आजचं मार्केट – २६ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ ऑक्टोबर २०१८

आज रुपया सुधारला (US $१ =Rs. ७३.२८ ) आणि क्रूडचा भाव US $७५.९५ प्रती बॅरल होता एवढी अनुकूल स्थिती असतानाही मार्केटचा मूड काही सुधारला नाही. मुलभूत गोष्टी सुधारत असतानाही निराशा वरचढ ठरली. एकदा मनःस्थिती खराब झाली की मार्केट सारासार विचार करण्याच्या स्थितीत राहत नाही हेच खरे. तेजीचाही नेहेमी अतिरेक आढळतो आणि मंदीचाही नेहेमी अतिरेक होतो. खरे पाहतां आज आलेले दुसर्या तिमाहीचे काही चांगले निकाल थोडासा सुखद गारवा देऊन गेले.

आज COC ने एस्सार स्टीलसाठीची आर्सेलर मित्तल या कंपनीची बीड मंजूर केली. एस्सार स्टीलला अनेक बँकांनी कर्ज दिले होते. हे कर्ज वसूल होईल असा एक आशेचा किरण बँकांना दिसू लागला. एस्सार स्टीलच्या प्रमोटर्सनी सांगितले की आम्ही आमच्यावर असलेलया Rs ५४७८९ कोटींच्या कर्जाची पूर्णपणे परतफेड करू. या कर्जामध्ये बँक ऑफ बरोडा Rs १३०० कोटी, HDFC बँक Rs १०० कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया Rs १३७०० कोटी, ICICI बँक Rs २५०० कोटी, PNB Rs ३००० कोटी, कॅनरा बँक Rs ३९०० कोटी, युनियन बँक Rs २२०० कोटी, कॉर्पोरेशन बँक Rs १७०० कोटी, एक्सिस बँक Rs १०० कोटी, बँक ऑफ इंडिया Rs २००० कोटी यांचा वाटा आहे. या केसमध्ये तीन प्रकारचे प्रश्न उद्भवतात. प्रमोटर्सकडे जर पैसे उपलब्ध होते तर त्यांनी NCLT मध्ये इंसॉल्व्हन्सी अर्ज जाऊन रेझोल्यूशन होऊन COC ने आर्सेलर मित्तलची बीड मंजूर होईपर्यंत वाट का पाहिली. तसेच त्यांनी आता एवढे पैसे कोठू उपलब्ध केले हा ही एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. जर ९०% कर्जदारांनी प्रमोटर्सच्या बीडला मान्यता दिली तर एस्सार स्टील ही कंपनी इंसॉल्व्हंसी मधून बाहेर येऊ शकेल.

सुप्रीम कोर्टाने न्यूमेटल या कंपनीला एस्सार स्टीलसाठी बीड करू देणार नाही असे सांगितल्यावर आता प्रमोटर स्वतः पुढे आले आहेत. यात एक कळीचा मुद्दा असा आहे की प्रमोटरची बीड जर बँकांनी स्वीकारली तर बँकांना फार थोडा हेअर कट घ्यावा लागेल. त्यामुळे कर्जदारांमध्ये फूट पडू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की रेझोल्यूशनची सर्व प्रक्रिया पुरी होऊन आर्सेलर मित्तलची बीड मान्य केल्यानंतर आता फ्रेश बीड विचारात घेतली जाऊ शकते कां ?  – बहुतेक बँकांनी सांगितले की आता हे शक्य होणार नाही. NCLT मध्ये रेझोल्यूशन पूर्ण करण्यासाठी २७० दिवसांची मुदत असते. पण आतापर्यंत या प्रकारच्या अर्जांना सरासरी ३२५ ते ३७० दिवस लागतात.

इक्विटास आणि उज्जीवन फायनान्स या कंपन्यांना RBI ने असे सांगितले की त्यांनी आपल्या स्मॉल फायनान्स बँकेचे (इक्विटासने २४ सप्टेंबर २०१९ पर्यंत आणि उज्जीवनने ३० जानेवारी २०२० पर्यंत) लिस्टिंग केले पाहिजे. RBIने असे सांगितले की स्माल फायनान्स बँकेचा कारभार सुरु झाल्यापासून ५ वर्षेपर्यंत प्रमोटर्सना त्यांचा स्टेक ४०% पर्यंत ठेवला पाहिजे. या दोन्ही कंपन्यांनी सांगितले की आम्ही RBI च्या सूचनांचे मुदतीच्या आत पूर्णपणे पालन करू. या दोन्ही शेअर्सला मार्केटमध्ये खूप मोठा हबका बसला.

विशेष लक्षवेधी

अतुल ऑटो, ITC , सुब्रोस, रेमन्ड, बायोकॉन, रुचिरा पेपर, गोदावरी इस्पात आणि पॉवर, हायडलबर्ग सिमेंट, DR रेड्डीज, श्रीराम ट्रान्सपोर्ट, M &M फायनान्सियल्स, UPL, BEL, कॅपिटल I st, किर्लोस्कर ऑइल, कोरोमंडल इंटरनॅशनल, IOB,सिएट यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

येस बँक ( या बँकेचे IL&FS ला Rs २५०० कोटींचे एक्स्पोजर आहे), HT मेडिया, ICICI बँक (५६% प्रॉफिट कमी झाले), कोलतेपाटील यांचे निकाल असमाधानकारक आले.

पनामा पेट्रोचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

NCLTने अरविंद फॅशन आणि अनुप इंजिनीअरिंगच्या डीमर्जरला परवानगी दिली. अरविंदच्या २७ शेअरमागे अनुप इंजिनीअरिंगचा एक शेअर मिळेल.

वेध उद्याचा

‘इस्मा'( इंडियन शुगर मिल्स असोसिएशन)ने सांगितले की साखरेचा उतारा कमी आल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होईल. ब्राझीलमध्येही साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीसाठी Rs ८ सवलत दिली आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये या वर्षात प्रथमच रॉ शुगर निर्यात केली जाणार आहे या आर्थीक वर्षात क्रूड, करन्सी आणि परदेशातील घडामोडी यापासून साखर उत्पादक कंपन्या दूर आहेत. निवडणुका, सणावाराचा सिझन असल्यामुळे या सेक्टरला प्राधान्य दिले आहे.

बर्याच कंपन्यांमध्ये प्रमोटर्स आपला स्टेक वाढवत आहेत. याची अनेक कारणे आहेत

(१) मार्केट पडत असल्यामुळे विविध कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात उपलब्ध आहेत. म्हणून प्रमोटर्स आपला स्टेक वाढवत आहेत.
(२) नजीकच्या भविष्यात कंपनीमध्ये काही सकारात्मक बदल अपेक्षित असतो
(३) होस्टाइल अक्विझिशनचा धोका संभवत असल्यास प्रमोटर्स आपला स्टेक वाढवत आहेत.

या कंपन्यांकडे आपण गुंतवणुकीच्या दृष्टीकोणातून लक्ष द्यावयास हरकत नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३३४९ NSE निर्देशांक निफ्टी १००३० आणि बँक निफ्टी २४४२१ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २६ ऑक्टोबर २०१८

  1. डॉ प्रदीप गाडगीळ

    सुंदर विश्लेषण साधी, सरळ, सोपी वाक्यरचना
    आभार .
    साईट माहीत नव्हती गूगल फीड मध्ये आल्यामुळे कळाली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.