आजचं मार्केट – ०९ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०९ ऑक्टोबर २०१८

करंसीचे हाल आणि रुपयाची चाल’ विचारत विचारत मार्केटला सुरुवात होते. क्रूड आणि करन्सी या दोन गोष्टींवर सध्या मार्केट आधारलेले आहे. व्याज दराच्या भीतीला RBI ने निदान तीन महिने तरी पूर्ण विराम लावला आहे. मार्केट उघडले तेव्हा रुपया US $१= Rs ७३.८७.तर क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरल या स्तरावर होते. पण मार्केट संपता संपता रुपया US $१=Rs ७४.३५ तर क्रूड US $८४.८८ प्रती बॅरल या स्तरावर पोहोचले.

काल सर्वांनी सरकारला निवेदन दिले की सणावाराचा सीझन असल्यामुळे कर्जाची मागणी आहे पण पात्र व्यक्तीस कर्ज देण्यासाठी पैसा उपलब्ध होत नाही आहे. तर हा पैसा सरकारने NHB, NABARD, RBI या सर्वांच्या सहकार्याने उभा करावा नाहीतर अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सरकारने सल्लामसलत करून रिफायनान्सिंगची मर्यादा वाढवली NHB ने ही मर्यादा Rs २४००० कोटींवरून Rs ३०००० कोटी केली. यामुळे आज तरी DHFL इंडिया बुल्स हाऊसिंग हे शेअर्स तेजीत होते.

IMF ने GLOBAL GDP चे अनुमान कमी केले. व्याजाचा दर वाढत असल्यामुळे व्याजाची रक्कम वाढते आहे म्हणून कर्जाची रक्कम कमी करावी लागेल, सबसिडी कमी करावी लागेल, GST ची कक्षा वाढवावी लागेल आणि क्रूडचा दर वाढतो आहे हे ध्यानात घ्यावे लागेल. जर आंतरराष्ट्रीय व्यापारातले अडथळे असेच चालू राहिले किंवा वाढले तर जगात आर्थिक मंदीचे प्रमाण वाढेल. याचा परिणाम भारतात हळू हळू तर चीनवर जास्त प्रमाणात होईल.

आजचा मोठा अपघात म्हणजे टाटा मोटर्स ! या कंपनीच्या JLR चे आकडे आले. विक्री १२.३% ने कमी झाली. चीनमधील मागणी कमी झाली असे कंपनीने कारण दिले. कंपनीच्या फायद्यामध्ये चीन मधील विक्रीचा २५% वाटा असतो. चीनमधून होणारी विक्री ४२% ने कमी झाली म्हणून एकूण विक्रीवर परिणाम झाला. यामुळे शेअर ७ते ८ वर्षाच्य किमान पातळीवर पोहोचला. यामुळे १५ दिवसांसाठी प्लांट बंद करणार आहे.तरीही कामगारांचे पगार चालू राहतील असे कंपनीने सांगितले. यामुळे टाटा मोटर्स चा DVR ही पडला. या दोन्ही शेअर्स मधील गळती थांबताना दिसत नाही.

M&M ने फियाटच्या डिझाईनच्या संदर्भात USA च्या कोर्टात तक्रार दाखल केली होती. पण USA तील कोर्टाने कोणतीही स्थगिती दिली नाही. आता M &M USITC कडे तक्रार दाखल करणार आहे

ब्राझीलच्या चलनात आलेल्या मजबूतीमुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखरेच्या किमती वाढत आहेत. ‘RAW SUGAR ‘चा भाव वाढतो आहे. सरकार इथेनॉल निर्मिती आणि ब्लेंडींगला उत्तेजन देत आहे. त्यामुळे साखर उत्पादक क्षेत्रातील कंपन्या तेजीत होता त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशातील साखर उत्पादक कंपन्या तेजीत होत्या .

आज DR रेड्डीज आणि अल्केम लॅब यांना डायबिटीजवरच्या औषधासाठी तर सन फार्माला त्वचा रोगावरील औषधासाठी USFDA कडून मंजुरी मिळाली.

UK च्या नॉर्थ महासागरामध्ये अबन ऑफशोअर US $ ७.५कोटी खर्च करून २ ब्लॉक्स खरेदी करणार आहे.

पुढील दोन वर्षात एल आय सी प्रमाणेच पोस्ट DEPT सुद्धा वेगळी विमा कंपनी उघडेल.

अजंता फार्माला माऊथ वॉशचे औषध बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी मंजुरी मिळाली.

विशेष लक्षवेधी

वेध उद्याचा

  • गार्डन रिच शिपबिल्डींग या सरकारी कंपनीचे उद्या लिस्टिंग आहे.
  • उद्या हिरोमोटो कॉर्प या कंपनीचे दुसर्या तिमाहीचे निकाल आहेत .
  • क्रूड वाढत असल्यामुळे पाईप कंपन्यांना फायदा होतो. महाराष्ट्र सीमलेस आणि जिंदाल SAW यांचा फायदा होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४२९९ NSE निर्देशांक निफ्टी १०३०१ आणि बँक निफ्टी २४५२७ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे .. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ०९ ऑक्टोबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.