आजचं मार्केट – १५ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ ऑक्टोबर २०१८

क्रूड US $८१ ते ८२ प्रती बॅरल या मर्यादेत राहिले. रुपया US $१=Rs ७३.८० आणि US $ निर्देशांक ९५.३४ होता.
क्रूड वाढायला लागल्यावर आणि रुपयाचे अवमूल्यन व्हायला लागल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. साखरउत्पादकांना इथॅनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी उत्तेजन देत आहे. तांदूळ,गहू, बटाटे या सगळ्यापासून इथेनॉल बनवा असे सांगत आहे. थेट उसापासून जे इथॅनॉल बनेल त्याचा दर जास्त दिला जाणार आहे. आणि साखर ही राजकीय वस्तू आहे. इथेनॉल ब्लेंडींगची मर्यादा १०% वरून २०% करणार आहे. ATF मध्ये सुद्धा इथेनॉलचे ब्लेंडींग करावे असे सुचवले आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या आयात निर्यातीवरील ड्युटी हटवण्यास सांगितली आहे. आणि अशी ड्युटी हटवण्याचा निर्णय छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या राज्यांनी घेतला आहे. इथेनॉल प्लांट लावण्यासाठी सरकार साखर उद्योगाला कर्ज देणार आहे, साखर उद्योगाने Rs ७०००० कोटींच्या बँक गॅरंटीची गरज सांगितली आहे. निवडणुका होईपर्यंत तरी म्हणजे पांच ते सहा महिने हा सेक्टर तेजीतच राहील.

CESC चे RESTRUCTURING होणार आहे याची बातमी १५ मे २०१७ ते १९ मे २०१७ या काळासाठीच्या ‘GST ची वरात शेअरमार्केटच्या दारात’ या साप्ताहिक समालोचनात कॉर्पोरेट एक्शन या विभागात दिली आहे. त्यावेळी ‘फोर वे RESTRUCTURING ‘करायचे असे ठरले होते. आता यात बदल करून ‘थ्री वे RESTRUCTURING’ करणार असे समजते. ३१ ऑक्टोबर २०१८ ही रेकॉर्ड डेट ठरवली. पण हा बदल मार्केटला फारसा आवडला नाही. त्यामुळे शेअर Rs ५० ने पडला.

ऑगस्ट २०१८ मध्ये USFDA ने सन फार्माच्या हलोल येथील प्लांटची तपासणी केली होती. त्यामध्ये ६ त्रुटी दाखवल्या होत्या. आता पुन्हा १२ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत दुसऱ्यांदा तपासणी करण्यात येणार आहे.

आज चहा कॉफी आणि साखर याचे शेअर्स तेजीत होते. चहा कॉफीच्या किमतीत वाढ होत आहे आणि साखर उद्योगाला सरकारची मदत मिळत आहे.

ITC ने आशीर्वाद आटा ६%, आशीर्वाद घी १०.५% आणि चार्मिस कोल्ड क्रीम २१% असे भाव वाढवले.

IOC, ONGC, OIL INDIA Rs १०००० कोटींचे शेअर्स BUY BACK करणार आहेत. STC आणि MMTC याचे मर्जर होण्याआधी कर्जाचे RESTRUCTURING केले जाईल.आणि नॉनकोअर ASSETS विकले जातील.

विशेष लक्षवेधी

  • D-MART, जय भारत मारुती, AU स्मॉल फायनांस बँक यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले. झी लर्न, ट्रायडंट यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. इंडसइंड बँकेचे निकाल ठीक आले.
  • सप्टेंबर २०१८ साठी WPI ५.१३% ( ऑगस्ट २०१८ मध्ये ४.१३%) होता.

वेध उद्याचा

  • उद्या इन्फोसिस, फेडरल बँक, आणि हिरोमोटो, J &K बँक, शक्ती पंप्स यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल १६ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहीर होतील. ACC, DCB, हॅवेल्स, माईंडट्री, MPHASIS, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल १७ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहीर होतील.
  • गुजरात गॅस या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची स्टॉक स्प्लिटवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
  • मी आपल्याला ८ ऑक्टोबरच्या दैनिक ब्लॉगमध्ये चार्ट देऊन सांगितले होते की निफ्टी १०५०० ते १०५५० अशी पूल बॅक रॅली मिळेल. आज निफ्टी १०५०० च्या वर क्लोज झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४८६५ NSE निर्देशांक निफ्टी १०५१३ आणि बँक निफ्टी २५३८८ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.