आजचं मार्केट – २२ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ६३.०२ प्रती बॅरल ते US $६३.२५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०२ ते US $१=Rs ७१.४५ या दरम्यान होता. US $निर्देशांक ९६.६३ होता.

या महिन्यात अर्जेन्टिनामध्ये जी -२० राष्ट्रांची बैठक आहे. या बैठकीत USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे प्रीमियर पिंग यांच्यात चर्चा होऊन ट्रेड वॉरमध्ये काही समझोता होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

RBI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक १४ डिसेम्बर २०१८ रोजी होईल

फेब्रुवारी २०१९ च्या एक्स्पायरीपासून बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये फिझिकल सेटलमेंट केली जाईल. नोव्हेंबर कॉन्ट्रॅक्टची एक्स्पायरी झाल्यानंतर जी नवीन काँट्रॅक्टस घेतलि जातील त्या मध्ये फिझिकल सेटलमेंट होईल.

क्वालिटी डेअरीच्या ऑडिटर्सनी राजीनामा दिला होता त्यामुळे नव्या ऑडिटर्सची नेमणूक झाल्यानंतरच दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करता येणे शक्य होईल. नवीन ऑडिटर्सना अकौंट्सचे फायनलायझेशन करण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे होते असे कंपनीने कळवले.

हुतात्माकी PPL या कंपनीला MPCB ने (महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड) त्यांचा ठाणे येथील प्लांट बंद करायला सांगितला. कोर्टाने या MPCB च्या ऑर्डरवर २८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत स्थगिती दिली. अशी कोणतेही वाईट बातमी आली तरी जर तो शेअर F &O मध्ये नसला तर शॉर्ट करण्याचा धोका पत्करू नये नुकसान होण्याचा संभव असतो.

दीपक फर्टिलायझर आणि दीपक नायट्रेट या दोन्ही कंपन्यांवर आयकर खात्याने छापा टाकला होता. ते सर्च आणि सीझर ऑपरेशन पूर्ण झाले आणि कंपन्यांनी नेहेमीप्रमाणे कामकाज करायला सुरुवात केली. कंपनीने असे सांगितले की आमचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगला आहे त्यामुळे या सर्च आणि सीझर ऑपरेशनचा वाईट परिणाम कंपनीच्या बिझिनेसवर होणार नाही.

अन्नधान्याचे पॅकेजिंग जूट बॅग मध्येच करणे अनिवार्य आहे असे सरकारने सांगितले. म्हणून लुडलो ज्यूट, CHEVIOT या तागाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स वाढले.

CCI ने SCHNEIDER इलेक्ट्रिक या कंपनीला त्यांनी L &T चे काही बिझिनेस विकत घेतले असल्यामुळे नोटीस पाठवली.
FY २०२० मध्ये ATF आणि नैसर्गिक गॅस यांना GST लागू होण्याची शक्यता आहे.

इंडोको रेमिडीजच्या गोवा युनिटला USFDA ने त्यांच्या १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०१८ दरम्यान केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

विशेष लक्षवेधी

 • बजाज ऑटोने तयार केलेल्या QUADRI CYCLE या वाहनाला परिवहन मंत्रालयाने नॉन्ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून खाजगी वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे बजाज ऑटो चा शेअर वाढला.
 • सरकार डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये त्यांच्या आवश्यकतेनूसार भांडवल घालेल.

वेध उद्याचा

 • २५ नोव्हेंबर २०१८ रोजी ब्रेक्झिट विषयी महत्वाची मीटिंग आहे
 • २६ नोव्हेंबर २०१८ रोजी GIC हौसींग आणि हुडको आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
 • २८नोव्हेंबर ही अरविंदच्या डीमर्जर ची एक्स डेट आहे.
 • या एक्स्पायरीपासून HCC आणि ग्रॅन्युअल्स हे शेअर्स F &O च्या बाहेर पडतील.
 • ३० नोव्हेंबर २०१८ रोजी GDP चे आकडे जाहीर होतील आणि MSCI निर्देशांकामध्ये होणारे बदल लागू होतील.
 • सध्या रुपयाचे मूल्य वाढले असून आणि क्रूड ची किंमत कमी होत आहे तरी मार्केटमध्ये कायम ट्रेंड टिकत नाही. मार्केट एका मर्यादित रेंज मधे फिरत आहे. जागतिक घटना आणि ११ डिसेम्बरला येणारे ५ राज्य विधानसभांचे निकाल मार्केटच्या मनात असल्यामुळे असे घडत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९८१ NSE निर्देशांक निफ्टी १०५२६ आणि बँक निफ्टी २५९९९ वर बंद झाले.

मी 22-25 नोव्हेंबर शेअर मार्केट वर course organise  केला आहे ..त्याच्या आता फक्त ५ सीट उरल्या आहेत.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Hz

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २२ नोव्हेंबर २०१८

 1. Amar d patil

  आपल्या रोज येणाऱ्या माहिती मुळे खरंच खूप माहिती मिळते. त्याबद्दल तुमच्या टीम चे खूप खूप आभार …
  पण तुमच्या येणाऱ्या मेल का फॉरवर्ड करू शकत नाही…किंवा त्यामधील माहिती कॉपी करता येत नाही..तुम्ही जर ही फॅसिलिटी दिली तर खूप बरं होईल ..कारण ही माहिती मी व्हॉटसअप वर शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आली असती.

  Reply
  1. surendraphatak

   Namaskar Amar, Thanks for the compliments.. tumhi blog chi link ka nahi share karat? tya prakare lokanna aajcha analysis aani blog varche bakiche lekh pan miltil

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.