आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर २०१८

निफ्टी हायर हाय आणि हायर लो फॉर्म करत आहे. आणि VIX कमी होतो आहे. VIX ८.० ३% ने कमी होऊन १७.३७ झाला. बँक निफ्टीने आपली २५५०० ही महत्वाची पातळी पार केली. रुपया १७ पैसे वाढून US $ १= Rs ७३.६० च्या आसपास राहिला.

आज क्रूड US $ ८० प्रती बॅरल च्या आसपास राहिले. रुपयाचे अवमूल्यन होणे थांबले. इंडियाची ट्रेड डेफिसिट ५ महिन्याच्या किमान स्तरावर म्हणजेच US $ १३.९८ बिलियन एवढे राहिले. सप्टेंबर २०१८ या महिन्यासाठी निर्यात US $ २७.९५ बिलियन तर आयात US $ ४१.९ बिलियन झाली.निर्यात २.१५% ने कमी झाली तर आयात १०.४५ % ने वाढली. RBI ने सांगितले की आम्ही Rs १२००० कोटी ओपन मार्केट ऑपरेशनसाठी वापरू. या कारणांमुळे रुपया वधारला. USA मधील क्रूडचा साठा वाढत आहे हे लक्षात येताच क्रूडचा दरही US $८० प्रती बॅरल झाला. यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

रिलायन्स इंडस्ट्रीज हाथवे आणि डेन नेटवर्क यामध्ये कंट्रोलिंग स्टेक घेणार आहे अशी खबर असल्यामुळे या तिन्ही कंपन्यांचे शेअर्स वाढले.

प्लायवूडवाल्या कंपन्यांनी गेल्या एकदोन महिन्यांच्या कालावधीमध्ये दोन वेळा किमती वाढवल्या. दुसऱ्यांदा ७% ते ८% ने किमती वाढवल्या. यामुळे सेंच्युरी प्लाय, आर्चिड प्लाय, आणि युनि प्लाय हे शेअर वाढले.

कुंभमेळ्यासाठी सरकार जय्यत तयारी करत आहे . कुंभमेळ्याच्या आधी नवीन टर्मिनल्स तयार होतील आणि मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली, बंगलोर या ठिकाणांहून अलाहाबाद आणि परत अशी विमानसेवा उपलब्ध होईल. इंडिगो याचा फायदा उठवण्याच्या तयारीत आहे.

फ्युचर ग्रुप अमेझॉन बरोबर करार करेल अशी बातमी येताच फ्युचर ग्रुपचे सर्व शेअर्स वाढले.

विशेष लक्षवेधी

आज इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.
या तिमाहीसाठी इन्फोसिसला Rs ४११०/- कोटी (Rs ४१३८ कोटी ), उत्पन्न Rs २०६०९ कोटी (Rs २०५५३ कोटी), ऑपरेटिंग मार्जिन २३.७५% ( २४.२५%), EBIT Rs ४८९४ कोटी (Rs ५००५ कोटी) US $ उत्पन्न २९२ कोटी ( २८९ कोटी) होते. कंसातील आकडे अनुमानाचे आहेत. पुढील वर्षाच्या आपल्या ऑपरेटिंग मार्जिन गायडन्स २२%ते २४% कायम ठेवला
डिजिटल बिझिनेस १३.५% ने वाढला. नवीन २ बिलियन US $ ची डील मिळाले. कंपनीने Rs ७ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीने अनुमानाप्रमाणे निकाल दिल्यामुळे शेअर्सच्या किमतीवर अनुकूल परिणाम दिसण्याची शक्यता आहे

फेडरल बँक आणि साऊथ इंडियन बँक यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल समाधानकारक आले. त्यामुळे या क्षेत्रातल्या इतर बँकांच्या शेअरवर तसेच बँक निफ्टीवर अनुकूल परिणाम झाला.

हिरोमोटो कॉर्प या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न Rs ९०९१ कोटी (Rs ८९६३ कोटी) प्रॉफिट Rs ९७६ कोटी ( Rs ९२० कोटी) EBITDA Rs १३७९ कोटी ( Rs १३७२ कोटी) तर मार्जिन १५.२% (१५.३%) राहिले.  कंसातील आकडे अनुमानाचे आहेत. हे निकाल गेल्या वर्षातील दुसऱ्या तिमाहीपेक्षा कमी असले तरी अपेक्षेनुसार आहेत.

NLC ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Rs ८८ प्रती शेअर या भावाने शेअर BUY बॅक करणार आहे. NLC या BUY बॅक साठी Rs १२४८ कोटी खर्च करणार आहे.

वेध उद्याचा

  • मार्केट गुरुवारी १८ ऑक्टोबर २०१८ रोजी दसऱ्यानिमित्त बंद राहील.
  • १९ ऑक्टोबर २०१८ रोजी SBI लाईफ आणि अल्ट्राटेक सिमेंट आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५१६२ NSE निर्देशांक निफ्टी १०५८४ आणि बँक निफ्टी २५५८९ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.