Monthly Archives: November 2018

आजचं मार्केट – ३० नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ५९.५५ प्रती बॅरल ते US $ ५९.७६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया U$१=Rs ६९.६४ ते US $१=Rs ६९.७८ या दरम्यान होते . US $ निर्देशांक ९६.७७ होता.  नोव्हेंबर २०१८ ची सिरीज तर चांगली संपली. आजपासून सुरू झालेली डिसेम्बर सिरीज सुद्धा चांगली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आतापर्यंतचा इतिहास असे सांगतो की २०१४ सालातला डिसेंबर महिना सोडल्यास प्रत्येक डिसेंबर सिरीज चांगली गेली आहे. पण या वेळेला डिसेंबरमध्ये बर्याच घटना धुमाकूळ घालणार असल्यामुळे ‘इस पार या ऊस पार’ अशी डिसेंबर सिरीज राहण्याची शक्यता काही लोक वर्तवत आहेत. पण निफ्टी या महिन्यात ११००० चा टप्पा गाठेल असे वाटते.

RBI ने सिक्युरिटायझेशनचे नियम ढिले केले आहेत. पांच वर्षांपेक्षा जास्त ज्यांचा मॅच्युरिटी पिरियड आहे त्या कर्जाची रक्कम एकत्र करून सिक्युरिटायझेशन करण्याचे नियम सोपे केले. RBI ने NBFC ला लोन सिक्युरिटायझेशनसाठी योग्य होण्यासाठी लोन देऊन १ वर्षाऐवजी सहा महिने झालेले पाहिजेत असा नियम केला. केली. त्यांनी दिलेल्या नवीन लोन पैकी त्यांना आपल्याजवळ २०% लोन ठेवावे लागेल. बाकीच्या सहा महिन्यांवरील ८०% लोनचे आता NBFC सिक्युरिटायझेशन करू शकतील. यामुळे NBFC चे शेअर वाढले. उदा :- रेपको होम फायनान्स, दिवाण हौसिंग कॅन फिन होम्स. इंडिया बुल्स हॉऊसींग फायनान्स

वैद्यकीय डिव्हायसेसच्या बाबतीत कायदा केला जाणार आहे जेणेकरून इलाज स्वस्तात करणे शक्य होईल. ह्यामुळे BPL आणि इंद्रप्रस्थ मेडिकल या शेअर्सवर परिणाम होईल. अमृतांजन ही कंपनी आता त्यांचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करत आहे. हेल्थ आणि पर्सनल केअर कॅटेगरीमधील प्रॉडक्ट्स बाजारात आणत आहे. त्यांना रीडर्स डायजेस्टकडून हेल्थ आणि PARSAQNAL कॅटॅगिरीमध्ये गोल्ड रिवॉर्ड मिळाले.

रोबोट २.० हा अक्षयकुमार आणि रजनीकांत यांचा सिनेमा रिलीज झाला याचा फायदा आयनॉक्स, PVR यांना होईल. त्याच बरोबर आयनॉक्स लिजरचे प्रमोटर गुजरात फ्लोरो यांना ६४ लाख शेअर्स Rs २५० प्रति शेअर् या भावाने इशू केले जाणार आहेत. म्हणून आयनॉक्सचा शेअर वाढला.

टाटा मोटर्स १५ दिवसांसाठी JLR चे उत्पादन बंद करणार आहे. म्हणून शेअर पडला.

RBI लिक्विडीटी सुधारण्यासाठी काही रक्कम देईल यावर सरकारचा विश्वास नाही. यासाठी काहीतरी प्लॅन बी पाहिजे होता. नीती आयोगाने सरकारला सुचवले की SUUTI मध्ये ५१ कंपन्यांमध्ये सरकारचा स्टेक आहे. यासाठी एक SPV ( स्पेशल पर्पज व्हेईकल) बनवून हा स्टेक विकून टाकावा आणि त्याचा उपयोग NBFC कंपन्यांना लिक्विडीटी पुरवण्यासाठी करावा. NBFC कडून कमर्शियल पेपर्स गॅरंटी म्हणून घ्यावेत. हे सर्व RBI च्या परवानगीशिवाय करता येणे शक्य आहे. पण सरकार या प्लॅन बी वर RBI ची बोर्ड मीटिंग होऊन त्यांचा निर्णय कळवेपर्यंत कोणतीही हालचाल करणार नाही.

सुप्रीम कोर्टाने रिलायन्स कम्युनिकेशनला दोन दिवसाच्या आत रिलायन्स कम्युनिकेशनने Rs १४०० कोटी किंवा Rs १४०० कोटींची कॉर्पोरेट गॅरंटी कोर्टात दिली तर DOT त्यांना रिलायन्स जियोला स्पेक्ट्रम विकण्यासाठी NOC देईल.

एल आय सी डिसेंबर २०१८ अखेर IDBI चे अधिग्रहण पुरे करेल. IDBI मध्ये एल आय सी Rs २०००० कोटींची गुंतवणूक करेल.

सरकार NTPC ला SJVN मधील आपला स्टेक आणि REC ला PFC मधील आपला स्टेक विकणार आहे.
६ डिसेंबर २०१८ पासून झुआरी ऍग्रोच्या प्लांटमध्ये युरियाचे उत्पादन सुरु होईल.

मद्यार्कासाठी असलेल्या मागणीचा डाटा पाहिल्यास मागणी २६% ने वाढली आहे असे जाणवते म्हणून रॅडिको खेतान आणि युनायटेड स्पिरिट्स हा शेअर्स वाढले.

वेध उद्याचा

  • अर्जेन्टिनामध्ये आजपासून G -२० मीटिंग सुरु झाली. यामध्ये चीन आणि USA यांच्यातील बोलण्यांकडे सर्वांचे लक्ष आहे.
  • रसोई या कंपनीचे व्हॉलंटरी डीलीस्टिंग होईल. (डीलीस्टिंग या कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.)

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१९४ NSE निर्देशांक निफ्टी १०८७६ बँक निफ्टी २६८६२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $५८.९७ प्रती बॅरल ते US $ ५९.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.८२ ते US $१=Rs ७०.०६ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.७३ तर VIX १७.४९ होता.

