Monthly Archives: October 2018

आजचं मार्केट – ०४ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०४ ऑक्टोबर २०१८

क्रूड आज US $ ८६.१४ प्रती बॅरल US$ निर्देशांक ९६.०८ आणि रुपया US $१ =७३.८० होते. मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निराशा पसरली आहे. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री चालू आहे. ऑटो विक्रीच्या आकड्यांनी या निराशेत भर घातली. त्यातच अर्थमंत्र्याच्या वार्ताहर परिषदेकडे डोळे लागले होते. सरकारने OMC (ऑइल मार्केटिंग कंपनी) साठी ECB (एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंग) विषयी नियम सोपे केले. ३ ते ५ वर्षांसाठी Rs १००० कोटींपर्यंत रक्कम BORROW करता येईल. अर्थमंत्र्यांनी एकसाईझ ड्युटी Rs १.५० कमी करू. असे सांगितले ऑइल मार्केटिंग कंपन्या किंमत Rs १ने कमी करतील आणि राज्य सरकारांना Rs २.५० VAT कमी करायला सांगितला. अशा रीतीने पेट्रोल /डिझेल ग्राहकांना Rs ५ चा फायदा होऊ शकेल. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात जेव्हा ग्राहकांचा फायदा होतो तेव्हा सरकारवर आणि कंपन्यांवर बोजा वाढतो. सरकार एकसाईझ ड्युटी कमी करणार असल्यामुळे सरकारवर Rs २१००० कोटींचा बोजा पडणार आहे. सरकारने ऑइल कंपन्यांना डिरेग्युलराइज केले होते. या कंपन्या व्यापारी तत्वावर निर्णय घेऊ शकत होत्या. त्यामुळे गुंतवणूक करणे सोपे जात असे. पण आजच्या सरकारच्या निर्णयामुळे सबसिडीचा बोजा लादला जाईल काय ? अशी भीती मार्केटला वाटली. क्रूड सारख्या मूलभूत गोष्टींसाठी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकातील (https://store.self-publish.in/products/market-aani-me) मूलभूत विश्लेषणाविषयी वाचा.

सरकारी कंपन्या, सरकारी बँका म्हणजे सरकारच्या हातातले खेळणे नव्हे काय ? असे वाटल्यामुळे शेवटच्या १५ मिनिटात ऑइल मार्केटिंग कंपन्या म्हणजेच BPCL HPCL IOC त्याचप्रमाणे ONGC, ऑइल इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्री झाली. मार्केटमध्ये नेहेमी एकाचा फायदा तर दुसऱ्याचा तोटा होतो. सरकारने सवलत दिल्यामुळे विमान कम्पन्यांचा फायदा होईल म्हणून जेट एअरवेज आणि इंडिगो यांचे शेअर वाढले.

ICICI बँकेच्या चेअरमन आणि CEO चंदा कोचर यांनी ICICI ग्रुपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि बँकेने तो स्वीकारला . त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची चेअरमन आणि CEO म्हणून ५ वर्षांसाठी नेमणूक झाली. त्यामुळे ICICI बँक. ICICI लोम्बार्ड हे शेअर वाढले.

श्रीराम ट्रान्सपोर्ट ने SVL च्या Rs ६५० कोटींच्या NCD साठी गॅरंटी दिली होती. यावर बरेच वादळ उठले होते. ही केस खरे म्हणजे जून २०१५ ची आहे. ही गॅरंटी आज कंपनीने रद्द केली

IFC ( इंटरनॅशनॅशल फायनान्स कॉर्पोरेशन) नी पुंज लॉईड या कंपनीच्या विरोधात इंसोल्वन्सी याचिका दाखल केली.

L &T ला ONGC कडून Rs ११७४० कोटींची ऑर्डर मिळाली.

टाटा मोटर्सच्या लँड रोव्हर विक्रीचे आकडे चांगले आले तर जॅग्वारची विक्री कमी झाली.

