आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $५९.७७ प्रती बॅरल ते US$ ५९.८५ या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८० ते US $१=Rs ७१.०४ या दरम्यान होता. VIX २०.४० तर PUT/कॉल रेशियो १.४६ होता.

बाल्टिक ड्राय निर्देशांक ८% ने वाढला. हा निर्दशांक वाढला की शिपिंग कंपन्यांचे शेअर वाढतात. हा निर्देशांक जहाज माल वाहतुकीच्या दरात किती वाढ झाली हे दर्शवतो. या दरात वाढ झाली की शिपिंग कंपन्यांना फायदा होतो. SCI, GE शिपिंग, मर्केटर यासारख्या कंपन्यांचं शेअर्स वाढतील.

चीन आणि USA ट्रेडवॉर मध्ये परस्पर फायदेशीर समझोत्यासाठी तयार आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रांनी सांगितले. त्यामुळे मार्केटमध्ये तेजीची लहर पसरली आणि मेटल संबंधित शेअर्स मध्ये खरेदी झाली.

बिनानी सिमेंटच्या रेझोल्यूशन प्रक्रियेतून IFCI ला Rs ४९२ कोटी मिळाले.

परदेशातून कर्ज काढण्याचे नियम थोडे ढिले केले. कव्हरेज रेशियो ७०% केला. याचा फायदा HDFC ला होईल.
मँगलोर केमिकल्सचे १.३३ लाख शेअर्स झुआरी ऍग्रो नी सोडवले. शेअर्स प्लेज केले की कंपनीने शेअर्स तारण ठेवून कर्ज काढले की शेअर पडतो. तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले की शेअर वाढतो

एस्सार स्टीलमधून Rs २५०० कोटींची वसुली PNB ला होईल. अशी बातमी असल्यामुळे PNB चा शेअर वाढला.
झायडस कॅडीला या कंपनीच्या BACLOFEM औषधाला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली त्यामुळे हा शेअर वाढला.

मर्क इलेक्ट्रॉनिक्स रिलायन्स रिटेलला टी व्ही सेट सप्लाय करणार आहे.

HEG या कंपनीकडे Rs १४०० कोटी कॅश आहे. यापैकी कंपनी शेअर BUY BACK साठी Rs ७५० कोटी खर्च करणार आहे.आणि बाकीची Rs ६५० कोटी कंपनीच्या बिझिनेसच्या विस्तारासाठी खर्च करणार आहे असे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले.

सन फार्मा US $ १० लाखात जपानस्थित डर्मटालॉजी क्षेत्रातील पोलो फार्मा या कंपनीचे अधिग्रहण करणार आहे.खरे पाहता आज हा शेअर वाढायला पाहजे होता सन फार्माच्या सबसिडीअरी च्या ऑडिट संबंधात काही खराब खबर आहे. अशी बातमी आली असल्यामुळे शेअरमधील तेजी टिकत नाही.

फ्यूचरचे संस्थापक बियाणी हे अमेझॉन बरोबर भविष्यात फ्युचर ग्रुप अमेझॉनने टेक ओव्हर करण्यासंबंधात वाटाघाटी करत आहेत.

सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये भांडवल घालणार होती त्याची रक्कम आता Rs ४२००० कोटीवरून Rs १००००० कोटीं पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

२७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१८ या दरम्यान USFDA ने ल्युपिन च्या तारापूर युनिटची तपासणी केली होती. त्यात एक त्रुटी मिळाली. USFDA ने ल्युपिनला EIR दिला.

सध्या मार्केटमध्ये व्हॉल्युम कमी असल्यामुळे तेजी टिकत नाही. आणि गुरुवारी एक्स्पायरी असल्यामुळे त्या दृष्टीकोनातून शेअर्स मध्ये तेजी मंदी दिसते आहे.

वेध उद्याचा

MONTE CARLO फॅशन्स या कंपनीची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मीटिंग आहे.
६३ मून या कम्पनीतील मेजॉरिटी स्टेक जपानी कंपनीला विकला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५१३ NSE निर्देशांक निफ्टी १०६८५ आणि बँक निफ्टी २६४४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.