Monthly Archives: October 2018

आजचं मार्केट – ३१ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३१ ऑक्टोबर २०१८

आज क्रूड US $ ७६.३८ ते US $ ७६.७२ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ७३.८५ ते US $१= Rs ७४.०४ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९७.०३ होता.

आजचे मार्केट अफवा आणि बातम्या यांनी गजबजलेले होते. RBI आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचले. RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार अशी चर्चा सुरु झाली. पुस्तकातील कायदे आणि प्रत्यक्ष परिस्थिती आणि त्यावेळची गरज यामध्ये नेहेमीच वेगवेगळी मते असू शकतात. जसा पाऊस असेल तशी छत्री धरावी लागते. RBI आणि केंद्र सरकार यांच्यातील हे मतभेद चव्हाट्यावर येण्याची गरज नव्हती. याचा परिणाम रुपयाच्या विनिमय दरावर झाला आणि रुपया US $१=Rs ७४ पर्यंत घसरला. मार्केट २०० पाईंट पडले. RBI ACT च्या कलम ७ नुसार केंद्र सरकार काही बाबींवर RBI शी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतल्यावर जर संमती होऊ शकली नाही तर केंद्र सरकार RBI ला त्या बाबींवर विशिष्ट्य प्रकारची एक्शन घ्यावयाची ऑर्डर करू शकते. आणि RBI ला या ऑर्डर्सचे पालन करणे जरुरी असते. अशाप्रकारे केंद्र सरकारने पॉवर क्षेत्रातील NPA, RBI कॅपिटल फंडाचा बँक रिकॅपिटलायझेशनसाठी उपयोग, आणि SME साठी सवलती या तीन बाबींवर RBI शी चर्चा केली. वर्तमान मतभेद ११ बँकांना PCA च्या यादीतून काढून टाकणे किंवा त्यांना PCA च्या काही अटींमध्ये मध्ये सूट देणे तसेच PCA खालील बँकांची यादी वाढवणे या बाबतीत होते. यातील PCA च्या अटींमुळे बँकांच्या कर्ज देण्यावर बंधने आल्यामुळे अर्थव्यवस्थेला विशेषतः NBFC क्षेत्राला होणारा कर्जाचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे लिक्विडीटी कमी झाली होती.

जर संमती शेवटपर्यंत बनू शकली नाही आणि RBI ने सरकारच्या ऑर्डरप्रमाणे एक्शन घेतली नाही तर RBI ऍक्ट च्या ११व्या कलमानुसार केंद्र सरकार RBI च्या गव्हर्नरला बरखास्त करू शकते. अशा चिंतातुर अवस्थेत मार्केट असताना सरकारने RBI च्या स्वायत्ततेची ग्वाही दिली पण त्याचबरोबर RBI आणि केंद्र सरकार या दोघांनाही जनतेच्या हितासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असते असे सांगितले. यानंतर मार्केट सुधारायला सुरुवात झाली. ज्यांनी शॉर्टींग केले होते ते सापळ्यात सापडले आणि मार्केट जोरदार वाढले. ५५०पाईंट पर्यंत (सेन्सेक्स) मार्केटमध्ये तेजी झाली.

टाटा स्टील आणि थिसेन कृप या जर्मन कंपनीच्या जाईंट व्हेंचर ची चौकशी युरोपिअन युनियनने सुरु केली. त्यामुळे टाटा स्टीलचा शेअर पडला.

DR रेड्डीजच्या दुवाडा प्लांटच्या तपासणी दरम्यान USFDA ला ८ त्रुटी आढळल्या. म्हणजे २०१५ च्या तपासणेनंतर या प्लांटमध्ये काही सुधारणा झाल्या नाहीत असे USFDA ला आढळले.त्यामुळे DR रेड्डीज चा शेअर Rs १२५ ने पडला नंतर Rs ७५ ने सावरला.

आज जेट एअरवेजने लीज पेमेंटमध्ये डिफाल्ट केला म्हणून एअरक्राफ्ट लिजिंग कंपनीकडून नोटीस मिळाली म्हणून शेअर पडला.

PSU OMC कंपन्यांना केरोसीनवरील सबसिडीमुळे दुसऱ्या तिमाहीत Rs १६४० कोटी तोटा झाला. सरकारने असे जाहीर केले की हा तोटा सरकार सोसेल आणि OMC कंपन्यांना खालीलप्रमाणे सरकार रक्कम देईल. (१) BPCL Rs २५० कोटी (२) HPCL Rs २७० कोटी (३) IOC Rs १२५० कोटी. सरकारच्या या घोषणेनंतर हे तिन्ही शेअर्स वाढले.
रेडीको खेतान या कंपनीने आपल्या ‘रामपूर सिंगल माल्ट व्हिस्की’ चे उत्पादन मे २०१९ पासून वाढवणार आहे असे जाहीर केले. हा शेअर वाढला

विशेष लक्षवेधी

  • ओरिएंटल पेपर, बँक ऑफ बरोडा, एस्कॉर्टस,अदानी एंटरप्राइजेस, AIA इंजिनीअरिंग, अजंता फार्मा, बलरामपूर चीनी, कोचिन शिपयार्ड, ल्युपिन, डाबर, MOIL, GHCL, रिलायन्स निपोन, हेरिटेज फूड्स, गुजरात पिपावाव, नितीन स्पिंनर्स, लार्सन अँड टुब्रो,या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले
  • शारदा क्रॉपकेम, टिन प्लेट, स्ट्राइड्स फार्मा, डालमिया भारत, सिंडिकेट बँक, कॅस्ट्रॉल, वेदांता, टाटा मोटर्स यांचे निकाल असमाधानकारक आले.
  • BF युटिलिटीज आणि प्रिज्म जॉन्सन ह्या कंपन्या टर्न अराउंड झाल्या .

