आजचं मार्केट – ३१ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३१ ऑक्टोबर २०१८

आज क्रूड US $ ७६.३८ ते US $ ७६.७२ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ७३.८५ ते US $१= Rs ७४.०४ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९७.०३ होता.

आजचे मार्केट अफवा आणि बातम्या यांनी गजबजलेले होते. RBI आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचले. RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार अशी चर्चा सुरु झाली. पुस्तकातील कायदे आणि प्रत्यक्ष परिस्थिती आणि त्यावेळची गरज यामध्ये नेहेमीच वेगवेगळी मते असू शकतात. जसा पाऊस असेल तशी छत्री धरावी लागते. RBI आणि केंद्र सरकार यांच्यातील हे मतभेद चव्हाट्यावर येण्याची गरज नव्हती. याचा परिणाम रुपयाच्या विनिमय दरावर झाला आणि रुपया US $१=Rs ७४ पर्यंत घसरला. मार्केट २०० पाईंट पडले. RBI ACT च्या कलम ७ नुसार केंद्र सरकार काही बाबींवर RBI शी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतल्यावर जर संमती होऊ शकली नाही तर केंद्र सरकार RBI ला त्या बाबींवर विशिष्ट्य प्रकारची एक्शन घ्यावयाची ऑर्डर करू शकते. आणि RBI ला या ऑर्डर्सचे पालन करणे जरुरी असते. अशाप्रकारे केंद्र सरकारने पॉवर क्षेत्रातील NPA, RBI कॅपिटल फंडाचा बँक रिकॅपिटलायझेशनसाठी उपयोग, आणि SME साठी सवलती या तीन बाबींवर RBI शी चर्चा केली. वर्तमान मतभेद ११ बँकांना PCA च्या यादीतून काढून टाकणे किंवा त्यांना PCA च्या काही अटींमध्ये मध्ये सूट देणे तसेच PCA खालील बँकांची यादी वाढवणे या बाबतीत होते. यातील PCA च्या अटींमुळे बँकांच्या कर्ज देण्यावर बंधने आल्यामुळे अर्थव्यवस्थेला विशेषतः NBFC क्षेत्राला होणारा कर्जाचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे लिक्विडीटी कमी झाली होती.

जर संमती शेवटपर्यंत बनू शकली नाही आणि RBI ने सरकारच्या ऑर्डरप्रमाणे एक्शन घेतली नाही तर RBI ऍक्ट च्या ११व्या कलमानुसार केंद्र सरकार RBI च्या गव्हर्नरला बरखास्त करू शकते. अशा चिंतातुर अवस्थेत मार्केट असताना सरकारने RBI च्या स्वायत्ततेची ग्वाही दिली पण त्याचबरोबर RBI आणि केंद्र सरकार या दोघांनाही जनतेच्या हितासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असते असे सांगितले. यानंतर मार्केट सुधारायला सुरुवात झाली. ज्यांनी शॉर्टींग केले होते ते सापळ्यात सापडले आणि मार्केट जोरदार वाढले. ५५०पाईंट पर्यंत (सेन्सेक्स) मार्केटमध्ये तेजी झाली.

टाटा स्टील आणि थिसेन कृप या जर्मन कंपनीच्या जाईंट व्हेंचर ची चौकशी युरोपिअन युनियनने सुरु केली. त्यामुळे टाटा स्टीलचा शेअर पडला.

DR रेड्डीजच्या दुवाडा प्लांटच्या तपासणी दरम्यान USFDA ला ८ त्रुटी आढळल्या. म्हणजे २०१५ च्या तपासणेनंतर या प्लांटमध्ये काही सुधारणा झाल्या नाहीत असे USFDA ला आढळले.त्यामुळे DR रेड्डीज चा शेअर Rs १२५ ने पडला नंतर Rs ७५ ने सावरला.

आज जेट एअरवेजने लीज पेमेंटमध्ये डिफाल्ट केला म्हणून एअरक्राफ्ट लिजिंग कंपनीकडून नोटीस मिळाली म्हणून शेअर पडला.

PSU OMC कंपन्यांना केरोसीनवरील सबसिडीमुळे दुसऱ्या तिमाहीत Rs १६४० कोटी तोटा झाला. सरकारने असे जाहीर केले की हा तोटा सरकार सोसेल आणि OMC कंपन्यांना खालीलप्रमाणे सरकार रक्कम देईल. (१) BPCL Rs २५० कोटी (२) HPCL Rs २७० कोटी (३) IOC Rs १२५० कोटी. सरकारच्या या घोषणेनंतर हे तिन्ही शेअर्स वाढले.
रेडीको खेतान या कंपनीने आपल्या ‘रामपूर सिंगल माल्ट व्हिस्की’ चे उत्पादन मे २०१९ पासून वाढवणार आहे असे जाहीर केले. हा शेअर वाढला

विशेष लक्षवेधी

 • ओरिएंटल पेपर, बँक ऑफ बरोडा, एस्कॉर्टस,अदानी एंटरप्राइजेस, AIA इंजिनीअरिंग, अजंता फार्मा, बलरामपूर चीनी, कोचिन शिपयार्ड, ल्युपिन, डाबर, MOIL, GHCL, रिलायन्स निपोन, हेरिटेज फूड्स, गुजरात पिपावाव, नितीन स्पिंनर्स, लार्सन अँड टुब्रो,या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले
 • शारदा क्रॉपकेम, टिन प्लेट, स्ट्राइड्स फार्मा, डालमिया भारत, सिंडिकेट बँक, कॅस्ट्रॉल, वेदांता, टाटा मोटर्स यांचे निकाल असमाधानकारक आले.
 • BF युटिलिटीज आणि प्रिज्म जॉन्सन ह्या कंपन्या टर्न अराउंड झाल्या .

वेध उद्याचा

 • सरकारने आपल्या कोल इंडियामधील स्टेकपैकी ९ % स्टेक Rs २६६ प्रती शेअर या भावाने ऑफर फॉर सेल आणली आहे.( ‘ऑफर फॉर सेल’ या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे ) यापैकी २०% शेअर्स रिटेल इन्व्हेस्टरसाठी राखीव ठेवले आहे उद्या ही ऑफर रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील. रिटेल इन्वेस्टर्सना ५% डिस्कॉउंट असेल.
 • वेदांताने Rs १७ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • अंजना फार्माने Rs ९ अंतरींम लाभांश जाहीर केला.
 • उद्या मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक आहे. या बैठकीत कंपनी कायद्यातील काही सुधारणांवर आणि स्वतंत्र डायरेक्टर्सच्या मानधनावर विचार केला जाईल.
 • उद्या बर्गर पेंट्स , द्वारिकेश शुगर, हफक गोदरेज प्रॉपर्टीज, ग्राईंडवेल नॉर्टन, HDFC, ICRA, HPCL इंडिया ग्लायकोल, पराग मिल्क, मॅरिको, SRF, झुआरी आणि झुआरी ऍग्रो यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४४४२ NSE निर्देशांक निफ्टी १०३८६ आणि बँक निफ्टी २५१५३ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ३१ ऑक्टोबर २०१८

 1. Tanvi Mahadeshwar

  Dear Ma’am

  Need to understand distributions of shares due to various corporate actions and their settlement process. Request to provide contact details for the same.

  Reply
  1. surendraphatak

   Namaskar Tanvi, you got 2 option. All the explanation is provided in my book and I do also cover it in my course next batch of which is scheduled for 22nd to 25th November. You can buy the book from this website – https://store.self-publish.in/products/market-aani-me and you can find more information about the course here – https://marketaanime.com/2018/10/05/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%A8/

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.