आजचं मार्केट – ०७ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०७ सप्टेंबर २०१८

शेअर मार्केटचा ढासळणारा बुरुज रुपयामुळे सावरला गेला. आणि रुपयाचा ढासळणारा बुरुज RBI च्या हस्तक्षेपामुळे सावरला. जागतिक पातळीवर निर्माण झालेले वादळ आज थोडेसे शांत झाले. ब्रेंट क्रूड US $ ७६.५४ प्रती बॅरेल पर्यंत आले, US $ निर्देशांक ९४.९४ वर झाला त्यामुळे RBI ने करन्सी मार्केटमध्ये केलेल्या हस्तक्षेपाचा उपयोग झाला आणि शुक्रवारी दिवसभर रुपया US $ १ = Rs ७१.७५ च्या जवळपास राहिला. त्यामुळे शेअर मार्केटमध्येही स्थिरता आली. आणि मार्केटमधल्या मंदीने थोडी माघार घेतली, ट्रेडर्सना हायसे वाटले.

आज पासून दोन दिवसांसाठी ग्लोबल मोबिलिटी समिट सुरु झाले. यांच्यामध्ये E व्हेईकल विषयी चर्चा होईल. इथेनॉल, मिथेनॉल त्याचप्रमाणे उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करणे, विजेवर किंवा बायोफ्युएलवर चालणार्या वाहनांना उत्तेजन देणे या संबंधात सरकार एक धोरण ठरवण्याच्या तयारीत आहे. E व्हेईकलसाठी आता लायसेंसची गरज असणार नाही असे सांगण्यात आले. याच थिमला अनुसरून असणारे शेअर्स काही दिवस लोकांच्या नजरेत असतील. बजाज ऑटो. अतुल ऑटो, ग्रीव्हज कॉटन, हिमाद्री केमिकल्स, प्राज इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकॉल, एवरेस्ट कांटो, ABB , सिमेन्स, इलेक्ट्रो थर्म, इऑन इलेक्ट्रिक L &T.

सरकार तेरा पब्लिक सेक्टर एंटरप्राईझेस मध्ये BUY BACK करणार आहे. NHPC, SJVN, KIOCL (कुद्रेमुख आयर्न ओअर कंपनी लिमिटेड), ONGC , ऑइल इंडिया, IOC, BHEL NTPC, NLC, NMDC, नालको, HAL, NBCC…

चीनमधून येणाऱ्या २०० अब्ज US $ च्या मालावर USA ड्युटी लावणार आहे. पण भारताने मात्र चीनमधून येणाऱ्या ग्राफाइट इलेक्ट्रोडवरील ANTI DUMPING ड्युटी हटवली. त्यामुळे आज हिंदुस्थान ग्राफाइट आणि ग्रॅफाइट इंडिया या दोन्ही शेअर्स मध्ये मंदी होती.

सन फार्माच्या हलोल प्लांटला USFDA ने ६ त्रुटी दाखवल्या तर ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत झालेल्या तपासणीत कॅप्लिन पॉईंटच्या चेन्नई युनिटला क्लीन चिट मिळाली.

L & T टेक ही कंपनी ग्राफिन सेमीकंडक्टर या कंपनीचे अधिग्रहण Rs ९१ कोटींना करणार आहे.

महाराष्ट्र सरकारने टोल कलेक्शनचा अवधी डिसेम्बर २०१८ पर्यंत वाढवला. याचा परिणाम IRB इन्फ्रा, दिलीप बिल्डकॉन या कंपन्यांवर होईल.

विशेष लक्षवेधी

  • ‘IRCON’ इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचा IPO १७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ओपन राहील. या IPO चा प्राईस बँड Rs ४७० ते Rs ४७५ आणि दर्शनी किंमत Rs १० राहील, मिनिमम लॉट ३० शेअर्चा असेल. या IPO ची अलॉटमेंट २५ सप्टेंबरला होईल, २६ सप्टेंबरला रिफंड मिळेल आणी DEMAT अकौंटला अलॉट झालेले शेअर्स जमा होतील. या शेअरचे २८ सप्टेंबर रोजी लिस्टिंग होईल. ही कंपनी INFRASTRUCTURE क्षेत्रात असून रेल्वे,पूल इत्यादी बांधण्याचे काम करते.
  • मदर्सन सुमी या कंपनीने २:१ या प्रमाणात बोनस दिला. तुमच्या जवळ असलेल्या २ शेअर्सला १ शेअर बोनस दिला जाईल.
  • १४ सप्टेंबर २०१८ पासून BSE लँको इन्फ्रा या कंपनीच्या शेअर्स मधील ट्रेडिंग सस्पेंड करणार आहे.

वेध उद्याचा

  • ८ सप्टेंबरला २०१८ ला क्रॉम्प्टन कंझ्युमर, १० सप्टेंबरला रिलायन्स होम, IFCI, ११ सप्टेंबरला PFC आणि रिलायन्स
  • कॅपिटल १४ सप्टेंबरला REC यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.
  • ११ सप्टेंबरला CPI आणि IIP चे आकडे जाहीर होतील. १४ सप्टेंबरला WPI चे आकडे जाहीर होतील.
  • १३ सप्टेंबरला मार्केटला रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८३८९ NSE निर्देशांक ११५८९ आणि बँक निफ्टी २७४८१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.