आजचं मार्केट – ११ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ सप्टेंबर २०१८

आज रुपयाने US $१= Rs ७२.७३ चा नवा निच्चांक गाठला. त्यातच क्रूडनेही भर टाकली. क्रूड US $ ७८.०० प्रती बॅरेल वर गेले. याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये जोरदार मंदी आली. या मंदीचे एक वैशिष्ट्य दिसते ते म्हणजे सेन्सेक्सच्या प्रमाणात निफ्टी जोरदार पडत आहे. याचा मागोवा घेतला असता असे आढळते की इमर्जिंग मार्केट म्युच्युअल फंडांनी विक्री केली. काही विक्री ऍडव्हान्स आयकर भरण्यासाठी झाली. यावेळेला नेहेमीप्रमाणे स्माल कॅप आणि मिडकॅपच्या किमती तेवढ्या प्रमाणात कमी झाल्या नाहीत. या शेअर्सना रोज खालची सर्किट लागत आहेत असे दिसत नाही. कदाचित स्माल कॅप, मिडकॅप शेअर्स आताच्या तेजी मध्ये वाढत नव्हते याला अपवाद फार्मा आणि टेक्नॉलॉजी आणि निर्यातीशी संबंधित शेअर्सचा आहे.

ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील सरकारचा ७३% स्टेक सरकार पारादीप पोर्ट ट्रस्ट, विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट, आणि मंगलोर पोर्ट ट्रस्ट यांना विकणार आहे. या पोर्टट्रस्टकडे ज्या प्रमाणात सरप्लस फंड्स असतील त्या प्रमाणात हा स्टेक विकला जाईल.

इंडस इंड बँकेचा परफॉर्मन्स कमी झाला आहे. कारण इंडस इंड बँकेचे चेअरमन सोबती यांचा कार्यकाळ आता फारसा शिल्लक राहिलेला नाही. सोबती निवृत्त झाल्यानंतर बँकेचे प्रमोटर्स अंतर्गतच कोणाची तरी नेमणूक या पदावर करतील अशा विचाराने लोक या शेअरमधून बाहेर पडून RBL मध्ये गुंतवणूक करत आहेत. इंडसइंड बँक २९.५४ च्या P /E रेशियोवर तर ४.६७ एवढ्या P /B रेशियोवर आहे . मार्केट पडू लागले की लोकांच्या डोक्यात बरेच विचार येतात. त्यामध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी हा विचार प्रामुख्याने येतो. त्या दृष्टीने RBL बँक ३.८२ P /B आणि P /E रेशियो ३७.३३ वर आहे म्हणजे RBL बँक फार स्वस्त नाही पण या इंडस इंड बँकेतून RBL बँकेत शिफ्ट होण्यामध्ये भीती हा घटक असावा.

सुप्रीम कोर्टाने पॉवर, शिपिंग आणि साखर या क्षेत्रातील कंपन्यांच्या बाबतीत RBIने  १२ फेब्रुवारीला
काढलेल्या ऑर्डरवर स्टे दिला. विविध हायकोर्टांमध्ये चालू असलेले खटले सुप्रीम कोर्टाकडे ट्रान्स्फर होतील. आता या क्षेत्रातील कंपन्यांच्या विरुद्ध कर्ज देणारे NCLT मध्ये जाऊ शकणार नाहीत. याची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होईल.

एथॅनॉलच्या किमती २५% ने वाढविण्याचा सरकार विचार करत आहे. त्याचा फायदा प्राज इंडस्ट्रीज आणि इंडिया ग्लायकोल यांना होईल

विशेष लक्षवेधी

 • रिलायन्स होम फायनांस. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन, REC, PFC यांचे निकाल चांगले आले पण मार्केट पडत आल्याने हे शेअर पडत राहीले.

वेध उदयाचा

 • १८ सप्टेंबरला HCL टेकचा BUY बॅक सुरु होईल. BUY बॅक प्राईस Rs ११०० प्रती शेअर असेल. ५ ऑक्टोबर २०१८ हा शेवटचा दिवस असून १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत BUY BACK केलेल्या शेअर्सची सेटलमेंट होऊन त्यानंतर पैसे आपल्या खात्यात जमा होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४१३ NSE निर्देशांक निफ्टी ११२८७ आणि बँक निफ्टी२६८०७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ११ सप्टेंबर २०१८

 1. Shrikant Patil

  Great information ma’am,
  मला शेअर मार्केट शिकायला खूप वेळ लागला असता पण आता तुमच्या मार्गदर्शनाने मी चांगल्या पैकी मार्केट मध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे.
  खरंच खूप छान माहिती आहे. आपला मराठी माणूस आता तुमच्या मार्गदर्शनाने शेअर मार्केट मध्ये एन्ट्री करणार.
  धन्यवाद.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.