आजचं मार्केट – ०५ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०५ ऑक्टोबर २०१८

आज ब्रेंट क्रूड US $ ८५ प्रती बॅरेल, US $निर्देशांक ९५.८५, रुपया US $१= Rs ७४ वर गेला. आज बर्याच दिवसापासून गर्जत असलेली RBI ची पॉलिसी आली.RBI ने या पॉलिसीमध्ये CALIBRATED TIGHTENING STANCE घेतला. RBIने रेपो रेट ६.५०% रिव्हर्स रेपो रेट ६.२५% CRR ४% या मध्ये कोणताही बदल केला नाही. महागाईचा दर ४% राहील ग्रोथ ७.४% राहील. विदेशी मुद्राभांडार समाधानकारक आहे. खरीप हंगाम चांगला जाण्याची शक्यता आहे. असा खुलासा RBI ने केला. मार्केट तज्ञाच्या मते रेट वाढवला असता तर कर्ज महाग झाले असते, ग्रोथवर विपरीत परिणाम झाला असता त्यामुळे योग्य निर्णय RBI ने घेतला आहे पण मार्केटने मात्र आपले उपोषण चालूच ठेवले असेच म्हणावे लागेल.

मार्केटला RBI हा निर्णय पसंत पडला नाही असे खेदाने म्हणावे लागते. कारण RBI ची पॉलिसी जाहीर झाल्यावर सेन्सेक्स जवळ जवळ १००० पाईंट कोसळले. किंवा पुढील विक्री करण्यासाठी मार्केट RBI च्या निर्णयाची वाट पाहत होते, RBI चा निर्णय झाल्यानंतर १०० ते १५० पाईंट मार्केट सुधारले पण त्या सुधारण्यामध्ये तेवढा जोर किंवा गती दिसली नाही हे दिसताच आणि त्याच वेळेला रुपयाने US $१=Rs ७४ ची पातळी गाठताक्षणी मार्केटमधले लोक घाबरले आणि पुन्हा विक्री सुरु झाली. रुपयांची घसरण थांबवायला RBI असमर्थ दिसते असे लोकांना वाटले असावे. किंवा २५ बेसिस पाईंट रेट नक्की वाढेल कदाचित त्यापेक्षाही जास्त म्हणजेच ५० बेसिस पाईंट्स रेट वाढण्याची शक्यता मार्केटने गृहीत धरली होती आणि त्यानुसार पोझिशन घेतली असावी.

१४-३० वाजता RBI ची पॉलिसी येते त्यानंतर १ च तास असतो त्यामुळे कोणताही विचार न करता होणारे नुकसान टाळावे असा विचार लोकांनी केला असावा. किंवा सरकारने RBI ला त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेऊ नका असे सुचविले का ? अशी कुजबुज मार्केटमध्ये होती. त्यातच निवडणुका होईपर्यंत ऑइल आणि गॅस क्षेत्रातील कंपन्यांनी दर वाढवू नयेत असे निर्देश दिले.म्हणजेच सरकार दुटप्पी धोरण अवलंबत आहे असे मार्केटला वाटले. एका बाजूने सरकार सांगते की आम्ही निर्बंध काढून टाकले आहेत कमर्शियल तत्वावर सर्व कंपन्या काम करू शकतील आणि दुसऱ्या बाजूने मात्र या कंपन्यांवर दबाव आणण्याचे काम चालू आहे.याचा परीणाम या कंपन्यांच्या ऑपरेटिंग मार्जिनवर आणि प्रॉफिटवर होईल आणि खरे चित्र स्पष्ट होणार नाही असे वाटल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सर्वात जास्ती कोसळले. कालच याचा अनुभव लोकांनी घेतला. या सर्व कंपन्यांना पेट्रोल/डिझेलचे दर Rs १ प्रती लिटर कमी करावेत असे सुचवले. Rs १ ची कपात Rs १लाख कोटी खातो असे कोणी म्हटल्यास विश्वास बसणार नाही. पण या Rs १च्या कपातीमुळे Rs १ लाख कोटीची मार्केट कॅप नष्ट झाली.

एल आय सी ने IDBI साठी Rs ६१.७३ प्रती शेअरची ओपन ऑफर आणली. एल आय सी IDBI मधील २६% स्टेक आणि २०४ कोटी शेअर्स खरेदी करणार आहे. IDBI ने एल आय सी ला प्रेफरन्स शेअर्सची अलॉटमेंट केल्यामुळे IDBI मधील एल आय सी चा स्टिक ७.९८% वरून १४.८९% पर्यंत वाढला. माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात या विषयी सविस्तर माहिती दिली आहे ती वाचा. – https://store.self-publish.in/products/market-aani-me

झायडस कॅडीलाच्या अहमदाबाद युनिटची तपासणी USFDA ने केली होती. त्यात त्यांना क्लीन चिट मिळाली.
सन फार्माच्या हलोल प्लाण्टला क्लीन चिट मिळाली.

GAIL त्यांचा मार्केटिंग व्यवसाय वेगळा काढून त्याची नवीन सबसिडीअरी करणार आहे. योग्य वेळेला या सबसिडीअरीचे लिस्टिंग केले जाईल.

विशेष लक्षवेधी

गोवा कार्बन या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक होता. कंपनी प्रॉफिटमधून लॉसमध्ये गेली. ICICI बँकेच्या चार्टचा अभ्यास केला असता ‘बुलिश एनगलफिंग पॅटर्न’ तयार झाला होता. सहा दिवसाच्या कॅण्डल्स एनगल्फ होतील एवढी तेजीची कॅण्डल ४ ऑक्टोबर २०१८ रोजी तयार झाली. व्हॉल्युम ही भरपूर होते.त्यानुसार हा शेअर तेजीत असायला हवा होता BSE वर हा शेअर Rs ३१६ वर ओपन झाला Rs ३२१ पर्यंत गेला आणि नंतर मार्केट बरोबरीनी Rs २९८ पर्यंत कोसळला म्हणजेच एवढा मजबूत चार्ट पॅटर्न असूनही मूलभूत गोष्टी जर खराब असतील तर चार्टनुसार घेतलेले निर्णय बरोबर येतीलच असे नाही.

 

वेध उद्याचा

मार्केट ओव्हरसोल्ड आहे बदललेल्या निवडणुकीच्या वातावरणात साखरेची गोडी अधिक वाढेल असे वाटते. पुढील आठवड्यात ज्या कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्स कडे लक्ष ठेवावे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४३७६ NSE निर्देशांक निफ्टी १०३१६ आणि बँक निफ्टी २४४४३ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे .. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ०५ ऑक्टोबर २०१८

 1. Karan Desai

  Chaan Mahiti milate aaplyakadun,

  Mi ek Manager padavar karyarat aahe SBI cap securities madhe, Sadhya mi Kolhapur ani Goa location pahato..sarv mahit amachya customer lonkaparyant Roz pohchavato….

  Reply
  1. surendraphatak

   Thanks. I hope you share the information with acknowledgement to the original author and a reference to our blog

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.