आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१८

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

क्रूड, विनिमय दर, व्याजाचा दर , ट्रेड वॉर, लिक्विडीटी, बॉण्ड यिल्ड,आणि आता IL&FS हे सर्व ढग मार्केटच्या आकाशात होते. काही गोष्टी सरकारच्या हातातल्या होत्या तर काही गोष्टी सरकारच्या हाताबाहेरच्या होत्या. शेअरमार्केट पडणं थांबलं नाही तर मार्केटमध्ये पैसा येण्याच्या ऐवजी काढून घेतला जाईल आणि बिकट परिस्थितीचा सामना करावा लागेल हे लक्षात येताच सरकार दरबारी हालचाल सुरु झाली. लिक्विडीटी कमी झाल्यामुळे शेअरमार्केट मध्ये जी घबराट निर्माण झाली होती त्यावर वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झाली. आणि IL&FS ची समस्याच सोडवली जाईल अशी ग्वाही दिली गेली. IL&FS मधील प्रॉब्लेम सॉल्वन्सीचा नसून लिक्विडिटीचा होता. IL&FS ला सुद्धा AAA – रेटिंग होते. हे रेटिंग हाय ट्रस्ट आणि रेप्युटेशन दाखवते. चांगल्या चांगल्या गुंतवणूकदारांनी या मध्ये गुंतवणूकही केली आहे. पण लिक्विडीटी इशू निर्माण झाल्यामुळे IL&FS पेमेंट करू शकले नाहीत. आणि त्यामुळे विश्वासार्हता गमावली म्हणून त्यांना ‘D’ रेटिंग दिले गेले.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

हा लिक्विडीटी इशू आहे असे रोगाचे निदान होताक्षणी RBI , SEBI ,अर्थमंत्रालय एकत्र आले. पद्धतशीरपणे लिक्विडीटी प्रोवाइड करू असे मार्केटला आश्वासन दिले.२१ सप्टेंबर पासून इंडिया बुल्स हौसिंग फायनान्सने Rs २२०० कोटींचे कमर्शियल पेपर्स ८.३६% दराने विकले. गृह फायनान्सने सुद्धा Rs १००० कोटी ८.५०% ने गोळा केले. अशाच प्रकारे आदित्य बिर्ला फायनान्स ने सुद्धा मार्केटमधून पैसा उभा केला. NBFC ना लिक्विडीटी इशुला सामोरे जावे लागते. सातत्याने रिपेमेंट करावी लागले आणि रिफायनान्स उपलब्ध होऊ शकला नाही तर IL&FS सारखा लिक्विडीटी इशू होतो आणि काही काळाने याचे रूपांतर सॉल्वन्सी इशूमध्ये होते. २१ सरकारी बँकांपैकी १७ बँका PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) खाली आहेत. या बँका कर्ज देऊ शकत नाहीत. आणि ही पोकळी सध्या NBFC भरून काढत आहेत.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

NBFC ला म्युच्युअल फंड पैसे पुरवतात. जर पैशाचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम प्रगतीवर आणि ग्रोथवर होऊ शकतो हे सर्व लक्षात घेऊन सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली आणि मार्केटने सुद्धा ३०० ( सेन्सेक्स) पाईंट्सची सलामी दिली. लिक्विडीटी पुरवण्यासाठी RBI CRR ( कॅश रिझर्व्ह रेशियो) कमी करू शकते. RBI एक स्वतंत्र विंडो उघडून बॉण्ड्सची खरेदी करू शकते. एल आय सी IL&FS मध्ये त्यांचा स्टेक वाढवू शकते. सध्या एल आय सी चा स्टेक २५.३४% आहे तर HDFC चा स्टेक ९.०२% आहे. IL&FS Rs ४५०० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे. पण या राईट्स इशूमध्ये आम्ही सहभाग घेणार नाही असे स्पष्टपणे HDFC ने कळवले आहे. आम्ही पॅसिव्ह इन्व्हेस्टर आहोत त्यामुळे भाग घेणार नाही. रोगाला उपाय सापडला आहे पण अशक्तपणा जायला वेळ लागतो त्याच प्रमाणे लोकांच्या मनातली भीती आणि अविश्वास जायला वेळ लागेल. मार्केट हळू हळू पूर्वपदावर येईल. आपल्या लिस्टमधील जे शेअर्स आपल्याला हव्या असलेल्या भावात उपलब्ध असतील ते शेअर हळू हळू खरेदी करायची ही योग्य वेळ आहे.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

GST कौन्सिलची मीटिंग २८ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. यामध्ये डिझास्टर सेस लावण्यासंबंधात चर्चा केली जाईल. प्रथम हा सेस सिगारेटवर लावला जाईल असे समजते. सिगारेट कंपन्या ५%सेस लावल्यास किमती तेवढ्याच वाढवून हा खर्च सोसू शकतील. सध्या केरळमध्ये निर्माण झालेल्या संकटामुळे हा खर्च केंद्र सरकारने करायचा की राज्य सरकारनं करायचा असा विचार ऐरणीवर आला.

नेस्ले या कंपनीने मॅगी स्प्रेड आणि डीप बाजारात आणले.

विशेष लक्षवेधी

  • रशिया आणि ओपेक देश क्रूडचे उत्पादन वाढवायला तयार नाहीत म्हणून क्रूडने US $ ८२ प्रती बॅरलची पातळी ओलांडली.
  • रुपया US $१=Rs ७२.७४ वर तर US $ निर्देशांक ९४.१८ झाले.

वेध उद्याचा

  • आजपासून फेडच्या FOMC ची मीटिंग सुरु झाली. त्यात काय झाले हे २७ सप्टेंबरला कळेल.
  • २७ सप्टेबर २०१८ ला F&O एक्स्पायरी तसेच बँकांची साप्ताहिक एक्स्पायरी आहे. २८ तारखेच्या GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये घेतलेल्या निर्णयांकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६५२ NSE निर्देशांक निफ्टी ११०६७ आणि बँक निफ्टी २५३३० वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.