आजचं मार्केट – २८ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $६०.८५ प्रती बॅरल ते US $ ६१.२० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.६४ ते US $१= Rs ७०.७४ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९७.३६ होता.

RBI ने डिसेंबर २०१८ मध्ये Rs ४००००कोटींचे बॉण्ड्स खरेदी करू असे सांगितले यामुळे मार्केटमधील लिक्विडीटी वाढेल. आणि गव्हर्नमेंट बॉण्ड यिल्ड ७.५०% होईल. या दोन्हीचाही फायदा NBFC आणि बँका यांना होईल. कॉस्ट ऑफ मनी कमी होईल.

FII आणि DII यांची शेअर्सची विक्री कमी झाली आहे आणि त्याविरुद्ध खरेदी वाढली आहे.

ल्युपिनचे CFO S. रमेश यांनी राजीनामा दिला. ते गेली १२ वर्ष ल्युपिन मध्ये कार्यरत होते. त्यांनी सांगितले की बेटर प्रॉस्पेक्टसाठी राजीनामा दिला. व्यक्ती मोठी की संस्था किंवा कंपनी मोठी असा प्रश्न उभा राहतो तेव्हा संस्था किंवा कंपनी मोठी असेच उत्तर मिळते. असे काही कारण घडल्यास सुरुवातीला शेअर पडतो नंतर त्यांच्या जागी दुसर्या येणाऱ्या माणसाच्या योग्यतेविषयी चर्चा सुरु होते आणि शेअर हळूहळू वाढतो. अशा वेळी कंपनीमध्ये तात्काळ असे काही घडलेले नसते जेणेकरून कंपनीचा फायदा कमी होईल. उलटपक्षी चांगला शेअर Rs १५ ते Rs २० स्वस्तात खरेदी करता येतो.

सन फार्माचा कॅनबेरी येथील प्लांट ते बंद करणार आहेत. सन फार्माचे रेटिंग कमी करण्यात आले.

रिअल इस्टेटवर स्टॅम्प ड्युटी वाढवली जाणार आहे त्यामुळे रिसेलिंग वर परिणाम होईल. आणि पर्यायाने रिअल इस्टेट क्षेत्रावरही परिणाम होईल.

IOB ही SIDBI आणि STCI मधील स्टेक विकून बाहेर पडणार आहे. याच प्रमाणे अनलिस्टेड कंपन्यांमधील स्टेक विकून आपली आर्थीक स्थिती सुधारण्याच्या विचारात आहे.

पिरामल फंडानी लोढा डेव्हलपर्सना कर्ज दिले आहे आणि हे कर्ज Rs १८०० कोटीनी वाढवणार आहेत.अशी बातमी आली. त्याचवेळेला लोढा डेव्हलपर्सचे बॉण्ड्स मात्र डिस्कॉउंटमध्ये म्हणजे US $ ८८.१४ ने विकले गेले. हा दर आधी US $ १०४.१३ एवढा होता.यामुळे पिरामल चा शेअर चांगलाच पडला होता. याबाबतीत लोढांच्या व्यवस्थापनाने खुलासा केला की आमचे US$ ३२५ मिलियनचे बॉण्ड्स आहेत त्यामधील फक्त ५ लाख बॉण्ड्सची खरेदी विक्री झाली. आमच्या बॉण्ड्समध्ये ट्रेडिंग होत नाही. ही खरेदी विक्री खासगी रित्या झाली आहे. त्याचे काही व्यक्तिगत कारण असू शकते. पण लोढा डेव्हलपर्स या कंपनीमध्ये लिक्विडीटी चांगली आहे. आम्ही प्रीपेमेन्ट केलेले आहे. फक्त प्रीमियम हौसिंग मध्ये थोडी फार समस्या आहे. आमची अनसोल्ड इन्व्हेन्टरी असली तरी त्यातून आम्हाला रेंटल इन्कम चांगले मिळत आहे. असा खुलासा ऐकताच पिरामलचा शेअर वाढायला सुरुवात झाली.

फ्युचर रिटेलमध्ये ९.५% स्टेक अमेझॉन खरेदी करणार आहे. शेअर्सच्या खरेदीत कॉल ऑप्शनचाही समावेश आहे. Rs ३२०० ते Rs ३५०० कोटींमध्ये हे डील होईल. कॉल ऑप्शनमध्ये नंतर स्टेक वाढवला जाईल.