आज निफ्टीने २००डे मुविंग एव्हरेजचा टप्पा निर्णायकरित्या ओलांडला. सेन्सेक्स ५०० पाईंट तेजीत होते आणि निफ्टी १०० पाईंट तेजीत होते. याला सुधारलेला रुपया आणि स्वस्त झालेले क्रूड ही प्रमुख कारणे होत. त्याच बरोबर US $ WEAK झाला US बॉण्ड यिल्ड २.९९% झाले.

सध्या मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये विक्री दिसते आहे त्याविरुद्ध लोकांचा कल लार्ज कॅप शेअर्समध्ये वाढत आहे. येस बँकेतील गुंतवणूक काढून घेऊन ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार आपला मोर्चा ICICI बँकेकडे वळवताना दिसतात.

रुपयाचा विनिमर दर US $१=Rs ७५ असताना RBI ला US $विकून रुपयांची किंमत स्थिर ठेवावी लागली होती ढासळणार्या रुपयाला लगाम घालावा लागला होता. अन आता रुपया वधारल्यामुळे पुन्हा RBI परकीय चलनाचा साठा वाढवत असल्याची बातमी आहे.

टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे निकाल दुसऱ्या तिमाहीचे चांगले आले नव्हते. पण हे निकाल तिसऱ्या तिमाहीत क्रूडचा दर कमी झाल्यामुळे चांगले येतील असा अंदाज आहे.

आज अदानी एंटरप्रायझेसचा शेअर खूपच वाढला. ऑस्ट्रेलियातील कारमायकेल कोल माईन्सचे बांधकाम आणि रेल प्रोजेक्टचे ऑपरेशन लवकरच सुरु होईल असे त्यांचे CEO लुकास डाऊ यांनी सांगितले.

हिंदुस्थान युनी लिव्हर GSK कन्झ्युमरचा न्यूट्रिशन व्यवसाय US ३.४ बिलियन देऊन कॅशमध्ये डील करणार आहे. शेअर स्वॅप रेशियोची ऑफर बदलून ऑल कॅश डील होणार आहे. या डील मुळे HUL चि पोझिशनही मजबूत होईल.पुढील आठवड्यात या करारावर सह्या होतील नेस्ले या रेसमध्ये मागे पडली असे दिसते आहे.

सेबीने स्टॉक मेनिप्युलेशनच्या बाबतीत वकरांगीला क्लीन चिट दिल्यामुळे आज शेअर पाचव्यांदा वरच्या सर्किटला लागला.
NGT ने वेदांताच्या बाजुने आपले म्हणणे मांडले. प्लांट क्लोज करा असे सांगणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे असे NGT चे म्हणणे आहे. त्यामुळे वेदांताचा शेअर वाढला.

टाटा कम्युनिकेशनच्या द्वारे टाटा टेली खरेदी करण्याची योजना तूर्तास तरी टाटा ग्रुपने बासनात गुंडाळली .
स्पाईस जेटने US $ २.८३मिलियनची जादा बँक गॅरंटी दिली म्हणून शेअर वाढला. तर जेट एअरवेज मधील कंट्रोलिंग स्टेक घेण्यासाठी ऐतिहाद थर्ड पार्टिबरोबर बोलणी करत आहे असे समजताच जेट एअरवेजचा शेअर वाढला.

विशेष लक्षवेधी

बँक ऑफ महाराष्ट्र चा दुसर्या तिमाहीचा निकाल चांगला लागला. Rs २७ कोटी नफा झाला. बँक टर्न अराउंड झाली.

वेध उद्याचा

GDP डेटा, RBI ची पॉलिसी, ओपेक ची मीटिंग, विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. G -२० मीटिंग आणि शनिवारी XI जीन पिंग आणि ट्रम्प यांच्यात होणारी बोलणी याकडे सर्वांचे लक्ष आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१७० NSE निर्देशांक निफ्टी १०८५८ आणि बँक निफ्टी २६९३९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $६०.८५ प्रती बॅरल ते US $ ६१.२० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.६४ ते US $१= Rs ७०.७४ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९७.३६ होता.

RBI ने डिसेंबर २०१८ मध्ये Rs ४००००कोटींचे बॉण्ड्स खरेदी करू असे सांगितले यामुळे मार्केटमधील लिक्विडीटी वाढेल. आणि गव्हर्नमेंट बॉण्ड यिल्ड ७.५०% होईल. या दोन्हीचाही फायदा NBFC आणि बँका यांना होईल. कॉस्ट ऑफ मनी कमी होईल.

FII आणि DII यांची शेअर्सची विक्री कमी झाली आहे आणि त्याविरुद्ध खरेदी वाढली आहे.

ल्युपिनचे CFO S. रमेश यांनी राजीनामा दिला. ते गेली १२ वर्ष ल्युपिन मध्ये कार्यरत होते. त्यांनी सांगितले की बेटर प्रॉस्पेक्टसाठी राजीनामा दिला. व्यक्ती मोठी की संस्था किंवा कंपनी मोठी असा प्रश्न उभा राहतो तेव्हा संस्था किंवा कंपनी मोठी असेच उत्तर मिळते. असे काही कारण घडल्यास सुरुवातीला शेअर पडतो नंतर त्यांच्या जागी दुसर्या येणाऱ्या माणसाच्या योग्यतेविषयी चर्चा सुरु होते आणि शेअर हळूहळू वाढतो. अशा वेळी कंपनीमध्ये तात्काळ असे काही घडलेले नसते जेणेकरून कंपनीचा फायदा कमी होईल. उलटपक्षी चांगला शेअर Rs १५ ते Rs २० स्वस्तात खरेदी करता येतो.

सन फार्माचा कॅनबेरी येथील प्लांट ते बंद करणार आहेत. सन फार्माचे रेटिंग कमी करण्यात आले.

रिअल इस्टेटवर स्टॅम्प ड्युटी वाढवली जाणार आहे त्यामुळे रिसेलिंग वर परिणाम होईल. आणि पर्यायाने रिअल इस्टेट क्षेत्रावरही परिणाम होईल.

IOB ही SIDBI आणि STCI मधील स्टेक विकून बाहेर पडणार आहे. याच प्रमाणे अनलिस्टेड कंपन्यांमधील स्टेक विकून आपली आर्थीक स्थिती सुधारण्याच्या विचारात आहे.

