आजचं मार्केट – ०४ सप्टेंबर २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०४ सप्टेंबर २०१८

सेबीने एप्रिल २०१८ मध्ये एक सर्क्युलर काढले होते. त्या सर्क्युलरप्रमाणे FPI ना ( FOREIGN PORTFOLIO इन्वेस्टर्स) ३१ डिसेम्बर २०१८ पर्यंत KYC नॉर्म्स पूर्ण करायला सांगितले होते. सप्टेंबर उगवला तरी या कामामध्ये फारशी गती सेबीला आढळली नाही. सेबीच्या या नियमातील बदलामुळे OCI ( OVERSEAS सिटिझन्स ऑफ इंडिया), PIO ( PERSONS ऑफ इंडियन ओरिजिन) आणि NRI हे मॅनेज करीत असलेली US $ ७५ बिलियनची गुंतवणूक अवैध ठरेल. कारण OCI, PIO आणि NRI ही गुंतवणूक करण्यास अपात्र ठरतील. त्यामुळे त्यांना ही गुंतवणूक अल्पावधीत काढून घ्यावी लागेल किंवा भारताबाहेर न्यावी लागेल.याचा शेअरच्या किमतीवर आणि रुपयाच्या विनिमय दरावर परिणाम होईल असा इशारा या गुंतवणूकदारांच्या असोसिएशनने दिला आहे. सेबीने मात्र नियमात बदल केल्यामुळे असे काही होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

SCI (शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आता इराणला जहाज पाठवून क्रूड आणू शकणार नाही. कारण त्यासाठी त्यांना इन्शुअरन्स कव्हर मिळणार नाही. आणि याचा परिणाम चेन्नई पेट्रो आणि MRPL यांच्यावर होईल. कारण SCI यांना क्रूड पुरवते

टाटा मोटर्सचा जॅग्वारचा IPO येण्याची शक्यता आहे. दोन महिन्यामध्ये टाटा मोटर्स इलेक्ट्रिकल व्हेईकल बाजारात आणणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेइकल्सचा परफॉर्मन्स चांगला आहे. मार्च ते डिसेंबर २०१७ या काळात कंपनीने विकलेल्या ‘TIGOR’ गाड्यांपैकी काही गाड्या परत बोलवाव्या लागल्या.

US $ मध्ये ज्या कंपन्यांना उत्पन्न मिळते त्यांना सध्याची स्थिती फायदेशीर आहे. या मध्ये ऍपेक्स फ्रोझन फूड्स, वॉटरबेस आणि अवंती फीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. ह्या कंपन्या झिंगे आणि झिंग्याचें खाद्य यांची USAला निर्यात करतात.
OMC ( ऑइल मार्केटिंग कंपन्या ) ना सध्या खूप मोठा तोटा सोसावा लागत आहे. या कंपन्यांना LPG वर Rs २५५ प्रती सिलिंडर आणि रॉकेलवर प्रती लिटर Rs १२ तोटा होतो आहे.त्यामुळे HPCL BPCL IOC हे शेअर पडले.
ल्युपिनच्या तारापूर प्लांटची USFDA ने तपासणी केली होती. या API युनिटमध्ये एक त्रुटी दाखवण्यात आली.
बाळकृष्ण इंडस्ट्रीजने जो कॅपेक्स प्लॅन सांगितला तो मार्केटच्या पसंतीस उतरला नाही. यामध्ये जास्त गुंतवणूक परदेशात केली जाणार आहे. आणि त्यामुळे कंपनीचे फायनान्सियलस कमजोर होतील.

NBCCने आपण आम्रपाली प्रोजेक्टसाठी कोणतीही आर्थीक मदत करणार नाही किंवा आम्रपालीची मालमत्ता विकूनही प्रोजेक्ट पुरी करता येणार नाही असे सुप्रीम कोर्टात सांगितले.

अडानी एंटरप्राइझेस कॉर्पोरेट एक्शन करीत आहे. गॅस डिस्ट्रिब्युशन बिझिनेस वेगळा काढणार आहेत आणि शेअर होल्डर्सना नव्या कंपनीचे शेअर्स १:१ या प्रमाणात देणार आहेत. याची एक्स डेट सप्टेंबर ६ आहे. F & O मार्केट मधील २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर, आणि २९ नोव्हेंबर २०१८ ह्या तारखांना एक्स्पायरी होणारे करार आता सप्टेंबर ५ ला एक्स्पायर होतील. हे करार ६ सप्टेंबर ला पुन्हा ओपन होतील. प्री ओपन कॉल ऑप्शन सेशन ६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९ ते १० या वेळात होईल. आणि त्यानुसार अडाणी एंटरप्रायझेसची ओपनिंग प्राईस ठरवली जाईल.

VST टिलर्स आणि ट्रॅक्टर्सची ५०% ने कमी झाली. फोर्स मोटर्सचे उत्पादन आणि विक्री कमी झाली.

विशेष लक्षवेधी

  • टी सी एस ही Rs ८ लाख कोटी मार्केट कॅप असणारी दुसरी कंपनी झाली
  • आज रुपयाने US $ १ = Rs ७१.५३ ही लेव्हल गाठली. त्यामुळे बॉण्ड यिल्ड ८.०४७ झाले तर क्रूड US $ ७९ प्रती बॅरेलच्या पातळीला पोहोचले.
    मुथूट आणि ईशान डाईज चे निकाल चांगले आले.

वेध उद्याचा

  • हुडको, SREI इन्फ्रा, वर्रोक इंजिनीअरिंग यांचे निकाल उद्या जाहीर होतील.
  • एल आय सीने IDBI च्या शेअर होल्डर्ससाठी ओपन ऑफर आणण्याच्या शक्यतेवर विचार केला.
  • निफ्टीचे २० दिवसांचे मूव्हिंग ऍव्हरेज ११५२० वर आहे येथे जर मार्केट सावरले नाही तर निफ्टी ११३०० पर्यंत पडण्याची शक्यता आहे.
  • BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८१५७ NSE निर्देशांक निफ्टी ११५२० आणि बँक निफ्टी २७४३० वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.