वेध उद्याचा

  • सरकारने आपल्या कोल इंडियामधील स्टेकपैकी ९ % स्टेक Rs २६६ प्रती शेअर या भावाने ऑफर फॉर सेल आणली आहे.( ‘ऑफर फॉर सेल’ या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे ) यापैकी २०% शेअर्स रिटेल इन्व्हेस्टरसाठी राखीव ठेवले आहे उद्या ही ऑफर रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील. रिटेल इन्वेस्टर्सना ५% डिस्कॉउंट असेल.
  • वेदांताने Rs १७ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
  • अंजना फार्माने Rs ९ अंतरींम लाभांश जाहीर केला.
  • उद्या मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक आहे. या बैठकीत कंपनी कायद्यातील काही सुधारणांवर आणि स्वतंत्र डायरेक्टर्सच्या मानधनावर विचार केला जाईल.
  • उद्या बर्गर पेंट्स , द्वारिकेश शुगर, हफक गोदरेज प्रॉपर्टीज, ग्राईंडवेल नॉर्टन, HDFC, ICRA, HPCL इंडिया ग्लायकोल, पराग मिल्क, मॅरिको, SRF, झुआरी आणि झुआरी ऍग्रो यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४४४२ NSE निर्देशांक निफ्टी १०३८६ आणि बँक निफ्टी २५१५३ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०१८

आज ब्रेंट क्रूड US $ ७७.३८ ते ७६.६९ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ७३.६५ आणि US $ निर्देशांक ९६.८६ होता. या तिन्ही गोष्टीं मध्ये खूप चांगला किंवा खूप वाईट बदल आज दिसला नाही. काल मार्केटमध्ये (सेन्सेक्स मध्ये ) ७०० पाईंटची रॅली झाली होती हे लक्षात घेता आज मार्केट व्होलटाइल किंवा अस्थिर राहील हे उघड होते. त्यामुळे मार्केट सुरुवातीला तेजीत होते पण नंतर ही तेजी हळू हळू नाहीशी झाली.

अल्युमिनियमच्या असोसिएशनने सरकारला एक निवेदन दिले होते. USA आणि चीन यांच्यामध्ये चालू असलेल्या ट्रेड आणि टॅरिफ वॉरचा परिणाम आमच्या उद्योगाला सोसावा लागत आहे. भारतात अल्युमिनियम स्क्रॅप आणि हलक्या प्रतीच्या अल्युमिनियमचे डम्पिंग होत आहे. आणखी US $२५४ लाख एवढ्या रकमेची ड्युटी चीनी मालावर बसवावी अशा विचारात USA चे अध्यक्ष ट्रम्प आहेत. चिनी टेक उत्पादनाच्या आयातीवर USA ने बंदी घातली त्यामुळे असोसिएशनच्या मागणीनुसार सरकार अल्युमिनियमची आयात कोणकोणत्या मार्गाने कमी करता येईल यांच्यावर विचार करत आहे. (१) जास्तीतजास्त किती आयात करता येईल यावर मर्यादा घालावी (२) कोणत्या गुणवत्तेचे अल्युमिनियम आयात करता येईल ते ठरवावे (३) आयातीवर जी इम्पोर्ट ड्युटी लावली जाते ती २.५% वरून १०% करावी. यामुळे आज सुरुवातीलाच हिंदाल्को, नाल्को आणि वेदांता हे शेअर्स तेजीत होते पण हळू हळू तेजी नाहीशी झाली.

भारत आणि जपानमध्ये US $ ७५ बिलियनचा करन्सी स्वॅप समझोता झाला. यामुळे करन्सी आणि इंटरेस्ट रेट स्थिर राहण्यास मदत होईल.

CESC चे डी मर्जर झाल्यानंतर पॉवर आणि रिटेल व्यवसाय बाहेर पडले आणि उरलेल्या CESC चे पुन्हा आज Rs ६७० ला लिस्टिंग झाले. दिवसअखेरीस हा शेअर Rs ७१० होता.

कालच्याच ब्लॉगमध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ASM च्या यादीतून शेअर्स बाहेर पडले. त्यामुळे हे शेअर्स तेजीत होते.

श्रीराम ट्रान्सपोर्टने १५ ऑक्टोबरला जो NCD ( नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स) इशू ओपन केला तो जेमतेम ४३% भरला. त्यामुळे हा शेअर पडला.

जेट एअरवेज मधला २४% स्टेक ‘डेल्टा एअर’ घेणार आहेत.आणि काही प्रमाणात कॅपिटल इन्फ्युजन ही करणार आहे. हे कॅश डील होणार असून चागल्या प्रीमियमवर होणार आहे. त्यामुळे जेट एअरवेजचे कर्ज कमी होईल म्हणून जेट एअरवेज चा शेअर Rs ३० ने वाढला.

विशेष लक्षवेधी

  • ABB, नोसिल, ग्रॅन्युअल्स, जस्ट डायल, सुप्रीम इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, GTL, वेलस्पन, टेक महिंद्रा, JK टायर्स,मान इंडस्ट्रीज, चोलामंडलं फायनान्स, टॉरंट पॉवर यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले होते.
  • बँक ऑफ महाराष्ट्र, हिंद रेक्टिफायर, ह्या कंपन्या टर्नराउंड झाल्या.
  • देना बँक, IDFC बँक, सिम्फनी, टाटा टेली (महाराष्ट्र) यांचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उद्याचा

  • उद्या अदानी एंटरप्रायझेस, AIA इंजिनीरिंग, अजंता फार्मा, बलरामपूर चिनी, कॅनरा बँक, कोची शिपयार्डस, डाबर, एस्कॉर्टस, HEG, ल्युपिन, मॉईल, नवनीत एजुकेशन या कंपन्या आपले दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३८९१ NSE निर्देशांक निफ्टी १०१९८ बँक निफ्टी २४८०७ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०१८

क्रूड आज US $७७.६१ प्रती बॅरल आणि रुपया US $१= Rs ७३.३५ ते Rs ७३.३९ होता . US $ निर्देशांक ९६.७० होता. या तिघानीही बुल्सना साथ दिली नव्हती. पण मार्केट एका महत्वाच्या पातळीवर पोहोचले होते. बर्याच कंपन्या बँका यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये सुधारणा दिसू लागली त्यामुळे एक पुलबॅक रॅली किंवा रिलीफ रॅली DUE होती. या पातळीला बेअर्स शॉर्ट करायला कचरत होते आणि हीच संधी बुल्सनी साधली.

