आजचं मार्केट – २९ नोव्हेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ नोव्हेंबर २०१८

आज क्रूड US $५८.९७ प्रती बॅरल ते US $ ५९.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.८२ ते US $१=Rs ७०.०६ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.७३ तर VIX १७.४९ होता.

आज निफ्टीने २००डे मुविंग एव्हरेजचा टप्पा निर्णायकरित्या ओलांडला. सेन्सेक्स ५०० पाईंट तेजीत होते आणि निफ्टी १०० पाईंट तेजीत होते. याला सुधारलेला रुपया आणि स्वस्त झालेले क्रूड ही प्रमुख कारणे होत. त्याच बरोबर US $ WEAK झाला US बॉण्ड यिल्ड २.९९% झाले.

सध्या मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये विक्री दिसते आहे त्याविरुद्ध लोकांचा कल लार्ज कॅप शेअर्समध्ये वाढत आहे. येस बँकेतील गुंतवणूक काढून घेऊन ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार आपला मोर्चा ICICI बँकेकडे वळवताना दिसतात.

रुपयाचा विनिमर दर US $१=Rs ७५ असताना RBI ला US $विकून रुपयांची किंमत स्थिर ठेवावी लागली होती ढासळणार्या रुपयाला लगाम घालावा लागला होता. अन आता रुपया वधारल्यामुळे पुन्हा RBI परकीय चलनाचा साठा वाढवत असल्याची बातमी आहे.

टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे निकाल दुसऱ्या तिमाहीचे चांगले आले नव्हते. पण हे निकाल तिसऱ्या तिमाहीत क्रूडचा दर कमी झाल्यामुळे चांगले येतील असा अंदाज आहे.

आज अदानी एंटरप्रायझेसचा शेअर खूपच वाढला. ऑस्ट्रेलियातील कारमायकेल कोल माईन्सचे बांधकाम आणि रेल प्रोजेक्टचे ऑपरेशन लवकरच सुरु होईल असे त्यांचे CEO लुकास डाऊ यांनी सांगितले.

हिंदुस्थान युनी लिव्हर GSK कन्झ्युमरचा न्यूट्रिशन व्यवसाय US ३.४ बिलियन देऊन कॅशमध्ये डील करणार आहे. शेअर स्वॅप रेशियोची ऑफर बदलून ऑल कॅश डील होणार आहे. या डील मुळे HUL चि पोझिशनही मजबूत होईल.पुढील आठवड्यात या करारावर सह्या होतील नेस्ले या रेसमध्ये मागे पडली असे दिसते आहे.

सेबीने स्टॉक मेनिप्युलेशनच्या बाबतीत वकरांगीला क्लीन चिट दिल्यामुळे आज शेअर पाचव्यांदा वरच्या सर्किटला लागला.
NGT ने वेदांताच्या बाजुने आपले म्हणणे मांडले. प्लांट क्लोज करा असे सांगणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे असे NGT चे म्हणणे आहे. त्यामुळे वेदांताचा शेअर वाढला.

टाटा कम्युनिकेशनच्या द्वारे टाटा टेली खरेदी करण्याची योजना तूर्तास तरी टाटा ग्रुपने बासनात गुंडाळली .
स्पाईस जेटने US $ २.८३मिलियनची जादा बँक गॅरंटी दिली म्हणून शेअर वाढला. तर जेट एअरवेज मधील कंट्रोलिंग स्टेक घेण्यासाठी ऐतिहाद थर्ड पार्टिबरोबर बोलणी करत आहे असे समजताच जेट एअरवेजचा शेअर वाढला.

विशेष लक्षवेधी

बँक ऑफ महाराष्ट्र चा दुसर्या तिमाहीचा निकाल चांगला लागला. Rs २७ कोटी नफा झाला. बँक टर्न अराउंड झाली.

वेध उद्याचा

GDP डेटा, RBI ची पॉलिसी, ओपेक ची मीटिंग, विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. G -२० मीटिंग आणि शनिवारी XI जीन पिंग आणि ट्रम्प यांच्यात होणारी बोलणी याकडे सर्वांचे लक्ष आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१७० NSE निर्देशांक निफ्टी १०८५८ आणि बँक निफ्टी २६९३९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.