आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $ ५९ प्रती बॅरल ते US $ ६०.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.४० ते US $१= Rs ७०.७५ च्या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९६.९४ तर इंडिया VIX १९.६४ होता.

गेल्या आठवड्यात ओळीनी तीन दिवस मंदी होती. त्याचाच काहीसा परिणाम सोमवारी सुरुवातीला जाणवला. त्यानंतर मार्केट हळूहळू सुधारायला सुरुवात झाली. आणि मग बुल्स मैदानात उतरले आणि मार्केट संपेपर्यंत बेअर्सचा शिरकाव होऊ शकला नाही. FMCG क्षेत्रातील शेअर्स उदा नेसले, कोलगेट, डाबर ह्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.चीनमध्ये ग्रोथ कमी होत असल्याने मेटल क्षेत्रातील शेअर्स पडले. CPSE ETF मध्ये ONGC, कोल इंडिया सारख्या कंपन्यांचा समावेश केल्यामुळे हे शेअर पडले. सुमारे ३५० पाईंट मार्केट वर राहिले. आठवड्याची सुरुवात चांगले झाली. पण बर्याच मोठ्या घटना समोर असल्यामुळे ही तेजी टिकेल का हे प्रश्नचिन्ह सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे.

कृषी एक्स्पोर्ट पॉलिसीला मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. बासमती तांदूळ सोडून उरलेल्या प्रकारच्या तांदुळाच्या निर्यातीसाठी ५% सबसिडी मिळेल असे सरकारने जाहीर केले. म्हणून कोहिनूर फूड, LT फूड्स, KRBL असे तांदुळाशी संबंधित शेअर्स वाढले.

२४ डिसेंबर पासून विप्रो आणि अदानी पोर्ट सेन्सेक्समधून बाहेर पडतील आणि HCL टेक आणि बजाज फायनान्स यांचा समावेश होईल.

महिंद्रा आणि महिंद्राने नवीन ALTURAS G-४ ही कार लाँच केली. याची किंमत Rs २७ लाख ते Rs ३० लाखादरम्यान असेल.

ल्युपिनला पोटॅशियम क्लोराईड साठी USFDA ची मंजुरी मिळाली.

गोदरेज प्रॉपर्टीजनी हिरो सायकल बरोबर ऑफिस प्रॉपर्टी डेव्हलपमेंट साठी JV करण्याचा करार केला.

२२ नोव्हेम्बरला मॉरिशस स्थित SAIF II या कंपनीने जस्ट डायल या कंपनीमधील २.३८% स्टेक विकला.

SJVN या कंपनीला हिमाचल प्रदेशमध्ये ७८० MW चालू करण्याचा अधिकार दिला. हा अधिकार ७० वर्षांकरता दिला आहे.

१५ डिसेंबर २०१८ पर्यंत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील SBI आणि PNB सोडून बाकीच्या सरकारी बँकांमध्ये Rs ४२००० कोटी भांडवल घालेल.

येस बँकेने रिलायन्स म्युच्युअल फंड आणि टेम्पल्टन म्युच्युअल फंड यांच्याकडे काही शेअर्स प्लेज केले होते. येस बँकेचा शेअर मंदीमध्ये असल्यामुळे लोनसाठी ठेवलेल्या तारणाच्या रकमेत घट झाली. पण येस बँकेने मार्केट संपता संपता अशी माहिती दिली की त्यांनी Rs २०० कोटींचे प्रीपेमेन्ट केले.त्यामुळे गुंतवणूकदारांची काळजी थोडी कमी झाली.

२८ नोव्हेंबर २०१८ पासून अरविंदचे RESTRUCTURING होईल. २८ नोव्हेंबर २०१८ पासून ब्रँडेड एपरल्स आणि इंजिनीरिंग बिझिनेस वेगळे होतील.

विशेष लक्षवेधी

HEG ने Rs ५५०० प्रतिशेअर ( आजच्या CMP वर २५% प्रीमियमवर) १३.६० लाख शेअर BUY BACK करणार.
हूडकोचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. उत्पन्न वाढले पण प्रॉफिट मात्र तेवढ्या प्रमाणात वाढले नाही.
आज हिरो मोटो कॉर्पने इन्व्हर्स हेड आणि शोल्डर पॅटर्नचा ब्रेक आऊट दिला. त्यामुळे या शेअरमध्ये भरपूर तेजी होती.हा पॅटर्न मंदी दाखवतो. या पॅटर्नमध्ये ब्रेकआऊट दिला म्हणजे भविष्यात तेजी होईल असे दाखवतो. इन्व्हर्स हेड आणि शोल्डर या पॅटर्नविषयीची सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.

वेध उद्याचा

मार्केट ब्रेक्झिट आणि राज्य विधानसभांच्या निकालांना सामोरे जात आहे. त्यामुळे या १५ दिवसात मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार अपेक्षित आहेत. त्यामुळे शेअर्सची खरेदी किंवा विक्री करताना प्रत्येक शेअरची निवड काळजीपूर्वक करावी. या आठवड्यात गुरुवारी F &O ची एक्स्पायरी आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५३५४ NSE निर्देशांक निफ्टी १०६२८ आणि बँक निफ्टी २६३६५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.