आजचं मार्केट – १७ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ ऑक्टोबर २०१८

आज क्रूड US $८१ प्रती बॅरल ते US $ ८२ प्रती बॅरल या दरम्यान होते. पण आज क्रूडचा भाव वाढत होता. रुपया US $१ =Rs ७३.४० ते Rs ७३.६० या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९५.१७ होते. क्रूड वाढत होते आणि रुपया घसरत होता या दोन्ही गोष्टी मार्केटच्या दृष्टीने अनुकूल नव्हत्या. त्यामुळे मार्केट घसरले. त्यातच सुपरटेक या रिअल इस्टेट डेव्हलपरने डिफॉल्ट केला ज्या ज्या हाऊसिंग फायनान्सिंग कंपन्यांनी त्यांना कर्ज देण्याची शक्यता होती त्या कंपन्यांचे शेअर्स लोकांनी विकून टाकले. यामुळे इंडिया बुल्स, रेपको होम फायनान्स, DHFL, एल आय सी हौसिंग हे शेअर्स पडले.

प्रथम KRBL च्या ऑडिटर्सने SSAY अँड असोसिएट्स यांनी राजीनामा दिला अशी खबर आली. त्यानंतर लगेचच त्यांनी राजीनामा दिला नसून कंपनीने शेअर होल्डर्सच्या सुचनेप्रमाणे ऑडिटर्सना हटवले असं सांगण्यात आले. त्यामुळे प्रथम शेअर पडला आणि नंतर सुधारला. WALKER CHANDIOK & CO यांना KRBL ऑडिटर म्हणून नेमणार आहेत.

सोलर पॅनेलसाठी क्वालिटी स्टॅंडर्ड लागू करण्याची डेडलाईन सरकारने १ जानेवारी २०१९ पर्यंत वाढवली. इंपोर्टेड सोलर पॅनेल्सवर BIS मार्क असणे जरुरीचे आहे.

CESC या पॉवर सेक्टर मध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीने आपल्या डीमर्जर प्लॅन मध्ये काही बदल केले. या कंपनीचे तीन लिस्टेड कंपन्यात रूपांतर केले जाईल. या डीमर्जरसाठी ३१ ऑक्टोबर २०१८ ही रेकॉर्ड डेट ठरवण्यात आली. नवीन एंटिटीजचे लिस्टिंग डिसेंबर २०१८ मध्ये होईल. CESC ही ऊर्जा उत्पादन आणि वितरण या क्षेत्रात असेल. RP – SG रिटेल या कंपनीकडे स्पेन्सर आणि FMCG हे बिझिनेस असतील. तर RP -SG बिझिनेस प्रोसेस ही कंपनी IT, QUEST मॉल, रिअल इस्टेट आणि इतर नॉन रिटेल आणि नॉन पॉवर बिझिनेस यांच्या कडे बघेल. WBSERC ( वेस्ट बंगाल राज्य इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी ऑथॉरिटी) कडून ४ ways डीमर्जरला मंजुरी मिळायला वेळ लागत असल्यामुळे आम्ही हा बदल केला असे कंपनीकडून सांगण्यात आले. CESC च्या शेअर होल्डर्स कडे १० शेअर्स असतील त्यांना RP-SG रिटेल चे ६ आणि RP-SG बिझिनेस प्रोसेसचे २ शेअर मिळतील. CESC चे शेअर त्यांच्याजवळच राहतील. पॉवर युनिटचे डीमर्जर करण्याचा विचार चालू आहे.

NTPC पॉवर क्षेत्रातील काही NPA युनिट खरेदी करण्यासाठी योजना बनवत आहे.

M &M ने इंजिन पुरवठा करण्यासाठी फोर्डबरोबर करार केला.

विशेष लक्षवेधी

 • ACC या सिमेंट क्षेत्रातील कंपनीचे या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीचे उत्पन्न, फायदा, EBITDA गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत वाढले तर ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले.
 • हॅवेल्स या कंपनीचे उत्पन्न वाढले तर ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले.
 • माईंड ट्री या IT क्षेत्रातील कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. कंपनीने Rs ३ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • NIIT टेक या IT क्षेत्रातील कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. J &K बँकेचे निकाल ठीक आले.
 • कोची शिपयार्ड ही कंपनी प्रती शेअर Rs ४५५ या भावाने ४३.९० लाख शेअर BUY BACK करेल. कंपनी यासाठी Rs २०० कोटी खर्च करेल.

वेध उद्याचा

 • उद्या दसऱ्याच्या निमित्ताने मार्केटला सुट्टी आहे.
 • RBL बँक, SETCO, टाटा मेटॅलिक्स यांचे तिमाही निकाल २३ ऑक्टोबर २०१८ रोजी आणि २४ ऑक्टोबर २०१८ ला बजाज ऑटोचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील .
 • द्वारिकेश शुगर या कंपनीचा शेअर T टू T या गटात टाकला.
 • RBI ने येस बँकेला १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आपला CEO आणि MD नेमण्यासाठी मुदत दिली.
 • ICICI बँकेचे MD आणि CEO संदीप बक्षी यांची नेमणूक RBI ने तीन वर्षासाठीच केली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी पांच वर्षांसाठी शिफारस केली होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४७७९ NSE निर्देशांक निफ्टी १०४५३ आणि बँक निफ्टी २५१८८ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १७ ऑक्टोबर २०१८

 1. Sunil Amle

  Madam, Happy Dussehra to u all.
  How operating Margin affects share price, what precautions should be taken while trading?

  Reply
  1. surendraphatak

   हे सर्व माझ्या मार्केट आणि मी या पुस्तकात आणि ब्लॉग मध्ये दिलेले आहे…

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.