आजचं मार्केट – २१ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ सप्टेंबर २०१८

सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून मार्केटमध्ये तेजीमंदीचा खेळ सुरु आहेच. पण आज मात्र कहर झाला. अवघ्या पांच मिनिटात मार्केट सेन्सेक्स १००० पाईंट कोसळले आणि तेवढ्याच गतीने सावरले. हा जरी ‘अल्गो’ ट्रेडचा परिणाम असला तरी मार्केटमधील निराशा शिगेला पोहोचली आहे असे जाणवते.जणू काही कारल्याचा वेळ कडुलिंबाच्या झाडावर चढावा तशी स्थिती होती. ही स्थिती बॉण्ड्समुळे निर्माण झाली. ** www.marketaanime.com **

आता प्रश्न येतो बॉण्ड म्हणजे काय ? बॉण्ड हे एक DEBT INSTRUMENT आहे. NBFC ना बँकेप्रमाणे सर्वसाधारण पब्लिक कडून ठेवी गोळा करता येत नाही. त्यामुळे NBFC ना बॉण्ड्स इशू करावे लागतात आणि बॉण्ड होल्डरला व्याजाची टक्केवारी कबुल केली जाते आणि ठरावीक कालावधीनंतर या बॉण्ड्सची रकम परत केली जाते. या बॉण्ड्सची खरेदी विक्री मनीमार्केटमध्ये केली जाते. अशीच एक NBFC IL&FS आहे. तिची लीड बँकर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एल आय सी, ORIX कॉर्पोरेशन ऑफ जपान हे IL&FS चे प्रमुख भागधारक आहेत. १० सप्टेंबर २०१८ रोजी IL&FS ही कंपनी SIDBI ला Rs एक बिलियन चे पेमेंट करू शकली नाही. याचाच अर्थ IL&FS मध्ये लिक्विडीटी CRUNCH आहे. IL&FS ने बॉण्ड्स इशू करून कर्ज घेतले आहे. हे IL&FS चे बॉण्ड DSP म्युच्युअल फंडाकडे आहेत पण IL&FS चे बॉण्ड्स विकले जाणार नाहीत असे वाटल्यामुळे DSP म्युच्युअल फंडाने DHFL चे Rs ३०० कोटींचे बॉण्ड्स डिस्कॉउंटने विकले किंबहुना विकावे लागले. याचा अर्थ BONDS चा सप्लाय जास्त आहे आणि लिक्विडीटी CRUNCH आहे. याचा सुगावा लागताक्षणी सर्व NBFC चे शेअर्स पडायला सुरुवात झाली. ** www.marketaanime.com **

अशा बर्याच म्युच्युअल फंडांकडे IL&FS चे बॉण्ड आहेत.Rs ९०००० कोटींच्या बॉण्डसाठी रिडम्प्शन प्रेशर येईल आणि मार्क टू मार्केट लॉसेस सोसावे लागतील. अजून याबाबतीत काहीच उपाययोजना झाली नाही IL&FS ची प्रोजेक्ट्स पूर्ण व्हायला उशीर लागत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने मनीमार्केटमध्ये लिक्विडीटी पुरवली पाहिजे तर या संकटातून मार्ग निघेल. ** www.marketaanime.com **

येस बँकेचे चेअरमन राणा कपूर यांची मुदत ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदत वाढवली. एवढ्या छोट्या कालावधीत त्यांचा सक्सेसर शोधणे सोपे नाही. आणि या कालावधीत आपला स्टेक प्रमोटर मॉनेटाईझ करतील या भीतीने येस बँकेचा शेअर Rs १०० ने पडला. आणि त्याच बरोबर येस बँक एक टेकओव्हर कॅन्डीडेट आहे. ** www.marketaanime.com **

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी केबिन प्रेशर मेंटेन करणारा स्विच चालू केला नाही त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. हे प्रवासी जेट एअरवेज विरुद्ध क्लास एक्शन सूट दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ** www.marketaanime.com **

टाटा मोटर्सचा कॅशफ्लो गरजेच्या मानाने कमी आहे आणि २०२० पर्यंत हीच स्थिती राहील असा अंदाज व्यक्त केला जातो.
चेन्नई पेट्रो ऑक्टोबरपासूनUSA चे अध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशाप्रमाणे इराणमधून आयात केले क्रूड प्रोसेस करणार नाही. पण त्याच बरोबर ट्रम्पनी ओपेक देशांना क्रूडची किंमत कमी करण्यासाठी सांगितले आहे. रविवारी अल्जीरियामध्ये तेल उत्पादक देशांची बैठक आहे. ** www.marketaanime.com **

ग्राफाइट इंडियाच्या बंगलोर युनिटला पर्यावरणाचे नियम पाळले नाहीत म्हणून हे युनिट बंद करायला सांगितले. कॉन्सेंट ऑफ ऑपरेशन रिन्यू केले नाही. ** www.marketaanime.com **

विशेष लक्षवेधी

  • आज टीसिएस च्या BUY BACK चा शेवटचा दिवस होता.
  • FTSE EM निर्देशांकात भारताचे वेटेज वाढणार आहे. या मध्ये बजाज होल्डिंग, पेट्रोनेट एल एन जी, बंधन बँक, L &T फायनान्सियल होल्डिंग, आणि L &T इन्फोटेक यांचा समावेश असेल.

वेध उद्याचा

  • निफ्टीमध्ये केलेले बदल पुढील आठवड्यातील शुक्रवारपासून लागू होतील. JSW स्टील निफ्टीमध्ये सामील होतील तर ल्युपिन बाहेर पडेल.
  • गार्डन रिच शिपबिल्डर या सरकारी कंपनीचा IPO २४ सप्टेंबरला ओपन होऊन २६ सप्टेंबरला बंद होईल.
  • पुढील आठवड्यात आवास फायनान्सिअल्सचा IPO २८ सप्टेंबर २०१८ ला ओपन होईल आणि ३ ऑक्टोबर२०१८ ला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ८१८ ते Rs ८२१ असेल. या शेअर्सची दर्शनी किंमत Rs १० असेल.
  • IRCON च्या शेअर्सचे लिस्टिंग २६ सप्टेंबर २०१८ ला होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६८४१ NSE निर्देशांक निफ्टी १११४३ आणि बँक निफ्टी २५५९६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २१ सप्टेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.