आजचं मार्केट – १० ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० ऑक्टोबर २०१८

आज क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरल, रुपया US $१= Rs.७४.१३ होते.  नवरात्राला सुरुवात झाली आणि बुल्सनी सुद्धा कंबर कसलीय त्याच बरोबर सरकारचीही मदत मिळाली. त्यामुळे मार्केटच्या रथाचे खचलेले चाक वर काढण्यात यश आले. वेगवेगळ्या बातम्यांचा खुराक मार्केटला दिवसभर मिळत राहिला.सौदी अरेबियाकडून ४०लाख बॅरेल्स जादा क्रूडचा पुरवठा केला जाईल. देशाच्या पूर्व किनार्यावर येऊ घातलेल्या ‘तितली’ नावाच्या वादळाच्या बातमीकडे मार्केटने दुर्लक्ष केले. त्याच बरोबर सरकार ONGC कडून Rs ३५०० कोटी ते Rs ४५०० कोटी आणि ऑइल इंडिया कडून Rs १५०० कोटी ते Rs २५०० कोटी घेणार आहे, या बातमीचाही मार्केटवर नकारात्मक परिणाम दिसला नाही उलटपक्षी हे दोन्ही शेअर्स वधारले आणि दिवसभरात सेन्सेक्स ५०० पाईंट वाढले.

फायनान्स कंपन्यांचे बॉण्ड्स SBI खरेदी करेल याची मर्यादा Rs १५००० कोटींवरून Rs ४५००० कोटी केली. यामुळे NBFC चे शेअर्स तेजीत होते.

यावर्षी रुपयाचे १४% अवमूल्यन झाल्यामुळं आणि लिक्विडिटीच्या व्यवस्थापनासाठी ११ ऑक्टोबरला Rs १२००० कोटी ओपन मार्केटच्या माध्यमातून टाकले जातील असे RBI ने सांगितले. यामुळे रुपया वधारला.

ATF वरील एकसाईज ड्युटी कमी करण्यासाठी सरकारने निवडणूक आयोगाला कळवले. ५ राज्यात निवडणुका असल्यामुळे कोणत्याही गोष्टीची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी लागते. हे कळल्यामुळे विमान कंपन्यांचे शेअर्स सुधारले.

स्टील पाईप्स वरची ANTI DUMPING ड्युटी सहा महिन्यापर्यंत वाढवली. याचा फायदा जिंदाल SAW, कलहस्ती पाईप्स आणि महाराष्ट्र सिमलेस या कंपन्यांना होईल.

भारताकडे US $ चा ओघ सुरु राहावा म्हणून सेबी काही नियम ढिले करणार आहे. FPI साठी फास्ट ट्रॅक रजिस्ट्रेशनची व्यवस्था केली जाणार आहे. या लोकांना वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करता येईल.

NCLTने सुद्धा IL &FS साठी काही सुविधा दिल्या. त्यांच्या कोणत्याही सबसिडीअरीमधील डायरेक्टर्स किंवा कर्मचारी बदलता येतील. विनीत नायर आता नवे मॅनेजिंग डायरेक्टर होतील. आणि ७५ वर्षांची मर्यादा विनीत नायरना लागू होणार नाही.

BOFA ML यांनी ग्राफाइट इलेक्ट्रोड बदल चांगले मत व्यक्त केले. याला पुढील वर्षभर चांगली मागणी असेल असे सांगितले. HEG या कंपनीचे टार्गेट दुप्पट केले. यामुळे HEG आणि ग्रॅफाइट इंडिया या दोन्ही शेअर्सला वरचे सर्किट लागले.

विशेष लक्षवेधी

 • PNB ने PNB हौसिंग मधील स्टेक विकण्याची योजना तूर्तास रद्द केली.
 • बंधन बँकेचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. NII, NIM, नेट प्रॉफिट, CASA रेशियो हे सगळे वाढले. ग्रॉस NPA आणि नेट NPA मध्ये नगण्य वाढ झाली. प्रमोटर्सचा स्टेक कमी करण्यासाठीची योजना बँकेने RBI कडे पाठवली आहे.
  इंडिया बुल्स व्हेंचरचा दुसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला पण शेअर मात्र लोअर सर्किट मधून हलला नाही. हे या शेअर्ससाठी १२ वे लोअर सर्किट होते.
 • झी एनटरटेनमेन्टचा दुसर्या तिमाहीचा निकाल गेल्या तिमाही पेक्षा चांगला पण गेल्या वर्षातील दुसर्या तिमाहीच्या निकालापेक्षा कमी होता.
 • साखर आणि पेपर क्षेत्रामध्ये हल्ली तेजी असते. कारण इथॅनॉलला दिले जाणारे उतेजन आणि चीनमध्ये बंद झालेले पल्पचे उत्पादन होय. यामध्ये ज्या कंपन्या निर्यात करतात त्यांचे शेअर्स अधिक तेजीत दिसतात. उदा ओरिएंट पेपर ही कंपनी टिश्यू पेपर कास्टिक सोडा याचे उत्पादन करते. टिश्यू पेपरला मागणी खूप आहे.
 • SBI आता आधार कार्डाशिवाय खाते उघडेल पण ज्यांनी आधी आधार कार्ड दिलेले आहे त्यांचे आधार कार्ड डीलिंक करणार नाही असे सांगितले.
 • आज सर्व IT क्षेत्रातले कंपन्यांमध्ये मात्र मंदी होती.
 • गार्डन रीच शिपबिल्डींग आणि इंजिनिअरिंग या कंपनीचे लिस्टिंग Rs १०४ वर झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ११८ला दिला होता.
 • टाटा मोटर्सने टिगॊर हे आपले नवीन मॉडेल बाजारात आणले.

वेध उदयाचा

 • NLC चा शेअर BUY BACK प्रती शेअर Rs ८८ या भावाने जाहीर झाला.
 • नाल्कोची शेअर BUY बॅकवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग १२ ऑक्टोबर २०१८ रोजी आहे.
 • गेल्या शुक्रवारी रिलीज झालेला ‘अंधाधुद’ हा सिनेमा चांगला चालल्यामुळे PVR आणि आयनॉक्सचे शेअर वाढले.
 • हिरोमोटो या कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४७६० NSE निर्देशांक निफ्टी १०४६० आणि बँक निफ्टी २५३२१ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे .. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १० ऑक्टोबर २०१८

 1. Dushyant Chavan

  Namaskar Madam Mi tumcha darroj blog wachto te khupach Chan astat. Tumhi khup sadhya shabdat market madhil purn divasachi mandani karata khupach Chan. Asech tumche nehmi blog wachyala milude. Dhanywad.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.