आजचं मार्केट – १४ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ सप्टेंबर २०१८

USA मध्ये आलेले महागाईचे आकडे थोडे कमजोर आले. त्यामुळे US $ निर्देशांक ९४.४८ झाला. ब्रेंट क्रूड US $ ७८.४५ प्रती बॅरेल होते. स्वतः पंतप्रधान देशाच्या आर्थीक स्थितीची समीक्षा करून आवश्यक असलेली उपाययोजना करणार आहेत. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी ६-३० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे रुपया US $१=Rs ७२ च्या खालीच राहिला. चीनबरोबरच्या व्यापारी वाटाघाटी करण्याची आम्हाला घाई नाही असे सांगून USA ने चीनला पुन्हा वाटाघाटीचे आमंत्रण दिले. त्यामुळे बुधवारी सुरु झालेली तेजी शुक्रवारी मार्केटचा वेळ संपेपर्यंत चालू राहिली. ११५००चा टप्पा पुन्हा एकदा निफ्टीने गाठला. आज बॉण्ड यिल्ड सुद्धा थोडे कमी झाले. त्यामुळे NBFC आणि हौसिंग फायनान्स कंपन्या तेजीत होत्या.

इथॅनॉलच्या दरात सरकारने केलेली वाढ मार्केटला खूपच आवडली. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. साखरेचे झालेले भरघोस उत्पादन विचारात घेता साखर निर्यातीसाठी दिली जाणारी सबसिडी २०१८ -२०१९ या वर्षांसाठी सुरु ठेवावी या विचारात सरकार आहे. पण या विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील WTO कडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. नवी सबसिडी ऊस पेरणी करण्यासाठी Rs १४० प्रति टन आणि निर्यातीसाठी Rs ३००० प्रती टन दिली जाणार आहे.

ITC ने SANFEAST बिस्किटांचा भाव १३% वाढवला. आशीर्वाद आट्याचा भाव वाढवला आणि बिंगो चिपचे वजन १३%ने कमी केले. सिगारेट्स च्या किमती ४% ते ८% पर्यंत वाढवल्या. कंपनीने गव्हाच्या वाढलेल्या किमती असे कारण या दरवाढीसाठी दिले. परिणामी ITC आणि प्रताप स्नॅक्सच्या शेअरचा भाव वाढला.

ITC आणि टाटा ग्रुप ताजमानसिंग हॉटेलसाठी बोली लावणार आहेत.

आज USFDA कडून बरसातच झाली. सन फार्माला डोळ्यांच्या औषधासाठी, ल्युपिनला न्यूमोनियाच्या औषधासाठी तर झायडसला हाडांच्या औषधासाठी मंजुरी मिळाली.

MCX आणि NSE यांचे मर्जर होण्याची शक्यता वाढली. MCX ला कमोडिटीमध्ये वायदा सुरु करण्याची परवानगी मिळाली.
RCF ला MMRDA ला जमीन ट्रान्स्फर करण्यासाठी परवानगी मिळाली. तर आर्बिट्रेशनमध्ये सुप्रीम कोर्टाने श्रीराम EPC ला ४३.७ लाख युरो एवढी पेमेंट करायला सांगितले.

डिसेम्बर २०१८ पर्यंत NHPC आणि NTPC शेअर BUY BACK करेल.

विशेष लक्षवेधी

  • साकुमा एक्स्पोर्ट एका शेअरचे १० शेअर्समध्ये विभाजन करणार आहे.
  • गोदरेज अग्रोव्हेट आणि ASTEC लाईफ यांच्या मर्जरला मंजुरी मिळाली. ASTEC लाईफ च्या १० शेअर्ससाठी गोदरेज अग्रोव्हेटचे ११ शेअर्स मिळतील
  • ऑगस्ट २०१८ साठी CPI १० महिन्यांच्या किमान स्तरावर म्हणजे ३.६९% होता तर WPI ४.५३% होता.IIP जुलै २०१८ साठी ६.६ % होता.

वेध उद्याचा

ट्रेड डेफिसिटचे आकडे येतील. FPI बरोबर जो KYC च्या संदर्भात विवाद चालला होता त्या बाबतीत सेबी सोल्युशन काढेल. पुढील आठवड्यात बँक निफ्टीची एक्स्पायरी बुधवारी असेल. कारण गुरुवारी मोहरमची सुट्टी आहे. शुक्रवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीतील घेतलेल्या निर्णयांचा परिणाम सोमवारी मार्केटमध्ये दिसेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०९० NSE निर्देशांक निफ्टी ११५१५ आणि बँक निफ्टी २७१६३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.