीमध्ये वायदा सुरु करण्याची परवानगी मिळाली.
RCF ला MMRDA ला जमीन ट्रान्स्फर करण्यासाठी परवानगी मिळाली. तर आर्बिट्रेशनमध्ये सुप्रीम कोर्टाने श्रीराम EPC ला ४३.७ लाख युरो एवढी पेमेंट करायला सांगितले.

डिसेम्बर २०१८ पर्यंत NHPC आणि NTPC शेअर BUY BACK करेल.

विशेष लक्षवेधी

 • साकुमा एक्स्पोर्ट एका शेअरचे १० शेअर्समध्ये विभाजन करणार आहे.
 • गोदरेज अग्रोव्हेट आणि ASTEC लाईफ यांच्या मर्जरला मंजुरी मिळाली. ASTEC लाईफ च्या १० शेअर्ससाठी गोदरेज अग्रोव्हेटचे ११ शेअर्स मिळतील
 • ऑगस्ट २०१८ साठी CPI १० महिन्यांच्या किमान स्तरावर म्हणजे ३.६९% होता तर WPI ४.५३% होता.IIP जुलै २०१८ साठी ६.६ % होता.

वेध उद्याचा

ट्रेड डेफिसिटचे आकडे येतील. FPI बरोबर जो KYC च्या संदर्भात विवाद चालला होता त्या बाबतीत सेबी सोल्युशन काढेल. पुढील आठवड्यात बँक निफ्टीची एक्स्पायरी बुधवारी असेल. कारण गुरुवारी मोहरमची सुट्टी आहे. शुक्रवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीतील घेतलेल्या निर्णयांचा परिणाम सोमवारी मार्केटमध्ये दिसेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०९० NSE निर्देशांक निफ्टी ११५१५ आणि बँक निफ्टी २७१६३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!