आज बुल्सच्या आणि बेअर्सच्या लढाईमध्ये बुल्सनी बेअर्सवर मात केली. सरकारचीही बुल्सना मदत झाली. त्यामुळे मार्केट ७०० पाईंट (सेन्सेक्स) आणि निफ्टी २३० पाईंट वर राहिले. सरकारने PCA खालील बँकांना काही सवलती देण्यावर विचार चालू आहे असे संगितले. या पैकी प्रमुख खालीलप्रमाणे (१) PCA खाली असणाऱ्या बँकांना नवीन शाखा उघडायला परवानगी मिळेल.(२) कॅपिटल ADEQUACY च्या नियमातून BASEL -३ नियमानुसार सूट देण्याचा विचार करण्यात येईल. (३) या बँकांना लोन देण्याची परवानगी दिली जाईल. ही बातमी येताच PCA खाली असलेल्या बँकांचे शेअर्स वाढायला सुरुवात झाली

ASM च्या यादितून उद्या ११० कंपन्या बाहेर येतील या कंपन्यांच्या शेअर्ससाठी १०० % मार्जिन भरावे लागत होते. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्स मधील ट्रेडिंग कमी होऊ लागले.उद्यापासून या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये नियमित ट्रेडिंग सुरू होईल
कॉक्स आणि किंग्स यांनी त्यांचा शैक्षणिक बिझिनेस विकला आहे. यांना या बिझिनेसचे Rs ४०३० कोटी मिळतील. यामुळे ही कंपनी कर्ज मुक्त(DEBT फ्री) होईल.आणि शेअर होल्डरला काही प्रमाणात रिवॉर्ड मिळेल.

ल्युपिनच्या पिथमपूर युनिटमध्ये मॅन्युफक्चरिंग, सॅम्पलिंग, क्वालिटी कंट्रोलमध्ये त्रुटी आढळल्या १९ ओक्टोबर २०१८ रोजी फॉर्म नंबर ४८३ इशू केला.

ग्रॅन्युअल्सच्या व्हर्जिनिया प्लांटमध्ये USFDA ने २ त्रुटी दाखवल्या. २२ ऑक्टोबर २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान ही तपासणी झाली होती.

जेट एअरवेजनी काही विमाने लीजवर घेतली. त्याच्या पेमेंटमध्ये जेट एअरवेजने डिफाल्ट केला.

एक्सिस बँक त्यांचा NSDL मधील स्टेक HDFC ला Rs १६३ कोटींना विकणार आहे.

‘CAIRN’ च्या राजस्थानमधील विस्तार योजनेला सरकारची मंजुरी मिळाली.

विशेष लक्षवेधी

  • विजया बँक, प्रकाश इंडस्ट्रीज, मंगलोर केमिकल्स आणि फर्टिलायझर, टाटा पॉवर, सोलार इंडस्ट्रीज, सुदर्शन केमिकल्स, KRBL, गृह फायनान्स, KPR मिल्स, कोलगेट(Rs ८ प्रती शेअर अंतरिम लाभांश), मेघमणी ऑरगॅनिक्स, कार्बोरँडम, सुंदरम फासनर्स, डिव्हीज लॅब्स, विनती ऑर्गनिक्स, नेस्टले, ASTEC लाईफ, दीपक नायट्रेट, शेषशायी पेपर्स यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
  • मॉन्सॅन्टो, स्नोमॅन लॉजिस्टिक, आणि युनियन बँक दुसर्या तिमाहीत टर्न अराउंड झाले

वेध उद्याचा

  • बँक ऑफ बरोडा, टेक महिंद्रा, दालमिया भारत, इमामी, नोसिल, पीडिलाइट यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल उद्या येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०६७ NSE निर्देशांक निफ्टी १०२५० आणि बँक निफ्टी २४९५९ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ ऑक्टोबर २०१८

आज रुपया सुधारला (US $१ =Rs. ७३.२८ ) आणि क्रूडचा भाव US $७५.९५ प्रती बॅरल होता एवढी अनुकूल स्थिती असतानाही मार्केटचा मूड काही सुधारला नाही. मुलभूत गोष्टी सुधारत असतानाही निराशा वरचढ ठरली. एकदा मनःस्थिती खराब झाली की मार्केट सारासार विचार करण्याच्या स्थितीत राहत नाही हेच खरे. तेजीचाही नेहेमी अतिरेक आढळतो आणि मंदीचाही नेहेमी अतिरेक होतो. खरे पाहतां आज आलेले दुसर्या तिमाहीचे काही चांगले निकाल थोडासा सुखद गारवा देऊन गेले.

आज COC ने एस्सार स्टीलसाठीची आर्सेलर मित्तल या कंपनीची बीड मंजूर केली. एस्सार स्टीलला अनेक बँकांनी कर्ज दिले होते. हे कर्ज वसूल होईल असा एक आशेचा किरण बँकांना दिसू लागला. एस्सार स्टीलच्या प्रमोटर्सनी सांगितले की आम्ही आमच्यावर असलेलया Rs ५४७८९ कोटींच्या कर्जाची पूर्णपणे परतफेड करू. या कर्जामध्ये बँक ऑफ बरोडा Rs १३०० कोटी, HDFC बँक Rs १०० कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया Rs १३७०० कोटी, ICICI बँक Rs २५०० कोटी, PNB Rs ३००० कोटी, कॅनरा बँक Rs ३९०० कोटी, युनियन बँक Rs २२०० कोटी, कॉर्पोरेशन बँक Rs १७०० कोटी, एक्सिस बँक Rs १०० कोटी, बँक ऑफ इंडिया Rs २००० कोटी यांचा वाटा आहे. या केसमध्ये तीन प्रकारचे प्रश्न उद्भवतात. प्रमोटर्सकडे जर पैसे उपलब्ध होते तर त्यांनी NCLT मध्ये इंसॉल्व्हन्सी अर्ज जाऊन रेझोल्यूशन होऊन COC ने आर्सेलर मित्तलची बीड मंजूर होईपर्यंत वाट का पाहिली. तसेच त्यांनी आता एवढे पैसे कोठू उपलब्ध केले हा ही एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. जर ९०% कर्जदारांनी प्रमोटर्सच्या बीडला मान्यता दिली तर एस्सार स्टील ही कंपनी इंसॉल्व्हंसी मधून बाहेर येऊ शकेल.

