आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०१८

आज क्रूड US $ ८२.२५ प्रती बॅरल आणि रुपया US $१= Rs ७२.६१ तर पुट/कॉल रेशियो १.०९ होता
इराणच्या विदेशमंत्र्यांनी असे सांगितले की भारत इराणमधून क्रूड आयात करणे बंद करणार नाही. क्रूड आयात करण्याचा करार ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

२५ सप्टेंबर २०१८ आणि २६ सप्टेंबर २०१८ असे दोन दिवस FOMC मीटिंग झाली. त्यामध्ये ०.२५ बेसिस पाईंट रेट वाढवला. आता रेट २.२५% झाला. २०१८ या वर्षात आणखी एकदा रेट वाढण्याची शक्यता वर्तवली गेली. २०१९ या वर्षात तीन वेळेला रेट वाढवला जाईल.

आज सरकारने अशा वस्तूंवर इम्पोर्ट ड्युटी लावली की ज्या वस्तू आयात केल्या नाहीत तरी चालतील. या वस्तूंचं उत्पादन भारतात होत आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना याचा फायदा होऊ शकेल. सणासुदीच्या सिझनचा विचार करून हा निर्णय घेतला आहे असे दिसते. ही इम्पोर्ट ड्युटी एअरकंडिशनर, वाशिंग मशीन, टायर्स, आणि पादत्राणे यावर लावण्यात आली. उदा जॉन्सन हिताची, IFB इंडस्ट्री, मर्क इलेक्ट्रॉनिक्स, ब्ल्यू स्टार, अंबर एंटरप्रायझेस, अपोलो टायर्स, लिबर्टी, नीलकमल, ला ओपाला, बोरोसिल. या कंपन्यांना फायदा तर हॅवेल्स आणि व्होल्टास या दोन कंपन्यांना तोटा होईल.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

ATF (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) वर ड्युटी लावली. याचा परिणाम जेट एअरवेज आणि इंडिगो यांच्यावर होईल. सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी न लावल्यामुळे टायटन कंपनीला फायदा झाला. पॉलिश्ड हिऱ्यांवरील ड्युटी १५% वरून २०% केली कारण UAE, टर्की, इटली आणि सिंगापूर येथून ज्युवेलरी आयात होते.

**भाग्यश्री फाटक www.marketaanime.com **

मारुतीचा शेअर दिवसेंदिवस पडत आहे कारण त्यांचा ‘WAITING पिरियड’ कमी होऊ लागला आहे याचा अर्थ मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाला आहे. कंपनी कार्सवर डिस्कॉउंटही देत आहे.

नेस्लेने मात्र नवीन नवीन प्रॉडक्ट्स, नवीन फ्लेवर्स, मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली आहे. नवीन पोर्टेबल कॉफी मेकर बाजारात आणला. त्याची किंमत Rs ६४९९ ठेवली आहे.

विशेष लक्षवेधी

  • TD पॉवर लिमिटेड या कंपनीने Rs २५६ प्रती शेअर या दराने शेअर BUY BACK जाहीर केला. कंपनी Rs ११कोटी BUY बॅक साठी खर्च करेल. माझ्या ‘मार्केट आणि मी ‘ या पुस्तकात ‘BUY BACK’ या कॉरपोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
  • मार्केट मंदीत असल्यामुळे गार्डन रिच शिपबिल्डर्स या सरकारी कंपनीच्या IPO ला थंडा प्रतिसाद मिळाला.प्राईस बँड मध्ये बदल केला की IPO ची मुदत तीन दिवस वाढवून मिळते. असा नियम असल्यामुळे प्राईस बँड Rs ११४ ते Rs ११८ करण्यात आला. हा IPO आता १ ऑक्टोबर २०१८ पर्यंत ओपन राहील.

वेध उद्याचा

  • १ऑक्टोबर आणि २ऑक्टोबर २०१८ रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील.
  • ५ ऑक्टोबर २०१८ RBI ची मीटिंग आहे. यामध्ये लिक्विडीटी वाढवण्यासाठी CRR कमी करण्याविषयी तसेच रेट वाढवण्याविषयी विचार केला जाईल.
  • विधानसभांच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईल.
  • २९ ऑक्टोबर २०१८ रोजी अयोध्या मामल्याची सुनावणी होईल.
  • १५ दिवसांसाठी अतिरिक्त मार्जिन लावण्यास उद्यापासून सुरुवात होईल.
  • दुसऱ्या तिमाहीचे निकाल यायला सुरुवात होईल. २८ सप्टेंबरला GST कौन्सिलची मीटिंग आहे. या मिटींगच्या अजेंड्यावर सिमेंटवरील GST कमी करण्याचा विषय नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३२४ NSE निर्देशांक निफ्टी १०९७७ आणि बँक निफ्टी २५०४२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.