आजचं मार्केट – १२ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ ऑक्टोबर २०१८

मार्केट मध्ये तेजी मंदीचे एक सुंदर नाट्य गुरुवार आणि शुक्रवारी पाहायला मिळाले. हिंदीत याचे वर्णन ‘कल बुखार आज बहार’ असे करावे लागेल. आज क्रूड US $ ८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७३.७० च्या आसपास होता. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी आली. पण कालची ८०० पाईंट्स ची मंदी आणि आजची ८०० पाईंट्सची तेजी यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना हा काय प्रकार आहे असे वाटले.

OPEC च्या अध्यक्षांनी क्रूडच्या पुरवठ्याबद्दल खात्री दिली. घाबरण्यासारखी कोणतीही स्थिती नाही असे सांगितले. मार्केटमध्ये योग्य तेवढा पुरवठा आम्ही करू. आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीने सुद्धा जागतिक पातळीवर क्रूडसाठी मागणी कमी होईल असे सांगितले . यामुळे क्रूड मधील सट्टेबाजी थांबली आणि क्रूडच्या भावातील वाढ कमी झाली.
अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्टला सरकार बर्याच सवलती देणार आहे त्यामुळे पॉवर क्षेत्रातले शेअर वाढले.

बँक ऑफ बरोडाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO P जयकुमार यांना सरकारने एक वर्षांची मुदतवाढ दिली.
स्पाईस जेट ७३७ MAX ही २०५ विमाने खरेदी करणार आहे. या विमानामध्ये ब्रॉडबँड इंटरनेटची सुविधा असेल. या विमानांना इंधन कमी लागेल, इंजिनीरिंग मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे. सेल आणि लीज या मोहिमेअंतर्गत स्पाईस जेट ही विमाने खरेदी करत आहे

ITC सन फीस्ट मिल्कशेक, फ्रोझन स्नॅक, आशीर्वाद बासमती तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.
यावेळी मार्केट एवढ्या जोरात पडले की गेल्या ८ महिन्यातील सगळे प्रॉफिट नाहीसे झाले. ४२० शेअर्सच्या किमती ३१ जानेवारी २०१८ला असलेल्या किमतीपेक्षा कमी आहेत. त्यामुळे आता जर हे शेअर्स विकले तर LTCG (लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स) भरण्याची गरज राहणार नाही. हे लॉसेस कॅपिटल गेन्सच्या AGAINST SET OFF करता येतील. उलटपक्षी पुढील ८ वित्तीय वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड होतील आपण आपल्या आयकर सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

विशेष लक्षवेधी

  • HUL चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल खूप चांगला आला. कंपनीने Rs ९ प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला. (कंसातील आकडे अनुमानाचे आहेत) उत्पन्न Rs ९२३४ कोटी(Rs ९३१० कोटी) प्रॉफिट Rs १५२५ कोटी ( Rs १४५२ कोटी), व्हॉल्युम ग्रोथ १०% , मार्जिन २१.९% ( २१.७%) , EBITDA Rs २०१९ कोटी (Rs २०२० कोटी) Rs ३५ कोटी एकमुश्त घाटा. मार्जिन आणि व्हॉल्युम वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत असे व्यवस्थापनाने सांगितले.
  • टाटा स्पॉंज आणि कर्नाटक बँक यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल समाधानकारक आले. पण काल मार्केट संपल्यानंतर लागलेला टी सी एस चा रिझल्ट मार्केटच्या पसंतीस उतरला नाही. त्यामुळे आज IT क्षेत्रातले बहुतेक शेअर पडले.
    मोबाईल बनवण्यासाठी लागणार्या विविध स्पेअर पार्टसवर इम्पोर्ट ड्युटी लावली. याचा परिणाम D -लिंक, स्मार्ट लिंक आणि तेजस नेटवर्क यांच्यावर होईल.
  • चीनमध्ये बॉयलर आणि तंबाखू यांची निर्यात वाढेल. याचा फायदा ITC, गॉडफ्रे फिलिप्स आणि थरमॅक्स या सारख्या कंपन्यांना होईल. USA आणि चीन यांच्यातील ट्रेंड वॉरचा फायदा भारत उठवू शकतो. नवीन उत्पादने भारत चीनला निर्यात करू शकेल
  • सप्टेंबर २०१८ साठी CPI ३.७७%(अनुमान ४.१६%) आणि ऑगस्ट २०१८ साठी IIP ४.३% (अनुमान ३.३%) . याचा अर्थ महागाई कमी झाली आणि उत्पादन वाढलं.

वेध उद्याचा

  • सोमवारी इंडसइंड बँक, इंडिया बुल्स हौसिंग, आणि D -मार्ट आणि AU स्मॉल फायनान्स बँक यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.मंगळवारी तारीख १६ ऑक्टोबर २०१८ रोजी हिरोमोटो कॉर्पचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.
  • DCB बँकेच्या दुसर्या तिमाहीचे निकाल बुधवार तारीख १७ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहीर होतील.

मार्केट जोरात वाढत असताना काही शेअर्स पडत असतात तर मार्केट जोरात पडत असताना काही शेअर्स वाढत असतात त्यामागच्या कारणांचा शोध घ्यावा आणि त्याकारणांवर आधारित आपला निर्णय घ्यावा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४७३३ NSE निर्देशांक निफ्टी १०४७२ आणि बँक निफ्टी २५३९५ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे .. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.