आजचं मार्केट – ११ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ ऑक्टोबर २०१८

घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं’ अशी मार्केटची अवस्था झाली. क्रूड, करन्सी, बॉण्ड यिल्ड,लिक्विडीटी, IL&FS चा गोंधळ या सगळ्या अडचणींनी कंटाळलेले शेअर मार्केट जागतिक अडचणींचा भार सहन करू शकले नाही. काल सर्व जगभरातील शेअरमार्केट भरपूर मंदीत होते. त्यामुळे मार्केटमधील वातावरण गढूळले.

USA मधील शेअर मार्केट पडल्यामुळे IT क्षेत्रातल्या कंपन्या पडायला सुरुवात झाली. आणि मार्केट उघडतानाच १००० (सेन्सेक्स) पाईंट कोसळले. भारतापुरते बोलायचे झाल्यास आज क्रूड दिवसभर US $८२ प्रती बॅरल या भावाच्या खाली होते. पण याचा फायदा मार्केटला झाला नाही. काही काळ मार्केट ४०० (सेन्सेक्स) सुधारले पण दिवस संपता संपता कोसळले.
सरकार साखर उद्योगासाठी Rs १०,००० कोटी सॉफ्ट लोन देण्याच्या विचारात आहे. हे लोन १ वर्षांसाठी असेल आणि याचे व्याज सरकार भरेल. त्यामुळे काही काळ साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स आज तेजीत होते.

ATF वरील एकसाईज ड्युटी १४% वरून ११% करण्याचे सरकारने मान्य केले. यामुळे एव्हिएशन क्षेत्रातील कंपन्या तेजीत होत्या.

सरकार आता पुन्हा ‘जुने ते सोने’ या म्हणीप्रमाणे बार्टर सिस्टीम वापरण्याच्या विचारात आहे. भारत इराण आणि व्हेनिझुएला यांच्याकडून बार्टर सिस्टीम वर आधारित क्रूड आयात करणार आहे.

US $ चा प्रवाह सतत येत राहावा म्हणून सरकार परदेशातून भारतात US $ पाठवण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करण्याच्या विचारात आहे. आता भारतात US $ पाठवायचे असल्यास सुमारे ५% चार्ज आकारला जातो. तसेच सोने आणि हिरे यांची तस्करी रोखण्यासाठी सरकार कडक उपाय योजण्याच्या विचारात आहे.

सरकारने असे जाहीर केले की आता OMC आणि ऑइल प्रोड्युसिंग कंपन्यांवर आणखी सबसिडीचा भार टाकणार नाही. त्यामुळे IOC, HPCL, BPCL आणि ऑइल इंडिया तसेच ONGC, HOEC, GAIL या ऑइल आणि गॅस क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले.

दिलीप बिल्डकॉनला ऑर्डर्स भरपूर प्रमाणात मिळत आहेत. पण ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करण्यासाठी तेवढाच कॅश फ्लो आवश्यक असतो. त्यामुळे आजकाल भेल , दिलीप बिल्डकॉन यांना भरपूर ऑर्डर्स मिळाल्या तरी त्याचा परिणाम शेअरच्या किमतीत दिसत नाही.

IOC ही सिटी गॅस प्रोजेक्टमध्ये Rs ५४६३ कोटी तर एथॅनॉलच्या प्रकल्पामध्ये Rs ५२० कोटी गुंतवणार आहे.

विशेष लक्षवेधी

  • आशापुरा इंटिमेट फॅशन LTD हा शेअर Rs ५१२ वरून Rs १७१ झाला.या शेअरला रोज लोअर सर्किट लागते. अतिशय कमी व्हॉल्युममध्ये लोअर सर्किट लागत आहे. या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षद ठक्कर हे हरवले आहेत अशी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या कंपनीचा २८.७२ % स्टेक IIFL सिक्युरिटीज कडे तारण म्हणून ठेवला आहे. हे शेअर IIFL सेक्युरिटीजने ACQUIRE केले आहेत या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्यामुळे बर्याच संस्थागत निवेशक आणि म्युच्युअल फंड यांना फटका बसला आहे.
  • टी सी एस चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला.फायदा Rs ७९०१ कोटी झाला म्हणजेच ७.६ % ने गेल्या तिमाहीपेक्षा वाढला. EBIT Rs ८५७८ कोटीवरून Rs ९७७१ कोटी झाले. म्हणजेच EBIT मध्ये १४% वाढ झाली. उत्पन्न Rs ३४२६१ कोटींवरून Rs ३६८५४ कोटी एवढे झाले. अन्य उत्पन्न Rs ७३० कोटी झाले. ATTRITION १०.९% BFSI सेगमेंट ग्रोथ ६.१ % झाली. EBIT मार्जिन २६.५% होते. टी सी एस ने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
  • M &M ने कॅस्ट्रॉल इंडियाबरोबर करार केला.

वेध उद्याचा

  • उद्यापासून म्हणजे १२ ऑक्टोबर २०१८ पासून NSE वर कमोडिटीमध्ये वायदा सुरु होत आहे. सुरुवातीला सोने आणि चांदीमध्ये वायदा सुरु केला जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४००१ NSE निर्देशांक निफ्टी १०२३४ आणि बँक निफ्टी २४७८३ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे .. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.