आजचं मार्केट – ०८ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०८ ऑक्टोबर २०१८

आज US $ निर्देशांक ९५.९१, रुपया US # १=Rs ७४.०६ आणि क्रूड US $८३ प्रती बॅरल होते. खरे पाहता क्रूड US $८६ प्रती बॅरल वरून US $८३ प्रती बॅरल एवढे कमी झाले याचा परिणाम रुपया आणि US $ यांच्यामधील विनिमय दरावर दिसला नाही सुरुवातीला विनिमय दर US $१=Rs ७३.७३ होता. हा सुधारायला पाहिजे होता. पण सुधारण्याच्या ऐवजी घसरला आणि त्याने US $१=Rs ७४ ची पातळीही ओलांडली. म्हणजेच कुठेतरी ‘WEAKNESS’ आहे हे जाणवते. गेल्या आठवड्यात निफ्टी जेवढा पडला तेवढा गेल्या दशकामध्ये एकाच आठवड्यात कधीही पडला नव्हता. USA मध्ये १० वर्षाचे बॉण्ड यिल्ड ३.२३३ % पर्यंत वाढले. त्यामुळे USA चे मार्केटसुद्धा कोसळले. इराणवर जे निर्बंध लादले आहेत त्यामध्ये थोडीशी सूट मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०१८ साठीच्या क्रूडसाठीच्या ऑर्डर्स सरकारने दिल्या आहेत. म्हणजेच मार्केट ढासळण्यासाठी कारणे जास्त आहेत पण मार्केट सुधारण्यासाठी संधी कमी उपलब्ध आहेत.

यावेळचा ऑक्टोबर महिना तपमानाच्या दृष्टीने खूपच तापदायक असेल असा अंदाज आहे. जर मार्केटचा मूड बदलला तर वोल्टास, ब्ल्यू स्टार यासारखे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. कारण उन्हाळ्यामुळे ए सी,फ्रिज, फॅन्स आदींसाठीची मागणी वाढेल भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

पुढील महिन्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि याचे निकाल ११ डिसेंबर २०१८ रोजी लागणार आहेत. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात आम्ही मद्यार्क बंदी करू असा उल्लेख नाही. निवडणुकीच्या कालावधीत मद्यार्काला मागणी वाढते हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेअर्स मार्केट सुधारल्यावर सुधारतील. आपण माझ्या ब्लॉगवरील ब्लॉग नंबर ४० आणि ४१ ‘मार्केटमध्ये विंडो शॉपिंग’ वाचा. भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

केरळमधील पूर परिस्थिती सावरत असताना अफोर्डेबल हौसिंग क्षेत्राला चांगली मागणी येत आहे. परिणामी साऊथमधल्या रीअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्या चांगल्या परफॉर्म करत आहेत. शोभाचे विक्रीचे आकडे चांगले आले. आणि प्रेस्टिज इस्टेट चे विक्रीचे आकडे चांगले येतील .भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

येस बँकेचे प्रमोटर श्री राणा कपूर आणि मधू कपूर आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करणार आहेत. नवीन MD &CEO चा शोध घेण्यासाठी बँकेने एक समिती नेमली आहे. तर कोटक महिंद्रा बँकेने प्रमोटर्सचा स्टेक कमी करण्यासाठी मुदतवाढ मागितली. ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे असे वाटल्याने हा शेअर वाढला. भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

कोल इंडिया कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहे. हा बोनस गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.५०% जास्त असेल. Rs ६०५०० कोटी या बोनससाठी खर्च केले जातील. ही बातमी आल्यावर शेअर पडला. NTPC च्या तालचेर प्लाण्टला पर्यावरणाची मंजुरी मिळाली. हा प्लांट १३२० MV चा आहे आणि Rs ९८०० कोटी यात गुंतवलेले आहेत.

विशेष लक्षवेधी

  • टाटा एलॅक्सीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. वरवर पाहता निकाल चांगला दिसत असला तरी मार्जिनमध्ये सुधारणा नाही आणि अन्य आयचा समावेश आहे. जर ही अन्य आय नसती तर कंपनीचा निकाल सर्वसाधारणच म्हणावा लागेल. टाटा एलेक्सीच्या निकालांकडे पाहता IT क्षेत्रातील कंपन्यांच्या निकालांचा अंदाज येईल अशी मार्केटची अटकळ होती. त्यामुळे IT क्षेत्रातील इतर कंपन्यांचे शेअर्स पडले.भाग्यश्री फाटक www.marketaanime.com
  • आवास फायनांशियल्सचे आज लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ८२१ ला दिला होता तो Rs ७५८ ला लिस्टिंग झाला आणि दिवसभर पडतच होता. भाग्यश्री फाटक www.marketaanime.com
  • तांत्रिक विश्लेषण मार्केट लोअर टॉप आणि लोअर बॉटम करत आहे. हे ‘HOLLLOW’ मार्केट आहे. बेअर्सच्या मगर मिठीत आहे. एक ऑक्टोबर २०१८ ला मार्केट थोडेसे तेजीत होते. २ तारखेला मार्केटला सुट्टी होती. ३,४,५ ऑक्टोबर २०१८ या दिवशी मार्केटने मंदीचा कहर केला आणि स्ट्रॉंग डाउनटर्नमध्ये मार्केट आहे असे दिसले ‘थ्री ब्लॅक क्रोज’ हा मंदीचा पॅटर्न तयार झाला. ६ आणि ७ ऑक्टोबरला सुट्टी होती. ८ ऑक्टोबरला हॅमर सारखा पॅटर्न तयार झाला आहे. हॅमर पॅटर्नचा लो निफ्टी १०१९८ आहे. याचा अर्थ १०१९८ पर्यंत मार्केट पडल्यानंतर अचानक खरेदी आली आणि सेलर्स चा प्रभाव नष्ट झाला. म्हणजेच मंदीवर जोरदार प्रहार झाला असे हा पॅटर्न दर्शवतो. पॅटर्नचा हाय निफ्टी १०३४८ आहे. जर मार्केटमधील घडामोडिंमध्ये निफ्टी १०१९८ ची पातळी तुटली नाही तर निफ्टी १०५०० ते १०५५० एवढी पूल बॅक रॅली येऊ शकते. पण ही रिलीफ रॅली असेल. असाच पॅटर्न २२ मे २०१८ ला थ्री ब्लॅक क्रोज आणि २८ मे २०१८ थ्री बॅक क्रोज आणि थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार झाला होता हे तुम्ही २२मे आणि २८ मे २०१८च्या लेखात वाचू शकता. भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

 

वेध उद्याचा

  • कोची शिपयार्ड या कंपनीने शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग १७ ऑक्टोबर २०१८ बोलावली आहे. BUY बॅक या कॉर्पोरेट एक्शनविषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.
  • BNP पारिबास आपला SBI लाईफ मधील २२% स्टेक विकणार आहे.
  • HUL या कंपनीने DOVE बेबी मसाज ऑइल बाजारात आणले आहे. भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४४७४ NSE निर्देशांक निफ्टी १०३४८ आणि बँक निफ्टी २४६१८ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे .. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.