आजचं मार्केट – ०५ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०५ सप्टेंबर २०१८

आज रुपया US $१=Rs ७२ या स्तरावर तर बॉण्ड यिल्ड ८.०६२ तर US $ निर्देशांक ९५.४३ वर पोहोचले. तर क्रूड US $ ७७.६० प्रती बॅरेल या भावाला होते कारण USA मध्ये ट्रॉपिकल वादळ येणार होते त्याचा जेवढा वाईट परिणाम अपेक्षित होता तेवढा अपेक्षित वाईट परिणाम झाला नाही.

USA चीन मधून आयात होणाऱ्या मालावर २५% ड्युटी लावणार की नाही हे आज USA चे अध्यक्ष ट्रम्प जाहीर करतील.
आज USA आणि भारत यांची महत्वाची बैठक आहे. त्यात इराणकडून क्रूड आयात करण्यासाठी USA ने घातलेल्या निर्बंधातून भारत USA कडून काही सवलत मागेल असा अंदाज आहे. USA ने ४ नोव्हेंबर २०१८ पासून इराणकडून क्रूड आयात करण्यावर बंदी घातली आहे आणि यात जगातील इतर देशांनी सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. भारतात इराणकडून क्रूड आयात करणे स्वस्त पडते तसेच इराणकडून भारतात आयात केलेले क्रूड भारतातील रिफायनरीज मध्ये रीफाईन करणे सोपे जाते. जर USA याला तयार झाले नाही तर भारत हळू हळू इराणबरोबरचे व्यापारी संबंध कमी करेल असे आश्वासन भारत देईल.

मुथूट फायनान्स आणि वरॉक इंजिनिअरींग आणि सफारी इंडस्ट्रीज यांचे निकाल चांगले आले . केरळमधील पुराचा परिणाम मुथूट फायनान्स या कंपनीच्या निकालावर होईल असे वाटले होते तेवढा परिणाम निकालावर दिसला नाही. कंपनीने ६ महिन्यात म्युच्युअल फंडाचा व्यवसाय सुरु करू असे सांगितले.

रिलायन्स इंफ्राने त्यांचा मुंबईतील पॉवर बिझिनेस विकून जे पैसे आले होते त्यातून NCD (नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स) चे रिपेमेंट केले. त्यामुळे त्यांना क्रिसिलने दिलेले ‘D ‘ रेटिंग काढून टाकले. त्यामुळे शेअर वाढला.

थॉमस कूक या कंपनीने Rs ६७ कोटीच्या NCD चे रिपेमेंट केले. यामुळे स्टॅन्डअलोन बेसिस वर कंपनी DEBT FREE होईल.

आज BEL च्या शेअरने मार्केटमध्ये चांगलाच गोंधळ झाला. प्रथम एक मोठे ब्लॉक डील झाल्यामुळे शेअर पडला तर मार्केट संपता संपता Rs ९२०० कोटींचा इक्विपमेंट सप्लाय साठी माझगाव डॉक बरोबर करार केला अशी बातमी आली. यासरशी शेअर काही प्रमाणात सुधारला

आज टाटा मोटर्सच्या विक्रीचे आकडे आले. USA मध्ये लँडरोव्हर ची विक्री १४%ने वाढली तर जग्वारची विक्री २०% ने कमी झाली. एकूण JLR ची विक्री २% ने वाढली.

विशेष लक्षवेधी

  • एंजल ब्रोकिंग चा IPO येणार आहे. त्याच बरोबर व्हेक्टस इंडस्ट्रीज या वॉटर स्टोअरेज आणि पाईपिंग सोल्युशन क्षेत्रातील आणि MILLTECH मशिनरी या शेतीचा माल प्रोसेसिंग साठी मशीनरी बनवणार्या कंपन्यांना IPO आणण्यासाठी सेबीने मंजुरी दिली.

वेध उद्याचा

  • रेलिगेअर फायनांस या कंपनीचे निकाल उद्या जाहीर होतील.
  • L & T फायनान्सियल होल्डिंगने आपला फायनान्सियल ऑपरेशन चेन बिझिनेस सेन्ट्रम कॅपिटल या कंपनीला विकला.
  • कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने L & T फायनान्स होल्डिंग, ट्री हाऊस एज्यूकेशन, DB रिअल्टी
    या कंपन्यांविरुद्ध प्रॉस्पेक्टस मध्ये उल्लेखिलेल्या हेतूंसाठी IPO ची प्रोसिड्स वापरली की नाही
    या संबंधात चौकशी सुरु केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०१८ NSE निर्देशांक निफ्टी ११४७६ आणि बँक निफ्टी २७३७६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.