सुप्रीम कोर्टाने न्यूमेटल या कंपनीला एस्सार स्टीलसाठी बीड करू देणार नाही असे सांगितल्यावर आता प्रमोटर स्वतः पुढे आले आहेत. यात एक कळीचा मुद्दा असा आहे की प्रमोटरची बीड जर बँकांनी स्वीकारली तर बँकांना फार थोडा हेअर कट घ्यावा लागेल. त्यामुळे कर्जदारांमध्ये फूट पडू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की रेझोल्यूशनची सर्व प्रक्रिया पुरी होऊन आर्सेलर मित्तलची बीड मान्य केल्यानंतर आता फ्रेश बीड विचारात घेतली जाऊ शकते कां ?  – बहुतेक बँकांनी सांगितले की आता हे शक्य होणार नाही. NCLT मध्ये रेझोल्यूशन पूर्ण करण्यासाठी २७० दिवसांची मुदत असते. पण आतापर्यंत या प्रकारच्या अर्जांना सरासरी ३२५ ते ३७० दिवस लागतात.

इक्विटास आणि उज्जीवन फायनान्स या कंपन्यांना RBI ने असे सांगितले की त्यांनी आपल्या स्मॉल फायनान्स बँकेचे (इक्विटासने २४ सप्टेंबर २०१९ पर्यंत आणि उज्जीवनने ३० जानेवारी २०२० पर्यंत) लिस्टिंग केले पाहिजे. RBIने असे सांगितले की स्माल फायनान्स बँकेचा कारभार सुरु झाल्यापासून ५ वर्षेपर्यंत प्रमोटर्सना त्यांचा स्टेक ४०% पर्यंत ठेवला पाहिजे. या दोन्ही कंपन्यांनी सांगितले की आम्ही RBI च्या सूचनांचे मुदतीच्या आत पूर्णपणे पालन करू. या दोन्ही शेअर्सला मार्केटमध्ये खूप मोठा हबका बसला.

विशेष लक्षवेधी

अतुल ऑटो, ITC , सुब्रोस, रेमन्ड, बायोकॉन, रुचिरा पेपर, गोदावरी इस्पात आणि पॉवर, हायडलबर्ग सिमेंट, DR रेड्डीज, श्रीराम ट्रान्सपोर्ट, M &M फायनान्सियल्स, UPL, BEL, कॅपिटल I st, किर्लोस्कर ऑइल, कोरोमंडल इंटरनॅशनल, IOB,सिएट यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

येस बँक ( या बँकेचे IL&FS ला Rs २५०० कोटींचे एक्स्पोजर आहे), HT मेडिया, ICICI बँक (५६% प्रॉफिट कमी झाले), कोलतेपाटील यांचे निकाल असमाधानकारक आले.

पनामा पेट्रोचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

NCLTने अरविंद फॅशन आणि अनुप इंजिनीअरिंगच्या डीमर्जरला परवानगी दिली. अरविंदच्या २७ शेअरमागे अनुप इंजिनीअरिंगचा एक शेअर मिळेल.

वेध उद्याचा

‘इस्मा'( इंडियन शुगर मिल्स असोसिएशन)ने सांगितले की साखरेचा उतारा कमी आल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होईल. ब्राझीलमध्येही साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीसाठी Rs ८ सवलत दिली आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये या वर्षात प्रथमच रॉ शुगर निर्यात केली जाणार आहे या आर्थीक वर्षात क्रूड, करन्सी आणि परदेशातील घडामोडी यापासून साखर उत्पादक कंपन्या दूर आहेत. निवडणुका, सणावाराचा सिझन असल्यामुळे या सेक्टरला प्राधान्य दिले आहे.

बर्याच कंपन्यांमध्ये प्रमोटर्स आपला स्टेक वाढवत आहेत. याची अनेक कारणे आहेत

(१) मार्केट पडत असल्यामुळे विविध कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात उपलब्ध आहेत. म्हणून प्रमोटर्स आपला स्टेक वाढवत आहेत.
(२) नजीकच्या भविष्यात कंपनीमध्ये काही सकारात्मक बदल अपेक्षित असतो
(३) होस्टाइल अक्विझिशनचा धोका संभवत असल्यास प्रमोटर्स आपला स्टेक वाढवत आहेत.

या कंपन्यांकडे आपण गुंतवणुकीच्या दृष्टीकोणातून लक्ष द्यावयास हरकत नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३३४९ NSE निर्देशांक निफ्टी १००३० आणि बँक निफ्टी २४४२१ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०१८

आज क्रूड US $ ७६.४५ प्रती बॅरल रुपया US $१= Rs ७३.२० आणि US $ निर्देशांक ९६.३० होता. आज मार्केटवर एक्स्पायरीचा परिणाम होता. आणि मार्केटमध्ये निराशाही फार मोठ्या प्रमाणावर होती. कोणताही निकाल ऐकला तरी व्यवस्थापनाची कॉमेंटरी ऐकू या आणि मगच आपला निर्णय ठरवू या. कारण निकाल येतो ते घडून गेलेल्या काळाचे दर्शन असते, आणि मार्केटमध्ये खरेदी ही पुढील काळासाठी होत असते. आज बर्याच कंपन्यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल लागले. निकाल चांगले येऊनही शेअरचे भाव वाढले नाहीत पण निकाल वाईट आल्यानंतर मात्र शेअरचे भाव आपटले. मारुती सुझुकीचा दुसर्या तिमाहीचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला. पण व्यवस्थापनाने व्याजाचे दर आणि क्रूडची किंमत याबद्दल चिंता व्यक्त केली.

