आजचं मार्केट – ५ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ७२.२३ ते US $ ७२.५० प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१= Rs ७३.११ पर्यंत घसरला. VIX १९.४० होते. इराण वरील निर्बंध आजपासून सुरु झाले पण भारताला सहा महिन्यांसाठी या निर्बंधातून सूट मिळणार आहे. इराण भारताकडून काही गोष्टी आयात करेल आणि त्या बदल्यात भारताला इराणकडून क्रूड आयात करता येईल. हा सर्व व्यवहार रुपयात UCO बँकेमार्फत होईल. यामुळे UCO बँकेचा शेअर १०%ने वाढला.

केरळमधील पुराचा परिणाम सन टी व्ही च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालावर होईल असा अंदाज होता आणि घडलेही तसेच! सन टी व्ही चा निकाल खराब आला जाहिरातींपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला.

SBI चा दुसर्या तिमाहीचा निकाल आला. तीन तिमाहीमध्ये लॉस दाखवल्यानंतर SBI ने या तिमाहीत प्रॉफिट दाखवले. पण त्याचवेळी SBI ला Rs १५६० कोटी इतर इनकम झाले आहे. प्रॉफिट Rs ९४४ कोटी दाखवले आहे. NPA अगदी थोड्या प्रमाणात कमी झाले. स्लीपेजीस Rs १०८८८ कोटी झाले.

MMTC सोने आणि चांदी आयात करून त्याची नाणी पाडण्याचे काम करते दिवाळीच्या दिवसात सोन्याची आणी चांदीची नाणी जास्त खपतात. म्हणून MMTC चा शेअर आज वाढला.

इंडोनेशिया थायलंड आणि सिंगापूर येथून येणाऱ्या ‘UNCOATED’ पेपरवर ५% इम्पोर्ट ड्युटी लावली जाणार आहे. याचा फायदा पेपर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल.उदा :- TNPL JK पेपर

USA व्हिसाचे नियम आणखी कडक करणार आहे. ज्या कंपन्यांचा बिझिनेस USA वर अवलंबून आहे त्या कंपन्यांचे नुकसान होईल. माईंड ट्री आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचा यात समावेश आहे.

विशेष लक्षवेधी

  • अडाणी एंटरप्राइझेसमधून वेगळ्या काढलेल्या अडानी गॅस या कंपनीचे Rs ७० वर BSE वर तर NSE वर Rs ७२ वर लिस्टिंग झाले. नंतर या शेअरला अपर सर्किट लागले.
  • BOSCH या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला लागला. ही कंपनी १०.२८ लाख शेअर टेंडर ऑफर प्रक्रियेने Rs २१००० प्रती शेअर या भावाने शेअर BUY BACK करेल.( BUY BACK ऑफ SHARES या कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर आणि खुलासेवार माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे )
  • ONGC, उकल फ्युएल, गॉडफ्रे फिलिप्स, CARE, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स, LUX, मिंडा इंडस्ट्रीज, गुड लक इंडस्ट्रीज, WEBCO. या कंपन्यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले
  • सेल, टाटा केमिकल्स,सिप्ला यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उद्याचा

  • ग्राफाईट इंडिया, लाल पाथ लॅब, सुमीत इंडस्ट्रीज यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल मंगळवार ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
  • ६ नोव्हेंबर रोजी बँक निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९५० NSE निर्देशांक निफ्टी १०५२४ आणि बँक निफ्टी २५७३२ वर
बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ५ नोव्हेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.