आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०१८

आज क्रूड US $ ७६.४५ प्रती बॅरल रुपया US $१= Rs ७३.२० आणि US $ निर्देशांक ९६.३० होता. आज मार्केटवर एक्स्पायरीचा परिणाम होता. आणि मार्केटमध्ये निराशाही फार मोठ्या प्रमाणावर होती. कोणताही निकाल ऐकला तरी व्यवस्थापनाची कॉमेंटरी ऐकू या आणि मगच आपला निर्णय ठरवू या. कारण निकाल येतो ते घडून गेलेल्या काळाचे दर्शन असते, आणि मार्केटमध्ये खरेदी ही पुढील काळासाठी होत असते. आज बर्याच कंपन्यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल लागले. निकाल चांगले येऊनही शेअरचे भाव वाढले नाहीत पण निकाल वाईट आल्यानंतर मात्र शेअरचे भाव आपटले. मारुती सुझुकीचा दुसर्या तिमाहीचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला. पण व्यवस्थापनाने व्याजाचे दर आणि क्रूडची किंमत याबद्दल चिंता व्यक्त केली.

टाटा स्टिल टाटा स्पॉन्जच्या मार्फत उषा मार्टिनचा स्टील बिझिनेस खरेदी करणार आहे.

टाटा स्पॉन्ज Rs १८०० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे आणि या राईट्स इशुच्या प्रोसिड्स मधून उषा मार्टिन चा बिझिनेस खरेदी करणार आहे.

SKF (इंडिया) लिमिटेड Rs २१०० प्रती शेअर या भावाने शेअर्स BUY बॅक करणार आहे. १९ लाख शेअर्स BUY बॅक करणार आहे.

विशेष लक्षवेधी

  • झायडस वेलनेस यांनी HEINZ ही क्रॉफ्ट हेन्झ या कंपनीची सबसिडीअरी Rs ४५९६ कोटी रुपयांना खरेदी केली. यामुळे कंपनीला आपल्या वेलनेस बिझिनेसचा विस्तार करता येईल. या खरेदीमुळे झायडस वेलनेस ही कंपनी कॉम्प्लान, ग्लुकॉन D, नायसिल, सम्प्रीती घी ह्या सुप्रस्थापित ब्रँडचे मालक होतील. यामध्ये कॅडिलाचा हिस्सा नाममात्र आहे. त्यामुळे झायडस चा शेअर वाढला आणि कॅडिलाचा शेअर वाढला नाही. हेइन्झ ही DEBT फ्री कंपनी आहे आणि या असिक्विझिशनसाठी झायडस या कंपनीला कर्ज काढावे लागणार नाही.
  • L &T फायनान्स कंपनीने Rs १८०० कोटी IL&FS ला कर्ज दिले आहे तसेच सुपरटेक या कंपनीला Rs ८०० कोटी कर्ज दिले आहे. त्यामुळे या कंपनीचा शेअर पडला.
  • PVR, NIIT, बोडल केमिकल्स, पिरामल इंटरप्रायझेस, प्राज इंडस्ट्रीज, महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्स, वरुण बिव्हरेजीस, मास्टेक, YES बँक ( NII, लोन पोर्टफोलिओ वाढला, एक NPA Rs ४४५ कोटींचा विकला) आणि JSW स्टील यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
  • लक्ष्मी विलास बँक , डिश टी व्ही, राणे मद्रास, V -गार्ड इंडस्ट्रीज, हेक्झावेअर,भारती एअरटेल( प्रॉफिटYOY बेसिसवर ६५% कमी झाले असले तरी मार्केटच्या अनुमानापेक्षा बरे निकाल आले) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
  • BHEL ही कंपनी Rs ८६ प्रती शेअर या भावाने १८.९३ कोटी शेअर्स BUY बॅक करणार आहे. भेल यासाठी Rs १६२८ कोटी खर्च करेल. या BUY बॅक ची रेकॉर्ड डेट ६ नोव्हेंबर २०१८ ही ठरवली आहे.
  • आज क्रूडची किंमत कमी होत असल्यामुळे IOC, BPCL, HPCL या ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे आणि जेट एअरवेज आणि इंडिगो या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये(जरी या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक असले तरी) खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३६९० NSE निर्देशांक निफ्टी १०१२४ आणि बँक निफ्टी २४८१७ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.