आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०१८

आज ब्रेंट क्रूड US $ ७७.३८ ते ७६.६९ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ७३.६५ आणि US $ निर्देशांक ९६.८६ होता. या तिन्ही गोष्टीं मध्ये खूप चांगला किंवा खूप वाईट बदल आज दिसला नाही. काल मार्केटमध्ये (सेन्सेक्स मध्ये ) ७०० पाईंटची रॅली झाली होती हे लक्षात घेता आज मार्केट व्होलटाइल किंवा अस्थिर राहील हे उघड होते. त्यामुळे मार्केट सुरुवातीला तेजीत होते पण नंतर ही तेजी हळू हळू नाहीशी झाली.

अल्युमिनियमच्या असोसिएशनने सरकारला एक निवेदन दिले होते. USA आणि चीन यांच्यामध्ये चालू असलेल्या ट्रेड आणि टॅरिफ वॉरचा परिणाम आमच्या उद्योगाला सोसावा लागत आहे. भारतात अल्युमिनियम स्क्रॅप आणि हलक्या प्रतीच्या अल्युमिनियमचे डम्पिंग होत आहे. आणखी US $२५४ लाख एवढ्या रकमेची ड्युटी चीनी मालावर बसवावी अशा विचारात USA चे अध्यक्ष ट्रम्प आहेत. चिनी टेक उत्पादनाच्या आयातीवर USA ने बंदी घातली त्यामुळे असोसिएशनच्या मागणीनुसार सरकार अल्युमिनियमची आयात कोणकोणत्या मार्गाने कमी करता येईल यांच्यावर विचार करत आहे. (१) जास्तीतजास्त किती आयात करता येईल यावर मर्यादा घालावी (२) कोणत्या गुणवत्तेचे अल्युमिनियम आयात करता येईल ते ठरवावे (३) आयातीवर जी इम्पोर्ट ड्युटी लावली जाते ती २.५% वरून १०% करावी. यामुळे आज सुरुवातीलाच हिंदाल्को, नाल्को आणि वेदांता हे शेअर्स तेजीत होते पण हळू हळू तेजी नाहीशी झाली.

भारत आणि जपानमध्ये US $ ७५ बिलियनचा करन्सी स्वॅप समझोता झाला. यामुळे करन्सी आणि इंटरेस्ट रेट स्थिर राहण्यास मदत होईल.

CESC चे डी मर्जर झाल्यानंतर पॉवर आणि रिटेल व्यवसाय बाहेर पडले आणि उरलेल्या CESC चे पुन्हा आज Rs ६७० ला लिस्टिंग झाले. दिवसअखेरीस हा शेअर Rs ७१० होता.

कालच्याच ब्लॉगमध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ASM च्या यादीतून शेअर्स बाहेर पडले. त्यामुळे हे शेअर्स तेजीत होते.

श्रीराम ट्रान्सपोर्टने १५ ऑक्टोबरला जो NCD ( नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स) इशू ओपन केला तो जेमतेम ४३% भरला. त्यामुळे हा शेअर पडला.

जेट एअरवेज मधला २४% स्टेक ‘डेल्टा एअर’ घेणार आहेत.आणि काही प्रमाणात कॅपिटल इन्फ्युजन ही करणार आहे. हे कॅश डील होणार असून चागल्या प्रीमियमवर होणार आहे. त्यामुळे जेट एअरवेजचे कर्ज कमी होईल म्हणून जेट एअरवेज चा शेअर Rs ३० ने वाढला.

विशेष लक्षवेधी

  • ABB, नोसिल, ग्रॅन्युअल्स, जस्ट डायल, सुप्रीम इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, GTL, वेलस्पन, टेक महिंद्रा, JK टायर्स,मान इंडस्ट्रीज, चोलामंडलं फायनान्स, टॉरंट पॉवर यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले होते.
  • बँक ऑफ महाराष्ट्र, हिंद रेक्टिफायर, ह्या कंपन्या टर्नराउंड झाल्या.
  • देना बँक, IDFC बँक, सिम्फनी, टाटा टेली (महाराष्ट्र) यांचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उद्याचा

  • उद्या अदानी एंटरप्रायझेस, AIA इंजिनीरिंग, अजंता फार्मा, बलरामपूर चिनी, कॅनरा बँक, कोची शिपयार्डस, डाबर, एस्कॉर्टस, HEG, ल्युपिन, मॉईल, नवनीत एजुकेशन या कंपन्या आपले दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३८९१ NSE निर्देशांक निफ्टी १०१९८ बँक निफ्टी २४८०७ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.