पिरामल फंडानी लोढा डेव्हलपर्सना कर्ज दिले आहे आणि हे कर्ज Rs १८०० कोटीनी वाढवणार आहेत.अशी बातमी आली. त्याचवेळेला लोढा डेव्हलपर्सचे बॉण्ड्स मात्र डिस्कॉउंटमध्ये म्हणजे US $ ८८.१४ ने विकले गेले. हा दर आधी US $ १०४.१३ एवढा होता.यामुळे पिरामल चा शेअर चांगलाच पडला होता. याबाबतीत लोढांच्या व्यवस्थापनाने खुलासा केला की आमचे US$ ३२५ मिलियनचे बॉण्ड्स आहेत त्यामधील फक्त ५ लाख बॉण्ड्सची खरेदी विक्री झाली. आमच्या बॉण्ड्समध्ये ट्रेडिंग होत नाही. ही खरेदी विक्री खासगी रित्या झाली आहे. त्याचे काही व्यक्तिगत कारण असू शकते. पण लोढा डेव्हलपर्स या कंपनीमध्ये लिक्विडीटी चांगली आहे. आम्ही प्रीपेमेन्ट केलेले आहे. फक्त प्रीमियम हौसिंग मध्ये थोडी फार समस्या आहे. आमची अनसोल्ड इन्व्हेन्टरी असली तरी त्यातून आम्हाला रेंटल इन्कम चांगले मिळत आहे. असा खुलासा ऐकताच पिरामलचा शेअर वाढायला सुरुवात झाली.

फ्युचर रिटेलमध्ये ९.५% स्टेक अमेझॉन खरेदी करणार आहे. शेअर्सच्या खरेदीत कॉल ऑप्शनचाही समावेश आहे. Rs ३२०० ते Rs ३५०० कोटींमध्ये हे डील होईल. कॉल ऑप्शनमध्ये नंतर स्टेक वाढवला जाईल.

आज अरविंद लिमिटेड एक्स डीमर्जर प्राईसला लिस्ट झाला. आता लिस्टेड अरविंद मध्ये फक्त त्यांच्या टेक्सटाईल कारभाराचा समावेश आहे. बाकीच्या विभांगांचे लिस्टिंग नंतर होईल. Rs ९०.२५ एवढा आज अरविंदचा भाव होता. अरविंद फॅशन LTD. अनवेशण हेवी इंजिनीअरिंग LTD. यांचे लिस्टिंग नंतर होईल. अरविंद लिमिटेड च्या शेअरला फारशी मागणी नव्हती कारण कापसाच्या किमती वाढत आहेत.

जेट एअरवेजचे प्रमोटर नरेश गोयल त्यांचा कंट्रोलिंग स्टेक विकायला तयार झाले आहेत. त्यांच्या ऐतिहाद आणि एअर फ्रांसच्या कन्सॉरशियम , DELTA ,आणि KLM यांच्या बरोबर वाटाघाटी सुरु आहेत. पण गोयल त्यांच्याकडे ५% स्टेक ठेवण्यास आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये सीट ठेवण्यास इच्छुक आहेत. पण एतिहाद कडे जेट एअरवेजमधील २४% स्टेक आहे ती एतिहाद ४९% पर्यंत वाढवेल. पण एतिहादला यासाठी फ्रेश कॅपिटल आणावे लागेल पण एतिहादची आर्थीक स्थिती एवढी चांगली नाही.

सध्या FMGC क्षेत्र तेजीत आहे त्याला प्रमुख कारण इलेक्शन स्पेंडिंग वाढल्यामुळे ग्रामीण मागणी चांगली निर्माण झाली आहे. आणि याचा परिणाम तिसर्या तिमाहीच्या निकालावर होईल असे वाटते.

येस बँकेने असे जाहीर केले की १३ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंग मध्ये दोन स्वतंत्र डायरेक्टर्स तसेच CEO च्या नेमणुकीसाठी काही प्रस्ताव आले असले तर त्यावर विचार होईल. तसेच येस बँकेने जाहीर केले की प्रमोटर कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे ‘एक्सटर्नल’ डील केलेले नाही. येस बँकेचे प्रमोटर्स राणा कपूर आणि मधू कपूर यांच्यात समझोत्याचे ९ कलमी अग्रीमेंट तयार केले आहे.

AAI ने लँडिंग चार्जेस आणि पार्किंग चार्जेस यांची बाकी Rs ११७ कोटी ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत भरण्यासाठी स्पाईस जेट या कंपनीला नोटीस पाठवली.

NGT ( नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) च्या कमिटीने वेदांताचा तुतिकोरिन येथील प्लांट बंद करण्याचा तामिळनाडू राज्य सरकारने घेतलेला निर्णय बरोबर नसल्याचे सांगितले. त्यांनी तामिळनाडू राज्य सरकारकडून या बाबतीत ७ दिवसात स्पष्टीकरण मागवले आहे.

वेदांताला बारमेर बेसिन मधील क्रूड निर्यात करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज हाय कोर्टाने फेटाळून लावला.

आज मध्यप्रदेश आणि मिझोराम मध्ये राज्य विधानसभांच्या निवडणुकांसाठी मतदान चालू आहे.

TRAI आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये मीटिंग झाली. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना इनकमिंग कॉल मिनिमम रिचार्जिंग साठी पत्र पाठवले. त्यात मोबाईलच्या अकॉउंट मध्ये बॅलन्स नसला तरी कनेक्शन कापू नये अशी सूचना केली. एअरटेल आणि वोडाफोन यांचे ग्राहक कमी झाले. पण रिलायन्स जियो चे ग्राहक १.३० कोटी वाढले.

HCC आणि ग्रॅनुअल्स या कंपन्या उद्यापासून F & O मधून बाहेर पडतील.

विशेष लक्षवेधी

  • EMPHASIS चा BUY बॅक ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१८ या कालावधीत आहे. BUY BACK साठी Rs १३५० प्रती शेअर या भावाने Rs ९८८ कोटी खर्च केले जातील. १ जानेवारी २०१९ रोजी BUY BACK केलेल्या शेअर्स चे पेमेंट केले जाईल.
  • NLC आज एक्स BUY BACK झाली. BUY बॅक प्राईस Rs ८८ होती.
  • कोची शिपयार्डचा BUY बॅक आजपासून सुरु झाला. BUY BACK प्राईस Rs ४५५ होती.
  • रिलायन्स कॅपिटल ही कंपनी टर्नअराउंड झाली. निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५७१६ NSE निर्देशांक निफ्टी १०७२८ आणि बँक निफ्टी २६४५७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $५९.७७ प्रती बॅरल ते US$ ५९.८५ या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८० ते US $१=Rs ७१.०४ या दरम्यान होता. VIX २०.४० तर PUT/कॉल रेशियो १.४६ होता.

