आजचं मार्केट – १ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US$ ७४.२४ ते US $ ७४.७६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.५९ होता. आणि US $निर्देशांक ९६.८७ होता.

सरकारी बातम्या आणि दुसर्या तिमाहीचे निकाल यांच्या नावे आजचा दिवस लिहिला जाईल. ओपेक आणि इतर देशांनी क्रूडचे उत्पादन वाढवल्यामुळे क्रूडची किंमत ढासळू लागली.  EASE ऑफ DOING BUSINESS मध्ये जागतिक पातळीवर भारत ७७व्या नंबरावर आला. इराणवर ४ नोव्हेंबर पासून निर्बंध लावणार आणि त्याची झळ भारताला पोहोचेल काय आणि जर झळ पोहोचलीच तर ती कितीशी या काळजीत मार्केट होते पण भारतावर परिणाम होऊ नये असे प्रयत्न केले जात आहेत असे जाणवते. भारताने इराणकडून होणाऱ्या क्रूडच्या आयातीमध्ये २०१८-२०१९ या वर्षांमध्ये १/३ कपात करू असे जाहीर केले. जास्त आयात करता येणार नाही पण पूर्वीच्या करारानुसार इराणकडून क्रूड आयात करता येईल आणि त्याच बरोबर भारताने सुद्धा USA तुन आयात होणाऱ्या मालावर ड्युटी वाढवण्याचा किंवा नवीन ड्युटी लावण्याचा निर्णय ४५ दिवसाने पुढे ढकलता येईल असे आश्वासन दिले.

सरकारने अर्थ मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱयांची बैठक पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये बोलावली आहे. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी RBI ने आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.

ऑक्टोबर २०१८ या महिन्यामध्ये GST ची वसुली Rs १००,००० कोटींपेक्षा जास्त झाली. सप्टेंबर २०१८ या महिन्यात ही वसुली Rs ९४४४२ कोटी होती. टॅक्स चोरीला घातलेला लगाम आणि GST चे कमी केलेले दर या कारणांमुळे ही वसुली शक्य झाली.

दोन वर्षांपासून ANNUAL RETURN भरला नाही म्हणून मुंबईच्या RC ( रजिस्ट्रार ऑफ कंपनीज) ने २५००० शेल कंपन्यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले. डिसेम्बर २०१८ पर्यंत आणखी काही कंपन्यांवर अशी कारवाई केली जाईल असे सांगितले.
पोल्युशनच्या कारणामुळे चीनने बर्याच व्यवसायांवर निर्बंध घातले किंवा हे व्यवसाय करण्यावर बंदी घातली. ट्रेंड वॉर टॅरिफ वॉरमुळे चीनला खूप मोठा तोटा सोसावा लागत आहे. यामुळे पॉलिटब्यूरोची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये चीनमधील खासगी उद्योगांना आर्थीक मदत दिली जाईल असे सांगण्यात आले.

ONGC ला व्हेनिझुएलाकडून Rs ३००० कोटी डिव्हिडंड ड्यू आहे. हा डिव्हिडंड ते कॅश मध्ये देऊ शकत नसल्यामुळे व्हेनिझुएला हा डिव्हिडंड ONGC ला क्रूडच्या स्वरूपात देणार आहे.

BSNL आणि MTNL ला Rs ३००० कोटींचा ४G स्पेक्ट्रम मोफत दिला जाणार आहे याचा निर्णय ३० नोव्हेंबर पर्यंत केला जाईल.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि डायरेक्टर्सना दिले जाणारे मानधन कंपनीला होणाऱ्या नफयाशी सलंग्न असावे यासाठी अध्यादेश काढून तो राष्ट्रपतींकडे त्यांच्या संमतीसाठी पाठ्वण्यात आला.

विशेष लक्षवेधी

  • आज ऑक्टोबर २०१८ मधील ऑटो सेल्स चे आकडे आले त्यात मारुती सुझुकी चे विक्री .२% वाढली टाटा मोटर्सची घरेलू विक्री १८%ने तर निर्यात ६%ने वाढली. तर एस्कॉर्टस ची विक्री २८.८% ने वाढली. अतुल ऑटोचे विक्रीचे आकडेही चांगले आले.
  • युनायटेड स्पिरिट्स, नवनीत पब्लिकेशन, HEG(Rs ३० अंतरिम लाभांश), कॅनरा बँक, अडव्हान्स एंझाईम, वेलस्पन कॉर्प, हिकल केमिकल्स, बजाज इलेक्ट्रिकल्स, अरविंद, VST इंडस्ट्रीज, फर्स्ट सोर्स, महिंद्रा लॉजीस्टिक्स, मेरिको,E -CLERK,, MAS फायनान्सियलस, सेरा सॅनिटरीवेअर,एलकॉन इंजिनीअरिंग यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
  • जागरण प्रकाशन, GIPCL, झुआरी ऍग्रो, द्वारिकेश शुगर यांचे निकाल असमाधानकारक आले. डाबर, HDFC, यांचे निकाल ठीक आले. पण मार्केटला पसंत पडले नाहीत.
  • बँक ऑफ बरोडाने मुदत ठेवींवरील व्याजाचे दार .०५% ते .२५% ने वाढवले त्यामुळे हा शेअर पडला. बँक ऑफ बरोडाने असे जाहीर केले की त्यांच्यात देना बँक आणी विजया बँक मर्ज करण्याचे काम ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत पुरे होईल.

वेध उद्याचा

  • टाइड वॉटर ऑइल या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक शेअर डीलीस्टिंगवर विचार करण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी आहे. (डीलीस्टिंग ऑफ शेअर्स या कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे)
  • BOSCH या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक सोमवार ५ नोव्हेंबर २०१८ रोजी शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोलावली आहे.
  • एक्सिस बँक, LUX इंडस्ट्रीज, NTPC भारत फोर्ज, हिंदाल्को. GILLETTE , ORACLE फायनान्स. पेट्रोनेट LNG, PFC, खादीम, प्रॉक्टर & गॅम्बल, PNB, SAIL, GSFC, सन टी व्ही, त्रिवेणी ,वाडीलाल, इक्विटास, V मार्ट, WHIRLPOOL , झायडस वेलनेस, अलकेम लॅब या कंपन्या आपले दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४४३१ NSE निर्देशांक निफ्टी १०३८० आणि बँक निफ्टी २५३२३ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १ नोव्हेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.