विशेष लक्षवेधी

 • L &T च्या शेअर BUY बॅकची रेकॉर्ड डेट १५ ऑक्टोबर २०१८ असून BUY BACK प्राईस प्रती शेअर Rs १४७५ केली आहे. माझ्या ब्लॉगवरील पोस्ट नंबर ५८ वाचा यात आपल्याला शेअर BUY BACK विषयी संपूर्ण माहिती मिळेल – https://wp.me/pa5o7Y-hB
 • NLC ची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी९ ऑक्टोबर २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे.
  लक्ष्मी विलास बँकेच्या बॉण्ड्स चे रेटिंग ‘CARE’ या रेटिंग एजन्सीने कमी केले.

वेध उद्याचा

 • NSE आणि BSE मध्ये ११ ऑक्टोबर २०१८ पासून ‘MOSER BAER’ या कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सस्पेंडेड राहील. कारण या कंपनीविरुद्ध लिक्विडेशन प्रक्रिया सुरु झाली आहे.
 • बंधन बँक १० ऑक्टोबर २०१८ रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.
 • टी सी एस आपले दुसर्या तिमाहीचे निकाल ११ऑक्टोबर रोजी जाहीर करेल
 • टाटा स्पॉन्ज, HUL, कर्नाटक बँक यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहीर होईल.
 • उद्या RBI एकंदर परिस्थिती बघता ०.२५ % रेट वाढवण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५१६९ NSE निर्देशांक निफ्टी १०५९९ आणि बँक निफ्टी २४८१९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ०३ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०३ ऑक्टोबर २०१८

भाग्यश्री फाटक www. marketaanime.com आज क्रूड US$ ८५.४७ प्रती बॅरल रुपया US $१=Rs ७३.३४ आणि US $ निर्देशांक ९५.३१ होता. आज मार्केट ( सेन्सेक्स) सुमारे ६०० पाईंट आणि निफ्टी १५० पाईंट पडले. पण विशेष म्हणजे मार्केट BREADTH चांगली होती. पडणाऱ्या शेअरपेक्षा वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती.त्या मध्येही स्मॉल कॅप शेअर्स वाढत होते. मेटल शेअर्स, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स, आणि पेपर उद्योगातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.
ट्रम्प साहेबांच्या ट्विटचा मार्केटवर लगेच परिणाम होतो. **भाग्यश्री फाटक www. marketaanime.com**ट्रम्प यांनी भारताला ‘टॅरिफ किंग’ असे संबोधले आणि सांगितले की काही क्षेत्रात आणि काही वस्तूंवर भारत १००% ड्युटी लावत आहे. भारत आमचे दोस्त राष्ट्र असल्यामुळे या ड्युटीत कपात करण्याचा अवश्य विचार करेल. आता यापुढे भारत नवीन इम्पोर्ट ड्युटी लावणार नाही आणि किंवा असलेली ड्युटी कमी करावी लागेल. भाग्यश्री फाटक www. marketaanime.com

सध्या शेतकरी आंदोलनांच्या झळा येत आहेत. कर्ज माफीची प्रमुख मागणी आहे. **भाग्यश्री फाटक www. marketaanime.com**. याचा तोटा इक्विटास, उज्जीवन यांना होईल. FINE पॅडी, मूग, रागी, सोयाबीन, हायब्रीड ज्वारी, बाजरी आणि गहू यांची MSP सुमारे Rs २०० प्रती क्विंटल ने वाढवली. याचा तोटा ब्रिटानिया, ITC नेस्ले, HUL, मेरिको यांना होईल.

