आजचं मार्केट – ०३ सप्टेंबर २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०३ सप्टेंबर २०१८

शुक्रवारी मार्केटची वेळ संपल्यानंतर GDPचे आकडे आले. २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीत GDP ८.२% ने वाढले. पूर्वीचा हा आकडा ६.६६ % होता. खरे पाहता लो बेस चा हा परिणाम होता पण शेतीमालाची ग्रोथ चांगली होती.आज रुपया US $ १ = Rs ७१ पर्यंत घसरला. रुपयाच्या या पडण्यामुळे चीन मधून होणारे डम्पिंग कमी होण्याची आणि भारताच्या निर्यातीत सुधारणा होण्याची शक्यता आहे म्हणून सोमवारी मार्केट उघडताच मार्केटने सलामी दिली. पण हळू हळू स्ट्रॉंग शेअर्स मंदीत जाऊ लागले. बँक निफ्टी पडू लागला. बाजाराचे अवसान गळाले. मुख्य लेव्हल तुटताच मार्केट जोरदार पडू लागले. दिवसाअखेरीस मार्केट जवळ जवळ ३०० पाईंट्स मंदीत होते.

मी आपल्याला २९ ऑगस्ट २०१८ च्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे ३ सप्टेंबरला ऑटो विक्रीचे आकडे जाहीर झाले. अशोक लेलँड, बजाज ऑटो, यांची विक्री चांगली तर हिरोमोटोच्या विक्रीत फारसा बदल नाही, मारुती आणि एस्कॉर्ट याची विक्री असमाधानकारक, आयशर मोटर्स चे आकडे वरकरणी चांगले दिसत असले तरी रॉयल एन्फिल्डची विक्री ७०,००० च्या वर गेलेली नाही.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान,चंडीगढ आणि छत्तीसगढ येथे सुप्रीम कोर्टाने बांधकामास मनाई केली आहे. बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या राबिटच्या व्यवस्थापनाचा आराखडा सादर केला जात नाही तोपर्यंत बांधकाम करता येणार नाही असे कोर्टाने सांगितले.त्याच बरोबर DLF ने गुरुग्राममध्ये जी खरेदी विक्री केली त्याबाबत FIR दाखल केला गेला. या दोन्हीही बातम्यांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स मंदीत होते.

ऑक्टोबरपासून नैसर्गीक गॅसच्या किमती ३.५ MMBTU ( सुमारे १४% वाढ होईल ) होणार त्यामुळे CNG आणि PNG च्या किमतीही वाढल्या

विप्रोला US$ १ .५ बिलियन किमतीचे मोठे कॉन्ट्रक्ट १० वर्षांसाठी मिळाले.

‘भारत २२ ETF’ चा समावेश तारीख ३ सप्टेंबर २०१८ पासून F & O मध्ये होईल..

किर्लोस्कर, TNPL, अमृतांजन, फायझर,बोरोसिल, JK पेपर, VIP इंडस्ट्रीज, रेडीको खेतान या कंपन्या सप्टेंबर २०१८ मध्ये ASM लिस्ट मधून बाहेर येतील.

F &O मध्ये १४ सप्टेंबर पासून हळूहळू टप्प्या टप्प्याने ASM मार्जिन सर्व ओपन असलेल्या सौद्यांवर आकारले जाईल. यामध्ये इंडेक्स ऑप्शन्स, इंडेक्स फ्युचर्स, आणि स्टॉक F & O चा समावेश आहे. इंडेक्स ऑप्शनवर १% पासून ४% पर्यंत तर इंडेक्स फ्युचर्स वर ०.५ % ते २% पर्यंत तर स्टॉक F & O वर १.२५% पासून ५ % पर्यंत १४ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात हे मार्जिन वाढवले जाईल. पण एकंदरीतच किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये हाच यामागे उद्देश आहे.

विशेष लक्षवेधी

  • L & T इन्फोटेक या कंपनीची OFS आज ( किरकोळ गुंतवणूकदारांशिवाय इतर गुंतवणूकदारांसाठी) आणि ४ सप्टेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील. या OFS ची फ्लोअर प्राईस Rs १७०० ठेवली आहे.
    बर्याच बँकांनी आपले MCLR ( कर्जावरील व्याजाचे दर) वाढवले.

वेध उद्याचा

  • मुथूट उद्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. . .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८३१२ NSE निर्देशांक ११५८२ आणि बँक निफ्टी २७८१९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ०३ सप्टेंबर २०१८

  1. योगेश बालासाहेब कातारे

    खूप छान ,अशीच माहिती दररोज देत जा.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.