आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०१८

आज देवालाच दया आली असे म्हणावे लागेल. आज रुपया वधारला ( US $१=Rs ७३.१७) क्रूडचा भावही कमी झाला ( US $७६.५० प्रती बॅरल) यामुळे सरकारला थोडी उसंत मिळाली. मार्केटच्या दृष्टीने VIX ११% ने कमी झाला.आज VIX १८.८८ होता म्हणजेच मार्केटच्या दृष्टीने सर्व गोष्टी अनुकूल होत्या. यामुळे सुरुवातीला मार्केट तेजीत उघडले. आणि पुट/कॉल रेशियो १.०१ झाला.

पण ही तेजी टिकली नाही. USA मधील वातावरण गढूळ झाल्यामुळे सर्व IT क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पडले. बेअर्स मार्केटवर ताबा मिळवत आहेत असे दिसू लागले. पुन्हा नवीन ‘लो’च्या स्तरावर मार्केट जाते असे वाटत असताना बुल्सनी तयारीनिशी लढा दिला आणि मार्केट सावरले.

एप्रील २०२० पासून BS-VI वाहनेच विकली जातील असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. पूर्वी इथेनॉल ब्लेंडींग ५% केले जात होते आता ते १०%पर्यंत केले जाईल. पण जर क्रूडचा दर US $ ६० प्रती बॅरलपर्यंत खाली आला तर इथेनॉल ब्लेंडींगचे आकर्षण संपुष्टात येईल.

सरकारने पेट कोकचे नियम सोपे केले. ५लाख टन एवढ्या पेट कोक आयातीला परवानगी दिली. अल्युमिनियम कंपन्यांना बर्याच सवलती दिल्या. याचा फायदा हिंदाल्को, नाल्को, वेदांता यांना होईल.

संकटाची मालिका काही थांबत नाही असे दिसते. गुजरात कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र येथे बर्याच ठिकाणी दुष्काळ जाहीर केला. कितीही चांगला पाऊस झाला तरी १५% ते १८ % ठिकाणी पाऊस पोहोचत नाही किंवा पावसाचे प्रमाण नगण्य राहते असे हवामान खात्याने स्पष्टीकरण दिले.

टी सी एस ने इंटेल बरोबर ब्लॉकचेन सोल्यूशनसाठी करार केला.

सेबीने BSE ला ओमान क्रूड वायद्यासाठी परवानगी दिली.

विशेष लक्षवेधी

  • बजाज फिनसर्व, अंबुजा, रॅलीज, सास्केन,भारती इंफ्राटेल, विप्रो, इंडीगो,राणे इंजिन यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.
  • झेनसार, टाटा मेटॅलिक्स, TTK प्रेस्टिज, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक,करून वैश्य बँक , ज्युबिलंट फूड, ज्योती लॅब, रॅडिको खैतान ओबेराय रिअल्टी, मुथूट कॅपिटल यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

वेध उद्याचा

  • उद्या ऑक्टोबर एक्स्पायरी आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०३३ NSE निर्देशांक निफ्टी १०२२४ आणि बँक निफ्टी २५०६४ वर
बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.