Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत . तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल
आजचं मार्केट – 3१ डिसेंबर २०१८
आज क्रूड US $ ५३.३२ प्रती बॅरल ते US $ ५४.४६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.७७ ते US $१= ६९.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३३ वर होता.
आज कोरिया चीन आणि जपान यांची शेअर मार्केट बंद होती. लोकांची सुट्टी अजूनही संपलेली नाही. २०१८ ची वर्षअखेर आणि २०१९ चे स्वागत करण्यासाठी पार्टीचा मूड असल्यामुळे मार्केटमध्ये व्हॉल्युम अतिशय कमी होते. ज्याचा शेवट गोड ते सारे गोड या हिशेबाने ट्रम्प साहेबांनी ट्रेड वॉरची तीव्रता कमी झाली असे सांगितले. चीन आणि USA यांच्यातील बोलणी सलोख्याने चालू आहेत प्रगतीपथावर आहेत. तोडगा दृष्टीपथात आहे असे सांगितले. त्यामुळे हाही धोका नव्हता. पण तरीही व्हॉल्युम कमी आहेत हे सातत्याने जाणवत होते.
मेरिको या कंपनीचा खोबरं हा कच्चा माल आहे. खोबऱ्याची MSP ( मिनिमम सपोर्ट प्राईस) Rs ७५११ प्रती क्विंटलवरून Rs ९५२१ केली. त्यामुळे मार्जिनवर परिणाम होईल. मेरिको ही वाढ ग्राहकांकडे पास ऑन करू शकली तर मार्जिन वर परिणाम होणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या परदेशी असलेल्या १० आणि बँक ऑफ बरोडा आपल्या परदेशी असलेल्या शाखा बंद करण्याचा विचार करत आहे.
कोटक महिंद्रा बँकेच्या प्रमोटर्सची त्यांचे शेअरहोल्डिंग २०% पेक्षा कमी करण्याची RBI ने दिलेली मुदत ३१ डिसेम्बरला संपत आहे. या विरुद्ध कोटक बँकेने कोर्टात अपील केले आहे. RBIने आपण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत थांबायला तयार आहे असे सांगितले.
श्री अमिताव चौधरी हे ऍक्सिस बँकेची चेअरमन आणि CEO म्हणून १ जानेवारी २०१९ पासून कार्यभार सांभाळतील.
RBI अनरिअलाइझ्ड गेन्स या हेडींग खाली जी रक्कम असेल ती रक्कम सरकारला लाभांश देण्यासाठी विचारात घेणार नाही असे सांगितले.
विशेष लक्षवेधी
- KIOCL( कुद्रेमुख आयर्न ओअर) चा FPO ( फॉलोऑन पब्लिक इशू) येत आहे हे समजताच शेअर १०% वाढला. त्याच बरोबर सरकार ६ कंपन्यांचे IPO आणत आहे. THDCIL ( टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन), TCIL (टेलिकम्युनिकेशन कन्सल्टन्ट ऑफ इंडिया) , RAILTEL,NSC,( नॅशनल सीड कॉर्पोरेशन) WAPCOS ( वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) , FAGMIL (FCI अरवली जिप्सम मिनरल्स)
- टेक महिंद्राच्या Rs ८२२ कोटीच्या FD जप्त करण्याच्या ED च्या ऑर्डरला हैदराबाद हाय कोर्टाने स्थगिती दिली.
म्युझिक ब्रॉडकास्ट या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने कंपनीच्या १ शेअरचे ५ शेअर्स मध्ये स्प्लिट करण्यासाठी मंजुरी दिली. - RBI ने NBFC आणी HFC ना सवलतीच्या दरात कर्ज मिळण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली.
जेट एअरवेजची SBI बरोबर वर्किंग कॅपिटल आणि पेमेंट ऑब्लिगेशन साठी Rs १५०० कोटी कर्जासाठी बोलणी चालू आहेत. त्यामुळे जेट एअरवेज चा शेअर वाढला. - सेलन एक्स्प्लोरेशन ही कंपनी Rs ३०० प्रती शेअर या दराने शेअर BUY BACK करेल. या साठी Rs २५ कोटी खर्च करेल.
सरकार ७ सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये Rs २८६१५ कोटीच्या रिकॅपिटलायझेशन बॉण्ड्सच्या रूपात भांडवल घालणार आहे . सेंट्रल बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक, यूको बँक, OBC या त्या बँका आहेत. - बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि OBC या PCA मधून बाहेर येतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
वेध उद्याचा
- १ जानेवारी २०१९ रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील.
- ओपेक आपले उत्पादनातील कपातीचे धोरण १ जानेवारी २०१९ रोजी जाहीर करून अमलात आणेल.
कतार ओपेक मधून १ जानेवारी २०१९ पासून बाहेर पडेल.
BSE निर्देशांक ३६०६८ वर NSE निर्देशांक निफ्टी १०८६२ वर तर बँक निफ्टी २७१६० वर बंद झाले
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!