आजचं मार्केट – ०४ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०४ ऑक्टोबर २०१८

क्रूड आज US $ ८६.१४ प्रती बॅरल US$ निर्देशांक ९६.०८ आणि रुपया US $१ =७३.८० होते. मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निराशा पसरली आहे. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री चालू आहे. ऑटो विक्रीच्या आकड्यांनी या निराशेत भर घातली. त्यातच अर्थमंत्र्याच्या वार्ताहर परिषदेकडे डोळे लागले होते. सरकारने OMC (ऑइल मार्केटिंग कंपनी) साठी ECB (एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंग) विषयी नियम सोपे केले. ३ ते ५ वर्षांसाठी Rs १००० कोटींपर्यंत रक्कम BORROW करता येईल. अर्थमंत्र्यांनी एकसाईझ ड्युटी Rs १.५० कमी करू. असे सांगितले ऑइल मार्केटिंग कंपन्या किंमत Rs १ने कमी करतील आणि राज्य सरकारांना Rs २.५० VAT कमी करायला सांगितला. अशा रीतीने पेट्रोल /डिझेल ग्राहकांना Rs ५ चा फायदा होऊ शकेल. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात जेव्हा ग्राहकांचा फायदा होतो तेव्हा सरकारवर आणि कंपन्यांवर बोजा वाढतो. सरकार एकसाईझ ड्युटी कमी करणार असल्यामुळे सरकारवर Rs २१००० कोटींचा बोजा पडणार आहे. सरकारने ऑइल कंपन्यांना डिरेग्युलराइज केले होते. या कंपन्या व्यापारी तत्वावर निर्णय घेऊ शकत होत्या. त्यामुळे गुंतवणूक करणे सोपे जात असे. पण आजच्या सरकारच्या निर्णयामुळे सबसिडीचा बोजा लादला जाईल काय ? अशी भीती मार्केटला वाटली. क्रूड सारख्या मूलभूत गोष्टींसाठी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकातील (https://store.self-publish.in/products/market-aani-me) मूलभूत विश्लेषणाविषयी वाचा.

सरकारी कंपन्या, सरकारी बँका म्हणजे सरकारच्या हातातले खेळणे नव्हे काय ? असे वाटल्यामुळे शेवटच्या १५ मिनिटात ऑइल मार्केटिंग कंपन्या म्हणजेच BPCL HPCL IOC त्याचप्रमाणे ONGC, ऑइल इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्री झाली. मार्केटमध्ये नेहेमी एकाचा फायदा तर दुसऱ्याचा तोटा होतो. सरकारने सवलत दिल्यामुळे विमान कम्पन्यांचा फायदा होईल म्हणून जेट एअरवेज आणि इंडिगो यांचे शेअर वाढले.

ICICI बँकेच्या चेअरमन आणि CEO चंदा कोचर यांनी ICICI ग्रुपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि बँकेने तो स्वीकारला . त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची चेअरमन आणि CEO म्हणून ५ वर्षांसाठी नेमणूक झाली. त्यामुळे ICICI बँक. ICICI लोम्बार्ड हे शेअर वाढले.

श्रीराम ट्रान्सपोर्ट ने SVL च्या Rs ६५० कोटींच्या NCD साठी गॅरंटी दिली होती. यावर बरेच वादळ उठले होते. ही केस खरे म्हणजे जून २०१५ ची आहे. ही गॅरंटी आज कंपनीने रद्द केली

IFC ( इंटरनॅशनॅशल फायनान्स कॉर्पोरेशन) नी पुंज लॉईड या कंपनीच्या विरोधात इंसोल्वन्सी याचिका दाखल केली.

L &T ला ONGC कडून Rs ११७४० कोटींची ऑर्डर मिळाली.

टाटा मोटर्सच्या लँड रोव्हर विक्रीचे आकडे चांगले आले तर जॅग्वारची विक्री कमी झाली.

विशेष लक्षवेधी

  • L &T च्या शेअर BUY बॅकची रेकॉर्ड डेट १५ ऑक्टोबर २०१८ असून BUY BACK प्राईस प्रती शेअर Rs १४७५ केली आहे. माझ्या ब्लॉगवरील पोस्ट नंबर ५८ वाचा यात आपल्याला शेअर BUY BACK विषयी संपूर्ण माहिती मिळेल – https://wp.me/pa5o7Y-hB
  • NLC ची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी९ ऑक्टोबर २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे.
    लक्ष्मी विलास बँकेच्या बॉण्ड्स चे रेटिंग ‘CARE’ या रेटिंग एजन्सीने कमी केले.

वेध उद्याचा

  • NSE आणि BSE मध्ये ११ ऑक्टोबर २०१८ पासून ‘MOSER BAER’ या कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सस्पेंडेड राहील. कारण या कंपनीविरुद्ध लिक्विडेशन प्रक्रिया सुरु झाली आहे.
  • बंधन बँक १० ऑक्टोबर २०१८ रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.
  • टी सी एस आपले दुसर्या तिमाहीचे निकाल ११ऑक्टोबर रोजी जाहीर करेल
  • टाटा स्पॉन्ज, HUL, कर्नाटक बँक यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहीर होईल.
  • उद्या RBI एकंदर परिस्थिती बघता ०.२५ % रेट वाढवण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५१६९ NSE निर्देशांक निफ्टी १०५९९ आणि बँक निफ्टी २४८१९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.