बाल्टिक ड्राय निर्देशांक ८% ने वाढला. हा निर्दशांक वाढला की शिपिंग कंपन्यांचे शेअर वाढतात. हा निर्देशांक जहाज माल वाहतुकीच्या दरात किती वाढ झाली हे दर्शवतो. या दरात वाढ झाली की शिपिंग कंपन्यांना फायदा होतो. SCI, GE शिपिंग, मर्केटर यासारख्या कंपन्यांचं शेअर्स वाढतील.

चीन आणि USA ट्रेडवॉर मध्ये परस्पर फायदेशीर समझोत्यासाठी तयार आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रांनी सांगितले. त्यामुळे मार्केटमध्ये तेजीची लहर पसरली आणि मेटल संबंधित शेअर्स मध्ये खरेदी झाली.

बिनानी सिमेंटच्या रेझोल्यूशन प्रक्रियेतून IFCI ला Rs ४९२ कोटी मिळाले.

परदेशातून कर्ज काढण्याचे नियम थोडे ढिले केले. कव्हरेज रेशियो ७०% केला. याचा फायदा HDFC ला होईल.
मँगलोर केमिकल्सचे १.३३ लाख शेअर्स झुआरी ऍग्रो नी सोडवले. शेअर्स प्लेज केले की कंपनीने शेअर्स तारण ठेवून कर्ज काढले की शेअर पडतो. तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले की शेअर वाढतो

एस्सार स्टीलमधून Rs २५०० कोटींची वसुली PNB ला होईल. अशी बातमी असल्यामुळे PNB चा शेअर वाढला.
झायडस कॅडीला या कंपनीच्या BACLOFEM औषधाला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली त्यामुळे हा शेअर वाढला.

मर्क इलेक्ट्रॉनिक्स रिलायन्स रिटेलला टी व्ही सेट सप्लाय करणार आहे.

HEG या कंपनीकडे Rs १४०० कोटी कॅश आहे. यापैकी कंपनी शेअर BUY BACK साठी Rs ७५० कोटी खर्च करणार आहे.आणि बाकीची Rs ६५० कोटी कंपनीच्या बिझिनेसच्या विस्तारासाठी खर्च करणार आहे असे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले.

सन फार्मा US $ १० लाखात जपानस्थित डर्मटालॉजी क्षेत्रातील पोलो फार्मा या कंपनीचे अधिग्रहण करणार आहे.खरे पाहता आज हा शेअर वाढायला पाहजे होता सन फार्माच्या सबसिडीअरी च्या ऑडिट संबंधात काही खराब खबर आहे. अशी बातमी आली असल्यामुळे शेअरमधील तेजी टिकत नाही.

फ्यूचरचे संस्थापक बियाणी हे अमेझॉन बरोबर भविष्यात फ्युचर ग्रुप अमेझॉनने टेक ओव्हर करण्यासंबंधात वाटाघाटी करत आहेत.

सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये भांडवल घालणार होती त्याची रक्कम आता Rs ४२००० कोटीवरून Rs १००००० कोटीं पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

२७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१८ या दरम्यान USFDA ने ल्युपिन च्या तारापूर युनिटची तपासणी केली होती. त्यात एक त्रुटी मिळाली. USFDA ने ल्युपिनला EIR दिला.

सध्या मार्केटमध्ये व्हॉल्युम कमी असल्यामुळे तेजी टिकत नाही. आणि गुरुवारी एक्स्पायरी असल्यामुळे त्या दृष्टीकोनातून शेअर्स मध्ये तेजी मंदी दिसते आहे.

वेध उद्याचा

MONTE CARLO फॅशन्स या कंपनीची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मीटिंग आहे.
६३ मून या कम्पनीतील मेजॉरिटी स्टेक जपानी कंपनीला विकला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५१३ NSE निर्देशांक निफ्टी १०६८५ आणि बँक निफ्टी २६४४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ५९ प्रती बॅरल ते US $ ६०.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.४० ते US $१= Rs ७०.७५ च्या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९६.९४ तर इंडिया VIX १९.६४ होता.

गेल्या आठवड्यात ओळीनी तीन दिवस मंदी होती. त्याचाच काहीसा परिणाम सोमवारी सुरुवातीला जाणवला. त्यानंतर मार्केट हळूहळू सुधारायला सुरुवात झाली. आणि मग बुल्स मैदानात उतरले आणि मार्केट संपेपर्यंत बेअर्सचा शिरकाव होऊ शकला नाही. FMCG क्षेत्रातील शेअर्स उदा नेसले, कोलगेट, डाबर ह्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.चीनमध्ये ग्रोथ कमी होत असल्याने मेटल क्षेत्रातील शेअर्स पडले. CPSE ETF मध्ये ONGC, कोल इंडिया सारख्या कंपन्यांचा समावेश केल्यामुळे हे शेअर पडले. सुमारे ३५० पाईंट मार्केट वर राहिले. आठवड्याची सुरुवात चांगले झाली. पण बर्याच मोठ्या घटना समोर असल्यामुळे ही तेजी टिकेल का हे प्रश्नचिन्ह सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे.

कृषी एक्स्पोर्ट पॉलिसीला मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. बासमती तांदूळ सोडून उरलेल्या प्रकारच्या तांदुळाच्या निर्यातीसाठी ५% सबसिडी मिळेल असे सरकारने जाहीर केले. म्हणून कोहिनूर फूड, LT फूड्स, KRBL असे तांदुळाशी संबंधित शेअर्स वाढले.

२४ डिसेंबर पासून विप्रो आणि अदानी पोर्ट सेन्सेक्समधून बाहेर पडतील आणि HCL टेक आणि बजाज फायनान्स यांचा समावेश होईल.

महिंद्रा आणि महिंद्राने नवीन ALTURAS G-४ ही कार लाँच केली. याची किंमत Rs २७ लाख ते Rs ३० लाखादरम्यान असेल.

ल्युपिनला पोटॅशियम क्लोराईड साठी USFDA ची मंजुरी मिळाली.

गोदरेज प्रॉपर्टीजनी हिरो सायकल बरोबर ऑफिस प्रॉपर्टी डेव्हलपमेंट साठी JV करण्याचा करार केला.

