Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१८
सकाळी रुपया US $१=Rs ७२.६६ होता. ढासळणार्या रुपयाला सावरण्यासाठी जे उपाय योजायला हवे होते ते उपाय योजले गेले नाहीत. आणि जाहीर झालेले उपाय पुरेसे नाहीत असे मार्केटला वाटले. त्यातून USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की चीनमधून आयात होणाऱ्या मालावर १०% आयात ड्युटी बसवली जाईल. पण हळू हळू सरकार फर्निचर, फळे, काजू , इलेक्ट्रॉनिक आयटेम्स, सोने आणि स्टील यावर ताबडतोब इम्पोर्ट ड्युटी लावण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे मार्केट सरता सरता रुपया US $१= Rs ७२.४६ वर पोहोचला. रुपयाच्या तालावर मार्केट नाचत होतं असं जाणवलं.
माणसाच्या आयुष्याचा आणि मार्केटचा विचार एकत्रितपणे करावा असे प्रकर्षाने जाणवते. सर्वजण श्रावण पाळतात गौरीच्या जेवणापर्यंत मांसाहार करत नाहीत काही काही गौरींना मासांहाराचा नेवैद्य असतो. त्या दिवसापासून लोक मांसाहार करतात. कदाचित (मजा केली हं 😉 ) यामुळेच अंडी झिंगे कोंबड्या याची विक्री वाढून हे शेअर्स मार्केट ५०० पाईंट पडलेले असतानाही २०% वर होते. उदा:- अवंती फीड्स, वॉटरबेस, वेंकीज, ऍपेक्स प्रोझॅन फूड्स, SKM एग्ज.
एथॅनॉलच्या किमतीमध्ये २५% वाढीला दिलेली मंजुरी सगळ्यांच्या फायद्याची ठरली. यावर्षी साखरेची मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. पुरवठा जास्त आणि मागणी कमी त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळातही साखरेचा भाव Rs २७ प्रती किलोपर्यंत खाली येईल असा अंदाज होता. पण आता उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केले जाईल. या सर्व गोष्टींमुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. द्वारिकेश, दालमिया भारत, अवध,उत्तम , रेणुका, धामपूर शुगर, राजश्री शुगर. प्राज इंडस्ट्रीज, त्रिवेणी.
सारीडॉन, एक्स प्रॉक्सिवान,नीमिलिड या औषधांवरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली.
ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी युनिटची तपासणी USFDA ने सुरु केली.
ऑइल रेग्युलेटर PNGRB यांनी सिटी गॅस रिटेलिंग लायसेन्स मिळाल्यांची नावे जाहीर केली. अडानी,IOC,BPCL आणि टॉरंट गॅस यांचा या यादीत समावेश असल्यामुळे हे शेअर वाढत होते.
विशेष लक्षवेधी
- गोदरेज कंझुमरला बोनस देण्यासाठी मंजुरी मिळाली. २ शेअर्सला १ शेअर बोनस म्हणून मिळेल.
- इरकॉन इंजिनीअरिंगचा IPO आज ओपन झाला. पहिल्या दिवशी मार्केट संपेपर्यंत १३% भरला.
- रेंडिंग्टन या कंपनीने Rs १२५ प्रती शेअर या भावाने शेअर BUY BACK जाहीर केला.
वेध उद्याचा
- सगळ्यांचे लक्ष FED च्या मीटिंगकडे आहे.
- २०१३ सालाप्रमाणे NRI बॉण्ड्स येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
- उद्यापासून HCL TECH चा BUY BACK Rs ११00 प्रती शेअर्स या भावाने सुरु होत आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७५८५ NSE निर्देशांक निफ्टी ११३७७ आणि बँक निफ्टी २६८२० वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
विशेष लक्षवेधी
गोदरेज कंझुमरला बोनस देण्यासाठी मंजुरी मिळाली. २ शेअर्सला १ शेअर बोनस म्हणून मिळेल.
( केव्हापासून डिमॅट ला पाहिजेत गोदरेज चे शेअर्स )
Mazyakade eid perry che share 383 la ghetle ahe ata kay karu hold karu ka vikun taku
maaf kara pan mi individual share baddal salla det nahi