टाटा स्टिल टाटा स्पॉन्जच्या मार्फत उषा मार्टिनचा स्टील बिझिनेस खरेदी करणार आहे.

टाटा स्पॉन्ज Rs १८०० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे आणि या राईट्स इशुच्या प्रोसिड्स मधून उषा मार्टिन चा बिझिनेस खरेदी करणार आहे.

SKF (इंडिया) लिमिटेड Rs २१०० प्रती शेअर या भावाने शेअर्स BUY बॅक करणार आहे. १९ लाख शेअर्स BUY बॅक करणार आहे.

विशेष लक्षवेधी

  • झायडस वेलनेस यांनी HEINZ ही क्रॉफ्ट हेन्झ या कंपनीची सबसिडीअरी Rs ४५९६ कोटी रुपयांना खरेदी केली. यामुळे कंपनीला आपल्या वेलनेस बिझिनेसचा विस्तार करता येईल. या खरेदीमुळे झायडस वेलनेस ही कंपनी कॉम्प्लान, ग्लुकॉन D, नायसिल, सम्प्रीती घी ह्या सुप्रस्थापित ब्रँडचे मालक होतील. यामध्ये कॅडिलाचा हिस्सा नाममात्र आहे. त्यामुळे झायडस चा शेअर वाढला आणि कॅडिलाचा शेअर वाढला नाही. हेइन्झ ही DEBT फ्री कंपनी आहे आणि या असिक्विझिशनसाठी झायडस या कंपनीला कर्ज काढावे लागणार नाही.
  • L &T फायनान्स कंपनीने Rs १८०० कोटी IL&FS ला कर्ज दिले आहे तसेच सुपरटेक या कंपनीला Rs ८०० कोटी कर्ज दिले आहे. त्यामुळे या कंपनीचा शेअर पडला.
  • PVR, NIIT, बोडल केमिकल्स, पिरामल इंटरप्रायझेस, प्राज इंडस्ट्रीज, महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्स, वरुण बिव्हरेजीस, मास्टेक, YES बँक ( NII, लोन पोर्टफोलिओ वाढला, एक NPA Rs ४४५ कोटींचा विकला) आणि JSW स्टील यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
  • लक्ष्मी विलास बँक , डिश टी व्ही, राणे मद्रास, V -गार्ड इंडस्ट्रीज, हेक्झावेअर,भारती एअरटेल( प्रॉफिटYOY बेसिसवर ६५% कमी झाले असले तरी मार्केटच्या अनुमानापेक्षा बरे निकाल आले) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
  • BHEL ही कंपनी Rs ८६ प्रती शेअर या भावाने १८.९३ कोटी शेअर्स BUY बॅक करणार आहे. भेल यासाठी Rs १६२८ कोटी खर्च करेल. या BUY बॅक ची रेकॉर्ड डेट ६ नोव्हेंबर २०१८ ही ठरवली आहे.
  • आज क्रूडची किंमत कमी होत असल्यामुळे IOC, BPCL, HPCL या ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे आणि जेट एअरवेज आणि इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये(जरी या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक असले तरी) खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३६९० NSE निर्देशांक निफ्टी १०१२४ आणि बँक निफ्टी २४८१७ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०१८

आज देवालाच दया आली असे म्हणावे लागेल. आज रुपया वधारला ( US $१=Rs ७३.१७) क्रूडचा भावही कमी झाला ( US $७६.५० प्रती बॅरल) यामुळे सरकारला थोडी उसंत मिळाली. मार्केटच्या दृष्टीने VIX ११% ने कमी झाला.आज VIX १८.८८ होता म्हणजेच मार्केटच्या दृष्टीने सर्व गोष्टी अनुकूल होत्या. यामुळे सुरुवातीला मार्केट तेजीत उघडले. आणि पुट/कॉल रेशियो १.०१ झाला.

पण ही तेजी टिकली नाही. USA मधील वातावरण गढूळ झाल्यामुळे सर्व IT क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पडले. बेअर्स मार्केटवर ताबा मिळवत आहेत असे दिसू लागले. पुन्हा नवीन ‘लो’च्या स्तरावर मार्केट जाते असे वाटत असताना बुल्सनी तयारीनिशी लढा दिला आणि मार्केट सावरले.

एप्रील २०२० पासून BS-VI वाहनेच विकली जातील असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. पूर्वी इथेनॉल ब्लेंडींग ५% केले जात होते आता ते १०%पर्यंत केले जाईल. पण जर क्रूडचा दर US $ ६० प्रती बॅरलपर्यंत खाली आला तर इथेनॉल ब्लेंडींगचे आकर्षण संपुष्टात येईल.

सरकारने पेट कोकचे नियम सोपे केले. ५लाख टन एवढ्या पेट कोक आयातीला परवानगी दिली. अल्युमिनियम कंपन्यांना बर्याच सवलती दिल्या. याचा फायदा हिंदाल्को, नाल्को, वेदांता यांना होईल.

संकटाची मालिका काही थांबत नाही असे दिसते. गुजरात कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र येथे बर्याच ठिकाणी दुष्काळ जाहीर केला. कितीही चांगला पाऊस झाला तरी १५% ते १८ % ठिकाणी पाऊस पोहोचत नाही किंवा पावसाचे प्रमाण नगण्य राहते असे हवामान खात्याने स्पष्टीकरण दिले.

टी सी एस ने इंटेल बरोबर ब्लॉकचेन सोल्यूशनसाठी करार केला.

सेबीने BSE ला ओमान क्रूड वायद्यासाठी परवानगी दिली.