रिलायन्स DTH घरोघरी पोहोचवण्यासाठी हाथवे नेटवर्क ही कंपनी खरेदी करेल अशी मार्केटमध्ये अफवा आहे.
एखाद्या कंपनीच्या एखाद्या मोठ्या ग्राहकाची आर्थीक परिस्थिती किंवा बिझिनेस परफॉर्मन्स असमाधानकारक असेल तर त्या कंपनीवर विपरित परिणाम होऊ शकतो. विप्रोचा G. E इलेक्ट्रिक हा मोठा ग्राहक आहे यांची परिस्थिती बिघडत आहे. याचा परिणाम विप्रोवर होईल. भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

प्लास्टिक बॅन मध्ये दिलेली सवलत १ ऑक्टोबर २०१८ ला संपली. याचा फायदा पेपर इंडस्ट्रीला होईल.
आयशर मोटारच्या तामिळनाडू प्लांट मधील कर्मचाऱयांचा संपकाळातील पगार कापल्यामुळे कामगार पुन्हा संपावर गेले.
मारुतीची साडेसाती अजून संपलेली दिसत नाही. **भाग्यश्री फाटक www. marketaanime.com**जानेवारी ते जुलै २०१८ या काळात विकलेल्या ६४० ‘सुपर कॅरी’ गाड्या FUEL पंपामध्ये दोष असल्यामुळे परत मागवाव्या लागल्या.

RBI ऑइल मार्केटिंग कंपन्यांठी स्पेशल US $ स्वॅप विंडो उघडण्याचा विचार करत आहे.

NRI साठी स्पेशल डिपॉझिट योजना चालू करण्याचा सरकार विचार करत आहे. यामुळे काही काळ रुपयांची घसरण कमी झाली भाग्यश्री फाटक www.marketaanime.com

NORSK HYDRO या ब्राझील मधील कंपनीने आपला ब्राझील मधील अल्युमिना प्लांट बंद केला. याचा फायदा हिंदाल्कोला होईल.

IL&FS साठी १० डायरेक्टर्स चे पॅनेल नेमले आणि त्याचे अध्यक्ष म्हणून उदय कोटकना नेमले. पहिली बातमी चांगली आली ITNL या कंपनीच्या डिबेंचर्सवरील व्याजाचे पेमेंट वेळेवर करण्यात आले. त्यामुळे शेअरहोल्डर्सना धीर आला. NHAI आणि SIDBI यांनी IL&FS ला मदत करू असे सांगितले. भाग्यश्री फाटक www. marketaanime.com

विशेष लक्षवेधी

 • ८ऑक्टोबर २०१८ रोजी टाटा एलेक्सि चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल आहे. जर टाटा एलेक्सिच्या शेअरने २०० DMA च्या स्तरावर म्हणजेच Rs ११७६ वर सपोर्ट घेतला तर तेजी राहण्याची शक्यता आहे कारण तिमाही निकाल चांगले येण्याची शक्यता आहे.
 • क्रूड US $ ८५ ते ८६ प्रती बॅरल चा स्तर पार केला तर क्रूड US $ १०० प्रती बॅरल एवढे वाढू शकते. रुपया US $ १= Rs ७५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. **भाग्यश्री फाटक www. marketaanime.com**
 • एशियन पेंट्स आज Rs १२७० ला उघडला. Rs १२६२ हा २०० DMAची पातळी तोडली तर . यापुढील सपोर्ट Rs ११९३ ला आहे. क्रूड वाढते आहे. तांत्रिक आणि मूलभूत दृष्टीने शेअर कमकुवत होतो आहे
 • MPHASIS BFL च्या BUY BACK ची २५ ऑक्टोबर २०१८ ही रेकॉर्ड डेट जाहीर झाली
 • कंपनी Rs १३५० प्रती शेअर या भावाने शेअर BUY BACK करेल. J B केमिकल चा शेअर BUY बॅक Rs ३९० प्रती शेअर या भावाने १० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ओपन राहील. भाग्यश्री फाटक www. marketaanime.com
 • L &T च्या शेअर BUY BACK ला शेअर होल्डर्सची मंजुरी मिळाली.
 • हिरो मोटो आणि TVS मोटर्स या कंपन्यांचे ऑटो विक्रीचे आकडे चांगले आले.

