आजचं मार्केट – २ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ७२.६२ प्रती बॅरल ते US $७३.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ७२.५१ ते US $१=७२.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.०४ होता. VIX १८.२२ होता. क्रूडची समस्याच जवळ जवळ सुटत आली. ऑइल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सप्लाय वाढवायला सुरुवात केली. लिक्विडीटी आणि IL &FS ची समस्या सोडविण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर कंबर कसली त्यामुळे आज काही काळ रुपया US $१=Rs ७३ च्या पातळीवरून सुधारला.

या सर्व अनुकूल गोष्टींना मार्केटने ६०० ( सेन्सेक्स मध्ये) पाईंट्सची सलामी दिली. या आठवड्यात २ वेळेला मार्केट ६०० पाईट्स वधारले. त्यामुळे निराशा दूर व्हायला मदत झाली आणि मार्केटने दिवाळीच्या आधीच दिवाळी साजरी केली. एवढे मार्केट तेजीत असले तरी डिलिव्हरी व्हॉल्युम मात्र खूप कमी आहे. बहुतांशी हे इंट्राडे ट्रेडिंग आहे.

USA ने ८ देशांना इराणवर घातलेल्या निर्बंधातून सूट दिली. USA ने भारतातून आयात होणाऱ्या शेतकी आणि हॅन्डलूम उ द्योगातील वस्तूंवरची ड्युटीफ्री सवलत १ नोव्हेंबर २०१८ पासून काढून घेतली.

भारत सरकार साखर निर्यातीची शक्यता चीन, बांगला देश, मलेशिया , दक्षिण कोरिया या देशांबरोबर अजमावत आहे.
आज किर्लोस्कर ग्रूपला RBI कडून NBFC सुरु करण्यासाठी लायसेन्स दिले. आता किर्लोस्कर ग्रुप किर्लोस्कर कॅपिटल या नावाने आपली FULLY OWNED सबसिडीअरीच्या माध्यमातून हा बिझिनेस करतील आणि Rs १००० कोटींची गुंतवणूक करतील.

कोल इंडियाचा OFS FULLY सबस्क्राईब झाला.

BSE ९ कंपन्या ५ नोव्हेंबर २०१८ पासून डीलीस्ट करणार आहे कारण या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग ६ महिन्यांसाठी सस्पेंड होते.

विशेष लक्षवेधी

 • आज ऍक्सिस बँक ( प्रॉफिटमध्ये ८३% वाढ आणि ASSET क्वालिटीमध्ये सुधारणा) GSFC,भारत फोर्ज, IOC (ग्रॉस रिफायनिंग मार्जिन वाढले.), धनलक्ष्मी बँक, व्हर्लपूल,हिंदाल्को (यांची सबसिडीअरी नॉवेलीस चा निकाल चांगला आला),पेट्रोनेट LNG ( Rs ५.५० अंतरिम लाभांश), प्रॉक्टर ऍण्ड गॅम्बल, NTPC, ओरिएंट इलेक्ट्रिकल, बाटा ,सिक्व्हेण्ट सायंटिफिक, सिटी युनियन बँक, इंगरसोल रँड, मुक्ता आर्ट्स यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • अल्केम लॅब, JB केमिकल्स,BSE या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.
 • PNB, MAX इंडिया, VASCON यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
 • AB फॅशन, फ्युचर एंटरप्रायझेस, बजाज हिंदुस्थान, या कंपन्या दुसऱ्या तिमाहीत तोट्यातून फायद्यात आल्या म्हणजेच टर्न अराउंड झाल्या
 • ऑक्टोबर २०१८ या महिन्यात बजाज ऑटोच्या घरगुती विक्रीत ३२% तर निर्यातीत ३८%ची वाढ झाली.
  महिंद्रा आणि महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री १७% ने वाढली, निर्यात २% ने वाढली.

वेध उद्याचा

 • शनिवार ३ नोव्हेंबर २०१८ रोजी आंध्र बँक, आर्चिज, कॅडीला हेल्थकेअर , एरिस लाईफ सायन्सेस , GSPL, ONGC, RELAXO, SCI, थायरोकेअर, उकल फ्युएल या कंपन्या आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
 • सोमवार ५ नोव्हेंबर २०१८ रोजी APL अपोलो ट्यूब्स, BOSCH, सिप्ला,एक्झाईड, GAIL, IGL कोपरान, मिंडा इंडस्ट्रीज, NATCO फार्मा, PNB हाऊसिंग, स्टेट बँक ऑफ इंडिया, वेंकीज या कंपन्या आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील .
 • BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५०११ NSE निर्देशांक निफ्टी १०५५३ आणि बँक निफ्टी २५७०१ वर
  बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – २ नोव्हेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.