२२ नोव्हेम्बरला मॉरिशस स्थित SAIF II या कंपनीने जस्ट डायल या कंपनीमधील २.३८% स्टेक विकला.

SJVN या कंपनीला हिमाचल प्रदेशमध्ये ७८० MW चालू करण्याचा अधिकार दिला. हा अधिकार ७० वर्षांकरता दिला आहे.

१५ डिसेंबर २०१८ पर्यंत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील SBI आणि PNB सोडून बाकीच्या सरकारी बँकांमध्ये Rs ४२००० कोटी भांडवल घालेल.

येस बँकेने रिलायन्स म्युच्युअल फंड आणि टेम्पल्टन म्युच्युअल फंड यांच्याकडे काही शेअर्स प्लेज केले होते. येस बँकेचा शेअर मंदीमध्ये असल्यामुळे लोनसाठी ठेवलेल्या तारणाच्या रकमेत घट झाली. पण येस बँकेने मार्केट संपता संपता अशी माहिती दिली की त्यांनी Rs २०० कोटींचे प्रीपेमेन्ट केले.त्यामुळे गुंतवणूकदारांची काळजी थोडी कमी झाली.

२८ नोव्हेंबर २०१८ पासून अरविंदचे RESTRUCTURING होईल. २८ नोव्हेंबर २०१८ पासून ब्रँडेड एपरल्स आणि इंजिनीरिंग बिझिनेस वेगळे होतील.

विशेष लक्षवेधी

HEG ने Rs ५५०० प्रतिशेअर ( आजच्या CMP वर २५% प्रीमियमवर) १३.६० लाख शेअर BUY BACK करणार.
हूडकोचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. उत्पन्न वाढले पण प्रॉफिट मात्र तेवढ्या प्रमाणात वाढले नाही.
आज हिरो मोटो कॉर्पने इन्व्हर्स हेड आणि शोल्डर पॅटर्नचा ब्रेक आऊट दिला. त्यामुळे या शेअरमध्ये भरपूर तेजी होती.हा पॅटर्न मंदी दाखवतो. या पॅटर्नमध्ये ब्रेकआऊट दिला म्हणजे भविष्यात तेजी होईल असे दाखवतो. इन्व्हर्स हेड आणि शोल्डर या पॅटर्नविषयीची सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.

वेध उद्याचा

मार्केट ब्रेक्झिट आणि राज्य विधानसभांच्या निकालांना सामोरे जात आहे. त्यामुळे या १५ दिवसात मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार अपेक्षित आहेत. त्यामुळे शेअर्सची खरेदी किंवा विक्री करताना प्रत्येक शेअरची निवड काळजीपूर्वक करावी. या आठवड्यात गुरुवारी F &O ची एक्स्पायरी आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५३५४ NSE निर्देशांक निफ्टी १०६२८ आणि बँक निफ्टी २६३६५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ६३.०२ प्रती बॅरल ते US $६३.२५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०२ ते US $१=Rs ७१.४५ या दरम्यान होता. US $निर्देशांक ९६.६३ होता.

या महिन्यात अर्जेन्टिनामध्ये जी -२० राष्ट्रांची बैठक आहे. या बैठकीत USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे प्रीमियर पिंग यांच्यात चर्चा होऊन ट्रेड वॉरमध्ये काही समझोता होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

RBI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक १४ डिसेम्बर २०१८ रोजी होईल

फेब्रुवारी २०१९ च्या एक्स्पायरीपासून बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये फिझिकल सेटलमेंट केली जाईल. नोव्हेंबर कॉन्ट्रॅक्टची एक्स्पायरी झाल्यानंतर जी नवीन काँट्रॅक्टस घेतलि जातील त्या मध्ये फिझिकल सेटलमेंट होईल.

क्वालिटी डेअरीच्या ऑडिटर्सनी राजीनामा दिला होता त्यामुळे नव्या ऑडिटर्सची नेमणूक झाल्यानंतरच दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करता येणे शक्य होईल. नवीन ऑडिटर्सना अकौंट्सचे फायनलायझेशन करण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे होते असे कंपनीने कळवले.

हुतात्माकी PPL या कंपनीला MPCB ने (महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड) त्यांचा ठाणे येथील प्लांट बंद करायला सांगितला. कोर्टाने या MPCB च्या ऑर्डरवर २८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत स्थगिती दिली. अशी कोणतेही वाईट बातमी आली तरी जर तो शेअर F &O मध्ये नसला तर शॉर्ट करण्याचा धोका पत्करू नये नुकसान होण्याचा संभव असतो.

दीपक फर्टिलायझर आणि दीपक नायट्रेट या दोन्ही कंपन्यांवर आयकर खात्याने छापा टाकला होता. ते सर्च आणि सीझर ऑपरेशन पूर्ण झाले आणि कंपन्यांनी नेहेमीप्रमाणे कामकाज करायला सुरुवात केली. कंपनीने असे सांगितले की आमचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगला आहे त्यामुळे या सर्च आणि सीझर ऑपरेशनचा वाईट परिणाम कंपनीच्या बिझिनेसवर होणार नाही.

अन्नधान्याचे पॅकेजिंग जूट बॅग मध्येच करणे अनिवार्य आहे असे सरकारने सांगितले. म्हणून लुडलो ज्यूट, CHEVIOT या तागाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स वाढले.

CCI ने SCHNEIDER इलेक्ट्रिक या कंपनीला त्यांनी L &T चे काही बिझिनेस विकत घेतले असल्यामुळे नोटीस पाठवली.
FY २०२० मध्ये ATF आणि नैसर्गिक गॅस यांना GST लागू होण्याची शक्यता आहे.

इंडोको रेमिडीजच्या गोवा युनिटला USFDA ने त्यांच्या १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०१८ दरम्यान केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

विशेष लक्षवेधी

  • बजाज ऑटोने तयार केलेल्या QUADRI CYCLE या वाहनाला परिवहन मंत्रालयाने नॉन्ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून खाजगी वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे बजाज ऑटो चा शेअर वाढला.
  • सरकार डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये त्यांच्या आवश्यकतेनूसार भांडवल घालेल.

