आजचं मार्केट – ६ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ नोव्हेंबर २०१८

आपल्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना, माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकाच्या सर्व वाचकांना, आणि प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना हे  नववर्ष म्हणजे संवत २०७५ हे समृद्दीचे, समाधानाचे, आरोग्याचे आणि भरभरुन यश देणारे आणि सुखाचे  जावो हीच शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या शेअर मार्केटविषयीच्या ज्ञानाचा वापर करून आपण स्वतंत्ररित्या आता शेअर मार्केटमधून पैसे मिळवायला लागला असाल. असाच लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या डोक्यावर राहो.

आज संवत २०७४ संपले. मार्केटमध्ये अस्थिरता खूपच होती. पण फार्मा शेअर्सनी थोडा रंग भरला. USA मध्ये मध्यावधी निवडणुकासाठी आज  मतदान होत आहे. या निवडणुकांच्या निकालांवरून USA च्या अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांच्या धोरणांविषयीचे लोकमत अजमावता येईल. तसेच फार्मा कंपन्यांच्या धोरणांविषयी निर्णय घेतला जाईल या अपेक्षेने फार्माचे शेअर्स वाढले.

आज क्रूड US $ ७२.७६  ते प्रती बॅरल ते US$  ७२.८७ प्रती बॅरल या दरम्यान राहिले. रुपया US $१=Rs७२.९५ ते आनि US $१= Rs ७३.२१ या दरम्यान राहिला. US $ निर्देशांक ९६.३७ होता.

आंध्र बँकेचे ज्या ज्या कंपन्या बरोबर जॉईंट व्हवेंचर आहे या कंपन्यातील आपला स्टेक  आंध्र बँक पूर्णपणे किंवा अंशतः विकण्याचा संभव आहे.

NMDC ला लीज संपल्यामुळे कर्नाटकातील दोनीमलाई खाण बंद करावी लागली होती. कारण सरकार आणि NMDC यांच्यात रॉयल्टीवरून वादविवाद चालू होता. ही लीज आता  २० वर्षापर्यंत रिन्यू केली.

वेदांताचा शेअर आजपासून एक्स Rs १७ अंतरिम लाभांश झाला. ह्या शेअरची किंमत ह्या रकमेने कमी झाली.

JLR च्या विक्री मध्ये UK मध्ये वाढ झाल्यामुळे टाटा  मोटर्सचा शेअर वाढला.

DHFL ने Rs १७७५  कोटींच्या CP (कमर्शियल पेपर) चे रिपेमेंट केले. त्यामुळे हा शेअर वाढला.

विशेष लक्षवेधी 
  • PNB मेट लाईफच्या IPO ला सेबीने परवानगी दिली.
  • ऑटोमोटिव्ह ऍक्सल्स (नफा विक्री आणि ऑपरेटिंग मार्जिन वाढले), गेल यांचे निकाल चांगले आले.  बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे निकाल चांगले आले पण कंपनीने नकारात्मक व्हॉल्युम गायडन्स दिल्यामुळे शेअर पडला. बामर लॉरी या कंपनीचा निकाल चांगला आला.
  • APL अपोलो ट्यूब्स, शीला फोम्स, संघी इंडस्ट्रीज यांचे निकाल असमाधानकारक आले.
  • सुवेंन लाईफ सायन्सेस या कंपनीला इज्राएल आणि जपान कडून प्रॉडक्ट पेटंट मिळाली.
  • जेट एअरवेजची टाटा ग्रुप बरोबर बोलणी चालू आहेत या बातमीचे जेट एअरवेज च्या व्यवस्थापनाने खंडन केले आहे.
  • अडानी ग्रुपला त्यांच्या ऑस्ट्रेलियातील प्रोजेक्टसाठी  कोरिया डेव्हलपमेंट बँकेने कर्ज देण्याची शक्यता दुरावली.
वेध उद्याचा 
  • ABAN ऑफशोअर, MRF, यांचे ८ नोव्हेम्बरला तर EID पॅरी, इगारशी मोटर्स , इंडिया सिमेंट, इंडियन बँक, शोभा, टायटन, VST टिलर्स, ट्रॅक्टर्स इंडिया लिमिटेड यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ९ नोव्हेंबर रोजी येतील.
  • उद्या BSE आणि NSE या दोन्ही एक्स्चेंजवर संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मुहूर्त ट्रेडिंग असेल. आपल्याला मुहूर्ताचे म्हणून काही शेअर्स खरेदी करायचे किंवा काही शेअर्सची विक्री करायची असल्या  या वेळात करू शकता.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९९१ NSE निर्देशांक निफ्टी १०५३० आणि बँक निफ्टी २५५९८ वर बंद झाले

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.