आजचं मार्केट – १० सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० सप्टेंबर २०१८

आज रुपयाने नवा निच्चांक गाठला. रुपया US $ १= ७२.६६ या स्तरावर पोहोचला. क्रूड US $ ७७.७१ प्रती बॅरेल या भावावर तर बॉण्ड यिल्ड ८.१४% वर पोहोचले. यामुळे मार्केटमध्ये जवळ जवळ ५०० पाईंटची (सेन्सेक्स) घसरण झाली. बॉण्ड यिल्ड वाढल्यामुळे सर्व NBFC चे शेअर्स पडले. चोलामंडळम, बजाज फायनान्स कॅनफिन होम्स
ट्रम्प चीनमधून आयात होणाऱ्या आणखी US $ २६६ कोटी मालावर ड्युटी लावणार आहेत त्यामुळे USA आणि चीनमधील ट्रेड वॉर चिघळले. USA चा जॉब डेटा चांगला आला त्यामुळे US $ निर्देशांक सुधारला. अशावेळी US $ मार्केटमध्ये विकणे अशा तात्पुरत्या उपायांचा उपयोग होताना दिसत नाही. त्यासाठी काही धोरणात्मक बदल झाले पाहिजेत. NRI ( नॉन रेसिडंट इंडियन) साठी विशेष डिपॉझिट योजना आणण्याचा सरकार विचार करत आहे. यात सगळ्यात एकच सुखावह बातमी म्हणजे आता रुपया घसरण्याचा वेग कमी होईल असे जाणकारांचे मत आहे.

ग्राफाइट महाग पडते याकडे स्टील कंपन्यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. म्हणून ग्राफाइटवरची ANTI DUMPING ड्युटी सरकारने काढून टाकली. त्याउलट USA ने कर लावल्यामुळे स्टीलचे DUMPING भारतात होईल आणि याचा फटका भारतीय स्टील उद्योगाला बसू नये म्हणून ५ वर्षांसाठी स्टिलवर ANTI DUMPING ड्युटी लावण्याच्या विचारात सरकार आहे. याचा फायदा JSW स्टील, टाटा स्टील, कल्याणी स्टील अशा मोठ्या कंपन्यांना तर उषा मार्टिन, सनफ्लॅग आयर्न, मुकंद अशा छोट्या कंपन्यांनाही होईल

टर्न अराउंड तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि HDFC स्टॅंडर्ड लाईफ मध्ये MD आणि CEO कार्य करीत असणाऱ्या अमिताव चौधरी यांची ऍक्सिस बँकेच्या MD आणि CEO या पदावर ३ वर्षांसाठी नेमणूक केली. यामुळे ऍक्सिस बँकेच्या बाबतीतील अनिश्चितता संपली म्हणून शेअर वाढला तर HDFC स्टॅंडर्ड लाईफच्या बाबतीत अनिश्चितता सुरु झाली त्यामुळे हा शेअर पडला. ICICI बँकेचीही हीच अवस्था आहे. चंदा कोचर यांचे जाणे जवळ जवळ निश्चित झाले आहे असे समजते. ऍक्सिस बँक (२.६४) आणि ICICI बँक(२.११) यांची तुलना केली असता प्राईस/ बुक VALUE या दृष्टिकोनातून ICICI चा शेअर स्वस्त आहे. हीच कथा येस बँकेची(२.८९) पण आहे.

फ्रॉडची खबर उशिरा दिल्यामुळे RBI ने युनियन बँक आणि इतर दोन बँकांवर प्रत्येकी एक कोटी दंड लावला.

विशेष लक्षवेधी

  • थायरोकेअर या कंपनीच्या ‘BUY BACK’ला प्रती शेअर Rs ७३० या दराने मंजुरी मिळाली.
  • JP असोसिएटनी ICICI बँकेला Rs १५०० कोटी द्यायचे आहेत. म्हणून बँकेनी इन्सॉव्हन्सी याचिका दाखल केली.
  • इंडियन ह्यूम पाईपने पुण्यातील जमीन डेव्हलप करण्यासाठी कल्पतरू गार्डन बरोबर करार केला.
    IFCI चा निकाल खूपच वाईट आला.

वेध उद्याचा

  • २८ सप्टेंबर रोजी GST कॉऊन्सिल ची मीटिंग होईल. या मध्ये नैसर्गिक गॅसच्या किमतीचा विचार केला जाईल. पण ATF च्या किमतीचा विचार केला जाणार नाही असे सांगण्यात आले.
  • अर्थमंत्रालयाने सर्व राष्ट्रीयीकृत बँकांची मीटिंग बोलावली आहे. या बैठकीत NPA आणि बँकांचे मर्जर याबाबतीत चर्चा होईल. पण पेट्रोल आणि डिझेल यांच्यावरील VAT कमी करण्याची कोणतीही योजना विचाराधीन नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७९२२ NSE निर्देशांक निफ्टी ११४३८ आणि बँक निफ्टी २७२०१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.