वेध उद्याचा

  • २५ नोव्हेंबर २०१८ रोजी ब्रेक्झिट विषयी महत्वाची मीटिंग आहे
  • २६ नोव्हेंबर २०१८ रोजी GIC हौसींग आणि हुडको आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
  • २८नोव्हेंबर ही अरविंदच्या डीमर्जर ची एक्स डेट आहे.
  • या एक्स्पायरीपासून HCC आणि ग्रॅन्युअल्स हे शेअर्स F &O च्या बाहेर पडतील.
  • ३० नोव्हेंबर २०१८ रोजी GDP चे आकडे जाहीर होतील आणि MSCI निर्देशांकामध्ये होणारे बदल लागू होतील.
  • सध्या रुपयाचे मूल्य वाढले असून आणि क्रूड ची किंमत कमी होत आहे तरी मार्केटमध्ये कायम ट्रेंड टिकत नाही. मार्केट एका मर्यादित रेंज मधे फिरत आहे. जागतिक घटना आणि ११ डिसेम्बरला येणारे ५ राज्य विधानसभांचे निकाल मार्केटच्या मनात असल्यामुळे असे घडत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९८१ NSE निर्देशांक निफ्टी १०५२६ आणि बँक निफ्टी २५९९९ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $६३.२२ प्रती बॅरल ते US $ ६३.६० प्रती बॅरल या दरम्यान होते. करन्सी मार्केट बंद होते त्यामुळे रुपया US $ १=Rs ७१.४५ वर स्थिर होता. बॉण्ड यिल्ड ३.०७ होते. US $ निर्देशांक ९६.८२ होता.

मंगळवारी USA मधील मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. डाऊ जोन्स ५४९ पाईंट पडला.आज IT क्षेत्रातील सर्व शेअर पडले. इन्फोसिस ने २००डेज मुविंग ऍव्हरेज ची पातळी तोडली त्यामुळे मंदी वाढेल हा संकेत मिळतो. Rs ६२९ ची पातळी तोडली.

क्रूड घसरले त्यामुळे विमान वाहतूक कंपन्या टायर कंपन्या पेंट कंपन्या आणि ज्याच्यात क्रूडची डेरिव्हेटिव्ज उपयोगात आणली जातात अशी केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढलें

जेट एअरवेजने पैशाची टिकाऊ व्यवस्था व्हावी यासाठी ‘ईतिहाद’ या कंपनी बरोबर बोलणी चालू केली आणि क्रूडही पडले त्यामुळे जेट एअरवेजचा शेअर वाढला.

विशेष लक्षवेधी

JP इन्फ्रा ही कंपनी खरेदी करण्यात ५ जणांनी इंटरेस्ट दाखवला. NBCC, कोटक इन्व्हेस्टमेंट, L &T इन्फ्रा CUBE हायवे, आणि सुरक्षा ग्रुप यांनी इंटरेस्ट दाखवला.

DR रेड्डीज च्या ड्रग ऍडिक्शनवरील औषध ‘SUBOXONE’ चे जनरिक व्हर्जन विकण्यास कंपनीला कोर्टाकडून परवानगी मिळाली. ही परवानगी मिळण्यासाठी जो उशीर झाला त्याबद्दल कंपनीला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे हा शेअर वाढला.

बँक ऑफ बरोडा ने CCIL मधील आपला ४% स्टेक HDFC बँकेला Rs १२४ कोटीला विकला. बँक ऑफ बरोडाने Rs ४२०० कोटींचे NPA विकण्यासाठी बोली मागवली.

येस बँकेच्या CEOची निवड करण्यासाठी नेमलेल्या समितीची १२ डिसेंबर रोजी बैठक आहे. येस बँकेचे प्रमोटर्स राणा कपूर आणि मधू कपूर हे त्यांच्या आपापसातील आणि त्यांच्यातील आणि येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधील मतभेद मिटवून सामंजस्याचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे येस बँकेचा शेअर तेजीत होता.

ITI या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने १८ कोटी शेअर्सच्या FPO साठी DRHP दाखल केले. FPO आणि IPO यासंबंधीची सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.

अदानी गॅस या शेअरला आज वरचे सर्किट लागले. कारण या कंपनीला १३ शहरांमध्ये गॅस डिस्ट्रिब्युशनचे कॉन्ट्रॅक्ट PNGRB कडून मिळाले याशिवाय ९ शहरामध्ये ती IOC बरोबर जॉईंट व्हेंचरमध्ये काम करत आहे.

वेध उद्याचा

उद्या बँक निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये भांडवल घालणार आहे तसेच बॉण्ड यिल्ड ३.०७ झाले या बातमीमुळे आजही PSU बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसली. NBFC कंपन्यांनी आपलया पैसा उभा करण्यातल्या अडचणी कमी झाल्या असे सांगितले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५१९९ NSE निर्देशांक निफ्टी १०६०० आणि बँक निफ्टी २६२६२वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ६६.१४ प्रती बॅरल ते US $ ६६.५१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs७१.२८ ते US $१= Rs ७१.५० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.२९ होता.

बहूचर्चीत RBI च्या बोर्ड मीटिंगमध्ये घुसळून घुसळून काहीही नवनीत बाहेर पडले नाही. सरकारच्या पदरी निराशाच आली असे मानावे लागेल. नुसत्या समित्या स्थापन होतील अशा घोषणा झाल्या. सरकारच्या समस्या तशाच राहिल्या. NBFC च्या बाबतीत लिक्विडीटी पुरवण्याच्या बाबतीत कोठलाही निर्णय झाला नाही. आधी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना भांडवल पुरवावे नंतरच PCA खालील नियम सोपे करण्याचा विचार करता येईल -असे RBI ने सांगितले.

टाटा सन्स ने असे सांगितले की आम्ही पूर्णपणे विचार करून जेट एअरवेज विकत घ्यायचा विचार करू आता बोलणी प्राथमिक स्वरूपात आहेत. जेट एअरवेजची आर्थीक परिस्थीती चिंताजनक आहे. प्रमाणाबाहेर असलेले कर्ज आणि ऑपरेशनल लॉसेस या विषयी टाटा सन्सने चिंता व्यक्त केली.