वेध उद्याचा

 • ५ ऑक्टोबर २०१८ रोजी RBI आपले वित्तीय धोरण जाहीर करेल. यात व्याजाचे दर ०.५० बेसिस पाईंट्सने वाढतील अशी भीती वाटल्याने मार्केट पडले.
 • गुरुवार ४ ऑक्टोबर २०१८ रोजी बँकांची एक्सपायरी आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९७५ NSE निर्देशांक निफ्टी १०८५८ आणि बँक निफ्टी २५०६९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ०१ ऑक्टोबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०१ ऑक्टोबर २०१८

आज रुपया US $१= Rs ७२.८० , क्रूड US $८३.२२ प्रती बॅरल अशा वातावरणात मार्केट उघडले. आज मार्केटला पहिला धक्का होता बंधन बँकेचा! बँकेला शाखा उघडण्याआधी RBI ची मंजुरी घ्यावी लागेल असे RBI ने सांगितले आणि शिक्षा म्हणून चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरची सॅलरी फ्रीझ केली. ४०% पेक्षा प्रमोटर्सचा स्टेक तीन वर्षात म्हणजे २३ ऑगस्ट २०१८ पर्यंत कमी केला नाही म्हणून RBI ने ही पाऊले उचलली. बँक PNB हौसिंग खरेदी करण्याच्या विचारात होती तेव्हा हे होल्डिंग कमी होईल असे वाटले होते.पण ते डील पूर्ण होऊ शकले नाही.बंधन बँकेचे लिस्टिंग २७ मार्च २०१८ रोजी झाले. प्रमोटर्सचे शेअर्स २७ मार्च २०१८ पासून एक वर्षाच्या लॉक-इन -पिरियड मध्ये आहेत. ताबडतोब प्रमोटर्स आपला स्टेक कमी करू शकत नाहीत. यामुळे बंधन बँकेच्या शेअरला लोअर सर्किट लागले

जयकुमार इन्फ्रा या कंपनीचे फोरेन्सिक ऑडिट करण्यासाठी सेबीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले. त्यामुळे हाही शेअर पडला.

BSE ला ५० ते ६० कमोडिटीमध्ये वायदा सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली . त्या अंतर्गत BSE ने आजपासून सोने आणि चांदी यात वायदा बाजार सुरु केला.यामुळे MCX ची मक्तेदारी भविष्यात कमी होईल त्यामुळे MCX चा शेअर पडला.
पण हे सर्व सुरु असताना येस बँकेनी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतचे अनऑडिटेड फायनान्सियल निकाल जाहीर केले.

मार्केटमध्ये येस बँकेच्या ASSET QUALITY च्या संदर्भात बर्याच अफवा पसरवल्या जात आहेत हे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यामुळे गैरसमज दूर करणे गरजेचे होते. बँकेने सादर केलेल्या निकालात NPA कमी झालेले दिसले, डिपॉझिट ४१% ने वाढली आणि CASA रेशियो २८% होता. या सगळ्याचा चांगला परिणाम झाला आणि येस बँकेचा शेअर वाढला.येस बँकेला’ ‘CARE’ ने वॉच लिस्ट मध्ये घातले.

नैसर्गिक वायूच्या किमती १०% ने वाढवल्या. त्यामुळे गेल आणि ONGC या कंपन्यांचे शेअर वाढले. ऑटो विक्रीचेही आकडे फारसे चांगले आले नाहीत. बजाज ऑटोची देशांतर्गत विक्री आणि निर्यात वाढली. मारुतीची विक्री ०.०५% ने कमी झाली. अशोक लेलँड ची LCV आणि M &H CV ची विक्री वाढली. टाटा मोटर्सची देशांतर्गत विक्री २०% ने वाढली. महिंद्राची ट्रॅक्टर विक्री १८%ने कमी झाली. एस्कॉर्टस ची विक्री २% ने वाढली. या सर्व घटनाक्रमामुळे मार्केट सकाळच्या सत्रात २०० बेसिस पाईंट खाली होते. **भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

