आजचं मार्केट – १२ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ सप्टेंबर २०१८

आर्थीक परिस्थितीची समीक्षा लवकरात लवकर केली जाईल. पंतप्रधान स्वतः समीक्षा करतील आणि ताबडतोब निर्णय घेतला जाईल असे समजताच रुपया सावरला रुपयांचा रेट जो US $१= Rs ७३ पर्यंत पोहोचला होता तो मार्केटची वेळ संपता संपता US $ १= Rs ७१.९४ झाला . US $ निर्देशांक ९५.१९ आणि क्रूड US $ ७९.३६ प्रती बॅरेल होते.जसा जसा रुपया सुधारत गेला तसे तसे मार्केटही सुधारले. दिवसाच्या शेवटी मार्केट ३०० पाईंट वधारले. ठरल्याप्रमाणे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये इथेनॉलचे दर २५% ने वाढवण्यात आले.ही बातमी साखर उत्पादक कंपन्यांच्या दृष्टीने सकारात्मक तर मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी नकारात्मक आहे.

क्रॉप प्रोक्युअरमेंट पॉलिसीची घोषणा केली. या पॉलिसीनुसार सरकार व्यतिरिक्त कोणीही व्यक्ती MSP च्या दराने अन्नधान्य खरेदी करू शकतात. केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकार खरेदी करू शकते. तसेच मध्यप्रदेशात चालू असलेल्या भावांतर योजनेप्रमाणे संपूर्ण देशात योजना राबवली जाईल. 

महिंद्रा आणि महिंद्राच्या ‘JEET’ पेटंट प्रकरणात जी तक्रार आली त्या अनुषंगाने US रेग्युलेटर तपासणी करेल. 

IL&FS ला ICRA ने डाउनग्रेड केले आहे. JUNK असे रेटिंग दिले आहे. त्यामुळे IL&FS ला ज्या बँकांनी कर्ज दिले आहे त्या बँकांवर परिणाम होईल. या मध्ये PNB, BOB आणि युनियन बँक यांच्यावर जास्त परिणाम होईल तर थोडासा परिणाम SBI,ऍक्सिस बँक आणि येस बँक यांच्यावर होईल.

दिलीप बिल्डकॉनच्या कन्सॉरशियमला कोल माईन डेव्हलपमेंटसाठी Rs ३२१६० कोटींची ऑर्डर मिळाली. सरकारने ३२८ औषधांना मनाई केली. याचा परिणाम सन फार्मा सिप्ला आणि वोखार्ट यांच्यावर होईल.TVS मोटर्सने नेपाळमध्ये NTORG नावाची १२५ CC पॉवरची स्कुटर लाँच केली. भारताची निर्यात १९.२१% ने वाढली तर आयात २५.४% ने वाढली त्यामुळे व्यापार घाटा US $ १७४० कोटी झाला. मारुतीने हरयाणा सरकारकडे १२०० एकर जागा मागितली आहे. या ठिकाणी ते आपला प्लँट शिफ्ट करणार आहेत. गार्डन रिच शिपबिल्डर्सचा IPO येत आहे त्याचा प्राईस बँड Rs ११५ ते Rs ११८ असेल. 

विशेष लक्षवेधी 

रिलायंस कॅपिटलचा निकाल चांगला आला. कंपनी टर्नअराउंड झाली रेंडिंग्टन या कंपनीची शेअर BUY बॅक वर विचार करण्यासाठी १७ सप्टेंबर २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.APPLE ही कंपनी भारतात ३ I फोन लाँच करत आहे. या I फोनचे डिस्ट्रिब्युशन रेडिंग्टनकडे असल्यामुळे या कंपनीकडे सगळ्यांचे लक्ष होते.

अलेम्बिक लिमिटेड रिअलिटी आणि पॉवर बिझिनेस वेगळा करणार आहेत.

गोदरेज अग्रोव्हेटची १४ सप्टेंबर २०१८ रोजी ASTEC लाईफ सायन्सेसचे गोदरेज अग्रोव्हेटमध्ये मर्जरविषयी विचार करण्यासाठी बैठक आहे. 

वेध उद्याचा 

  • १४ तारखेपासून सेबी ASM मार्जिन लावणार आहे. याच दिवशी REC चे तिमाही निकाल आणि WPI चे आकडे येतील. 
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७७१७ NSE निर्देशांक निफ्टी ११३७० आणि बँक निफ्टी २६८१९ वर बंद झाले.

 

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.