विशेष लक्षवेधी

  • बजाज फिनसर्व, अंबुजा, रॅलीज, सास्केन,भारती इंफ्राटेल, विप्रो, इंडीगो,राणे इंजिन यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.
  • झेनसार, टाटा मेटॅलिक्स, TTK प्रेस्टिज, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक,करून वैश्य बँक , ज्युबिलंट फूड, ज्योती लॅब, रॅडिको खैतान ओबेराय रिअल्टी, मुथूट कॅपिटल यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

वेध उद्याचा

  • उद्या ऑक्टोबर एक्स्पायरी आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०३३ NSE निर्देशांक निफ्टी १०२२४ आणि बँक निफ्टी २५०६४ वर
बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ ऑक्टोबर २०१८

आज मार्केटची गोष्ट मागील पानावरुन पुढे जशीच्या तशी सुरू झाली. चांगल्या बातमीकडे होणारे दुर्लक्ष आणि वाईट बातमीचा होणारा जबरदस्त परिणाम त्यातून निर्माण होणारी आणि गडद होत जाणारी निराशा. या छायेखालीच मार्केट दिवसभर राहिले. दिवसाच्या शेवटी शेवटी रुपया सुधारला तो US $१= Rs ७३.५५ झाला. क्रूडचा भाव घसरला तो US $७८.८५ प्रती बॅरल झाला. सरतेशेवटी तर US $ ७८.३८ प्रती बॅरल झाला. सौदी अरेबिया क्रूडचा पुरवठा वाढवेल असे चिन्ह दिसू लागले. या सर्व गोष्टी अनुकूल असल्यामुळे दिवस अखेरीस मार्केट थोडेसे सुधारले.

लक्ष्मी विलास बँकेमध्ये ब्लॅकस्टोन, BAIN कॅपिटल आणि TPG कॅपिटल मॅनेजमेंट, बेअरिंग प्रायव्हेट इक्विटी एशिया, होमग्रोन गांजा कॅपिटल हे कंट्रोलिंग स्टेक घेणार आहेत म्हणून या बँकेचा शेअर वाढला. कंपनीच्या शेअर्ससाठी नॉनबाईंडिंग ऑफर Rs १४० ते Rs १६० प्रती शेअर या दरम्यान आल्या आहेत. या बँकेच्या शेअरची CMP सोमवार तारीख २२ ऑक्टोबर २०१८ रोजी Rs ९० होती.

आज पुन्हा IL& FS ने आज Rs २४७ कोटींचा डिफाल्ट केला.

नेस्लेने GST कमी केलेल्याचा फायदा ग्राहकापर्यंत पोहोचवला नाही आणि याचा Rs १०० कोटी फायदा उठवला आहे असे DGAP (डायरेकटोरेट जनरल ऑफ अँटी प्रॉफीटिअरींग) चे म्हणणे आहे त्यांनी तसा रिपोर्ट NAA (नॅशनल अँटीप्रॉफीटिअरींग ऑथॉरिटी)ला सादर केला आहे. व्यवस्थापनाने अशी माहिती दिली की हे Rs १०० कोटी कन्झ्युमर वेल्फेअर फंडात जमा केले आहेत कारण काही बाबतीत GST मुळे मिळालेला फायदा ग्राहकांना पास ऑन करणे शक्य नव्हते. यामुळे शेअर Rs ३०० पडला.

इंडसइंड बँकेने IL &FS ला Rs १००००० कोटींचे लोन दिले आहे. IL &FS चा येऊ घातलेला राईट्स इशू लांबणीवर पडला आहे. यामुळे या लोनची वसुली होणे लांबणीवर पडले. तसेच या लोनसाठी इंडसइंड बँकेला Rs २७५ कोटीची प्रोव्हिजन करावी लागली. इंडसइंड बँकेने असे सांगितले की आमचा रिअल्टी सेक्टरला लोन बुकच्या ४% एक्स्पोजर आहे आणि त्यातील कोणतेही लोन ओव्हरड्यू झालेले नाही. या बँकेचा JP ग्रुप आणि आम्रपाली ग्रुपला एक्स्पोजर नाही हे स्पष्टीकरण आल्यावर शेअरमध्ये थोडी सुधारणा झाली

RBL बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.प्रॉफिट, NII वाढले,लोन बुक वाढले पण NPA ही वाढले. तसेच RBL बँकेने अशी माहिती दिली की त्यांचे NBFC ला Rs २६२३ कोटींचे एक्स्पोजर आहे. जेट एअरवेजमध्ये मात्र एक्स्पोजर नाही.
एस्सार स्टील ही NCLT मध्ये गेलेली कंपनी आर्सेलर मित्तल यांच्या हवाली होणार असे दिसते. त्यामुळे ज्या ज्या बँकांचे पैसे या कंपनीमध्ये अडकले आहेत.ते थोड्या प्रमाणात वसूल होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे उदा. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक

विशेष लक्षवेधी

  • ओबेराय रिअल्टी, बजाज फायनान्स, इंडियन मेटल, SPIC, टी व्ही एस मोटर्स, HCL टेक, HDFC स्टॅंडर्ड ( नेट प्रीमियम उत्पन्न आणि प्रॉफिट वाढले) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. HCL टेकने त्यांचा Rs ४००० कोटींचा BUY बॅक पुरा झाला.
  • बजाज फिनसर्वचे निकाल ठीक आले.
  • एशियन पेंट्स, राणे ब्रेक्स,अडानी पोर्ट्स ( त्यांना Rs ५७० कोटी फॉरेक्स लॉसेस झाले) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल खराब आले.
  • लक्ष्मी मशीन वर्क्स चा निकाल ठीक आला. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने २६६६६६ शेअर्स कमाल Rs ६००० प्रती शेअर या किमतीने ‘शेअर बाय बॅक’ करण्यास मंजुरी दिली. शेअरहोल्डर्सना हा BUY बॅक पसंत पडला नाही शेअर Rs ४०० पडला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३८४७ NSE निर्देशांक निफ्टी १०१४६ आणि बँक निफ्टी २४९७२ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०१८

आज मार्केट तेजीत उघडले पण मार्केटने टिकाव धरला नाही. लोकांची मनःस्थिती खराब असल्यामुळे कंपनीचे तिमाही निकाल चांगले आले किंवा वाईट आले तरी प्रतिक्रियेमध्ये फरक पडत नव्हता. आज खरे पाहता क्रूड US $ ७९.६५ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७३.५० होता. तरीही मार्केटमधील तेजी टिकली नाही याचे आश्चर्य वाटले.

