आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१८

शुक्रवारी मार्केटमध्ये जो गोंधळ उडाला त्यानंतर RBI आणि SEBI यांना लक्ष घालणे भाग पडले. दोघांनीही संयुक्त स्टेटमेंट दिले. IL&FS च्या ज्या काही अडचणी असतील त्या समजावून घेण्यासाठी मीटिंग ठरवली आहे. कदाचित IL&FS ला ‘BAIL OUT’ करण्याचीही शक्यता आहे. ‘ICRA ‘ आणि ‘CARE’ या रेटिंग एजन्सीजनी DHFL आणि इंडिया बुल्सच्या रेटिंगवर शिक्कामोर्तब केले. पण मार्केट जे काही समजायचे ते समजले होते. अर्थमंत्रयांनी सुद्धा सांगून पाहिले. इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगात ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले. ** www.marketaanime.com **
सर्वांना वाटले होते की एखादा अपघात झाल्याप्रमाणे मार्केट पुन्हा पूर्ववत होईल. झाले गेले विसरून जाईल ! पण तसे घडले नाही. मार्केटमध्ये मंदी सुरूच राहिली.

व्यक्तिशः मला मात्र ‘सत्यम’ च्या घटनेची आठवण झाली. जे कोणी गेल्या पंधरा वीस वर्षात मार्केटमध्ये व्यवहार करत आहेत त्यांनासुद्धा जानेवारी २००९ मधील ‘सत्यम ‘च्या घटनेची आठवण झाली असेल . ‘सत्यम’ चा शेअर सुद्धा Rs ६०० च्या वर होता. भले भले विश्लेषक सुद्धा ‘सत्यम’ मध्ये काही दोष आहे किंवा ‘सत्यम’ पासून दूर राहावे असे सांगत नव्हते. पण प्रमोटरने स्वतः कबूल केल्यानंतर शेअर Rs ६०० वरून Rs १० पर्यंत खाली गेला होता. ऑडिटर्स वरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे नष्ट झाला होता. त्यामुळे अशा घटनांमुळे लोकांचे हात पोळलेले आहेत. शुक्रवारी घडलेली घटना हा एक अपघात म्हणून सोडून देण्यास लोक तयार नाहीत असे दिसते. ** www.marketaanime.com **

शुक्रवारी मार्केट एवढे पडेल असे कोणत्याही दूरदर्शनच्या वाहिनीवरून सांगितले नव्हते. किंवा अशा प्रकारची शंका उपस्थित केली नव्हती. DHFL ५०% पडेल किंवा अगदी १०% ने NBFC चे शेअर्स पडतील असेही भाकीत कोणी केले नव्हते. समझनेवालेको इशारा काफी होता है ! त्यामुळे आपण अंथरून पाहूनच पाय पसरावेत. तुम्ही का सांगितले नाही म्हणून कोणाला दोष देऊ नये. तोटा आपलाच होतो ना ? मग जेवढा तोटा सहन करू शकू तेवढाच धोका पत्करावा. ज्याला आगत असेल त्यानेच स्वागत केले पाहिजे. ** www.marketaanime.com **

आज क्रूडने US $ ८० प्रती बॅरल ची पातळी ओलांडली रुपया US $ १ = Rs ७२.६१ झाला होता. US $ निर्देशांक वधारला. फेड रेट वाढवेल, भारतातही व्याजाचे दर वाढवले जातील अशी शक्यता वाटू लागली. NBFC कंपन्यांची फंडिंग कॉस्ट वाढेल असे बोलले जाऊ लागले. ११ वाजता मार्जिन कॉल साठी विक्री होते तशी विक्री सुरु झाली. या सगळ्यामुळे मार्केटची अवस्था ‘आधीच मर्कट तशात मद्य प्याला तशात त्यास झाली भूतबाधा’ अशी झाली ** www.marketaanime.com **
आणि मार्केट दिवसभर पडतच राहिले. याला अपवाद ऑइल आणि गॅस क्षेत्र आणि IT क्षेत्रातील कंपन्यांचा होता.

या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी काही उपाय योजले आहेत. ते उपाय लागू होऊन त्याचा परिणाम दिसायला वेळ लागेल. ऑइल मार्केटिंग कंपन्या जो क्रूडचा साठा ठेवतात तो कमी ठेवतील. त्यामुळे क्रूडची आयात कमी करता येईल ..
सुप्रीम कोर्टाने दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरील थर्ड पार्टी इन्शुअरन्स Rs १५ लाखांचा करावयास सांगितला. यामुळे इन्शुअरन्स प्रीमियमपासून मिळणारे उत्पन्न वाढेल. ** www.marketaanime.com **

टाटा स्टील ने उषा मार्टिनचा स्टील बिझिनेस Rs ४७०० कोटींना खरेदी केला.

येस बँक नवीन CEO ची नेमणूक करण्यासाठी एक समिती नेमेल . ही समिती राणा कपूर यांच्या अधिकारांचा विचार करेल.
PFC मधील सरकारची हिस्सेदारी REC Rs १२००० कोटींना खरेदी करेल. SJVN मधील सरकारची हिस्सेदारी NTPC Rs ८००० कोटींना खरेदी करेल अशा पद्धतीने पॉवर कंपन्या मर्ज करून सरकारला Rs २८० कोटी मिळतील.

आजपासून चीन मधून आयात होणाऱ्या मालावर १०% ड्युटी लावण्यास USA ने सुरुवात केली.

विशेष लक्षवेधी ** www.marketaanime.com **

  • कोची शिपयार्ड ८ ऑक्टोबरला ‘BUY BACK’ वर विचार करेल. BUY BACK झाल्यानंतर शेअरचा भाव वाढतो असे मी माझ्या ‘मार्केट आणि मी ‘ या पुस्तकात दिले आहे – https://store.self-publish.in/products/market-aani-me. त्याचा अनुभव टी सी एस आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्यामुळे येत असेल.
  • आज गार्डन रीच शिपबिल्डर्सचा IPO ओपन झाला.

वेध उद्याचा ** www.marketaanime.com **

पुट /कॉल रेशियो १ पेक्षा कमी झाल्यानंतर बॉटम फॉर्म होईल. आणि तोपर्यंत ‘सेल ऑन रॅलीज’ मार्केट चालू राहील. मार्केट थोडे जरी वाढले तरी पुन्हा शॉर्टींग केले जाईल. जर पुट/ कॉल रेशियो आधीच्या दिवशीच्या पूट /कॉल रेशियो पेक्षा कमी राहिला तर मार्केट बेअरिश असेल. आणि त्याउलट स्थिती असेल तर मार्केट बुलिश असेल असा अर्थ होतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३०५ NSE निर्देशांक निफ्टी १०९६७ आणि बँक निफ्टी २४९७० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.