विशेष लक्षवेधी

  • HEG ही कंपनी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी शेअर BUY BACK वर विचार करेल.
  • सरकार डिसेंबर महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये Rs ४५००० कोटी ते Rs ५०००० कोटी भांडवल घालेल.
  • सरकार प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकेच्या परफॉर्मन्स आणि गरजेप्रमाणे प्रत्येक बँकेला भांडवल पुरवेल.
  • येस बँकेच्या इंडिपेन्डन्ट डायरेक्टर श्री R. चंद्रशेखर यांनी डायरेक्टरपदाचा राजीनामा दिला. हा आठवड्याभरातला दुसऱ्या डायरेक्टरचा राजीनामा आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर पडला.
  • आजपासून बिनानी सिमेंट ही अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीची १००% सबसिडीअरी झाली.
  • NBCC चा तिमाहीचा निकाल ठीक होता.

सध्या शेअर BUY बॅक आणण्याची कंपन्यांची स्पर्धा चालली आहे. पण शेअर BUY बॅक या एकमेव कारणासाठी शेअर्स खरेदी करू नयेत. त्यात आपला फायदा होत असला पाहिजे BUYBACK च्या सर्व पैलूंचा अभ्यास करून मगच शेअर विकत घ्यावेत. शेअर BUY BACK या कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या ‘ मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४७४ NSE निर्देशांक निफ्टी १०६५६ आणि बँक निफ्टी २६११३ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ नोव्हेंबर २०१८

क्रूड US $६७.२१ प्रती बॅरल ते US $ ६७.४८ प्रती बॅरल आणि रुपया US १=Rs ७१.५९ ते US $१=Rs ७१.९६ या दरम्यान होते. बॉण्ड यिल्ड ७.७५% तर US $ निर्देशांक ९६.४८ होता.

आज मार्केटने ५० डेज मुविंग एव्हरेज, २०० डेज मुविंग एव्हरेज ही सीमा रेषा पार केली. ओळीनी तीन दिवस मार्केट रोज ३०० पाईंटनी वाढले . आणि ३ ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच २०० डेज मुविंग एव्हरेजची पातळी पार केली ही चांगली गोष्ट आहे. मार्केट खाली येत असताना १०८४५ ते १०७५४ ही गॅप म्हणजे रेझिस्टन्स आहे. ही गॅप भरल्यानंतरच मार्केटला चांगली तेजी येईल.

कोणतीही घटना घडते त्या घटनेचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. आपण फक्त एकच बाजू विचारात घेतो दुसरी बाजू विचारात घेत नाही. तामिळनाडूमध्ये जे ‘गाजा’ नावाचे वादळ आले त्याचा परिणाम SRF च्या विरालीमलाई या टेक्सटाईल युनिट वर झाला या युनिटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. GHCL चे मणिपराई युनिट उध्वस्त झाले.या दोघांना इन्शुअरन्स कंपनी नुकसानभरपाई देईलच. या वादळामध्ये घरं पडली असतील रिअल इस्टेटचे नुकसान झाले असेल ही बाजू विचारात घेता सिमेंटची मागणी वाढेल आणि दक्षिणेकडील सिमेंट कंपन्यांचा खप वाढेल ही दुसरी बाजू कोणी विचारात घेत नाही. त्यामुळे आज रामको सिमेंट, इंडिया सिमेंट, हे शेअर वाढत होते.

DB कॉर्प या कम्पनीची रेडियो सबसिडीअरी ‘माय FM’ ने जाहिरातींचे दर वाढवले. DB कॉर्प म्हणजे दैनिक भास्कर म्हणजेच आपल्याला कंपनी कोणत्या व्यवसायात आहे हे माहीत असले पाहिजे. जाहिरातीचे उत्पन्न हा या कंपनीच्या उत्पन्नाचा स्रोत.सध्या विधानसभांच्या निवडणुका असल्यामुळे जाहिरातींपासून कंपनीला चांगले उत्पन्न मिळेल म्हणून शेअर वाढला.

DR रेडीज च्या श्रीकाकुलम प्लाण्टला USFDA ने क्लीन चिट दिली. खरे पाहता क्लीन चिट मिळाल्यानंतर शेअर खूप वाढतो पण आज असे घडले नाही कारण श्रीकाकुलम प्लांटच्या पूर्वी केलेल्या तपासणीतही काही त्रुटी नव्हत्या. त्यामुळे क्लीन चिट मिळाली यात आश्चर्य नव्हते. बातमीचा सखोल विचार केला पाहिजे डोळे झाकून ट्रेड करू नये

आज दिवसभर मार्केट RBI च्या बोर्ड मीटिंगमधील निर्णयाची वाट बघत होते आणि वेगवेगळे विश्लेषक आपापली मते सांगत होते. मार्केटच्या वेळेमध्ये RBI आणि सरकारमध्ये काही समझोता झाला किंवा कसे ते समजू शकले नाही.
RBI ने कॅपिटल फंड्स आणि रिस्क ऍसेट्स रेशियो म्हणजे CRAR ९% ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅपिटल ADEQUACY रेशियोवर चर्चा झाली . MSME च्या Rs २५ कोटी पर्यंत लोनच्या रिस्ट्रक्चरिंग बाबत चर्चा झाली. बोर्ड फॉर फायनान्सियल सुपरव्हिजन PCA खालील बँकांचा मामला हाताळेल.

PFC मधील सरकारचा स्टेक REC खरेदी करेल अशी चर्चा होती म्हणून दोन्हीही शेअर वाढले.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरचा मामला लवकरच सुटेल असे ट्रम्प यांनी सांगितल्यामुळे मेटल शेअर्समध्ये आज हलकीशी तेजी होती.

विशेष लक्षवेधी

  • आज ऑइल इंडियाची शेअर BUY बॅकवर विचार करण्यासाठी बैठक होती. ऑइल इंडिया ही कंपनी ५,०४,९८,७१७ शेअर्स टेंडर BUY BACK पद्धतीने Rs २१५ प्रति शेअर्स या भावाने BUY बॅक करेल. कंपनी यासाठी Rs १०८५,७२,२४,१५५ खर्च करेल. या BUY BACK साठी ३ डिसेंबर २०१८ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
  • टाटा इन्व्हेस्टमेंट या कंपनीने Rs १००० प्रती शेअर या भावाने ४५ लाख शेअर BUY बॅक करणार. कंपनी या BUY बॅक वर Rs ४५० कोटी खर्च करेल.
  • शालिमार पेंट्स ही कंपनी राईट्स इशू दवारा Rs ३०० कोटी उभारणार आहे.