मार्केटचा रस्ता आता इतका खराब झाला आहे की अपघात होणे काही नवीन नाही. सेक्टर मधील एक शेअर पडू लागला की त्या सेक्टरमधील सर्व शेअर्स पडू लागतात.पर्सिस्टंटचे दुसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक असल्यामुळे शेअर पडला. रिअल्टी सेक्टर मधील सगळे शेअर्स पडले.

आज मंदीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुढाकार होता. इंडस इंड बँक, RBL बँक, AU स्मॉल फायनान्स बँक हे सर्व शेअर्स पडत होते. कन्साई नेरोलॅक या कम्पनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल खराब आला त्यामुळे ट्रेडर्स बिथरले.

उद्या एशियन पेंट्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल कसे येतील कोणास ठाऊक अशा भीतीने एशियन पेन्ट्सच्या शेअरमध्येही विक्री सुरु झाली. HDFC बँकेचा दुसर्या तिमाहीचा निकाल सगळ्यांना आवडला ही काय ती जमेची बाजू !

इंडिया बुल्स हाउसींग फायनान्स हा शेअर तेजीत होता.या कंपनीचा ओक नॉर्थ होल्डिंग या UK बेस्ड कम्पनीमध्ये १८.७% स्टेक आहे . हा स्टेक महिन्याभराच्या कालावधीत एका प्रायव्हेट म्युच्युअल फंडाला विकणार आहे. अडानी इंटरप्राइयझेस मधील तेजी मात्र आजही सुरु होती.

विशेष लक्षवेधी

  • भेल गुरुवारी शेअर BUY बॅक वर विचार करणार आहे.
  • अलेम्बिक फार्मा , ज्युबिलंट लाईफ, CCL प्रॉडक्ट्स, आयनॉक्स लेजर, हिंदुस्थान झिंक, ओरिएंटल हॉटेल यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले
  • कन्साई नेरोलॅक, कल्याणी स्टील, आणि GSK फार्मा यांचे निकाल असमाधानकारक आले.
  • युनिकेम लॅबला पिथमपूर आणि रोहा या प्लांटसाठी USFDA कडून EIR मिळाला

वेध उद्याचा

  • हिंदुस्थान झिंक या कंपनीने Rs २० प्रती शेअर स्पेशल अंतरिम लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४१३४ NSE निर्देशांक निफ्टी १०२४५ आणि बँक निफ्टी २५०७८ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ ऑक्टोबर २०१८

आज क्रूड US $ ८० प्रती बॅरल च्या खाली होते. रुपयाही वधारला होता. US $ निर्देशांक ९६ होता. पण तरीही मार्केट रुसलेलेच राहिले. सरकारी बातम्यासुद्धा मार्केटचा रुसवा काढण्यात असमर्थ ठरल्या. आज VIX १०.०५% वरून १९.७८% झाले.

USA मध्ये H1B व्हिसाचे नियम बदलणार आहेत. आता फक्त सर्वोत्कृष्ट आणि सर्वात हुशार आणि सगळ्यात जास्त पगार असणाऱ्या परदेशी नागरिकांना व्हिसा देण्यात येईल. H1B व्हिसा असणाऱ्या विवाहित H1B व्हिसा होल्डर्स च्या पती किंवा पत्नीला USA मध्ये काम करण्याचे स्वातंत्र्य नसेल. आता फक्त स्पेशालिटी फिल्डमध्ये स्नातक किंवा स्नातकोत्तर पदवी असलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा दिला जाईल. USA मध्ये शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याना मर्यादित मुदतीसाठी व्हिसा दिला जाईल. सध्या ह्या विद्यार्थाना विद्यार्थी दशा संपेपर्यंत व्हिसा दिला जातो हे बदललेले नियम ऑगस्ट २०१९ पासून अमलात आणले जातील.

फेडने असे जाहीर केले की बेंचमार्क लेन्डिंग रेट ३.४०% होईपर्यंत २०२० पर्यंत वाढवला जाईल. .तसेच USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरमुळे USA मधील आणि जगातील शेअर मार्केट पडली. चीन मधील ग्रोथ रेट गेल्या ९ वर्षातील किमान स्तरावर आहे.

RBI ने लिक्विडीटी कव्हरेज रेशियो मध्ये सूट दिली. याचा फायदा NBFC ना होईल. आता NBFC ना सिंगल बॉरोअर एक्स्पोजर लिमिट १०% ऐवजी १५% केली.

सरकारने स्पेशिलाईज्ड स्टील वरील ANTI डम्पिंग ड्युटीची मुदत ५ वर्षांकरता वाढवली.याचा फायदा वर्धमान स्टील आणि सनफ्लॅग आयर्न यांना होईल. चीन मधून आयात होणाऱ्या काही स्टिल प्रॉडक्ट्सवर अँटी डम्पिंग ड्युटी लावली.
फ्लेक्स यार्नवर अँटी डंपिंग ड्युटी लावली. हे यार्न रेडिमेड गारमेंट बनवण्यासाठी वापरण्यात येते. याचा फायदा अरविंद,आणि रेमंड या दोन कंपन्यांना होईल.

जेट एअरवेज टाटा विकत घेणार अशी बातमी असल्यामुळे जेट एअरवेज चा शेअर वाढला.

J B केमिकलच्या पनोंली प्लांटची १५ ते १८ ऑक्टोबर २०१८ दरम्यान USFDA ने तपासणी केली होती त्यामध्ये ४ त्रुटी दाखवल्या

ल्युपिनच्या इंदोर येथील पिथमपूर प्लांटची USFDA ने तपासणी केली त्यात ५ त्रुटी दाखवल्या.