आज IL&FS मधील गुंता सोडविण्यासाठी सरकारने पाऊले उचलली. IL&FS या कंपनीत लिक्विडिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे कंपनी बॉण्ड्स, किंवा लोनचे हप्ते मुदत संपल्यावर भरू शकत नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार कर्ज चुकविण्यात डिफॉल्ट होऊ लागले. सेकंडरी मार्केटमध्ये त्यांचे बॉण्ड्स, कोणी विकत घेइनासे झाले. यामुळे बॉण्ड मार्केटमध्ये लिक्विडीटी CRUNCH निर्माण झाला. बॉण्ड यिल्ड वाढले म्हणजे बॉण्ड्स कमी किमतीत विकले जाऊ लागले. याचा पहिला आणि जबर फटका DHFL या NBFC ला बसला. त्याच्या बॉन्डला खरेदीदारानीं कमी किमतीत विकत घेतले. त्यामुळे DHFL च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा शेअर एका दिवसात ५०% पडला. NBFC कंपन्यांना आता बॉण्ड्स द्वारे पैसे उभे करण्यासाठी जास्त व्याजाचा दर द्यावा लागेल किंवा त्यांचे बॉण्ड्स कमी किमतीत विकले जातील या भीतीने NBFC आणि हौसिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स पडायला सुरुवात झाली. शेअर मार्केटमधील फायनान्स क्षेत्रात मंदी आली. **भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

सरकार आणि RBI ने IL&FS च्या प्रश्नांत लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा असे सगळीकडे बोलले जाऊ लागले. IL&FS च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs ४५०० कोटींचा चा राईट्स इशू, Rs १५००० कोटींचा बॉण्ड्स इशू करायला मंजुरी दिली. IL& FS ची कर्ज काढण्याची मर्यादा Rs २५००० कोटींवरून ३५००० कोटींवर नेली.परंतु कर्ज देणार्या बँकांनी IL&FS चा रेझोल्यूशन प्लॅन पास झाल्याशिवाय आणखी कर्ज देण्यात असमर्थता दाखवली. आणि HDFC ने राईट्स इशुला सबस्क्राईब करण्याची असमर्थता दाखवली. दरम्यान IL&FS कर्ज परत करण्यात डिफॉल्ट करतच होती. IL& FS मधील स्थितीमुळे बर्याच म्युच्युअल फंडांवर विपरीत परिणाम झाला. **भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

सरकारने NCLT कडे अपील करून IL&FS चे कर्ज RESTRUCTURE करण्याची परवानगी मागितली. सरकारने IL&FS च्या डायरेक्टरनी सार्वजनिक हिताकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले.कंपनीने कर्ज देताना ज्या मालमत्तांसाठी कर्ज दिले त्या मालमत्तांचे व्हॅल्युएशन वाढवून दाखवले. तसेच ही केस SFIO (सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिस) कडे वर्ग केली. सरकारने बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टेक ओव्हर करण्याची आणि नवे १० डायरेक्टर नेमण्याची तयारी दर्शवली. तसेच उदय कोटक यांना नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नेमण्याची घोषणा केली. हे सर्व झाल्यावर कंपनीच्या कर्जाचे RESTRUCTURING करण्यास परवानगी द्यावी असे अपील केले.म्हणजेच सरकारने ‘सत्यम’प्रमाणे IL&FS मध्ये सफाई करून ती उदयकोटक आणि नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कडे सोपविण्याचा निर्णय घेतला. **भाग्यश्री फाटक www.marketaanime.com**

सरकारच्या या उपायांच्या घोषणेनंतर मार्केटला हायसे वाटले आणि आता IL&FS मधील प्रश्न मार्गी लागला या विचाराने मार्केट पुन्हा एकदा तेजीत आले. मार्केटमधील मरगळ नाहीशी झाली आणि मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. NBFC, हौसिंग लोन देणार्या कंपन्या, आणि बँकांचे शेअर्स पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली. ‘बोलाचा भात आणि बोलाचीच कधी’ संपून सरकारने एक्शन सुरू केली आणि निफ्टी ११०००च्या वर गेला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५२६ NSE निर्देशांक निफ्टी ११००८ आणि बँक निफ्टी २५३६७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!