आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१८

१२ बँका PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) या RBI च्या कार्यक्रमा अंतर्गत आहेत. यांना दत्तक कोण घेणार ? यांचा सांभाळ कोण करणार ? हा फार मोठा प्रश्न सरकारला भेडसावत होता. बँकांना फार मोठ्या प्रमाणात भांडवल पुरवण्याची गरज होती. या सगळ्यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू होते. शेवटी बँकांचे सक्तीने लग्न लावून द्यावे असा मतप्रवाह उदयाला आला.

विजया बँक, बँक ऑफ बरोडा यांची कुंडली चांगली जमते आहे. भोगौलिक दृष्ट्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा या दोन्ही बँका एकमेकांना पूरक होतील असे वाटले. आणि यांच्या गळ्यात देना बँकेसारखी अशक्त बँक घालायचे सरकारने ठरवले. सरकारच मोठा शेअरहोल्डर असल्यामुळे कोणाचीही हरकत येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशा प्रकारच्या मर्जरमुळे ज्यांची स्थिती चांगली आहे त्या बँकाही डबघाईला येतील असा अंदाज गुंतवणूकदारांना आला त्यामुळे मार्केटमध्ये पडझड सुरु झाली आणि जर हा मर्जरचा मौसम सुरु झाला असेल तर कोणत्या बँकेच्या गळ्यात कोणती बँक घातली जाईल याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरु झाले. त्यामुळे मजबूत बँकाही पडू लागल्या. स्टेट बँकेमध्ये मुळातच इतर स्टेट बँकांचे आणि महिला बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणतीही बँक स्टेट बँकेच्या गळ्यात पडण्याची शक्यता नाही. परंतु वातावरणाचा परिणाम स्टेट बँकेच्या शेअरवरही झाला. बँक बरोडाचे ५.४०% NPA आणि विजया बँकेचे ४.१०% NPA आणि देना बँकेचे ११.४% NPA आहेत. पण मर्जरनंतर याचे प्रमाण ५.७% वर येईल. ROA निगेटिव्हच राहील.आणि NIM ( नेट इंटरेस्ट मार्जिन) मध्येही लक्षणीय सुधारणा होणार नाही . पण सरकार या मर्जरसाठी आवश्यक असणारा पैसा पुरवणार आहे. मर्ज्ड एंटीटीला भांडवल पुरवण्याची गरज नाही असे समजते. मर्जर नंतर ही सर्व जबाबदारी बँक ऑफ बरोडाचे चेअरमन P .S . जयकुमार यांच्याकडे सोपवली जाईल. त्यांनीही याला तयारी दर्शवली आहे. या मर्जरमध्ये कर्मचाऱ्यांचे कोठलेही नुकसान होणार नाही असे सरकारने जाहीर केले. यामुळे विजया बँक आणि बँक ऑफ बरोडाचे शेअर पडले आणि देना बँकेचा शेअर अपर सर्किटला बंद झाला. 

इराणवरील निर्बंध ४ नोव्हेंबर पासून लागू होतील. इराण हा केमिकल प्लेअर आहे. ज्या कंपन्या केमिकलच्या बिझिनेसमध्ये आहेत त्यांना या निर्बंधांचा फायदा होईल. त्यांना प्रायसिंग पॉवर मिळेल. उदा दीपक नायट्रेट, GNFC GSFC

क्रूड US $ ८० प्रती बॅरेल एवढे असेल तर आमची काहीही हरकत नाही असे सौदी अरेबियाने सांगितले. आता USA, रशिया आणि OPEC देश यांची एकी झाली आहे. HURRICANE ( चक्री वादळं) येण्याचा हा सिझन आहे. वादळग्रस्त भागातून क्रूडची रिकव्हरी आणि रिफायनिंग काही काळापुरते बंद होते. त्यामुळे क्रूड US $ ८२ ते ८३ प्रती बॅरेल तर रुपया US $ १= ७५ पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज ७.१७% २०२८चे बॉन्ड्स ८.१०% वर पोहोचले त्यामुळे सर्व NBFC चे शेअर्स पडले.

ब्रेक्झिट आणि डिझेलच्या पॉलिसीमुळे आणि USA आणि चीन यांच्यातील ट्रेंड वॉर मुळे टाटा मोटर्सचा लंडनमधील प्लांट आता आठवड्यातून तीन दिवस सुरु राहील.

विजेचे दर १४% ने वाढले आहेत याचा फायदा पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपन्यांना होईल. टाटा पॉवर, अदानी पॉवर, REC आणि PFC यांना होईल.

पाम ऑइलच्या किमती कमी होत आहेत तर HUL ने त्यांच्या उत्पादनांच्या किमती ३% ते ४% ने वाढवल्या आहेत. या दोन्हीमुळे HUL चे मार्जिन वाढेल म्हणून शेअर वाढला.

सणासुदीच्या काळाचा विचार करून सरकारने सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी वाढवली नाही. म्हणून टायटनचा शेअर तेजीत होता.

MACLEOD RUSSEL या कंपनीच्या आसाममधील दोन चहाच्या बागा GOODRICK ही कंपनी विकत घेणार आहे. हे डील Rs ९१ कोटींना होईल असे अपेक्षित आहे.

डिफेन्स कौन्सिलने Rs ९१०० कोटींची उपकरणे खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली. यात मिसाईलचा समावेश आहे. याचा फायदा भारत डायनामिक्सला मिळेल.

विशेष लक्षवेधी

  • IRCON चा IPO आज दुसऱ्या दिवशी ४३% भरला. उद्या या IPO चा शेवटचा दिवस आहे.
  • ३ ऑक्टोबर २०१८ ला HCL TECH च्या BUY बॅकची शेवटची तारीख आहे.
  • F & O ट्रेडिंगचा कालावधी रात्री ११ वाजेपर्यंत वाढवण्याचा आपला निर्णय सेबीने पुढे ढकलला.

वेध उद्याचा

  • गुरुवारी मोहर्रम ची सुट्टी असल्यामुळे बँकांची साप्ताहिक एक्स्पायरी बुधवार दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७२९० NSE निर्देशांक निफ्टी ११२७८ आणि बँक निफ्टी २६४४१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.