आज माईंडट्रीचा शेअर खूप पडला. युरोपमध्ये आणि रिटेल व्यवसायात मंदी आली. नवी डील फारशी मिळाली नाहीत. आणि पहिल्या तिमाहीचा निकाल खूपच चांगला होता त्यामुळे दुसऱ्या तिमाहीचा निकाल तुलनात्मक दृष्ट्या थोडा कमी वाटतो असे व्यवस्थापनाने सांगितले.

सुपरटेक या डबघाईला आलेल्या कंपनीला कर्ज देणार्या कंपन्यांमध्ये रेपको होम फायनान्स कंपनीचा वाटा खूप आहे त्यामुळे रेपको होम फायनान्सचा शेअर पडला.

विशेष लक्षवेधी

  • अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल अपेक्षेपेक्षा थोडा कमी आला.
  • M &M ला १०००० मोराझो साठी बुकिंग ऑर्डर मिळाली.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचा दुसर्या तिमाहीचा निकाल मार्केट संपल्यानंतर तारीख १७/१०/२०१८ रोजी जाहीर झाला.
  • रिलायन्सने डेन नेटवर्क्स आणि GTPL हाथवे यासाठी ओपन ऑफर प्राईस जाहीर केली. GTPL हाथवे साठी Rs ८२.६५ या दराने २१ लाख शेअर्स घेणार आणि त्यासाठी Rs २३८.३७ कोटी खर्च करणार. डेन नेटवर्क्ससाठी Rs ७२.६६ प्रती शेअर्स या दराने १२ कोटी शेअर्स घेणार आणि Rs ८८७.७८ कोटी खर्च करणार आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने SkyTran या USA मधील कंपनीत १२.७% स्टिक घेतला.

वेध उद्याचा

पुढील आठवड्यात जाहीर होणारे दुसर्या तिमाहीचे मह्त्वाचे निकाल खालील प्रमाणे

  • २० ऑक्टोबर २०१८ HDFC बँक
  • २१ ऑक्टोबर २०१८ पर्सिस्टंट
  • २२ ऑक्टोबर २०१८ एशियन पेंट्स, GLAXO, हाटसन ऍग्रो, इनॉक्स लिजर, HOEC, हिंदुस्थान झिंक
  • २३ ऑक्टोबर २०१८ अडानी पोर्ट, अंबुजा सिमेंट, बजाज कॉर्प, बजाज फायनांस, बजाज फिनसर्व
  • २४ऑक्टोबर २०१८ बजाज ऑटो, भारती इन्फ्राटेल, जुबिलंट फूड्स
  • २५ ऑक्टोबर २०१८ JSW स्टील, हैदराबाद इंडस्ट्रीज, कजारिया सिरॅमिक्स, येस बँक, मारुती,
    PVR, मास्टेक, रेमंड
  • २६ ऑक्टोबर २०१८ अतुल ऑटो, BEL, DR रेड्डीज, ICICI बँक, ITC

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४३१५ NSE निर्देशांक निफ्टी १०३०३ आणि बँक निफ्टी २५०८५ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – विशेष लक्षवेधी – रिलायन्स इंडस्ट्रीज results

आज रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.

एकूण उत्पन्न Rs १५६२९१ कोटी झाले. ही YOY (YEAR ON YEAR) ५४.५% ग्रोथ आहे.

नेट प्रॉफिट Rs ९५१६ कोटी झाले. ही YOY १७.३०% ग्रोथ आहे. GRM ( ग्रॉस रिफाईनिंग मार्जिन) US $ ९.५ /BBL होते. हे GRM गेल्या तिमाहीपेक्षा कमी (US $१०.५०/BBL ) आणि YOY( US $१२/BBL) ही कमी होते. EBITDA Rs २११०८कोटी होते. ही YOY ३५.६% ग्रोथ आहे. इतर उत्पन्न ३०% ने कमी होऊन Rs १२५० कोटी होते.
पेट्रोकेमिकल्स विभागाचे उत्पन्न YOY ५६.२% वाढून Rs ४३७४५ कोटी झाले. EBIT Rs ८१२० कोटी होती.
रिलायन्स जियोचे सब्सक्राइबर्स २५ कोटींपेक्षा जास्त झाले. या तिमाहीत ३.७ कोटी सब्सक्राइबर्स वाढले. ARPU प्रती सब्सक्राइबर प्रती महिना Rs १३१.७० होता. रिलायन्स जियोचे नेट प्रॉफिट Rs ६८१ कोटी होते.
रिलायन्स रिटेलने चांगली प्रगती केली. उत्पन्न Rs ३२४३६ कोटी होते. EBIT Rs १२४४ कोटी होते. रिलायन्स रिटेल ची ९१४६ स्टोर्स आहेत.
हा लक्षणीय बिझिनेस परफॉर्मन्स पेट्रोकेमिकल्स बिझिनेस मधील व्हॉल्युम आणि मार्जिन मधील वाढीमुळे आणि रिटेल आणि डिजिटल बिझिनेस मधील चांगल्या हातभारामुळे शक्य झाला .
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हाथवे मधील ५१.३४% स्टेक Rs २९४० कोटींना खरेदी करेल. हाथवे रिलायन्स इंडस्ट्रीजला ९०.८० कोटी शेअर्स Rs ३२.३५ प्रती शेअर या भावाने ( CMP वर १०% प्रीमियमवर) प्रेफरन्स शेअर्स जारी करेल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड Rs २२९० कोटी खर्च करून डेन नेटवर्क्सया कंपनीमध्ये ६६.०१% स्टेक घेणार आहे. यामध्ये Rs २०४५ कोटी प्रेफरन्स इशूद्वारे तर Rs २४५ कोटींचे शेअर्स वर्तमान प्रमोटर्स कडून खरेदी केले जातील.
या दोन्ही कंपनीत ओपन ऑफर आणली जाईल.
हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाहीतला परफॉर्मन्स उत्कृष्ट म्हणावा लागेल.