आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०१८

आज मार्केट तेजीत उघडले पण मार्केटने टिकाव धरला नाही. लोकांची मनःस्थिती खराब असल्यामुळे कंपनीचे तिमाही निकाल चांगले आले किंवा वाईट आले तरी प्रतिक्रियेमध्ये फरक पडत नव्हता. आज खरे पाहता क्रूड US $ ७९.६५ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७३.५० होता. तरीही मार्केटमधील तेजी टिकली नाही याचे आश्चर्य वाटले.

मार्केटचा रस्ता आता इतका खराब झाला आहे की अपघात होणे काही नवीन नाही. सेक्टर मधील एक शेअर पडू लागला की त्या सेक्टरमधील सर्व शेअर्स पडू लागतात.पर्सिस्टंटचे दुसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक असल्यामुळे शेअर पडला. रिअल्टी सेक्टर मधील सगळे शेअर्स पडले.

आज मंदीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुढाकार होता. इंडस इंड बँक, RBL बँक, AU स्मॉल फायनान्स बँक हे सर्व शेअर्स पडत होते. कन्साई नेरोलॅक या कम्पनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल खराब आला त्यामुळे ट्रेडर्स बिथरले.

उद्या एशियन पेंट्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल कसे येतील कोणास ठाऊक अशा भीतीने एशियन पेन्ट्सच्या शेअरमध्येही विक्री सुरु झाली. HDFC बँकेचा दुसर्या तिमाहीचा निकाल सगळ्यांना आवडला ही काय ती जमेची बाजू !

इंडिया बुल्स हाउसींग फायनान्स हा शेअर तेजीत होता.या कंपनीचा ओक नॉर्थ होल्डिंग या UK बेस्ड कम्पनीमध्ये १८.७% स्टेक आहे . हा स्टेक महिन्याभराच्या कालावधीत एका प्रायव्हेट म्युच्युअल फंडाला विकणार आहे. अडानी इंटरप्राइयझेस मधील तेजी मात्र आजही सुरु होती.

विशेष लक्षवेधी

 • भेल गुरुवारी शेअर BUY बॅक वर विचार करणार आहे.
 • अलेम्बिक फार्मा , ज्युबिलंट लाईफ, CCL प्रॉडक्ट्स, आयनॉक्स लेजर, हिंदुस्थान झिंक, ओरिएंटल हॉटेल यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले
 • कन्साई नेरोलॅक, कल्याणी स्टील, आणि GSK फार्मा यांचे निकाल असमाधानकारक आले.
 • युनिकेम लॅबला पिथमपूर आणि रोहा या प्लांटसाठी USFDA कडून EIR मिळाला

वेध उद्याचा

 • हिंदुस्थान झिंक या कंपनीने Rs २० प्रती शेअर स्पेशल अंतरिम लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४१३४ NSE निर्देशांक निफ्टी १०२४५ आणि बँक निफ्टी २५०७८ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०१८

 1. C k parab

  नमस्कार, धन्यवाद शेअर बाजार मराठी त अवतरला,वातावरण निर्मिती अतीशय महत्वाची , हळूहळू शेअर बाजार सीरीयल नाटकात,होऊन गली गलित शेअर राजे , शेअर शाखा शेअर मंडळ निर्माण होतील हे साकार होण्यात आपला सिंहांचा वाटा असेल आपली माहिती खडानखडा मुद्येसुर उपयुक्त आहे

  Reply
 2. विठ्ठल चौधरी

  नमस्कार ,शेअर बाजार मराठीतून आवश्यक होते. विशेष सदरात उद्या च्या दिवसात लक्षात ठेवण्यासारखे स्टाॉक हे सदर सुरू करावे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.