आजचं मार्केट – २३ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ ऑक्टोबर २०१८

आज मार्केटची गोष्ट मागील पानावरुन पुढे जशीच्या तशी सुरू झाली. चांगल्या बातमीकडे होणारे दुर्लक्ष आणि वाईट बातमीचा होणारा जबरदस्त परिणाम त्यातून निर्माण होणारी आणि गडद होत जाणारी निराशा. या छायेखालीच मार्केट दिवसभर राहिले. दिवसाच्या शेवटी शेवटी रुपया सुधारला तो US $१= Rs ७३.५५ झाला. क्रूडचा भाव घसरला तो US $७८.८५ प्रती बॅरल झाला. सरतेशेवटी तर US $ ७८.३८ प्रती बॅरल झाला. सौदी अरेबिया क्रूडचा पुरवठा वाढवेल असे चिन्ह दिसू लागले. या सर्व गोष्टी अनुकूल असल्यामुळे दिवस अखेरीस मार्केट थोडेसे सुधारले.

लक्ष्मी विलास बँकेमध्ये ब्लॅकस्टोन, BAIN कॅपिटल आणि TPG कॅपिटल मॅनेजमेंट, बेअरिंग प्रायव्हेट इक्विटी एशिया, होमग्रोन गांजा कॅपिटल हे कंट्रोलिंग स्टेक घेणार आहेत म्हणून या बँकेचा शेअर वाढला. कंपनीच्या शेअर्ससाठी नॉनबाईंडिंग ऑफर Rs १४० ते Rs १६० प्रती शेअर या दरम्यान आल्या आहेत. या बँकेच्या शेअरची CMP सोमवार तारीख २२ ऑक्टोबर २०१८ रोजी Rs ९० होती.

आज पुन्हा IL& FS ने आज Rs २४७ कोटींचा डिफाल्ट केला.

नेस्लेने GST कमी केलेल्याचा फायदा ग्राहकापर्यंत पोहोचवला नाही आणि याचा Rs १०० कोटी फायदा उठवला आहे असे DGAP (डायरेकटोरेट जनरल ऑफ अँटी प्रॉफीटिअरींग) चे म्हणणे आहे त्यांनी तसा रिपोर्ट NAA (नॅशनल अँटीप्रॉफीटिअरींग ऑथॉरिटी)ला सादर केला आहे. व्यवस्थापनाने अशी माहिती दिली की हे Rs १०० कोटी कन्झ्युमर वेल्फेअर फंडात जमा केले आहेत कारण काही बाबतीत GST मुळे मिळालेला फायदा ग्राहकांना पास ऑन करणे शक्य नव्हते. यामुळे शेअर Rs ३०० पडला.

इंडसइंड बँकेने IL &FS ला Rs १००००० कोटींचे लोन दिले आहे. IL &FS चा येऊ घातलेला राईट्स इशू लांबणीवर पडला आहे. यामुळे या लोनची वसुली होणे लांबणीवर पडले. तसेच या लोनसाठी इंडसइंड बँकेला Rs २७५ कोटीची प्रोव्हिजन करावी लागली. इंडसइंड बँकेने असे सांगितले की आमचा रिअल्टी सेक्टरला लोन बुकच्या ४% एक्स्पोजर आहे आणि त्यातील कोणतेही लोन ओव्हरड्यू झालेले नाही. या बँकेचा JP ग्रुप आणि आम्रपाली ग्रुपला एक्स्पोजर नाही हे स्पष्टीकरण आल्यावर शेअरमध्ये थोडी सुधारणा झाली

RBL बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.प्रॉफिट, NII वाढले,लोन बुक वाढले पण NPA ही वाढले. तसेच RBL बँकेने अशी माहिती दिली की त्यांचे NBFC ला Rs २६२३ कोटींचे एक्स्पोजर आहे. जेट एअरवेजमध्ये मात्र एक्स्पोजर नाही.
एस्सार स्टील ही NCLT मध्ये गेलेली कंपनी आर्सेलर मित्तल यांच्या हवाली होणार असे दिसते. त्यामुळे ज्या ज्या बँकांचे पैसे या कंपनीमध्ये अडकले आहेत.ते थोड्या प्रमाणात वसूल होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे उदा. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक

विशेष लक्षवेधी

  • ओबेराय रिअल्टी, बजाज फायनान्स, इंडियन मेटल, SPIC, टी व्ही एस मोटर्स, HCL टेक, HDFC स्टॅंडर्ड ( नेट प्रीमियम उत्पन्न आणि प्रॉफिट वाढले) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. HCL टेकने त्यांचा Rs ४००० कोटींचा BUY बॅक पुरा झाला.
  • बजाज फिनसर्वचे निकाल ठीक आले.
  • एशियन पेंट्स, राणे ब्रेक्स,अडानी पोर्ट्स ( त्यांना Rs ५७० कोटी फॉरेक्स लॉसेस झाले) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल खराब आले.
  • लक्ष्मी मशीन वर्क्स चा निकाल ठीक आला. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने २६६६६६ शेअर्स कमाल Rs ६००० प्रती शेअर या किमतीने ‘शेअर बाय बॅक’ करण्यास मंजुरी दिली. शेअरहोल्डर्सना हा BUY बॅक पसंत पडला नाही शेअर Rs ४०० पडला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३८४७ NSE निर्देशांक निफ्टी १०१४६ आणि बँक निफ्टी २४९७२ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.