BSE निर्देशांक ३५७७४ NSE निर्देशांक निफ्टी १०७६३ आणि बँक निफ्टी २६३०० वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १६ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ६६.७२ प्रती बॅरल ते US $ ६७.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७० ते US $१= Rs ७१.९८ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९६.७२ ते ९६.९० होता.

UK च्या पंतप्रधान थेरेसा मे या थोड्या अडचणीत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील ४ मंत्रयांनी ब्रेक्झिट प्रपोजलच्या विरोधात राजीनामा दिला आहे. तसेच पंतप्रधानांच्या पक्षातील काही खासदारांनी नेतृत्व बदलाचाही आग्रह धरला आहे.

RBI ऍक्टच्या सेक्शन ७ अन्वये अर्थ मंत्रालय RBI ला जनहितार्थ काही निर्देश /आदेश देण्याच्या तयारीत आहे.

अर्थमंत्रालयाने या बाबतीत कायदे मंत्रालयाचा सल्ला घेतला असता कायदे मंत्रालयानं सांगितले की RBI ऍक्ट च्या कलम ७ खाली जनहितार्थ आदेश देणे हे अर्थ मंत्रालयाच्या अधिकारात आहे. RBI आणि सरकार यांच्यात १५ मुद्द्यांवर गंभीर मतभेद आहेत. १९ नोव्हेम्बरला RBI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग आहे.

सरकारची अशी इच्छा आहे की या बैठकीत RBI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी खालील बाबीं/मुद्द्यांवर निर्णय घ्यावा.

(१) NBFC ना लिक्विडीटीच्या अभावाचा प्रश्न सतावत असल्यामुळे बँकांकडून कर्ज मिळण्याशिवाय RBI ने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. RBI स्वतंत्र व्यवस्थेला फारशी अनुकूल नाही. RBI चे असे म्हणणे आहे की NBFC नी बँकाकडूनच कर्ज घ्यावे.

(२) RBI ने आपल्याजवळ किती रिझर्व्हज आणि कॅश ठेवावी याचा अंदाज घेऊन एका सूत्रबद्ध कार्यक्रमा द्वारे याची रक्कम ठरवावी. RBI ने आपल्या रिझर्वमध्ये ठेवायची रकम काही सुत्राने निश्चित करता यावी. या व्यतिरिक्त राहणारे रिझर्व्हज RBI ने सरकारला लाभांश म्हणून द्यावेत

(३) PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) योजनेचे नियम सोपे करावेत. आणि योग्य वाटल्यास ११ सार्वजनिक बँकांना हे सोपे नियम लागू करावेत आणि त्यांना PCA कार्यक्रमातून वगळावे आणि त्यांच्यावर घातलेले निर्बंध विशेषतः कर्ज देण्यासंबंधी निर्बंधात सूट द्यावी. RBI चे म्हणणे आहे की आधी सरकारने या बँकांना भांडवल पुरवावे मगच या बँकांना PCA मधून बाहेर आणण्याचा विचार करता येईल.

जर या मुद्द्यांवर १९ नोव्हेंबरच्या RBI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत सहमत झाले नाही तर मात्र सरकार RBI कायद्याच्या कलम ७ नुसार जनहितार्थ RBI ला आदेश देईल.  सरकारने त्यांचे RBI बरोबरचे मतभेद सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे मार्केटमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे शेअर्स वधारले. तसेच यांच्यात NBFC ना झुकते माप दिल्यामुळे NBFC चे शेअर्सही वाढले.

येस बँकेच्या CEO निवडण्यासाठीच्या समितीमधून O P भट यांनी राजीनामा दिला.क्लॅश ऑफ इंटरेस्ट असे कारण दिले. लागोपाठ दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीने राजीनामा दिल्यामुळे येस बँकेचा शेअर पडला.

SRF च्या दहेज प्लांटची कॉस्ट Rs १८० कोटींवरून Rs २५५ कोटींपर्यंत वाढली.

पॉवर कंपन्यांनी RBI च्या NPA विषयक नियमांच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सुप्रीम कोर्टाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी ठेवली.

युनायटेड ब्रुअरीजचा दुसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला कारण या तिमाहीत उन्हाळा असल्यामुळे बिअरचा खप तुफान वाढतो. पण तिसर्या तिमाहीत थंडी असल्यामुळे मद्यार्काचा खप वाढतो त्यामुळे तिसर्या तिमाहीत मद्यार्क बनवणाऱ्या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले येतात. उदा :- युनायटेड स्पिरिट्स, रेडीको खेतान

अंड्यांच्या किमती थंडी असल्यामुळे दर शेकडयाला Rs १४ ते Rs १७ ने वाढल्या. याचा फायदा वेंकीज आणि SKM एग्ग्ज यांना झाला आणि या शेअर्सच्या किमती वाढल्या.

विशेष लक्षवेधी

  • जेट एअरवेज आर्थीक कारणांमुळे भारतातील अंतर्गत सेवा कमी करत आहे.
  • सरकारने PSU च्या शेअर्स BUY BACK मधून Rs ५००० कोटी जमा करण्याचे लक्ष ठेवले आहे. जानेवारी २०१९ अखेर
  • कोल इंडियाचा शेअर BUY BACK करून सरकार Rs १००० कोटी उभारेल.
  • NMDC ने जर कर्नाटक सरकारला दोनीमलाई खाणीतल्या उत्पन्नाचा हिस्सा वाढवून दिला नाही तर कर्नाटक राज्य
  • सरकार ही खाण NMDC कडून परत घेऊन या खाणीचा लिलाव करेल असे राज्यसरकारने स्पष्ट केले.
  • व्होडाफोन आयडिया भारती कडून त्यांचे फायबर ASSET खरेदी करू शकते.
  • श्रेय इन्फ्राचे निकाल ठीक आले. इंटरेस्ट कॉस्टमध्ये खूपच वाढ झाली.

वेध उद्याचा

  • आता दुसर्या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल येऊन गेले.
  • सर्वांचे लक्ष आज टाटा सन्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बैठकीत होणाऱ्या जेट एअरवेज खरेदी करण्याच्या निर्णयाकडे असेल.
  • तसेच सोमवारी होणाऱ्या RBI च्या बैठकीत RBI चे बोर्ड सकारात्मक आणि सरकारशी तडजोडीचा निर्णय घेते का ? यावर सगळ्यांचं लक्ष असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४५७ NSE निर्देशांक निफ्टी १०६८२ आणि बँक निफ्टी २६२४५ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!