आज अरविंद लिमिटेड एक्स डीमर्जर प्राईसला लिस्ट झाला. आता लिस्टेड अरविंद मध्ये फक्त त्यांच्या टेक्सटाईल कारभाराचा समावेश आहे. बाकीच्या विभांगांचे लिस्टिंग नंतर होईल. Rs ९०.२५ एवढा आज अरविंदचा भाव होता. अरविंद फॅशन LTD. अनवेशण हेवी इंजिनीअरिंग LTD. यांचे लिस्टिंग नंतर होईल. अरविंद लिमिटेड च्या शेअरला फारशी मागणी नव्हती कारण कापसाच्या किमती वाढत आहेत.

जेट एअरवेजचे प्रमोटर नरेश गोयल त्यांचा कंट्रोलिंग स्टेक विकायला तयार झाले आहेत. त्यांच्या ऐतिहाद आणि एअर फ्रांसच्या कन्सॉरशियम , DELTA ,आणि KLM यांच्या बरोबर वाटाघाटी सुरु आहेत. पण गोयल त्यांच्याकडे ५% स्टेक ठेवण्यास आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये सीट ठेवण्यास इच्छुक आहेत. पण एतिहाद कडे जेट एअरवेजमधील २४% स्टेक आहे ती एतिहाद ४९% पर्यंत वाढवेल. पण एतिहादला यासाठी फ्रेश कॅपिटल आणावे लागेल पण एतिहादची आर्थीक स्थिती एवढी चांगली नाही.

सध्या FMGC क्षेत्र तेजीत आहे त्याला प्रमुख कारण इलेक्शन स्पेंडिंग वाढल्यामुळे ग्रामीण मागणी चांगली निर्माण झाली आहे. आणि याचा परिणाम तिसर्या तिमाहीच्या निकालावर होईल असे वाटते.

येस बँकेने असे जाहीर केले की १३ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंग मध्ये दोन स्वतंत्र डायरेक्टर्स तसेच CEO च्या नेमणुकीसाठी काही प्रस्ताव आले असले तर त्यावर विचार होईल. तसेच येस बँकेने जाहीर केले की प्रमोटर कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे ‘एक्सटर्नल’ डील केलेले नाही. येस बँकेचे प्रमोटर्स राणा कपूर आणि मधू कपूर यांच्यात समझोत्याचे ९ कलमी अग्रीमेंट तयार केले आहे.

AAI ने लँडिंग चार्जेस आणि पार्किंग चार्जेस यांची बाकी Rs ११७ कोटी ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत भरण्यासाठी स्पाईस जेट या कंपनीला नोटीस पाठवली.

NGT ( नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) च्या कमिटीने वेदांताचा तुतिकोरिन येथील प्लांट बंद करण्याचा तामिळनाडू राज्य सरकारने घेतलेला निर्णय बरोबर नसल्याचे सांगितले. त्यांनी तामिळनाडू राज्य सरकारकडून या बाबतीत ७ दिवसात स्पष्टीकरण मागवले आहे.

वेदांताला बारमेर बेसिन मधील क्रूड निर्यात करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज हाय कोर्टाने फेटाळून लावला.

आज मध्यप्रदेश आणि मिझोराम मध्ये राज्य विधानसभांच्या निवडणुकांसाठी मतदान चालू आहे.

TRAI आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये मीटिंग झाली. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना इनकमिंग कॉल मिनिमम रिचार्जिंग साठी पत्र पाठवले. त्यात मोबाईलच्या अकॉउंट मध्ये बॅलन्स नसला तरी कनेक्शन कापू नये अशी सूचना केली. एअरटेल आणि वोडाफोन यांचे ग्राहक कमी झाले. पण रिलायन्स जियो चे ग्राहक १.३० कोटी वाढले.

HCC आणि ग्रॅनुअल्स या कंपन्या उद्यापासून F & O मधून बाहेर पडतील.

विशेष लक्षवेधी

  • EMPHASIS चा BUY बॅक ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१८ या कालावधीत आहे. BUY BACK साठी Rs १३५० प्रती शेअर या भावाने Rs ९८८ कोटी खर्च केले जातील. १ जानेवारी २०१९ रोजी BUY BACK केलेल्या शेअर्स चे पेमेंट केले जाईल.
  • NLC आज एक्स BUY BACK झाली. BUY बॅक प्राईस Rs ८८ होती.
  • कोची शिपयार्डचा BUY बॅक आजपासून सुरु झाला. BUY BACK प्राईस Rs ४५५ होती.
  • रिलायन्स कॅपिटल ही कंपनी टर्नअराउंड झाली. निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५७१६ NSE निर्देशांक निफ्टी १०७२८ आणि बँक निफ्टी २६४५७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २८ नोव्हेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.